लेखांक २.
१५२४ आषाढ शुध्द ३.
॥ अज रख्तखाने खोदायवंद खान अलीशान ख॥ हैबतखान साहेब अलीदयाम दौलतहू तं॥ कारकुनानि पा। पुण्हे बिदानद की ह॥ सु॥ सन अलास अलफ जमीन एक चावर ५१ दर सवाद मौजे परवती ब॥ सन नाम बाजी अजरामर्हामती बे॥ तानाजीराम देसकुलकर्णी प॥ मजकूर जमीन दे॥ माहासूल व नख्तयाती दिल्हे आहे दुबाला कीजे. तालीक लीहून घेउनु असली परतेतु दीजे. बाबती सेत बादुनु दुबाला कीजे औलीयाद वा अफवाद चालवीजे. तेरीख १ माहे मोहरम.
तानाजी वलद रामाजी वलद होनाजी देशपांडे प्रांत पुणें-होनप.