Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

जोडणें [ यौट् १ बंधने, यौटनं=जोडणें ] (धा. सा. श.)

जोडवें (यौतकं (dowry) = जोडवें ) Ornament given by the husband to wear on the fingers of the foot at marriage.

जोडा १ [जोगोधः ] (जोड ३ पहा )

-२ [ युतयोः वधूवरयोः इदं यौतकम् । युतौ म्हणजे वधूवुर, नवराबायको. यौतक = जौडअ = जोडा] (भा. इ. १८३४)

जोडी १ [ जोगोधः = जोडी] (जोड ३ पहा)

-२ [जुड् + ति = जुट्टिः = जोडी ] ( ज्ञा. अ. ९ )

जोडीचें [ यौतवीयं = जोडीजें = जोडीचें ]
यौतवं मानं = जोडीचें माप.
यौतवं द्रुवयं पाय्यं (अमर, द्वितीय कांड, वैश्य वर्ग ८५)

जोडीवँ [ जुडेलिम = जोडावँ. त्रुटेलिम = तोडीवँ ]

जोतें [युत् १ बंधने. युतं = जोतें ] पायाचें दगडी बांधकाम तें जीतें. ( धा. सा. श. )

जोंधळा, जोन्हळा [ योनल:, (यवनाल:) = जोनळा = जोन्हळा = जोंधळा ] (भा. इ. १८३६)

जोपें [ जातापत्यं, जातपीतं ] (जावपें १, २, पहा)

जोम [ द्युम्न ( जोर, शक्ति ) = जोम ]

जोव [द्युत् १० प्रकाशे. द्योतिनी = जोईण = जोवी = जोव ] जोव म्हणजे विद्युत्. ( धा. सा. श. )

जोहर १ [ जतुग्रह = जोहर ( लाखेचें घर) ] जोतिर्धर म्हणून माडगांवकर देतो तें चूक.

-२ [ जतुगृह = जोहर. जतुकारिन् = जोहारी ( लाखकाम करणारा ) ]

जोहारा [ द्योकारः = जोआरा = जोहारा ] बांधणारा शिल्पी

जोहारी [ जतुकारिन् ] (जोहार २ पहा)

ज्या [ ज्यु गतौ ]
ज्या रे, तुझ्यानें काय होणार आहे ?
येथें ज्या म्हणजे नीघ असा अर्थ आहे.

ज्या, ज्याव [ज्यव = ज्याव, ज्या. ज्यु गतौ ]
ज्या, ज्याव म्हणजे जा, निघ.

ज्याव, ज्या रे ! [ ज्यु ज्यवति to go = ज्याव, ज्या ]

ज्येठी [ ज्या to oppress + इष्ठ ( primary affix ) = ज्येष्ठ oppressor. ज्येष्ठिक: = जेठी ] oppressor, a wrestler-employed to oppress and beat people. जगजेठी = जगज्जेष्ट the greatest of the universe.

लोलू [ लोहल: ( अस्फुटवादी ) = लोलू ] लोलू अण्णा हें मराठींत विशेषनाम झालें आहे. अस्फुट बोलणार्‍या मुलाला प्रथम प्रथम लोलू म्हणत.

वच्छे [ वत्सिके ] (दासींचीं नांवें पहा) 

वाघूजी, वाघोजी [ व्याघ्रादित्य ] (आदित्य पहा) 

वामनाजी, वामनोजी [ वामनादित्य ] ( आदित्य पहा) 

वारी [ वर्या (स्वयंवरा बाला) = वार्‍या = वारी ] वारी हें मराठींत स्त्रीविशेषनाम आहे. (भा. इ. १८३२)

वाली, वालू, वाल्ही [वाल्मीका = वाल्ही, वाली ] वाली, वाल्ही, वालू हीं मराठींत स्त्रीनामें आहेत.

वाल्ह्या [ वाल्मीकिकः = वाल्हीइआ = वाल्हीआ = वाल्ह्या ] वाल्ह्या कोळी विशेषनाम.

विजेसेन [ विजितसेन = विजियसेन = विजसेन, विजेसेन ] ( भा. इ. १८३५) 

विष्णाजी, विष्ण्याजी [ विष्ण्वादित्य] (आदित्य पहा) 

विसाजी, विसोजी [ विश्वनाथादित्य ] ( आदित्य पहा ) 
वीटु - सीयडोणी शिलालेखाच्या ४ थ्या व २७ व्या ओळींत वीठु हा शब्द आलेला आहे. म्हणजे हा शब्द शक ८७६ त प्रचलित होता. विष्णूचीं म्हणजे वीठूचीं देवळेंही होती. अर्थात्, पुंडलिकानें पंढरीस वीठूचें प्रतिष्ठापन करण्याच्या अगोदर निदान नर्मदेच्या उत्तरेस वीठूचीं देवळें असत; व त्या देवळांला सर्व जातीचे लोक देणग्या देत. ( सरस्वती मंदिर-संकीर्ण लेख ) 

शंकराजी, शंकरोजी [शंकरादित्य ] (आदित्य पहा)

शबरे [ शबरिके ] ( दासींचीं नांवें पहा ) 

शाम्या [ शर्मन् = शाम्या ] (भा. इ. १८३४) 

शिउजी [ शिवादित्य ] ( आदित्य पहा) 

शिदू, शिदोजी, शिदोबा [ सिद्ध = शिद, शिदू. सिदनाथवाडी, सिदोपंत, सिदनाथ, शिदोबा, शिदोजी इ इ.] (भा. इ. १८३३)

शिरळशेट - शिराळशेट [ श्रीलश्रेष्ठिः = शिरळशेट = शिराळशेट ] शिराळशेट म्हणजे धनाढ्य शेट. श्रील हें विशेषनामहि आहे. सामान्यनामहि आहे. (भा. इ. १८३४) 

शिवाजी [ शिवादित्य ] (आदित्य पहा)

शेवंते [ सीमंतिनि ] ( दासींचीं नांवें पहा )

सई [ सती = सई. सईबाई = सती ] (भा. इ. १८३४)
सखुली ( ममत्वदर्शक) - ला - लें [ सखी शब्दाचें ममत्वदर्शक सखु. सखु + ल = सखुल ( ल-ली-लें ) ]
(भा. इ. १८३४)

जेव्हां [ यदा वा ] (ज्ञा. अ. ९ पृ. ६२ )

जेष्ठमध [ यष्टीमधु = जेष्ठमध] (भा. इ. १८३४)

जोकड [ योक्त्र ] ( जोखड पहा )

जोखड १ [ योक्त्र = जोकड, जोखड] (भा. इ. १८३६)

-२ [ योक्त्रं = जोखड. यूपकटकं = जोखड ]

-३ [ योक्त्रदंड = जोखड]

जोखा ( बाई ) [ योपा = जोखा ] ( भा. इ. १८३६)

जोखीम [ योगक्षेम = जोगखेम = जोखेम = जोखीम ] योगक्षेम म्हणजे जोखीम. पैशाची जोखीम म्हणजे the security of money. (भा. इ. १८३६)

जोगता [ युक्त: = युगता = जोगता ]

जोगमेढी [ योगमेधिन्= जोगमेढी ] (भा. इ. १८३४)

जोगवण [ योगापनं = जोगवण] (भा. इ. १८३६)

जोगवा १ [ जोहूया = जोघुवा = जोगवा. हु to sacrifice ] जोगवा म्हणजे उत्कट यज्ञ.

-२ [ जोगवः = जोगवा ( beggary with singing aloud. (Vaidik) जोगू to sing aloud from गु to sound ]

-३ [ योगोपायन = जोगोवाअण = जोगोवा = जोगवा ] कांहीं योग चालविण्याकरतां जें वाण मागणें तो जोगवा. (भा. इ. १८३६)

जोगा [ योग्यः = जोगा ]

जो जो [ द्रै ( स्वप्ने, निद्रायाम् ) द्राय द्राय = जाव् जाव् = जो जो ] वाळा ! जो जो रे म्हणजे लाडक्या ! नीज नीज.

जो जो जो जो [ ज्योक् (शीघ्रार्थे ) = जो ] वाण जो जो जो सुटला तो रावणाच्या उरांत घुसला. येथें जो जो जो याचा अर्थ शीघ्रता, त्वरा असा आहे. तो जो निघाला तो एकदम खड्यांत पडला, एथें जो म्हणजे शीघ्रत्वानें.

जोड १ [ जुड् बंधने ] (जुडी पहा)

[ योध = जोढ = जोड (कुस्तीचा ) ] मला कुस्तीला जोड द्या = युद्धार्थ योधं ददत. (भा. इ. १८३४)

[जोगोधः। = जोओढा = जोडा, जोड, जोडी. गोघ् to play, sport. जोडा playmate ]

जुळें [ युगलं = जुअलं = जुळें ]

जूग [ युग्मं = जुग्ग = जूग ] स्त्रीपुरुषयुग्मं = स्त्रीपुरुषांचे जूग.
सर्पयुग्म = सापाचें जूग.

जूट [ यूथ = जूट ] (भा. इ. १८३६)

जेजे [ जै क्षये द्विरुक्ति = जेजे ] vexation.

जेठा [ जानुष्टयम् = जेठा ] a position in which the kness are bound with the धोतर.

जेठी १ [ योधिष्ठः = जेहिठ्ठ = जेठ. यौधिष्ठि्यन्= जेठी ] a Wrestler.

-२ [ याष्टीक warrior armed with a club = जेठी ] a warrior armed with a club.

-३ [ युद्धिष्ठिर = जहिठ्ठिल = जेठिल = जेठी. जगयुधिष्टिर = जगजेठी ] (भा. इ. १८३२)

-४ [ज्येष्ठिकः ] (ज्येष्ठी पहा)

जेणें [ य + एनेन ] ( एणें पहा )

जेरी १ [ जिरी - जिरीणोति. तनादि गण. जिरी नाश करणें, जखम करणें. जिरी = जेरी ( थकवा, नाश). जेरीस चतुर्थी. ] ( भा. इ. १८३३)

-२ [ जिरि = जेरी. जिरि = जिरिणाति ( found only in the Vedas, जिरि to kill ]

जेवणी [ जेम् १ भोजने. जेमनी = जेवणी ] त्याच्या तोंडाची जेवणी लहान आहे. दोन्ही ओठ मिळून जें जेवण्याचें इंद्रिय होतें त्याला जेवणी म्हणतात.

जेवणें [ ज्यायान् (nomination of ज्यायस्) = जेवणें ] first, excellent, right. जेवणें आंग - first, right side.

जेवि [ यद्वत् ] ( शा. अ. ९, पृ. ८ )

जेव्कार - ब्राह्मणेतर लोक लावण्या गातांना कडव्याच्या शेवटीं तुणतुण्याच्या स्वरावर जिज्जिज्जिज्जि - असें एक पद सातत्यानें म्हणत असतात; आणि थोर लोकांच्या हांकेला होकार देतांना हे लोक जी असा दीर्घ उच्चाराचा शब्द उच्चरितात. हा दीर्घ जी शब्द आर्य, अज्ज, अशा परंपरनें मराठींत साधला आहे, असें बहुतेक वैय्याकरणांचें मत आहे. आर्य, अज्ज शब्दापासून अजा व आर्या शब्दापासून अजी हे शब्द मराठींत आले आहेत हें स्पष्ट आहे. अज्ज शब्दाचा मराठींत दुसरा अपभ्रंश फार झालें तर, ज्ज असा होईल; परंतु जी असा दीर्घ ईकारांत होणार नाही. माझ्या मतें, होकारार्थी जी हा मराठी शब्द जय, जे ह्या परंपरेनें साधलेला आहे. जय हा शब्द मराठी व संस्कृत कवितेंत नमस्कारार्थी येतो. जे हा शब्द प्राकृतांतही नमस्कारार्थी योजीत. गाथासप्तशतीच्या चवथ्या शतकाच्या ३२ व्या गाथेंत हा शब्द योजिला आहेः- 

सूरच्छलेण पुतअ कस्स तुमं अञ्जलिं पणामेसि ।
हासकडक्खुम्मिस्सा ण होन्ति देवाणँ जेव्कारा ॥३२॥

जेव्कारो नमस्कारे देशी, असा टीकेंत जेव्कार म्हणजे जे ह्या शब्दाचा अर्थ दिला आहे. ह्या प्राकृत जे शब्दाचा लावणींतील जिज्जिज्जि हा अपभ्रंश आहे. (सरस्वतीमंदिर श्रावण १८२६)

रघाजी, रघुजी, रघोजी [रघुनाथादित्य] (आदित्य पहा)

रंभाजी [ रंभ (वानराचें नांव ) जित् = रंभाजी ] 

राउजी, राजाजी [ राजादित्य ] (आदित्य पहा) 

रामा [ अनुदात्तं प्रश्नान्ताभिषूजितयोः (पाणिनि ८-२-१००) अगमः पूर्वान् ग्रामान् राम ३ अ = रामा ( आ Vocative) ] मराठीत संबोधन अकारांत शब्दाचें प्लुत होऊन होतें.

रामाजी [ रामादित्य ] ( आदित्य पहा) 

रामानुज [ रामानुजः मुख्यः एषां ते रामानुजकाः रामानुजकाः = रामानुज ] तो रामानुज आहे म्हणजे रामानुजाचा अनुयायी आहे. 

रामोजी [ रामादित्य ] ( आदित्य पहा)

रावत्या [ रेवत्याः अपत्यं पुमान् रैवतिकः. रैवतिक=रैवतिअ = रैवत्या = रावत्या (शूद्रनाम) ] (भा. इ. १८३४)

राही [राधा = राहा. राधी = राही ] राही हें नांव कुणब्यांत फार. (सरस्वतीमंदिर शके १८२६)

रुई [ रोहिणे ] ( दासींचीं नांवें पहा ) 

रुप्या [ रूप्यः = रुप्या ( मूलार्थ सुंदर ) मारवाडी पुरुषाचें नांव) ] ( भा. इ. १८३४)

रूपीबाई [ रुक्मिणी = रुप्पि = रूपी ]

लखजी [ लक्ष्मणादित्य ] ( आदित्य पहा) 

लखाणशेट ( लक्ष्मण = लख्खण = लखाण ] लखणशेट व शिरळशेट या शब्दांचा अर्थ एकच. (भा. इ. १८३४) 

लखभट [ लक्ष्म = लख्ख = लख. लख + भट = लखभट ] लक्ष्या, लखु, लख्या वगैरे अपभ्रंश आहेत. (भा. इ. १८३४) 

लखंभट [ लक्ष्मण = लखण् = लखम. लखम् + भट = लखंभट ] (भा. इ. १८३४)

लखमल [ रक्षामल्ल = रखमल, लखमल] ( भा. इ. १८३६ )

लखाजी, लखुजी [ लक्ष्मणादित्य ] (आदित्य पहा) 

लल्लू [ ललित = ललिअ = लल्य = लल्ल = लल्लू ] लल्लूचा मूळ अर्थ सुंदर. त्यावरून विशेषनाम. (ग्रंथमाला)

लाडी १ [ लडहा (सुंदर) = लाडी (स्त्रीनान) ] ( भा. इ. १८३४) 

-२ [ लटह ] (लाडू पहा) 

लाडू [ लटह beautiful = लाडू, लाडीबाई ] 

लुकजी [ लक्ष्मणादित्य ] (आदित्य पहा) 

लोलिंबराज [ रोलंब ( भ्रमर ) = लोलंब = लोलिंब विशेषनाम ) अ = इ ]

जिए [ जीवति ] ( धातुकोश-जि ३ पहा)

जिकीर १ [ जिगीर्षा = जिगीर = जिकीर ] पदार्थ गिळण्याची इच्छा. (भा. इ. १८३४)

-२ [ चिक्रीषा = चिकीर=जिकीर ] पदार्थ विकत घेण्याच्या वेळीं दाखविलेली कचाटी. (भा. इ. १८३४)

-३ [ जिघृषा = जिघीर = जिगीर = जिकीर ] पदार्थ घेण्याची इच्छा. (भा. इ. १८३४)

जिज्जिज्जि [ जेव्कार पहा ]

जिणिजे [ ज्या जिनाति to overpower, conquer लिङ् with विकरण = जिणिजे may overpower ]

जिरणें [ स्रिव् ४ स्रीव्यति ( शुष्क होणें, शोषिणें ) = जरणें ] टीपकागदांत वस्त्रांत पाणीं जिरतें. (भा. इ. १८३३)

जिवट [ जीवथ (दीर्घायुः) = जिवट ]

जिवाणू [ जीविष्णु = जिवाणू ] (भा. इ. १८३४)

जिवापाड [ जीवपातं (adverb) = जिवापाड, जीवापाड ]

जी १ [ जेव्कार पहा ]

-२ [ जय, जयतु = जी ] ( ज्ञा. अ. ९ )

-३ [ आर्याः = जी ] ,,

-४ [ आर्य ! = जी ! ]

-५ [ (लोट्) जय = जी ]

-६ [ ( लोट्) जीव = जी ]

जीभ [ जिव्हा = जीभ ] ( स. मं. )

जीवापाड [ जीवपातं ] (जिवापाड पहा )

जी हा [ चीभ् ( स्तुति करणें ) चीभति; चीभा = जी हा ] जी हा करणें म्हणजे स्तुती करणें. जी ! हा ! या अव्ययांशीं संबंध नाहीं.

जी हा करणें [ चीभ् स्तुति करणें ] ( जी हा पहा )

जुगारी [ युगहारी = जुगहारी = जुघआरी = जुघारी = जुगारी. द्यूतकारी = जुअआरी = जुआरी = जुवारी ] हीं दोन्ही रूपें मराठींत प्रचलित आहेत. युग हा शब्द फांसा ह्या अर्थी संस्कृतांत फार जुना आहे. ( भा. इ. १८३२ )

जुडी [ जुड् बंधने = जुडी, जोड ] ( ग्रंथमाला )

जुणट, जुनाट, जुनाट [जूर्णिष्ठ = जुणट, जुनट, जुनाट ] जुनाट म्ह० अति जुनें. ( भा. इ. १८३७ )

जुनेरें [ जूर्णवस्रं = जुनरें]

जुवा [ द्यूतः = जुआ = जुवा ]

जुवारी [ द्यूतकारी ] ( जुगारी पहा )

जुळणें [ युगलनं = जुळणें ] ( धा. सा. शा.) ना.को. १०

जायजाणा [ याच्ञाजन्यः = जाञजाणा = जायजाणा ] जायजाणा जिन्नस म्हणजे यांचा करून आणिलेला जिन्नस.

जा ये [ याहि रे आयाहि रे = जारे येरे ]

जाये [ येयायेय = याये ( पहिलें व चवथें अक्षर लुप्त) = जाये ] जाये करतो म्हणजे येयायेयं करोति. जाये नाम आहे. (भा. इ. १८३६)

जाल (ला-ली-लें) - ज्ञानेश्वरीच्या व्याकरणांत जन् जात पासून ( जात + ल = जाअल = जाहल अथवा जाल = झाल) जाल व्युत्पादिलें होतें. परंतु हा शब्द अथवा उच्चार दुसर्‍या एका तर्‍हेनें उत्पन्न झाला आहे, असें दिसतें. तिला पुत्र झाला, येथें जन् धातूत्पत्ति आहे; परंतु एक राजा झाला, येथें जन् धातू नाहीं. येथें झाला हें अस् भावे पासून निघालें आहे. अस् ( निष्ठा )- स्त. स्त + ल = स त ल = झअल = झाल = जाल. स्त हें निष्ठारूप लुप्त वैदिककालीं हि झालेलें होतें. पण प्रांतिक भाषांत प्रचारांत होतें. त्याला प्रत्यंतरपुरावा जाल हा मराठी शब्द आहे. भू-भूत-पासून ज्ञानेश्वरींत भूतल असें रूप येतें. होल, असें रूप कांहीं कनिष्ठ जातींत आढळतें. राजा झाला म्हणजे जन्मला असा अर्थ नाहीं; अभूत्, अभवत्, आसीत् असा अर्थ आहे. तेव्हां अस् च्या निष्टारूपांपासून हा जाल शब्द निघाला आहे. (भा. इ. १८३२)

जावई शोध [ जातवेद = जाअवेअ = जावई शोध ] जातवेदस् म्हणजे सर्व जाणणारा. जावई शोध म्हणजे सर्व कांहीं जाणण्याचा आव घालणार्‍याचा शोध. विपरीत लक्षणा आहे.

जावपें १ [ जातापत्यं = जावपें, जोपें. जातं च तत् अपत्यं। ] नवीन जन्मलेलें अर्भक.

-२ [ जातपीतं = जाअपिअँ = जावपें, जोपें ] जन्मून नुकतें च प्यायला लागलेलें पोर, पिल्लूं.

जावयी [ जामातृ = जावांअ = जावांय = जावायी = जावयी ] (स. मं.)

जावळ (ळा-ळी-ळें) [ जामि (सोदरसंबंधीं = जवि. जामल = जावळ (ळा-ळी-ळें) ] जावळे भाऊ म्ह० एकाच वेळीं जन्मलेले सोदर भाऊ. (भा. इ. १८३३)

जांवेई [जामेय (बहिणीचा मुलगा) = जांवेय = जावेई.
जामातृ = जांवाय = जांवाई ] जांवाई व जांवेई या दोन शब्दांचा उच्चार सारखा असल्यामुळें भाचा म्हणजे बहिणीचा मुलगा तोच जांवाई झाला. (भा. इ. १८३३)

जाळीकाम [जालकर्मन् = जाळकाम, जाळीकाम ]

जाळीवँ [ज्वलेलिम = जाळीवँ ]

मानाजी, मानोजी [ मानादित्य ] (आदित्य पहा )

मायण [ मात्रज्ञ ] (सायण पहा)

मिरा ( बाई) [ मिहिरा ( मिहिर शब्दाचें स्त्रीलिंग) मिहिर हें पुरुषनाम आह. मिहिरा = मिइरा = मिरा (बाई) ] (भा. इ. १८३३) 

मिशरा [मसूरिका = मिशूरिआ = मिशरा (नायकिणीचें नांव) ] मसूरिका म्हणजे पण्यस्त्रियांची मुख्य. मिशरा नायकीण पुण्यांत प्रसिद्ध होती. (भा. इ. १८३७) 

मुक्ता, मुक्ती - हें स्त्रीनाम शूद्रांत आढळतें. बंधकी कुलटा मुक्ता ( ३५ धनंजयकोश) ] कुटुंबांतून सुटलेली जी
स्त्री ती मुक्ता, मुक्ती. (भा. इ. १८३३) 

मुक्त्ये [ मुक्तिके ] ( दासींचीं नांवें पहा ) 

मुधोपंत [मुग्धपंडितः = मुधोपंत ] 

मेनके [ मेनके ] ( दासींचीं नांवें पहा )

मैना १ [ मदनिका = मयनिआ = मैनी, मैना ] स्त्रियांचें नांव आहे.

-२ [ मेनका = मेणआ = मेणा = मैना ] मैनाबाई म्हणजे मेनकाबाई.

मैनाबाई [ मेना अथवा मेनका = मेणआ = मेणा = मेन = मैना ] मैणाबाई, मेणाबाई असेहि उच्चार करतात.
मैनानामक पाखराशीं कहीं संबंध नाहीं. (भा. इ. १८३६ ) 

मैनी [ मदनिका ] ( मैना १ पहा) 

मोरबा [मयूरपाल ] (धणबा पहा) 

यमी [ यमुना =यमू, यंमी (एकशेष)] (भा. इ. १८३६) 

यमू [ यमुना ] ( यमी पहा )

युधि - षत्वप्रक्रियेंत गवियुधिभ्यां स्थिर: ( ८-३-९५) हें सूत्र पाणिनि देतो. हलदन्तात् सप्तम्याः संज्ञायां ( ६-३-९ ) या सूत्राखालीं कांहीं पाणिनीनें गवियुधिभ्यां स्थिर: हें सूत्र दिलें नाहीं. म्हणजे गवि व युधि ह्या गो व युध् या शब्दांच्या सप्तम्या कांहीं पाणिनि गवियुधिम्यां स्थिर: या सूत्रांत समजत नाहीं. गवि व युधि हीं पाणिनिमतें प्रातिपादिकें आहेत. गव्यूति व युधिंगम या समासांत गवि व युद्धि हे शब्द प्रातिपादिक असलेले स्पष्ट दिसतात. सबब गवि व युधि ह्या सप्तम्या घेऊन गविष्ठिर व युधिष्ठिर हे समास अलुक्समासांत काढण्याचें कारण नाही. (भा. इ. १८३६) 

येशी [ यशोदा = येशी, येसू (एकशेष) ] (भा. इ. १८३६)

येसू [ यशोदा ] (येशी पहा)

जाचणें [(जसु ताडने) जासयति = जाचणें ] सासू सुनेस जाचते = श्वश्रूः स्नुषां जासयति. जाच ( नाम ) = जासः (भा. इ. १८३७)

जा जा [द्यै १ न्यक्करणे. द्यायाः = जाजा ] जा जा, गरज नाहीं जा = द्यायाः, कारणं न वर्तते.

जाजू [ जायुः ( औषधं ) = जाजू ] तो कांहीं तरी जाजू करून, रोग बरा करतो. जाजू म्हणजे औषध.

जाड [ जड एव जाड: = (हलक्याच्या उलट ) ] (भा. इ. १८३२)

जाण [ जज्ञान = जणाण = जाण ] जाण म्हणजे ज्याला ज्ञान होऊन गेलें आहे तो. हा शब्द जुन्या मराठींत व सध्यांच्या बोलण्यांत येतो.

जाणता [ जानत ] (सुजाण पहा)

जाणावणें [ ( ज्ञा ) जाज्ञायते = जाणावणें ] वारंवार समजाविणें. (भा. इ. १८३६)

जाणो [ ( जानु + उ ) जानू = जाणो ( आश्चर्यप्रश्ने) यथानु = जणु (औपम्ये) द्याश्रय-१-३२ ]

जातर् [जातु = जातर्] जातु दुग्धं पिब = जातर दूध पी. जातु नाम एकवारम्. (भा. इ. १८३४)

जातीचें-चा-ची [ जात्य = जातिज = जातीच (चा- -ची-चें) ] जात्य म्हणजे कुलिन.

जातें [ यंत्र = जंतं = जातें ]

जादू [ यातु (जादू) = जादू ] यातुधान म्हणजे जादूगार ( ऋग्वेद १-७-३५-१० ) शंकर पंडित यानें हीच व्युत्पत्ति दिली आहे.

जानपछान १ [ ज्ञानप्रत्याज्ञान = जानपच्चाञान = जानपछान ] (भा. इ. १८३४)

-२ [ ज्ञानप्रज्ञान = जानपजाण = जानपछाण-न ]

जानवसा [ यज्ञवास्तु = जञ्ञवासा = जानवसा ] वर्‍हाडी लग्नरूपी यज्ञ करण्यास ज्या घरांत उतरतात तें घर. (भा. इ. १८३४)

जानोसा [ यानवासक = जानवासक = जानोसअ = जानोसा ] प्रवासांत व्याह्यांना रहावयाला दिलेली जागा. (स. मं.)

जाब [ जल्प् १ व्यक्तायांवाचि. जल्प = जाब ] ( धा. सा. श. )

जाभाड [ जृंभा + अस्थि = जांभा + अठ्ठि = जांभा + हड्डिि = जांभा + हाड = जांभाड = जाभाड ] (स. मं.)

जांभूळ [ जंबूफल = जांभूळ ]

जवान [ युवन् = जुवन् = जवान ] जवान् म्हणजे तरुण. जवान हा शब्द फारशींतहि आहे; परंतु तो त्या भाषेंत संस्कृततुल्य किंवा पूर्ववैदिक भाषेंतून गेलेला आहे. (भा. इ. १८३४)

जहांबाज [ साहसभाज् = जहांबाज ] साहसी.

जळण [ ज्वलन = जलण = जळण ] (ग्रंथमाला)

जळपळणें [ जाजल्पनं = जळपळणें ] बरळणें. (भा. इ. १८३४)

जळलेलें [ ज्वलितज्वलितं ] ( ओलेलें पहा)

जळल्या [ जाल्म = जाळ्ळ = जाळल = जळल ( ला-ली-लें) ] इदानीं ज्ञास्यसि जाल्म = समजेल आतां जळल्या मेल्या. पाणिनि ८-२-९६

जाइ [ याहि ] (येइ पहा )

जाऊ १ [ यात्ता = जाआ = जावा = जाऊ ] (स. मं.)

-२ [ यातृ = जाऊ. जाया स्तु भातृवर्गस्य यातरः स्युः परस्परं (भट्टोजी, उणादि २६२) ] (भा. इ. १८३३)

जाऊं देणें - "एक्को वि कालसारो ण देइ गन्तुं ” -गाथासप्तशती १-२५ (भा. इ. १८३२)

जाग [ यागः = जाग ] खंडोबाचा जाग = पडाननस्य यागः = खंडोबाप्रीत्यर्थ केलेला याग ऊर्फ यज्ञ. (भा. इ. १८३६)

जागड, जांगड [ ग्रंथ् ९ संघाते. जाग्रथ्य = जागड, जांगड ] ( धा. सा. श. )

जागर [ जागरीति (गृ ९ स्तुतौ) = जागर ] आमच्या घरीं खंडोबाचा जागर आहे म्हणजे स्तवनाकरितां घरांतील मंडळी जमणार आहे.

जागल [ जागर: = जागल (पुं.). जागृति = जागल. ( स्त्री ) ]

जागल्या [ जागृ २ निद्राक्षये. जागरिक: = जागल्या ]

जागृती [ जागर्तिः = जागृती ] (भा. इ. १८३६)

जाच [ यास: ( यस्) = जाच ] ( भा. इ. १८३६)

जाचक [ यासक = जाचक ] (भा.इ.१८३६)

जाचणी [ यातना ] (धातुकोश-जाच ६ पहा)