Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
उपनामव्युत्पत्तिकोश
आराध्ये - राध् संसिद्धौ. आराधिकः = आराध्या (आडनांव धंद्यावरून ) ( धा. सा. श. )
आसकारे - आयस्कारयः (स)
आस्वल - आश्वलायनाः (स)
इ
इडविडे - ऐलविलाः (स)
उ
उखळे - उलूखलः (स)
उंचमाने - उच्चैर्मन्यवः (स )
उपाध्ये - (पाध्ये पहा)
उंबरे - औदुंबरायणाः (स ) ( क )
उमराणी - कर्हाडप्रांतीं उमराणी हें आडनांव देशस्थ ब्राह्मणांत आहे. औदुंबरायणिः = उंबराअणि = उमराणी. उदुंबराचा पोर औदुंबरायण. त्याचा पोर औदुंबरायणि. (भा. इ. १८३३)
उसणारे - १ हें आडनांव महाराष्ट्रांत ब्राह्मणादिकांत आहे. हें उशीनरस् या संस्कृत जनपददेशवाचक शब्दापासून आलेलें दिसतें. (भा. इ. १८३२)
-२ औषीनराः (स)
उळवे - औलपीयाः = उळवे.
ए
एडके -ऐरक्याः (स)
ओ
ओगले - औकुलाः (स) कों )
ओगवे - १ औपगवि: (स )
-२ औपगवः = ओगवे (औपगवस्य अपत्यं ) (स)
-३ ( उपगोः अपत्यं पुमान्) औपगवः = ओगवा.
ओगुले - औकुलाः (स)
ओझा - (पाध्ये पहा)
ओडलमने - औदलाः मन्याः च ( स )
ओझे - बौध्याः (स)
ओरपे - औलोप्याः (क) (स)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
टिकें [त्रिकं (तीन रस्ते मिळण्याची जागा १) = टिकें ] टिक्या वर भाजी मिळते म्हणजे तीन रस्ते मिळण्याच्या जागीं भाजी मिळते.
टिक्का [ तिलककः = टिक्का ]
टिपण [ तिप् १ क्षेपे ] ( धा. सा. श. )
टिंब १ [ डिंब egg = टिंब ( अंड्यासारखें वाटोळें ) ]
-२ [ डिंब = टिंब ( शाईच्या लेखणीनें काढलेलें सूक्ष्म वर्तुळ, ठिपका ) ] डिंब म्हणजे लहान गोळी.
टिमकी [ स्थंभकिन्। ] ( टमकी पहा )
टिरी १ [ त्रिका, त्रिकं = टिरी ( वंशान्धः )]
-२ [ त्रिक = टिरिअ = टीर-री ] (भा. इ. १८३४)
टिळा [ तिलक = टिळअ = टिळा ]
टीर [ त्रिक ] ( टिरी २ पहा )
टुक [ त्वकः ( एकः अन्यतरः ) = टुक ] टुकटुक माकड (म्हणजे तें तें माकड) असें म्हणून पोरें एकमेकांना वेडावतात.
टुकटुक [ दृश् = टुकटुकणें to look wistfully ]
टुकटुकणें [ दृश् = टुकटुकणें to look wistfully ]
टुकटुक माकड [ तक् हसने । तकतकं = टकटक = टुकटुक ] बोटानें वेडावून पोरें कांहीं पदार्थ खात खात एकमेकांना हंसतात तें.
टुकडा [ त्वक्षः = टुकडा ]
टुचकन् [ तुद् to wound = टुच् ]
टुणकन् १ [ तुर्ण]
-२ [ तुण to curve ]
-३ [ त्वङ्ग् ( Gallop ) = टुण (कन्) ] (भा. इ. १८३५)
-४ [ त्वङ्ग to leap Whitney ]
टुणटुण [ तूर्णंतूर्णं = टुणटुण (उडतो) ]
टू [ टुः (रूप बदलणारा प्राणी) = टू] एक होती ऊ, तिला झाली टू.
टूरटूर [ तूः तूः ( त्वर् गतौ) = टूरटूर ] अतिघाई, तातड. टूरटूर नको म्हणजे घाई नको.
टेंटू १ [ टिंटुकः = टेंटू ( वनस्पति) ]
-२ [ टुंटुकः = टेंटू ( वनस्पति ) ]
टेर [ टट्टरी = टेर. टट्टरी मृषावादः ] टेर उडवणें म्ह० थट्टा करणें.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
टांग १ [टंग, टंक = टांग ] (स. मं. )
-२ [टंगा = टांग, तंगडी, टंगडी ] (भा. इ. १८३३)
टांगें [ शिक्षा देतांना शेंडीनें जो अवयव टांगतात तो ] (स. मं. )
टांच १ [ तञ्च् १ संकोचने, तंचा = टांच ] सरकारनॆ टांच देणें. तंचतिः = टंचाई. ( धा. सा. श. )
-२ [ तञ्च् क्षीण करणें. तंच = टांच ]
सावकारानें टांच देणें म्हणजे कर्जाच्या उगवणीकरितां ऋणकोला क्षीण करणें. टांच आणणें असा हि प्रयोग आहे.
-३ [ ज्या अवयवानें पाखरें किंवा पशु शत्रूला टांचतात म्हणजे मारतात तो ] (स. मं. )
टांच आण [ तज्च् १ गतौ ] (धातुकोश-टांचा २ पहा)
टांचण [ तञ्च् १ गतौ तञ्चन ] ,,
टांच दे [ तञ्च १ गतौ ] ,,
टारगा १ [(नारी) तरंगक = टरंगा = टारगा ]
-२ [ टार एव टारकः . टारकः ( गांडू ) = टारगा ]
-३ [ ( टारः ) टारकः ( catamite ) = टारगा ] ( कुत्सितार्थी ) टारगट. (भा. इ. १८३७)
टाळ [ ताली time beating instrument वैजयंती कोश = टाळ ]
टाळकें १ [ तालूषकं = टाळकें ]
-२ [ तालकं = टाळकं = टाळकें ] (स. मं.)
-३ [ ताल = तालक = टाळक = टाळकें. टाळक = टाकल = टक्कल = टकलें. ताल = डोक्याची कवटी. ] (ग्रंथमाला)
टाळू [ तालु = ताळू= टाळू] (स. मं.)
टाळें १ [ तालम् = टाळँ = टाळें (कुलूप)] (ग्रंथमाला)
-२ [ तालकं = टाळें ( कुलूप ) ]
टिकणें [ टिकृ गतौ ] माझ्या बरोबर टिकतो = माझ्या बरोबर चालतो, दम धरतो. लुगडें टिकलें = गेलें. (ग्रंथमाला)
टिकला [ तिलकः = (वर्णविपर्यय ) टिकला ]
टिकली [ तिलकिका = टिकली ]
टिकाउ [ तितिक्षु = टिखाउ = टिकाउ ] टिकाउ म्हणजे दमदार. नाम टिकाव. (भा. इ. १८३५)
टिकाव धर [ तक् १ कृच्छ्रजीवने (तितक) ] (धातुकोश-टिक २ पहा)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
टरांव [ तरन्त = टरांव (बेडकाचें ओरडणें ) ] (भा. इ. १८३४)
टवका १ [ त्वचक: = टवका. त्वच् ६ संवरणे ]
-२ [ त्वक्= टवक. त्वचा (का) = टवका ] टवका म्ह० बाहेरील पापुद्रा. ( भा. इ. १८३४)
टवचणें [ त्वचय = टवच. त्वचं गृहणाति-त्वचयति ]
टवटवीत [ तु २ गतिवृद्धिहिंसासु ] ( धातुकोश-टवटव पहा)
टवळी [ तपनी ] ( तपेली पहा)
टळटळित, टळटळी, टळटळीत [ तल् १० तपने द्वित्त ] ( धातुकोश-टळटळ पहा)
टाऊक १ [ टौक् to go = टाऊक. टौकते ]
-२ [ तावत्क = टाउक्क = टाऊक ] तावत्क म्हणजे अमुक थोड्या किंमतीस घेतलेला पदार्थ.
टांक [ टंक छाप मारणें. टंक = टांक (देवांतला) ] टंक या क्रियापदाचें टच असें हि एक रूप असावें. टच हें रूप संस्कृत कोशांत नाही; परंतु तदुत्पन्न टांच हा धातू मराठीत आहे. त्यावरून अनुमान होतें कीं, संस्कृतांत जरी नाहीं, तरी तत्कालीन प्रांतिक भाषांत टंच, टाँच हा धातू असावा. (भा. इ. १८३३ )
टाकणें [ त्याग = टाक ] टाकणें म्ह० त्यजणें, सोडून देणें. ( भा. इ. १८३४)
टांकणें [ स्तक् = टकणें. टाकणें ( प्रयोजक) ] हात टाकतो = हस्तं स्तकयति. (भा. इ १८३३)
टाकला [ तर्क् - तर्कितः ] तो कसा अगदीं टाकलेला आला म्ह० तर्क केल्याप्रमाणें हुबेहूब आला. (धातुकोश-टाक ३ पहा)
टाकळा १ [ तर्कारी = टक्वाली = टाकळी. तर्कारः = टक्काला = टाकळा ]
-२ [ तर्करी वैजयंतिका । ] टाकळा ( वनस्पति). (केयदेव-पथ्यापथ्य विबोध) ( भा. इ. १८३४)
टांका (चोईचा, दोर्याचा) [ टंक् बांधणें. टंकक = टाँकअ = टाँका ] (भा. इ. १८३३)
टांकारी [ टंकाहारी = टांकारी ]
टांकी [ टंकिका = टांकी ]
टाकीव [ त्यागिमं = टाकीव ] त्यागेन निर्वृतं त्यागिमं (४-४-२०)
टाकोटाक [ त्राक् वा टाक् = द्राक् वा टाक् = टाकोटाक ] टाकोटाक म्हणजे ताबडतोब. (भा. इ. १८३३)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ट
टक [ (दृश् १ प्रेक्षणे ) दृक् = डक् = टक ] टक लावणें म्हणजे दृष्टि लावून बसणें.
टकलें [ ताल-तालक ] ( टाळकें ३ पहा)
टका [ टंकक = टकअ = टक. टंक = टांक ]
येथें पहिल्या उदाहरणांत अपभ्रंश होतांना अनुस्वाराचा लोप झाला आहे, व दुसर्या उदाहरणांत अनुस्वाराचा अनुनासिक झाला आहे. (भा. इ. १८३३)
टक्कर [ (स्त्री) टक्कर (blow on the head ) = टक्कर ( स्त्री ) ] (भा. इ. १८३५)
टक्कल [ ताल-तालक ] ( टाळकें ३ पहा)
टंगडी [टंगा] (टांग पहा)
टंगळमंगळ १ [ तङ्गनं मंङ्गनं = टंगळमंगळ. तङ्ग् स्खलने व मङ्ग् गतौ ] टंगळमंगळ म्ह० स्खलन, चुकारपणा. (भा. इ. १८३६)
-२ [तग् (तंग्) अडखळणें व मंघ् फसविणें. तंग+ मंघ् ] टंगळमंगळ म्ह० अडवणूक व फसवणूक करणें.
टचकारा [ त्वचाग्रहः = टचकारा ]
टंचाई १ [ तंच् संकोचने. तंचतिः = टंचाई ] संकोच, अल्पीभाव.
टचकन् [ तस् ४ उपक्षये ] ( धातुकोश-टचक पहा)
टणक [ तर्णक = टणक ] तर्णक = वत्स young.
टणका [ तर्णकः (वत्सः young one) = टणका ]
टपाल [ तल्प = टप्प (ल स्वार्थक ) = टपाल ]
बरें टपाल हंटलें = वरं तल्पं साधितं. टपाल म्हणजे बीभत्स मराठींत स्त्री. तल्प म्हणजे मंचक, खाटलें. त्यावरून खाटल्यावरील स्त्री. टपाल वाजविणें असाही प्रयोग आहे. टपाल वाजविणें म्हणजे बाज वाजवणें.
टप्पा [ अष्टपदी = अठ्ठपई = ठ्ठुपी = टप्पा असा परंपरेनें हा शब्द आला आहे ] (स. मं.)
टमकी [ स्थंभकिन् = टंम्हकि = टमकी = टिमकी ] स्थंभकिन् म्हणजे दोन्ही बाजूंनीं कातड्यानें मढविलेलें वाद्य.
टरकणें [ तर्क = टरक ] टरकणें म्ह• बुद्धि चंचळ होणें. (भा. इ. १८३४)
टरकन् पाद [ तर्क ] (धातुकोश-टरक १ पहा)
टरकन् फाड [ तर्क् ] ,,
टरबुज [ तरंबुज = टरबुज. तरत् अंबु = तरंबु (कर्क-धुवत् समास) तरंबुनि जातं तरंबुजं ] (भा. इ. १८३४)
टरारणें [ तरुणयति = टरारणें ] तरुणयति म्हणजे अतिशयें करून होणें. पुरी टरारून फुगली म्हणजे अतिशयें करून फुगली. ( भा. इ. १८३७ )
उपनामव्युत्पत्तिकोश
अ
अगस्ते - अगस्तिः ( स )
अत्रे - आत्रेयाः ( स )
अदकारी, अधिकारी, अधिकारी - अधिकारिः ( स ) अधिकारी - अधिकारिः ( क )
अंधे - १ अंधक: ( स )
-२ अधलः (स)
अनंतपइ प्रभु - हें नांव वसईस सांपडलेल्या शक १०८२ च्या शिलालेखावर आहे. अनंतपति = अनंतपइ (ग्रंथमाला)
अंबार्डेकर - ग्रामनामावरून ( क )
अवटे - अवट्याः (स)
अवतणे - अवतानाः (स)
अवस्ति - औत्साः ( स )
अष्टपुत्रे - अष्टकिपुत्रः (स)
आ
आगटे - आगस्त्याः (क) (स)
आंगरे - १ आंगिरसाः (स)
-२ अंगराजः = अंगराअ = आंगरा - रे.
आंगरे हे अंगदेशांतील राजे मूळचे.
आगलावे - अग्निलोमन् (स)
आगलोवे - अग्निलोमन् (स )
आगाशे - १ आकशायेयाः (स)
-२ आकशायेयाः (कों)
आचवळ - आश्वलाः (स) ( कों)
आचारी - आचर्या: (स)
आचार्य - आचर्याः ( स ) ( कों )
आचार्ये - आचर्या: (क)
आज्ये - अजाः ( क ) ( स )
आठवेले - (अष्ट ) पैलाः (कों)
आत्रे - आत्रेयाः (स)
आथर्वण - १ आथर्वणिक (पुरोहित ) = आथर्वण. हें देशस्थांत आडनांव आहे.
-२ आथर्वणिकाः (स)
आद्ये - आद्यहया: (क) (स)
आंबिके - आंबिकेयाः (स)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
झुळझुळ वाहणें [ श्वल् आशुगमने = झुळझुळ ]
झुळुक [ सृक: ] (झुरका ३ पहा)
झूल [ हुल् आच्छादने होलति, जुहुल्= झूल ] coverlet of an ox, horse, elephant.
झेंगट [ संगतम् = झंगट, झेंगट ] (झंगट पहा)
झेट् [ जिहेठ्] ( झट् पहा)
झेंडा [ ध्वजदंड: = झयअंडा = झेंडा ] प्राकृतांत ध्वज चा अपभ्रंश झय होतो.
झोका [ धक्कः; धक्क् नाशने ] (धकाधकी पहा)
झोट १ [ जूट: = झोट ]
-२ [ सुभटः = झोट ]
झोटिंग [ जोटिगस्तु महाव्रतिः (त्रिकांडशेष)] ( ग्रंथमाला)
झोड १ [ संप्रवृत्तिः set about vigorously = झोड ] कामाची झोड उडवून देणें.
-२ [ संप्रवृष्टिः to be continuously raining = झोड ] पावसाची झोड.
-३ [ हुड् to go जुहुड = झोड ] to approach assiduously anything. o वर झोड उडवून देणें, झोडणें.
-४ [समृद्धि = झोड ] plenty. पैश्याची, कामाची झोड उठविली acquired plenty of money.
झोंड १ [ जोहुंडय = झोंड. हुंड् १ संघाते ] झोंड म्ह. गर्दी करणारा. ( धा. सा. श. )
-२ [ यवीयुध् eager to fight, warlike = झोंड ] warlike, eagar to fight.
झोत १ [ स्रोत: ( निम्नगा-रये) = झोत = धोत ]
-२ [ श्रोतस् = सोत्त = झोत, घोत ]
झोपा, झोंपा [ यूपः = जोपा = झोपा, झोंपा ] वईच्या दाराला झोंपा म्हणतात.
झोल [हुल् १ सरणे. जोहुल्य = झोल] ( धा. सा. श.)
झ्या [ झ्यावस्व = झ्या. झ्यु गतौ ] झ्या म्हणजे चल, निघ, चाल.
झ्या ! झ्या ! [ झ्यु to move, to go झ्याव, झ्याव (imp. second, sing. ) = झ्या ! झ्या ! ]
झ्याट् १ [ ( निपात) स्यात् न गमिष्यामि = झ्याट् ! नाहीं जाणार = may be, I wont go ] झ्याट् = काय होऊल तें होवो. झ्याट् हा शब्द शिवी नाहीं. शिवी असती तर लोक सररहा घरांत बायकापोरांदेखत तो उच्चारते ना. ( भा. इ. १८३४)
-२ [ जिहेठ्] ( झट् पहा)
झ्याट् मारी [स्यात् मारी =झ्याट् मारी ] मारी म्हणजे दुर्गादेवी (स्मशानांतील) स्यात् मारी म्हणजे मारी असेना. हे दोन शब्द हि गाळी नाहींत. (भा. इ. १८३४)
उपनामव्युत्पत्तिकोश
देवरुखे, पळशे, सवाशे, शेणवई, तिर्गूळ, गोळक, वगैरेंच्या आडनांवांची हि वरीलप्रमाणें च व्यवस्था असलेली दिसेल, ह्यांचीं गोत्रें मीं अद्याप जमविलीं नाहींत.
क्षत्रिय दोन प्रकारचे, सार्ष व अनार्ष. पुरोहितप्रवरो राज्ञां असें आश्वलायन श्रौतसूत्रांत म्हटलेलें आहे. तत्रापि, शुंग, मौर्य गुप्त, शालिवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, बाण, इंद्र, चालुक्य, चौलुक्य, गुहिल, गांग, गुप्त, सिंद, वगैरे आडनांवें गोत्रमामें असलेलीं स्पष्ट दिसतात. ताम्रशिलापट्टांत हारीत, आंगिरसहारीत, काश्यप, कौंडिन्य, मानव्य, वगैरे गोत्रें क्षत्रियांचीं दिलेलीं आढळतात. वासिष्ठीपुत्र, गौतमीपुत्र, माठरीपुत्र, वगैरे नांवें जशीं शातवाहनवंशांत सांपडतात तशीं ब्राह्मणांतील आचार्यवंशपरंपरेत हि सांपडतात. काळे, पांढरे, गोरे, गोळे, गाढवे, साठे, वगैरे गोत्रनामोत्पन्न आडनांवें मराठ्यांत अद्याप आहेत. त्यावरून असें दिसतें कीं, मराठ्यांत ऊर्फ क्षत्रियांत ब्राह्मणांच्या प्रमाणें च गोत्रें आहेत. परंतु, इतकें खरें कीं, क्षत्रियांचीं गोत्रें व प्रवर त्यांना तोंडपाठ असण्यापेक्षां त्यांच्या पुरोहितांना जास्त तोंडपाठ असत. उघड च आहे, इतर विवंचनेपुढें गोत्रांकडे लक्ष्य देण्यास त्यांना वेळ नसे. ब्राह्मणानां राजार्पितानां राज्ञां वा ब्राह्मणार्पितानां, असें सूत्रवचन आहे. राजाला अर्पण केलेल्या ब्राह्मणाचें गोत्र जें राजाचें तें, व ब्राह्मणाला अर्पण केलेल्या राजाचें गोत्र जें ब्राह्मणाचें तें, असा प्रघात असे. वैश्यांची हि हीच तर्हा. जैन लोकांत गोत्रें आहेत. तीं हि गोत्रांचा अभ्यास करणार्याला जुळविणें मोठं फलप्रद होईल यांत संशय नाहीं.
गाणगारि वगैरे तांडिन आचार्य सर्ववर्ण एकार्षेय मानीत. सर्ववर्णांचें आर्ष ' मानव ' असें तें म्हणत. त्याला आधार, मानव्यो हि प्रजा इति हि ब्राह्मणं । हा देत. परंतु, हें एकप्रवराचें व एकगोत्राचें मत श्रौतकर्मवरणांत मान्य करीत, विवाहादिसंस्कारांत मान्य करीत नसत. कारण, तसें केल्यास समानप्रवर्यांचा विवाह होऊं लागेल अशी अडचण येई व समानप्रवरांचा विवाह आर्यांना केव्हां हि मान्य नसे. तात्पर्य, एकप्रवरत्वाचें हें मत सर्वसंमत होण्यासारखें नव्हतें. तत्त्वतः सर्व प्रजा मनूपासून निघाली असें मानीत. परंतु व्यवहारांत असंख्य गोत्रें व असमानप्रवरविवाह चालू असत.
१२ येणेंप्रमाणें कर्हाडे, कोंकणस्थ व देशस्थ यांच्या गोत्रांची परंपरा आहे. सप्तर्षीपर्यंत यांचीं गोत्रें जातात व तेथपासून आतांपर्यंत व आपल्यापर्यंत वंश आणून भिडवितां येतो. अशा ह्या वंशांत अहिंदूचा समावेश होण्याचा बिलकुल संभव व शक्यता नाहीं. अगस्तीसह आठ ऋषि, ४९ प्रवर व अर्बुद गोत्रे, नंतर प्राकृत गोत्रें व नंतर मराठी आडनांवें, अशी अव्याहत परंपरा आहे. भारतीय आर्यांचा वंश येणेंप्रमाणें महाराष्ट्रांत बिनतूट व अस्खखित चालत आलेला आहे. वंशेतिहासाचीं आपल्या इकडे जितकीं साधनें आहेत तितकीं विपुल साधनें अन्य देशांत व अन्य समाजांत क्वचित् च सांपडतील.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
झालें १ [ ( जन् ) जात + ल = जाल = झाल ] हें याचें झालें.
-२ [ सो (to bring to an end)-सित = झिअ + ल = झिअल = झ्याल = झालें ] त्याचा धडा झाला he has ended his lesson.
झालेला [ ज्या ] ( धातुकोश-झा पहा)
झिंगा [ चिंगेटः = झिंगा ] a kind of fish.
झिटकारणें [ हट् निंदायां ] ( हटकारणें पहा)
झिटी [ झिंटि (झुडुप) = झिटी, झिपरी ] (भा. इ. १८३३)
झिपरी १ [ झिंटि ] (झिटी पहा)
-२ [ झंपटिः unbound mass of hair = झपरी) = झिपरी (वैजयंती कोश) ]
झिमझिम [ जिह्मजिह्मं = झिमझिम ] जिह्म म्हणजे मंद. झिमझिम म्हणजे मंदमंद.
झिम्मा [ हम्म् गतौ Freq जिहम्म् = झिम्मा ] a sport.
झिरका [ जीर्विका = झिरका. झिरका = झिडका = झिटका = इटका ] झिरका व झटका हीं एका वाहनाचीं नांवें आहेत.
जीर्वि म्हणजे गाडी.
झिरझिरीत [ झृष् वयोहानौ ] क्षिरक्षिरीत वस्त्र म्हणजे कालान्तरानें जीर्ण झालेलें वस्र. ( भा. इ. १८३३)
झिरझिरे [ झर्झरीकं ( शरीरं) = झिरझिरें शरीर ( कृश शरीर) उणादि सूत्राणि ]
झिरा [ सरित् ] ( धातुकोश-झिरप पहा)
झिळमिळ्या [चिलमीलिका a kind of necklace like a luminous flying insect = झिळमिळ्या ) एक दागिना.
झुंजूमुंजू [ संध्यामंदसंध्या = झंज्यामंझ्या = झुंजूमुंजू ] किंचित् दिसावयाला लागतें इतकी संघ्यावेला.
झुट् ( निपात ) [ युत् (कुत्सने निपातः ) = जुट् = झुट्, छुट्, छट, हुट् ] ( भा. इ. १८३४)
झुपका, झुबका [ स्तबक: (पुष्पांचा घोस ) ]
झुरका १ [ सरकः = झरका = झुरका ]
सरक म्हणजे दारूचा घोट.
झुरका म्हणजे तंबाखूच्या धुराचा घोट.
मूल शब्द झरका असा होता, त्याचा अपभ्रंश झुरका.
-२ [सृ १ गतौ. सृक = स्रुक = झुरका = झुळूक.
सृपाटिका = झपाटिका ] ( धा. सा. श. )
-३ [सृक: (वार्याची झुळूक) = झुरका. सृक: = स्रुका = झुरुका = झुळूक, झुरका ]
-४ [ सरकः (दारू पिण्याचें कृत्य) = झरका, झुरका ( तंबाखूचा, दारूचा, विडीचा ) ] (भा. इ. १८३४)
झुरणें १ [ शृ = झुरणें ] शीर्यते वन एव वा = वनांत झुरतो. (भा. इ. १८३४)
-२ [ जूरि वयोहान्यां ] (ग्रंथमाला)
झुलणें, झुलवणें, झुलावणें [ धूलति = झुलणें.
धूलयति = झुलवणें, धूलापयति = झुलावणें ] (भा. इ. १८३६)
झुलवा [ अध्युव्हाहः marriage = ( अलोप ) झुलवा ] रंडीचा झुलवा.
उपनामव्युत्पत्तिकोश
वर्तक, जोशी, देशमुख, भट, पटवर्धन, हीं कोकणस्थांची आडनांवें धंद्याचीं दर्शक आहेत. पैकीं पट्टवर्धन ह्या कुलाचें नांव प्राचीन ताम्रपटांतून येतें. एका प्राचीन ताम्रपटांत एक नायकीण पट्टवर्धन कुलांत जन्मली म्हणून उल्लेख असल्याचें आठवतें. संदर्भ पुस्तकें जवळ नाहींत म्हणून संदर्भ दिला नाही. पट्टवर्धनाचें काम ताम्रपट्ट कापुण्याचें व तयार करण्याचे असावें. हें कुलनाम होतें त्या अर्थी त्या कालीं हा ताम्रपट्ट तयार करण्याचा धंदा पिढीजाद होऊन बसला होता, हें उघड आहे. तसें च पट्टवर्धन ब्राह्मण च होते असें दिसत नाहीं, ब्राह्मणेतर हि होते. कालान्तरानें धंद्याचा लोप होऊन, हें केवळ कुलनाम ऊर्फ आडनांव झालें.
रानड्ये हें गोत्रनाम आहे. मूळ गोत्र अरण्यवाटा; त्याचा अपभ्रंश रण्णवाड. त्याचें प्राचीन मराठी राणवडे. त्याचें अर्वाचीन मराठी रानडे. रानडे यांच्या वंशांत उत्पन्न झाले ते रानड्ये. वाटाः हें गोत्रनाम प्रसिद्ध आहे. परंतु, अरण्यवाटा : हें प्रसिद्ध नाहीं, म्हणजे गोत्रप्रवरग्रंथांत नाहीं. लक्षावधि जीं गोत्रें होतीं त्यांत हें गोत्रनाम असावें. मनोहर, मधुमत्ते, भैरव, भोगले, फफे, पघे, नवांके, फाळके, फडके वगैरे हि अप्रसिद्ध गोत्रनामें असावीं. ह्या लक्षावधि अप्रसिद्ध गोत्रांचा निर्देश गोत्रप्रवरग्रंथांत, करणारा पुरुष प्राचीन काळीं कोणीं निपजला नाहीं, हें मोठे दुर्भाग्य होय. तत्रापि अशीं गोत्रें होतीं, हें अर्वाचीन कालांत उपलब्ध होणार्या मराठी आडनांवांवरून निःसंदेह ताडतां येतें.
राजवाडे हें आडनांव दोन तर्हांनीं व्युत्पादितां येईल. राजवाटा: असें गोत्र असावें. किंवा राजवाड्यांतील अधिकारी अशी दुसरी व्युत्पत्ति होईल. पैकीं दुसरी व्युत्पत्ति दिनकरराव राजवाडे यांच्या चरित्रांत दिली आहे.
शिवाजीच्या राजवाड्यांत राजवाड्यांच्या कोण्या एका पूर्वजाला कांहीं एक अधिकार होता, त्यावरून त्याच्या सर्व वंशजांनीं राजवाडे हें आडनांव पिढीजाद लावून घेतलें. राजवाड्यांचें मूळ आडनांव जोशी. हे शांडिल्यगोत्री जोशी मूळचे राहणार निवें म्हणून गांव रत्नागिरीजवळ आहे तेथचे.
अगस्तीसह एकंदर ऋषि आठ व प्रवर एकूणपन्नास. ह्या एकूणपन्नास प्रवरांखालीं लक्षावधि गोत्रें पडतात. एक भागवित्ति किंवा भागवित्तायन गोत्र घेतलें तर तें गार्ग्य, कपि, जामदग्नि व कौशिक ह्या चार मुख्य गोत्रांखालीं पडतें. म्हणजे भागवित्ति ऊर्फ भागवत जसे गार्ग्यगोत्री आहेत, तसेच ते कपिगोत्री, जामदग्निगोत्री व कौशिकगोत्री हि आहेत. कर्हाड्यांत भागवत काश्यपगोत्री व भारद्वाजगोत्री हि आहेत. म्हणजे एकंदर भागवत सहा निरनिराळ्या गोत्रांचे आहेत. ह्या सहा गोत्रांप्रमाणें भागवित्ति ऊर्फ भागवत हें हि गोत्रनाम च आहे. इतकेंच कीं कोंकणस्थांत व कर्हाड्यांत तें आडनांव झालें आहे. गोत्रप्रवरग्रंथांत सांगितलेलीं दोन हजार गोत्रें त्या दोन हजार गोत्रांपैकीं प्रत्येकाखालीं पडतील. ह्याचा अर्थ इतका च कीं, हीं गोत्रनामें संस्कृत भाषा जेव्हां सररहा प्रचलित होती त्या कालीं ऋषिनामें ऊर्फ व्यक्तिनामें होती व तीं पुढें प्रजा जशी वाढत चालली तशीं कांहीं प्रत्यय लागून गोत्रनामें ऊर्फ आडनांवें झालीं. हीं आडनांवें सध्यां हि प्राकृत रूपानें महाराष्ट्रांत चालू आहेत. भाटे हें आडनांव शांडिल्य, कपि, गार्ग्य, जामदग्नि, अत्रि, भार्गव व गौतम, इतक्या गोत्रांत आहे. भाटे म्हणजे भ्राष्ट्रेयाः. गोडशे, गोरे, खुळे, आचार्ये फणशे, मुळ्ये वगैरे अनेक आडनांवें अशीं अनेकगोत्री आहेत. खुद्द गोत्रप्रवरग्रंथांत तीं च तीं गोत्रनामें निरनिराळ्या गणांत येतात. ती च प्रकार सध्यां हि दृष्टीस पडतो. ह्यावरून एक गोष्ट निष्पन्न होते, ती ही कीं, पांच हजार गोत्रांपैकीं प्रत्येक गोत्राखालीं जर सारीं च पडू शकतात, तर एकंदर गोत्रें ५००० × ५०००= २५०००००० दोन कोट पन्नास लाख होतात. बौधायन तर म्हणतो की गोत्रें अर्बुद आहेत. वरील गणित पहातां बौधायनाचें म्हणणें साधार दिसतें व बौधायनकालीं ब्राह्मणसंख्या किती मोठी होती याचा स्थूल अंदाज होतो.