Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

देवाण घेवाण [ देहिवाणिजा गृहाणवाणिजा = देवाण घेवाण ] ( मयूर व्यंसकादयः )

देव्हारा १ [ देवागारः = देवाआरा = देव्हारा ]

-२ [देवतागाराः = देवआआरा = देवारा = देव्हारा] (भा. इ. १८३४)

देशावरावर [देशांतरं उपरि = देशावरा वर
स देशं उपरि गतः = तो देशा वर गेला
स देशांतरं गतः = तो देशावर गेला.
दुसर्‍या वाक्याचा अर्थ, तो दुसर्‍या देशांत गेला, असा होतो. ग्रामान्तरं गतः = गांवावर गेला.

देसावर [देशांतरं = देसाअर = देसावर ] सः देशांतरं गतः = तो देशावर गेला. येथें देशावर ही द्वितीया आहे.

दोढ्ढाचार्य [ दोग्धृ + आचार्य = दोढ्ढाचार्य]
दोग्धृ म्हणजे वेतन घेऊन काव्य करणारा, स्वार्थी. दोढ्ढाचार्य म्हणजे स्वार्थी, आपमतलबी माणूस. दोंदिल, दोंद्या [ तुंदिल: = दोंदिल, तुंदिकः = दोंद्या ]

दोन्ही [ द्वीनि = दोनि = दोन्ही ]
प्राकृतांत व मराठीत द्विवचन नाहीं. सवब द्वि हा शब्द प्राकृतांत अनेकवचनीं चालवून द्वीनी असें रूप साधलें. ( ग्रंथमाला)

दोभ [ दोग्धृ = दोभ ] गाईच्या थानाला दोभ म्हणतात.

दोसण [ दोषज्ञ = दोसण्णु = दोसण ( णा-णी-णें ) ] सिहाण व दोसण हे दोन शब्द ज्ञानेश्वर व दासोपंत योजतात. (भा. इ. १८३२)

दोस्त [ दोः स्थ (हातांतला,सेवक, विश्वास्य) = दोस्त] हा शब्द पारशींत हि आहे पण तो हि संस्कृतांतून च फारशींत गेलेला आहे. (भा. इ. १८३३)

दौड [ धौर्य / धोरित ] दौड.
धौर्य-धोरित म्हणजे अश्वगतिविशेष. ( भा. इ. १८३६)

दुरडी [ दृतिः = दुरडी] दुरडी म्हणजे वेळू वगैरेंचें एक पात्रविशेष. दृति म्हणजे पखाल, बुधली असा एक अर्थ व वेळूचें पात्र असा दुसरा अर्थ.

दुराप [ दुराप = दुराप] यश येणें दुराप आहे.

दुर्भर [ दुः स्मरः = दुर्भर. स्मर = भर ( प्राकृत )]

दुलई [ दुकूलं, दुकूली = दुऊली = दुलई, दूल, दुली ] (ग्रंथमाला)

दुलदुलित [ दुल् १ गतौ ] ( धातुकोश-दुलदुल पहा)

दुवड [ द्विपद = दुवड. त्रिपदा = तिवड. चतुष्पदा = चौवड. (Sans) F पंचपदा = पाचुंदा M. (in मराठी)] दुवाड [ दुविदग्ध ] (द्वाड पहा)

दुह [ दुह्]

दूण [(सं.) द्विगुण = (महाराष्ट्री) दुउण = (मराठी) दूण ] एक दूण दोन, बे दूण चार. (भा. इ. १८३२)

दूणी बीणी [द्वि ह्या संस्कृत शब्दाचीं दुण्णि व बिणि अशीं नपुंसकलिंगी प्रथमेचीं व द्वितीयेचीं रूपें महाराष्ट्रींत होतात ] (भा. इ. १८३२)

दूम [ लूम = डूम = दूम ] दूम म्हण्जे शेंपूट.

देइजे [ कर्तरि विधिलिङ् किंवा कर्मणि विधिलिङ् दद्यात किंवा दीयेत. देइजे = दीजे ] (ज्ञा. अ. ९ पृ. १ )

देखत-चोर [ ( पश्यतो हरः ) पश्यश्चौरः = देखतचोर. देखत षष्टी आहे.] (भा. इ. १८३३)

देणा [ ददानः = देणा ] तो माझा देणा होता = सः मे ददानः आसीत्. गृहाणः = घेणा.

देंट, देंठ [ दण्ड = देंट, देंठ, stem ] (ज्ञा. अ. ९ पृ. १४४)

देदेदेणें [(दा ) ददाति = देदेदेणें ] (भा. इ. १८३६ )

देवघेव [देयग्राह्य - देवघेव] देणें घेणें.

देवचार [देवाचार पहा ]

देवड [ दा-पदं = देवड] घेवडदेवड =घेणेंदेणें, मोबदला.

देवाचार [ देवाप्सरसः = देवअच्चार = देवाचार - देवचार ] कोंकणांत हा शब्द फार ऐकूं येतो. (भा. इ. १८३२)

देवाच्यान् [देवाच्यान्, आईच्यान्, बापाच्यान्, गुरुच्यान् वगैरे शब्द महाराष्ट्रांत जोरानें व आग्रहाने बोलतांना उच्चारितात. ह्या शब्दांचा विग्रह असा-देवाची + आण = देवाच्याण = देवाच्यान्. आईची + आणा=आईच्याण = आईच्यान् इ.इ. इ.] संस्कृतांतल्याप्रमाणें मराठींत संधी ज्या कांहीं थोड्या स्थलीं होतात त्यांपैकीं हें एक स्थळ आहे. (भा. इ. १८३३)

पाठाण - प्रात्तायनाः (स)

पाठारे - प्रस्थाहारकाः ( प्रभु )

१ पाताणे ऊर्फ पाठारे परभू ऊर्फ प्रभू हे लोक कोंकणांत कोठून आले, एतत्संबंधानें निश्चित अशी माहिती बिलकूल नाहीं. पाताणे हा शब्द पत्तन ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा असा कित्येकांचा तर्क आहे, परंतु तो साधार नाहीं. पत्तन ह्या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पातन होईल किंवा पातण होईल, परंतु पाताण होणार नाहीं. पट्टण ह्या शब्दापासूनही पाताणे हा मराठी शब्द निघूं शकत नाहीं. पट्टण ह्या संस्कृत शब्दाचा मराठी किंवा गुजराथी अपभ्रंश पाटण होतो, पाताण होत नाहीं. सबब, अन्हिलपट्टण किंवा अनहिलपत्तन या शहरांशीं पाताण्यांचा संबंध जोडतां येण्यास अशी ही भाषिक अडचण येते. शिवाय, इतर ऐतिहासिक पुरावा, पाताणे अनहिलपत्तन शहरीं किंवा प्रांतीं मध्ययुगीन काळीं राहात होते असा, बिलकुल उपलब्ध नाहीं. करितां, पट्टण, पाटण, पतन व अनहिलपट्टण किंवा अनहिलपत्तन या शब्दांशीं पाताणे या मराठी शब्दाचा कांहीं एक संबंध नाहीं हें स्पष्ट झालें.

२ पाठारे या मराठी शब्दाचा तर पट्टण, पट्टन, पतन व अनहिलपट्टण किंवा अनहिलवाट किंवा अनहिलवाड या शब्दांशीं दूरचाहि आपभ्रांशिक संबंध नाहीं. पाताणे या मराठी शब्दांत पत्तन या संस्कृत शब्दांतील प, त, न, या अक्षरांचें समानास्तित्व तरी आहे, फक्त त चा ता कां व कसा झाला, एवढेंच विषमत्व उरतें. परंतु पाठारे ह्या मराठी शब्दांत पत्तन ह्या संस्कृत शब्दांतील प हें एक अक्षर तेवढे समान आहे, बाकी सर्व अक्षरें विषमान आहेत. पट्टन ह्या संस्कृत शब्दांतील पाठारे ह्या मराठी शब्दांत प हें एक अक्षर समान आहे. बाकीचीं सर्व अक्षर विषमान आहेत. सबब, कोणतीही घालमेल केली, तरी पत्तन किंवा पट्टन अथवा पाटण ह्या शब्दापासून पाठारे हा मराठी शब्द निर्वचितां येणें मुष्कील अहे.

३ इतर कोणत्याहि संस्कृत शब्दापासून पाठारे हा मराट शब्द यथायोग्य निर्वचिलेला माझ्या पहाण्यांत नाहीं.

४ पाताणे व पाठारे अशीं दोन नांवें ह्या लोकांचीं प्रसिद्ध आहेत. पाताणे प्रभू व पाठारे प्रभू, किंवा नुसतें पाताणे किंवा पाठारे अशा चार तर्‍हांनीं ह्या जातीचा निर्देश लौकिकांत होत असलेला आढळतो. प्रस्थपुरवहान्ताच्च (४-२-१२२) ह्या सूत्रावर भाष्य करतांना पतंजलि वाहीक देशांतील एका गांवाचा उल्लेख असा करतो :- पातानप्रस्थ नाम वाहीक ग्रामः । वाहीक देशांत म्हणजे सध्यांच्या पंजाबाच्या पूर्वभागांत पातानप्रस्थ नांवाचें एक गांव आहे, असें पतंजलि म्हणतो. पातानप्रस्थ हें त्या तर्फेतील प्रमुख गांव होतें, हें तदवयवीभूत प्रस्थ ह्या शब्दावरुन उघड आहे. प्रस्थं म्हणजे प्रकर्षेण प्राचुर्येण स्थीयते अत्र इति प्रस्थं. जेथें पुष्कळ लोकांची वस्ती असे त्या मोठ्या गांवांला प्रस्थ म्हणत. अशा मोठ्या गांवावरून त्या गांवाच्या भोवतालील तर्फेला किंवा तालुक्याला नांव पडे. त्या कालीं तर्फेला किंवा तालुक्याला आहार ही एक संज्ञा असे. पातानप्रस्थ ह्या मोठ्या गांवावरून सभोंवतालील तर्फेला पातानप्रस्थाहार असें नांव पडलें. ह्या पातानप्रस्थाहारांत राहाणारे जे लोक त्यांना पातानप्रस्थाहारका: म्हणत. पातानप्रस्थाहारका: ह्या लांबलचक अष्टाक्षरी नांवांतील ' पूर्वोत्तरपदयोर्वा लेपो वाच्यः ” ह्या वार्तिकाप्रमाणें उत्तरपदाचा लोप होऊन पातानका: असा एक संक्षेप होई व पूर्वपदाचा लोप होऊन प्रस्थाहारकाः असा दुसरा संक्षेप होई. अश्या तर्‍हेनें वाहीक देशांतील पातानप्रस्थाहार प्रांतांत राहाणार्‍या ह्या लोकांना उच्चारसौलभ्यार्थ पातानक व प्रस्थाहारक अशीं दोन नांवें पडलीं. पैकीं पातानक ह्या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पाताणा आणि प्रस्थाहारक ह्या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पठ्ठारा, पाठारा.

दुडकी [ द्रुतका = दुडकी (चाल)] दुडकी चाल म्हणजे दुडदुड चाल. (भा. इ. १८३४)

दुडदुड [ द्रुतंदुत्तं = दुडदुड, दुडुदुडु ]

दुंडा १ [द्विकांडः = दुंडा] द्विकांडी रज्जुः = दुंडा दोरा = द्विकांडः दोरकः

-२ [ दुंदुभिः ( अक्षेषु ) = दुंडा ] दुंडा फासा पडला - एक दान आहे.

दुडुदुडु १ [ द्रुद्रु = दुडुदुडु running धावणें ]

-२ [ द्रुतंद्रुतं ] (दुडदुड पहा)

दुडुम् [ द्रुम्म ] ( धुडुम् पहा )

दुढ्ढी [ द्वेघ्यं = दुढ्ढी division into two.]
दुढ्ढी बिराजा = द्विधाभाव म्हणजे विभक्त राज्य.

दुध [दुह्]

दुधार [ द्विधाकार = दोधार = दुधार (रा-री-रें) ] ( भा. इ. १८३२ )

दुधारी [ द्विधाकारिन् = दोधाआरी = दोधारी = दुधारी (निवडुंग) ]

दुधी [ दुग्धिका ] (भा. इ. १८३४)

दुध्या १ [ दह्या पहा]

-२ [ दुग्धिका = दुद्धिया = दुध्या ( भोपळा ) ] ( ग्रंथमाला)

दुपट्टा १ [दुकूलपट्ट = दुपट्टा]

-२ [ द्विपटवानम् (कौटिल्थ, weavers) = दुपट्टा, दुपेटा ]

दुपारी [ द्विप्रहरिका = दुपहरिआ = दुपारी ] (भा. इ. १८३४)

दुपेटा [ द्विपटवानम् ] (दुपट्टा पहा)

दुबेळकें [ द्विबिलकं= दुबेळकें] दोन बिलें आहेत ज्यांततें. बिलं म्हणजे splitting, opening, aperture तोंड. (भा. इ. १८३६)

दुभ [दुह् ] दुभणें (ह = भ)

दुहणें ( ह = ह )

दुघणें ( ह = घ )

दुमडणें, दुमोडणें [मुट् १० संचूर्णने. द्विमोटनं = दुमोडणें = दुमडणें ] ( धा. सा. श. )

दुरक [द्विक = दुक = दुरक (तिरकच्या धर्तीवर ) ] एक दुरक दोन. (ग्रंथमाला) ना. को. १३

दीड १ [ द्यवर्धम् = दीडँ = दीड ] (ग्रंथमाला)

-२ [ अध्यर्ध = ( अ लोप) दिड्ड = दीड ] ज्ञानेश्वरी व्याकरणांत द्व्यर्ध या शब्दापासून दीड या शब्दाची व्युत्पति कशी तरी केली आहे. परंतु ती समाधानकारक नाहीं. दीड ह्या अर्थी अध्यर्ध हा शब्द संस्कृतांत योजतात:- तद्वदंतर्मुखं तस्य फलं अध्यर्धं अंगुलम् ॥ १० ॥
( वाग्भट-सूत्रस्थान-षड्विंशोध्यायः । )
येथे अध्यर्ध म्हणजे ११/२ ऊर्फ दीड.
अर्थात् दीड या शब्दाची ही व्युत्पति खरी. (भा. इ. १८३४)

दीडगांठ [ दृढग्रंथिः = दिढगंठि = दीडगांठ ] दीडगांठ म्हणजे घट्टगांठ

दीडमिश्या १ [ दृढस्मश्रूकः = दिढ = दीड ] दीडमिश्या म्हणजे बळकट आहेत मिश्या ज्याच्या.

-२ [ दीर्घश्मश्रुः = दरमिश्या = दीडामिश्या ] दीडमिश्या म्हणजे लांब आहे मिशी ज्याची तो.
(गोपथब्राह्मण-द्वितीयप्रपाठक पूर्वभागः ।) ( भा. इ. १८३४)

दीड शहाणा १ [ दीर्घचक्षणः = दिङ्ढ सहण्णः दीड शहाणा ] ( भा. इ १८३४ )

-२ [ दृढविचक्षणः = दीड शहाणा ] दीड शहाणा म्हणजे दृढ, पूर्ण शहाणा.

दीपोष्टेल [ दीपोच्छिष्ट तैल ] (तिळेल पहा)

दीर [देवर = दिअर = दीर] (स. मं.)

दुकटा [ द्विकस्थः ] ( एकटा पहा )

दुखवटा [ दुःखपाटः = दुखवटा ] (तुलना) आषाढपाटी, श्रावणपाटी.

दुखापत [ दुःखापत्तिः = दुखापत ]

दुख्खारा, दुख्खेरा [ तुषाराः तुखाराः ](तुख्खारा पहा)

दुगाणी [ द्वि + आणिका = दु + आणी = (दुवाणी) = दुगाणी ] अर्धा आणा. (भा. इ. १८३२)

दुट्ट [(ट्टा-ट्टी-ट्टें) द्विष्ठ = दुठ्ठ = दुट्ट ] दुट्ट म्हणजे दोन ठिकाणीं राहणारें.
वाक्यान्यपि द्विष्टानि भवंति । (पातंजल महाभाष्यं । ) (भा. इ. १८३४)

दुट्टें १ [ दुष्ट = दुट्ठ =दुट्ट (ट्टा-ट्टी一ट्टें)] (भा. इ. १८३२)

-२ [ दुष्टं = दुट्टें ] दुष्टे दुष्टं आचरेत् । तुझें दुट्टें काढतों म्हणजे दुष्टं काढतों.

दावण [ दामनी = दावणी = दावण (गुरांची ) ] ज्या लांब दोरीनें गुरांना एका ठिकाणीं ओळीनें बांधतात ती दोरी, लक्षणेनें जेथें बांधतात त्या जागेला हि दावण म्हणतात. (भा. इ. १८३६)

दावें [ दामन् = दावें ] ( भा. इ. १८३७ )

दास [दस्युः = दासः ] दास शब्द दस्यु शब्दाचा जुनाट वैदिक अपभ्रंश आहे व तो संस्कृत म्हणून गणला गेला आहे.

दासट [ दशृ, दंश् : दंसक superl दंसकिष्ट = दासट ] biting.
उ. - तरि मारें उणें कालकूट । तेणें मानें कडुवट ।
कां चूनेयांहुनु दासट । अम्लीं हान॥ ज्ञा.१७-१३८
चूनेयाहुनि दासट more biting than chunem.

दाह [ दाहः ] ( डाह पहा )

दाही [ पाची पहा ]

दिखत [ दृश् १ प्रेक्षणे ] (धातुकोश-दिख पहा)

दिठा [ द्विपथ = दिठा ]

दिठिवा [ दृष्टिपातः = दिठ्ठिवाआ = दिठिवा ] हा शब्द ज्ञानेश्वरींत येतो.

दिपुष्ठाण [ दीपोच्छिष्ट = दिपुष्ठ. दिपुष्ट + घाण = दिपुष्ठाण ] दिव्याची घाण.

दिमाख [ घ्मांक्षा = दिमाख ] ध्मांक्षा म्हणजे कावळ्यासारखे कावकाव करणें, जबर इच्छा, इ. इ.
दिमाख काढीन म्हणजे तुझी महत्त्वाकांक्षा मारून टाकीन.

दिलँ, दिलें-ला-ली [ दत्त = दिन = दिलँ = दिलें -ला-ली ] ( ग्रंथमाला)

दिवटा [ दीपवर्त्तिका = दिवटी. द्विष्टः = दिवटा ] दिवटें पोर = द्विष्टः पुत्रकः

दिवटा, दिवटी [ दिविष्ठ heavenly = दिवटा-टी-टें] divine दिवटें पोर ( लाक्षणिक ) worthless chap. दिवटी १ [ दिव्यस्त्री divine female = दिवटी ] any vagrant woman.

-२ [ दीपवर्तुलि = दीववाटुली = दिवाटली = दिवाटी, दिवटी ] ( ग्रंथमाला)

दिवड [ द्विपद = दिवड ] ( भा. इ. १८३२ )

दिवसपट्टी [ दिनपट्टिका = दिनपट्टी, दिवसपट्टी ] रोजचें वेतन. मासपट्टिका = मासपट्टी, महिनेपट्टी. वर्षपट्टिका = वरीसपट्टी.

दीठ [ दृष्टि = दीठी = दीठ] (स.. मं.)

दीठिवा [ दृष्टिपात = दीठिवाअ = दीठिवा ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ५ )

दादला १ [ दाद: ] ( दादुला २ पहा)

-२ [ दातृक = दातरअ = दादलअ = दादला, दादा (जीव देणारा, अन्न देणारा ), दातार (ज्ञानेश्वर) दादुला ] (स. मं.)

-३ [ दयित: ] ( दादा ४ पहा)

दादा १ [ दातृक ] ( दादला २ पहा)

-२ [ दवदव (imperative) = दादा. दु-दवति to go ] दादा म्हणजे चलचल, चलाचलाव.

-३ [ दादः (donor ) = दादा ] father.

-४ [ दयितः = दाइदा = दादा. दादा + ल (स्वार्थक ) = दादला ] दयित म्हणजे नवरा, प्रिय.

दादुला १ [ दातृक ] ( दादला २ पहा)

-२ [ दाद: ( donor ) + स्वार्थक ल = दादला, दादुला ] husband.

दाम [ द्रम्म ] (द्रम्म पहा)

दामाडू [ द्रम्म ]

दार [ दारु (दा + रु ) one who gives = दार ] one capable of giving or spending. नादार not capable of giving or paying.

दारकुसूं [ द्वारकुशी = दारकुसूं ] कुशी म्हणजे लोखंडाचा फाळ.

दारवटा [ द्वारकोष्ट, द्वारप्रकोष्ठः ] (दारोटा १, २ पहा )

दारूहळद १ [ दारुहरिद्रा = दारूहळद ] ( भा. इ. १८३७)

-२ [ दार्वी हरद्रुः = दारूहळद ] दार्वी व हरद्रु हीं दोन नांवें दारु हळदीचीं च आहेत. दोन्ही नांवांचें मराठींत एक नांव झालें आहे.

दारोटा १ [ द्वारकोष्ट = दारओठ्ठ = दारोटा, दारवटा ] द्वारकोष्ठे च मुक्तापटकलापप्रलंबितानि । ( कारंडव्यूह) (भा. इ. १८३४)

-२ [ द्वारप्रकोष्ट: = दारोटा, दारोठा, दारवटा ]

दारोठा [ द्वारप्रकोष्ठः ] ( दारोटा २ पहा)

दार्वटेकार [ दार्वटकार: = दार्वटेकार ] दार्वट म्हणजे सभास्थान. दार्वटेकार म्हणजे सभास्थानीय वेत्रकार किंवा सभासद.

दाल [ दारु = दाल, ढाल. दाल म्हणजे शिपतर ]
अति पुरातनकालीं ढाला लांकडाच्या होत्या असें दिसतें.

नाणवटी - नाणवंटक= नाणवटी. नाण्याचा बटवडा करणारा जो तो, सराफ. नाणावटी, नानावटी, हें आडनांव गुजराथ्यांत अद्याप आहे.

नामांकनं = नाआंअणं = नाणँ हा शब्द संस्कृतांतून प्राकृतांत आला आहे. (भा. इ. १८३४)

नांदे - नंदिः (स)

निचुरे - १ [ सं. निष्ट्ररिक - महा - निट्टरिआ - मरा - निचुरे ] (म) (इतिहाससंग्रह)
-२ निचोराणिः (स) .

नित्सुरे - निचोराणिः (स)

नेकोणे - नैकर्णिः ( कों ) ( स )

नेवरे - नैकरि: = (नेअरि ) नेवरे (कों)

पंगे - पैंग्याः (स)

पंचनदीकर - पांचनदाः (स)

पटवर्धन - धंद्यावरून (कों) (क)

पठाण - प्रात्तायनाः (स)

पंडित - पांडाः ( क )
पंड्ये - पांडेया: ( कों )

पतकी - धंद्यावरून (क )

परचुरे - परिकुराः (कों)
परजपे, परांजपे - परश्चासौ जपश्च. (स)

पराशर - पाराशर्य्या: (स)

पराशरे - पाराशर्य्या: (स)

पवैते - १ पर्वताः (कों ) (स )
-२ (पर्वतस्य अपत्यंपुमान्) पार्वतः= पर्वत, पर्वते.

पलित - पलतः (स)

पळनिटकर - ग्रामनामावरून (कों )

पळशे - पालाशिनः (स)

पागे - प्रागे (हया: ) (एकशेष ) ( कों ) (स)

पाटणकर - ग्रामनामावरून (कों)

पाटील [ पट्टकील = पाटैलु, पाटेल, पाटील ] अशोकाच्या वेळीं कापसाचे विणलेले पट्ट लिहिण्याकरितां वापरीत. जमिनीच्या मालकीची नोंद ह्या पट्टांवर करीत व ते पट्ट कीलकांत म्हणजे वेळूच्या पोकळ कांडांत घालून सुरक्षित ठेवीत. पट्टकील म्हणजे पट्ट ज्यांत ठेविले आहेत तीं वेळूचीं पोकळ कांडें. हे पट्टकील ज्याच्या ताब्यांत असत त्या गांवच्या ग्रामणीला पट्टकीलक म्हणत. पट्टकीलक या शब्दाचा अपभ्रंश पट्टकील. पट्टकील या शब्दाचा मराठी अपभ्रंश पाटैलु, पाटेल, पाटील. (रा. मा. वि. चंपू. पृ. १९२)

दाढी (भाजणें) [ दग्धि - दढ्ढि = दाढी = भाजावयाकरितां जमवलेला पाचोळा ] ( ग्रंथमाला)

दाणा [ धाणिका = दाणा (स्त्री-इंद्रिय) तैत्तिरीय संहिता ]

दाणादाण १ [ द्राणं + आद्राणं = दाणादाण ]
द्राण म्हणजे पळणें. दाणादाण म्हणजे पळापळ.

-[ द्रा २ कुत्सितायां गतौ ]
द्राणंआद्राणं = दाणादाण (पळापळ ) (धा. सा. श)

दाणिँ [ इदानीम् ] ( आताँ पहा)

दांत १ [ दंत = दांत ] (स. मं. )

-२ [ द्वंद्व = दंद = दंद किंवा दांत ] त्यानें माझ्या वर दांत धरला म्हणजे वैर धरलें. दंद धरला असा हि प्रयोग आहे. द्वंद्व म्हणजे वैर, भांडण, युद्ध.

दांतखीळ [ दंतकील = दांतखीळ ] (भा. इ. १८३४)

दांतरा [ दंतुरः = दांतरा (री - रें) ] ( भा. इ. १८३६)

दाता [ दात्रः = दाता ] शेतकर्‍याचें औत.

दाँता [ दंतक = दांता] चाकाचा दांता.

दातार [ दातृक ] (दादला २ पहा)

दांती [ दंतिका = दांती ( वनस्पतिविशेष) ] (भा. इ. १८३७)

दांतेकड [ दंतकाष्टिका = दांतेकड] रहाटाच्या चाकाच्या दांत्याच्या कड्या.

दांतोडी [ दंतकोटि: = दांतोडी]

दाद १ [ दै, दे to take compassion on Freq दादेति. ( नाम ) दादा (स्त्री) = दाद compassion ] दाद मागणें to ask protection, mercy, compassion.

-२ [ (दय् पौनःपुन्य) दादय्य = दाद (संरक्षण, दया) ] दाद मागणें म्हणजे संरक्षण, दया sympathy मागणें. (भा. इ. १८३४)

-३ [ दद्रु = दाद (रोगाविशेष ) ] (भा. इ.१८३४)

-४ [ ध्यै Freq दाध्याति, दाध्येति noun दाध्या = दाद ) attention, minding.
त्याला त्याची दाद नाहीं he had no knowledge of it.

-५ [ दे to protect Freq दादेति noun दादिः = दाद ] protection. दाद मागणें to ask protection.

-६ [ दे to protect : दाति protection = दाद ] protection. दाद मागणें to ask for protection.

धराधर - धरधर (कृष्ण ) = धराधर (आडनांव) धाकरस - १ दाध्रेकछि: (क)
-२ दाध्रेकषिः ( स )

धुमे - धौम्याः ( स )

धुरू - अध्वर्युः = धुरू (आडनांव आहे)

धुळप - सं. दिलीप. (म) (दुळीप पहा)

धोत्रे - दौहित्राः (स)

नकटे - नैकटि: (स)

नगरकर - १ नागरक = नगरकर } कौटिल्य-
नागरकप म्हणजे town clerk } अर्थशास्त्र
नगरक शब्दाला र जोडला आहे (आडनांव) नगरकर म्हणजे नगर शहरांतला राहणारा हा शब्द निराळा.
-२ ग्रामनामावरून. (कों)

नंदे - १ नंदिः (स)
-२ नानान्द्रः (स)
-३ [ सं. नंदक - महा. णंदअ - मरा. - नंदे,
णंदे] (म) ( इतिहाससंग्रह )

नरटे - नाराट्यः ( स )

नराणे - १ नाराणाः (कों)
-२ नारायणः (स)

नवघरे - नवग्रामाः ( स )

नवरंगे - नवरंग = केशरीवत्र. नवरंगे - केशरी वत्र रंगविणारे किंवा वापरणारे. हें आडनांव आहे. (ग्रंथमाला)

नवाथे - १ नपात्यः (स)
-२ नपात्याः (क)

नाखरे - नैकरिः (क) (स)

नाग [सं. नाग - महा - नाग - मरा - नाग ] (म) (इतिहाससंग्रह)

नागवे [ नागपति = नागवइ = नागवी = नागवे ] (म) (इतिहाससंग्रह)

नाचण - नृत्यायनः (स)

नाचणे - नृत्ययनाः (स)

नाटेकर - नाटेरः ( स )