Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

चुप बसणें [ चुप् मंदायां गतौ ] (ग्रंथमाला)

चुंबत १ [ चुंब् इजा करणें, मारणें. चुंबत् = चुंबत ] चुंबत येईल म्ह० त्रास झाला तरी येईल.

-२ [ चुप् - चुंप् ]

-३ (गुप) चुप, चुप (imp. second singular) चुप to move slowly = चुप ( move slowly ) चुप् चुंप् = चुंबत बसणें to sit idly unoccupied ]

चुरकन् [ चूर् - चूर्यते ] ( धातुकोश-चुरचुर २ पहा)

चुरगळ [ चूर्णकला = चूरगळ ] (भा. इ. १८३६)

चुरचुरणें [ चुरि दाहे ] (ग्रंथमाला)

चुरचरणें [ चूरी दहे. द्वित्वेन चुरचूर ] चुरचूणें म्ह० दाह होणें. (भा. इ. १८३३)

चुरणें [ छुरणं (घासणें ) = चुरणें (पाय वगैरे)] (भा.इ. १८३३)

चुरा १ [ छुरा = चुरा (चुन्याचा वगैरे) ] (भा. इ. १८३३)

-२ [ छुर: = चुरा. छुर् कापणें ] कापून बारीक केलेला भुगा तो चुरा.

चुलत-ता-ती [ चुल्लस्थ = चुल्लत्त = चुलत-ता-ती ] निराळी चूल करून राहणारा. ( स. मं. )

चुलता [ क्षुल्लतात = चुल्लताअ = चूलता = चुलता ] क्षुल्लतात म्हणजे बापाचा धाकटा भाऊ. (स्त्री.) चुलती. ( भा. इ. १८३३)

चुळचुळ [चुल्ल १ भावकरणे = चुळ, (द्विरुक्ति) चुळचुळ] चुळचुळ (मुंगळा ) म्हणजे हावभाव करणारा.

चूक [शुकः, शूका (कांटा, अग्र) = चूक] कांट्यासारखा लोखंडाचा पदार्थ.

चूण [ चूर्णिका = चूण ]

चूत १ [ च्युतिः ( योनि) =चूत. चूतिः (गुदद्वार) = चूत ]

-२ [च्युतिः = चूत vulva. वैजयंती ]

चुत्या १ [ चूतिकः = चूत्या (गांडू) ]

-२ [ चौतिकः (चूतिः) = चूत्या ] born from the anus insteed of from vulva.

-३ - चोत्त, चोत्तओ, ह्या शब्दांचा अर्थ प्राकृतांत 'चांगला' असा आहे. तो चूत्या आहे, म्हणजे तो चांगला आहे, असा मूळ अर्थ. विपरीत लक्षणेनें पाजी असा अर्थ सध्यां बनला आहे. ( ग्रंथमाला )

चूप [ चुप् मंदायां गतौ ] चूर बैस = मंद बैस, स्वस्थ बैस, उगा रहा. ( भा. इ. १८३३)

चिवडा १ [ चिपिट ११. चिपिटः = चिविडा = चिवडा ] ( धा. सा. श. )

-२ [ चिपिटकः = चिवडा ] चिपिटक म्ह० पोहे.

चिवा [ चिमिय = चिवा a kind of Bamboo ] कौटिलीय अर्थशास्त्र पृ. १०० ओळ ३

चीक [ जिष् = चीक. जिष् to sprinkle जेषति ] चिकाचा पडदा म्हणजे पाणी शिंपडून हवा गार करण्याचा पडदा.

चीत [जी १ जये. जित = चीत (जिंकलेला ) ] ( धा. सा. श. )

चीप [क्षिप्रं = चिप्पँ = चीप ] चीप येतोहे = क्षिप्रं आयाति. ( भा. इ. १८३४)

चुई [ सूचि = चूई= चुई ] ( भा. इ. १८३२ )

चुकचुक [ कूच् १ अव्यक्तायां वाचि ] चोकुज्य = चुकचुक. कुचकुच (द्विरुक्त). ( धा. सा. श. )

चुकणें [ स्कु = चुक + णें = चुकणें ] स्कु म्हणजे उडी मारणें, गति करणें. करून चुकणें म्हणजे करून पुढें जाणें, करून दुसरें कांहीं जलदीनें काम करणें. (भा. इ. १८३५)

चुकार (तट्टू) [ शूकल: = चूकर = चुकार (तट्टू) ] शूकल म्हणजे अडेल घोडा.

चुटकन कांपणें [ चुट्, छुट् छेदने ] चुटकन कांपणें. (ग्रंथमाला)

चुटका १ [ चुट्टकः = चुटका ( लहान ) ]

-२ [ सुट्ट to be smell. सुट्टकः = चुटका ] a small portion of anything.

चुटकी [ छोटिका = चोटकी = चुटकी ]

चुटपुटता [ चुट्ट अल्पीभावे + स्फुट् to break = चुटपुटता ] small and broken.

चुट्टा [ चुट्ट १० अल्पीभावे. चुट्टः = चुट्टा ] चुट्टा म्हणजे वाटून बारीक केलेलें धान्य. ( धा. सा. श. )

चुट्टाचुर्मा [ चुट्ट: = चुट्टा. चुट्ट अल्पीभावे ] चुट्टा म्हणजे वाटून बारीक केलेलें धान्य. [ चूर्णिमन् = चुरमा = चुर्मा ] चुर्मा मद्दणजे चूर.

चुडा [ चूड़ा = चुडा ] (स.मं.)

चुडेल [ चूडाल: = चुडेल (पाखरूं) ]

चुणी [ चूर्णिका = चुणी) धोत्राच्या उभ्या घड्या.

चुनखडा [ चूर्णखंडः = चुनखडा ]

चुनखडी [ चूर्णखटी ] (खडा २ पहा)

चुप् [ सुषुप् (स्वप्) = चुप् ] be sleepy, silent. चुप् बैस = stand silent, sit silent.

बिजे [ विजये ] (दासींचीं नांवें पहा)

बिजेसिंग [विजितसिंह = बिजेसिंग ] (भा. इ १८३५)

बिजेसेन [ विजितसेन ] (विजेसेन पहा ) 

बिर्जा [ वीर्या = बिर्जा (स्त्री नाम ). कारंडव्यूह नागकन्यानामानि ] (भा. इ. १८३४) 

बिर्जे [ विराजिके ] (दासींची नांवें पहा)

बिळंभट [ बिहलण = बिल्लण = बिळम्.
बिळम् + भट = बिळंभट ] (भा. इ. १८३४)

भगु [ (भाई, विशेषनाम). भग = ( पुं.) भगु, बगु ] (भा. इ. १८३४)

भटंभट [ बृहत्तम = भत्तम = भट्टम = भट्टम.
भटम् + भट = भटंभट ] (भा. इ. १८३४) 
भलंदन - भलंदन हें एका ऋषीचें व गोत्राचें नांव आहे. भलंदन म्हणजे मराठींत अगडबंब पुरुष. (भा. इ. १८३४)

भागी १ [भागीरथी = भागी (स्त्री) (एकशेष)] ( भा. इ. १८३४) 

-२ भागधेयी (संस्कृत स्त्रीनाम) = भागी (धेय गळालें) स्त्रीनाम. (भा. इ. १८३४) 

भामह [ मन्मथ ] ( मम्मट पहा ) 

भिउजी [ भीमादित्य ] (आदित्य पहा)

भिकंभट [ भीष्म = भीख्म = भिकम्. भिकम् + भट = भिकंभट ] (भा. इ.१८३४) 

भिकम [ विक्रमः = विक्कम = भिकम (शेट, भट ) ] 

भिकमशेट [ विक्रमश्रेष्ठिन्।= विक्कमसेट्ठि = बिकमसेट = भिकमशेट ] 

भिकाजी [ भैक्ष्याजीव = भिक्खाजीअ = भिकाजी ] begger. हे भिकाजी आले here comes the beggary fellow.

भिकुभट [ भिक्षु = भिख्खु = भिकु ] (भा. इ. १८३४) 
भिमाजी, भिमोजी [ भीमादित्य ] (आदित्य पहा) 

भीम [ बिंब = भिंब (अर्धमागधी) = भीम ] ठाण्याच्या बिंबदेवाला भीमदेव असें हि म्हणतात. (भा. इ. १८३२ 

भुंगे [ भृंगारधारिणि ] ( दासींचीं नांवें पहा 

मकाजी [ मंकि = मक (मकाजी) मंख = मक (मकाजी)]

मंगे [मातंगिके ] (दासींचीं नांवें पहा) 

मंगळे [मंगलिके]       ,,

मंजुळे [मंजुलिके]     ,,

चिमूट [ मुचुट्यंगुलिमोटनं (त्रिकांड शेष) मुचुटि = चुमुटि = चिमूट ] (ग्रंथमाला)

चिरटी [ चिरंटी ( मुलगी ) = चिरटी ] मुली लाडानें एकमेकीला अपशब्द बोलतांना हा शब्द योजतात.

चिरटी-टा-टें [ चीर (लांब टुकडा ) = चिरटा-टी-टें, चिरफळी ] (भा. इ. १८३३)

चिरडणें १ [ अर्द् १० हिंसायाम्-अत्यर्दनं = (अलोप) चिरडणें ] अत्यर्दन म्ह० सडकून दाबणें (धा. सा. श.)

-२ [ स्त्रिध् = चिरड + णें = चिरडणें. स्त्रिध् (वैदिक ) ठार मारणें ]

चिरफळी [ चीर (लांब टुकडा ) = चिरटा-टी-टें, चिरफळी ] (भा. इ. १८३३)

चिरा [चीवर = चिरा] चिराबादली. (भा. इ. १८३४)

चिराचोळी [ चिल् (वस्त्रें घेणें) = चिरा cloth ] चिराबादली.

चिरी १ [ चीवर (री) = चिअरी = चिरी ] लहान मुलीचें लहान लुगडें म्हणजे चिरी.+ (भा. इ. १८३४)

-२ [ चिर a stripe of cloth = चिरी. चिरपत्रिका a stripe of cloth = चिरोटी a scrap of paper etc. ]

चिरेबंद [ शिलाबद्ध = सिराबद = चिराबंद = चिरबंद ] चिरेबंदी वाडा = शिलाबद्धः वाटः

चिरोटी [ चिरपत्रिका ] (चिरी २ पहा)

चिलट [ झिल्ली = चिली. झिल्लीटं = चिलीट = चिलट ] चिलीट असा उच्चार अशिष्ट करतात.

चिलया [ चेलकः = चिलया ]

चिल्लर, चिल्हर [ क्षीणतर = चीणअर = चिण्णर = चिल्लर = चिल्हर] चिल्लर म्हणजे अति सूक्ष्म, सटर फटर.
क्षुल्ल = चुल्ल.
क्षुल्लतात = चुलता.
क्षुल्लतर = चुल्लर = चिल्लर ( क्ष = च ).

चिवचिव [ चीव् भाषार्थे ] चिमणीसारखा शब्द करणें. (ग्रंथमाला)

चिवचिव [ स्यम् १ शब्दे. द्विरुक्ति चिवचिव ] (झमझम पहा)

चिचुंदरी [ छुछुंदुर (छुछु + उंदुर: ) = चिचुंदर-री ] (भा. इ. १८३३)

चिचुंद्री [ चंद्र नामधातू Freq चिचंद्र: नाम चिचंद्रिः = चिचुंद्री ] A shinning firework like the moon. चिचुंद्री ह्या शब्दावरून दिसतें कीं, दारू करण्याची कला frequentative रूपें भाषेंत चालू असतांना प्रचलित होती म्हणजे ही कला भारतवर्षांत फार जुनी आहे.

चिट पाखरूं [ चटकः, चिटिक: = चिडी = चिट ] चिट पाखरूं म्हणजे चिमणीसारखें क्षुद्र पाखरूं.

चिट्टी [ चिट् निरोप घेऊन पाठवणें. चिट्टिका = चिट्टी ] ( भा. इ. १८३३)

चिडणें [ चड् कोपे. डोकें चढणें = डोक्याचा कोप होणें = चिडणें, चढणें ] (ग्रंथमाला)

चित् [ स्वित् = चित् (हा अपभ्रंश जुना आहे )]

चिताड १ [चित्रान्नं = चिताण = चिताड ] सगळें पान चिताड करून उठला म्हणजे सर्व अन्नें चित्रविचित्र मिसळून उठला.

-२ [ चित्रं = चितरं = चितड = चिताड ]

चित्ताथिला [ चित्तान्वित + ल = चित्ताथिला ] विचारी.

चिस्ता वाघ १ [ चित्रकः व्याघ्रः = चित्ता वाघ ] चित्रकः चित्रकायः स्यात् उपव्याघ्रो मृगान्तकः ॥ राजनिघंटु ॥ (भा. इ. १८३७)

-२ [ चित्रकः = चित्तओ = चित्तो. चित्रक =चित्तअ = चित्ता ] चित्ता = चित्रविचित्र कातडें ज्याचें तो. (ग्रंथमाला)

चिंधी [ चिन्ह ( पताका ) = चिंध. लहान चिंध = चिंधी ] (ग्रंथमाला)

चिंब [ श्विंद् १ to be wet = चिंब ]

चिबूड १ [ चिर्भिट = चिब्भिड = चिबीड = चिबूड = फलविशेष ] (ग्रंथमाला)

-२ [ चिर्भटिका = चिबूड ]

-३ [ चिर्भटं = चिबूड ]

चिमकणें [ श्मीलनं = शिमळणँ = चिमळणँ = (वर्णविपर्ययानें) मिचळणें = चिमकणें (ळ बद्दल क) मिचकणें, मिचकावणें ] (भा. इ. १८३७)

चिमणी [ चीव् पासून चीवणी = चिमणी-णा-णें] (ग्रंथमाला)

चिमुटी [ मुचुटी = चुमुटी = चिमटी ] मुचुटी म्हणजे दोन किंवा तीन बोटांची मुद्रा.

-बा [ पाद = पाअ = वाअ = बा. ]
देवपादाः देवपाआ = देववाआ = देवबा.
गणपादाः = गणबा.
गोविंदपादाः = गोंदबा.
हरिपादाः = हरबा.
नारायणपादाः = नारबा.
महादेवपादाः = म्हदबा.
बल्लालपादाः = बाळोबा. इ. इ. इ.] ( भा. इ. १८३५)

बाची १ [ वासू: (a young girl) = बाची, बचू ]
-२ [ वत्सा ] (बची पहा )

बाचू [वासू = बाचू (पुत्रीनाम)] वासू म्हणजे मुलगी.
बाजीराव - इ. स. १२४१ त बाचीराज कर्नाटकांत अधिकारी होता. च चा ज होऊन बाजीराव हें आधुनिक नांव निष्पन झालें. (भा. इ. १८३२)

बाबण-[ पाप्मन् = पापण=वावण=बाबण(विशेषनाम)] (शब्द-आबण बाबण पहा)

बामनजी [ वामनादित्य] (आदित्य पहा) 

बामह [ मन्मथ ] (मम्मट पहा) 

बालाजी [ बालादित्य ] ( आदित्य पहा)

बास [ वयस्य = वअस्स = बास्स = बास = बाह = बा ] विठ्ठलबास, कान्हबास वगैरे नांवें मानभावग्रंथकारांत फार. ह्या नांवांतील बास हा शब्द संस्कृत वयस्य शब्दापासून निघाला आहे व त्याचा अर्थ Companion, associate असा आहे.
मराठींत गणबा, गोंदबा, वासबा वगैरे शब्दांतील बा हा अवयव हि ह्या संस्कृत वयस्य शब्दापासूनच निघालेला आहे. (भा. इ. १८३४)

बाळ [ बाल ] (स. मं. शके १८२७) 

बाळक्या-की-क [ बालक] (बाळा पहा)

बाळभट [ बाल + भट = बाळभट ] (भा. इ. १८३४) 

बाळंभट [ बहलण = बल्लण = बाळण = बाळम्, बाळम् + भट = बाळंभट ] बाळ म्हणजे मुलगा ह्या शब्दाशीं कांहींएक संबंध नाहीं. (भा. इ. १८३४ ) 

बाळा-ळी-ळ [ बालक = बाळअ = बाळा-ळी-ळ, बाळक्या-की-क ] (स. मं. गोतवळा शके १८२७)

बाळाजी १ [बालराज ] (बल्लाळ पहा.) 

-२ [ बालादित्य ] (आदित्य पहा) 

बाळोजी [बालादित्य ] ,,

बिकर्मजी [ विक्रमादित्य ] ,,
बिंबदेवाला भीमुदेव असें हि म्हणतात.

चाळ [ शाला = साळ = चाळ ] (भा. इ. १८३२, १८३६)

चाळणें (कौलें) [ चाळ (घराच्या पिंजरीवरील भाग ) तो नीट करणें म्हणजे चाळणें ] ( भा. इ. १८३४ )

चाळवणी [ चलापनी = चाळवणी ] (चाळा पहा)

चाळा [ चालः (चल् ६ P विलसने) = चाळा.

चलापनी = चाळवणी चलापनं = चाळवणें. ]

चाळीस [ चत्वारिंशत् ] (विंशति पहा)

चाळें [चलिः = चाळें ] चलि म्हणजे आस्तर. चाळें म्हणजे घोंगडीचें पांघरूण.

चिक [ जिष् १ सेचने. जिष = चिक ] चिकाचा पडदा म्हणजे पाणी शिंपून हवा गार करण्याचा पडदा. (धा. सा. श.)

चिकट १ [ किल् ६ बन्धने. चेकिल्य = चिकट ] ( धा. सा. श. )

-२ - घासाघीस करून थोड्या पैशांत उत्तम माल घेणारें जें गि-हाईक त्याला महाराष्ट्रांत चिकट गि-हाईक म्हणतात. चीक शब्दापासून निघालेला जो चिकट शब्द त्याशी ह्या चिकट (गिर्‍हाईक) शब्दाचा कांहीं एक संबंध नाही. हा शब्द निराळ्याच एका शब्दापासून निघालेला आहे. [ चिकित्सक = चिकिट्टअ = चिकिट = चिकट ] चिकित्सा करणारें गिन्हाईक तें चिकट गिर्‍हाईक. (भा. इ. १८३३)

चिकण [श्लक्ष्ण = चिक्कण = चिकण]

चिकणी (सुपारी) [श्लक्ष्णिका = चिक्कणीआ = चिकणी ]

चिकार [ चिकृ ( Frequentative of कृ ) कृ ६ विक्षेपे = चिकार ( crowded, densely ) संकृ to crowd ]

चिखल [ क्लिद् ४ आर्द्रीभावे. चिक्लिन्न =चिखिल्ल= चिखल ] चिखिल्ल हा शब्द प्राकृत वैय्याकरण देशी म्हणजे अव्युत्पाद्य मानतात. परंतु निश्चित आहे कीं, हा शब्द संस्कृतोत्पन्न आहे. चिक्लिन्न म्हणजे अतिशय ओलें. अतिशय पाण्यानें बरबटलेली माती म्हणजे चिखल.

चिखलू [ चिखल:, चिकिल:, इचिकिल: ] (ज्ञा. अ. ९ पृ. ४१)

चिघळणें १ [ जागल्य = जिगल = चिघळ (चिघळणें)] अतिशय गळणे. (भा. इ. १८३६)

-२ [(गल्) जागल्यते = चाघळणें = चिघळणें ] (भा. इ. १८३६)

चिच्या [ शिशुकः = चिचुआ = चिच्या ] लहान मुलाला चिच्या हें नांव महाराष्ट्रांत देतात.

चापट [चपेट = चापट ] (स. मं.)

चापणें १ [(जि) जापयति (णिच्) = चापणें. ज=च] जापयति म्ह० जिंकवितो. चापतो म्ह० जिंकवितो. (भा. इ. १८३६)

-२ [ चप् सांत्वने ] चापणें = सांत्वन करणें = स्तब्ध करणें - दाबणें. (ग्रंथमाला)

चापटपोळी [ चिपिट (थापटलेली) पोली = चापटपोळी चि बद्दल चा ] (भा. इ. १८३३)

चामट पोळी [ जम् अदने. जमट पोलिका = खायची, खाण्यायोग्य पोळी ] चामट म्हणजे कातड्यासारखी चिवट, ह्या शब्दावर कोटी आहे.

चामडें [ चर्म्म = चाम = चामडें (र्‍हस्वत्वदर्शक) ] (स. मं.)

चामुंडा [चर्ममुंडा = चामुंडा ] चामुंडा हा शब्द संस्कृत समजला जातो; वस्तुतः अपभ्रंश आहे.

चार १ [चर् १० संशये = चार करणें ] to behave suspiciously उ.- वेडे चार करणें.

-२ [ शार = चार ] हिरवा चार = हरित् शारः . शाण = साण, साहाण.

-३ [ शाद (हरित) = (हिरवा ) चार. द =ड = ल= र] चार म्हणजे हिरवा. चाराचें गवत म्हणजे हिरवें गवत.

चारगट [चारभट ( हिय्येबाज) = चारहट = चारगट ] चरगट म्ह० चावट. (भा. इ. १८३४)

चारा [ यवसं चारि इत्यपि (हेमचंद्र-निघंटुशेष ) ] (ग्रंथमाला)

चारी, चार्‍ही [ चत्वारि = चआरि = चारि = चार्‍ही ] (ग्रंथमाला)

चालीचा [ शालेयः = सालिज्जा = साळेचा = चालीचा ]

चावळणें [ वल् १ वेष्टने, संवरणे. अत्यावलनं= (अलोप) च्यावळणें = चावळणें ] ( धा. सा. श. )

-२ [ श्वलनं = सवळणँ = चवळणँ = चावळणें ] झोपेंत चलन करणें. स्वप्+ चाल् = श्वल् हा धातू झाला आहे. (भा. इ. १८३५)

चाव्या [ चामः = चावा, चाव्या ] चाव्या म्हणजे खाणें (बदाम, पिस्ते इ. इ.)

चाहा [श्लाघ्, श्लाघा = चाहा ] गोपी कृष्णाय श्लाघते = गोपी कृष्णातें चाहते. (धा. सा. श.)  ना. को. ९

चाँचा [ चंचा ( पाणिनि १-२-५२ ) = चाँचा ] चंचा म्हणजे कुपुरुष. चच्या हें नांव मराठींत आहे. सिंध प्रांतांत चचनामा म्हणून एक फारसी तवारीख आहे. तेथें चच या शब्दाचा चंचा या शब्दाशीं कांहीं संबंध असेल काय ? (भा. इ. १८३३)

चांचोड १ [ चंचूपुटं = चांचोड]

-२ [ चंञ्चूकोटि: = चांचोड ] चांचोड म्हणजे चोंचेचें अग्र.

चाट १ [ चट् to injure = चाट ] चाट लागला = नुकसान झालें.

-२ [ चृष्टिः = चाट ] इजा, नुकसान.

-३ [ चातयति. चातयतिर्नाशने इति यास्क: ( ६-३०) = चाट ] नाश, तोटा.

चाटणें [ चटनं = चाटणें ] स्पर्श करणें. अत्र पूर्णिमादिने समुद्रवेला चटति । पंचतंत्र-प्रथमतंत्र-कथा १२ (भा. इ. १८३५)

चाटळ [ चाटुलोल = चाटोळ = चाटळ = चाहाटळ ] चाटुलोल म्ह० थट्टेबाज. (भा. इ. १८३६)

चाड १ [ चते, चदे याचने. चति:, चदिः = चाड ] त्याला संसाराची चाड असेल म्हणजे विवंचना असेल.

-२ [ चातिः, चादिः = चाड. चत्, चद् याच्ञायां ] चाड म्ह० यांचा, गरज.

-३ [ चत्तिः चत् याच्ञायां = चाड ] (ज्ञा.अ.९)

-४ [ चाटु (स्तुतीची इच्छा) = चाड ] (भा. इ. १८३६)

चातुर - (सं.) चातुर म्हणजे शहाणा - हा शब्द मराठी लावण्यांत प्रियकरार्थक आहे. (भा इ. १८३४)

चांदकी [ चंद्रिका = चांदकी ] र्‍हस्वत्वदर्शक चांदुकली.

चांदवा [ चंद्रा, चंद्रिमा = चांदवा. चंद्रा canopy छत ]

चांदी [ चांद्री ( Moonlight पूर्णिमा) = चांदी ] ह्या दिवशीं मुसुलमानी अमलांत पगार वांटीत.

चांदोबा दाखविणें - दामोदरकराघातविव्हलीकृतचेतसा ।
दृष्टं चाणूरमल्लेन शतचंद्रं नभस्तलं ॥

चांदोबा दाखविणें म्हणजे उताणा पाडून मनुष्याच्या कानशिलांत अशी चपराक मारणें कीं, त्याला शंभर चंद्र दिसू लागावे, तिरमिरी येऊन. (भा. इ. १८३४)

चांधई [ चंद्रभित्तिः = चांदहिइ = चांधई ] चंद्रशाला शिरोग्रहं । घराच्या माथ्यापर्यंत जाणारी जी भिंत ती चंद्रिका. चंद्रभित्ति, चंद्रिकाभित्ति म्हणजे चांधई.

चळोकापळो कर [चलीकल्प्य = चळोकापळो. क्लपचें पौनः पुन्यदर्शक रूप चलीकल्प्य-त्यापासून मराठी चळोकापळो. क्लप् म्ह० कल्पना करणें. चलीकल्प्य किंवा चल्कल्प्य म्हणजे नाना संकल्पविकल्प प्रकर्षानें करणें. चलीकल्प्य् पासून नाम चालीकल्पनं चलीकल्पनं करोति = चळोकापळो करतो-चळणें आणि पळणें या क्रियापदांशीं येथें कांहीं एक कर्तव्य नाहीं. ] (भा. इ. १८३६)

चळोकापळो करणें [ ( क्लृप्) चलीक्लप = चलीकलप = चळोकापळो ] चळोकापळो करणें म्हणजे वारंवार कल्पना करून घाबरविणें. (भा. इ. १८३६ )

चाकी [जक्षिः ] ( चाखी पहा)

चाकु, चाकू [ कृ ९ हिंसायाम्, चर्कुः = चाकु, चाकू ( Knife) हिंसेचें उत्कृष्ट शस्त्र. ( धा. सा. श. )

चाखणें [ चष (ख) भक्षणें ] (ग्रंथमाला)

चाखंदळ १ [खाद red चाखाद + ल (स्वार्थक) = चाखंदळ ] given up to eating.
जीभ चाखंदळ झाली आहे.

-२ [ चष् भक्षणे चषंदरः = चाखंदळ ] खाण्यांत पटाईत. (भा. इ. १८३३)

चाखी [ जाक्षिः = जाखी = चाखी, चाकी ]
त्या पोरट्याची एकसारखी चाकी चालू आहे. येथें चाकी म्हणजे खाणें.

चांग भल (वैदिक) भल indeed, certainly ! (interjection)
चांग भल = certainly propitious.

चाचणी १ [ चर्चना = चाचणी ] चाचणी म्हणजे वरवर परीक्षा. चाचणी म्हणजे वरवर वाटलेल्या डाळीचें भरड ओलें पीठ.

-२ [चर्चणिः = चाचणी ]

-३ [ शास् to cut, Whitney = चाचणी ] डाळ फोडून केलेलें बेसन.

चाचपणें [ चाचप्यते (चप् सांत्वने) (पौनःपुन्य) = चाचपणें ] चाचपणें म्हणजे हातानें सांत्वन करणें, नंतर हातानें शोधणें. (भा. इ. १८३६)

चाचरणें [ (चर) चाचर्यते = चाचरणें ] चाचरणें म्ह० वांकडें तिकडें चालणें. (भा. इ. १८३६)

चांचरा [ चंचरीक = चांचरा ] (भा. इ. १८३३)

चांचरी [ चंचूर्या = चांचरी ] वाईट चालीची.