हरदोजणा नफरांच्या तकरीरा मनास आणून मौजेमजकूर बलुते कोनेखुटे यांसि तलब करून आणिले.
सोनोरी |
मोकदम मोजे खानवड |
त्यांचे डोईवर सुकुरत घालून गोही पुसिली तिही X X X उभयवर्ग साठी सत्तर वरसे भांडताती यांचे निवाडे जाले नाहींत कुंभारकर पाटीलकी चालविता होता तो खांडगियानी मारा करून भांडण बहुत दिवस आहे आतां हरदोजण दिव्यास राजी जाले आहेत दिव्य करितील खरा होईल तो खाईल खोटा होईल तो तुटला जाईल. ऐसी गोही जालियावर जाऊ पाटील व अंचल पाटिल खलदास गोतामधें गेला होता X X X जे अंचलपाटिलानें रवा करणे साधून खाणे म्हणऊन खलदच्या X X X त्यावर तान पाटील कुंभारकर दिव्यास राजी जाला यावर ठाणाहून पांढरीवर दिव्य करावे ऐसा तह करून पाठविले आधले दिवसी हत धोऊन हाती पिसवीया घातलिया एरे दिवसी श्रीशके १५३० कीलक नाम संवछरे जेस्ट वद्य एकादशी रविवार छ २४ माहे सफर
विठल तानदेऊ अजहत | लिंगो पंडित ठाणेदार |
कृष्णाजी त्रिमल मुश्रीफ | कर्याती सासवड |
X X X पाटिल मोकदम | मालोजी नरसिंगराऊ सितोले |
क॥ पुणे | देशमुख यांचे अजहत त्रिंबक |
उमाजी मोकदम | पिलदेव व एकोजी सितोले |
मौजे वाल्हे बाऊजी मोकदम मौजे भिवरी जाऊ पाटिल मोकदम मौजे वाघापूर |
व कृष्णाजी चौधरी व देश- कुलकर्णी यांचा यारेदी रंगो श्रीपति कसबे सासवड गणाजी व बालोजी व |
हिरोजी मोकदम लखोजी | |
सताजी व बोपाजी | बाबाजी दाणी |
मोकदम मौजे पारगाऊ | देऊजी कासार |
बाद पाटिल मोकदम मौजे भिवडी X X X पाटील मोकदम मौजे एकवडी बाल माली चौगुला मौजे सानवडी बाबाजी नेलेकर व जानोजी खैरा मौजे कोढित खुर्द |
रूपाजी सेटिया व मालजी सेटिया माहाजन दमसेट रंगारा क॥ जेजूरी बालसेट सेटिया भिका सुतार बालोजी बुरुंजा हशम नाईक जथे कान्होजी बाबर |
या हुजूर तान पाटिल बिन अंचलपाटील सुश्चातत होऊन पत्र भाखा बांधोन मौजे मजकुरीचे बहिरवाचे देवलापुढें तपत माहादिव्य तानपाटिलें सात हि मंडलें चालोन रवा काढिला व पाटिल खांडगे याने साउली केली होती हाती पिसविया घालून तेथून स्वार होऊन छ २६ माहे सफरी सीसंबेचे रोजी हातीच्या पिसविया काढिल्या बिहुजूर मजालस मौजे वाल्हे
विठल तानदेऊ अजहत कृष्णाजी त्रिमल मुश्रीफ त्रिंबक पीलदेव व एकोजी सितोले व कृष्णाजी चौधरी अजहत मालोजी सितोले देसमुख व रंगो श्रीपत यारीदी देशकुलकर्णी पाटिल मोकदम मौजे वडगाऊ सुलतानजी मोकदम मौजे साकुर्डे रुद्राजी जाधव व जनाजी खैरा मौजे काडीत खुर्द |
सांगो माऊजी सरसंमत कर्हेपठार |
X X X हात पाहिला चोखट निघाला तानपाटिल कुंभारकर खरा जाला यावर ठाणियास तानपाटिल व जाऊपाटिल आणिले हाजीर मजालसीस तानपाटिलाचा हात पाहिला तानपाटील खरा जाला तानपाटिल कुंभारकर आपली औलियाद व अफलादी लेकराचे लेकुरी आपली पाटिलकी खाणे