Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
दहा पांच वर्षे - दहा पांच वर्षे हे शब्द कालासंबंधानें योजतात. ही योजना मराठीनें संस्कृतांतून घेतली आहे, व ती पंचतंत्राच्या कालाइतकी जुनी आहे:-
शिथिलौ च सुबद्धौ च पततः पततो न वा ।
निरीक्षितौ मया भद्रे दशवर्षाणि पंच च ॥ १४६ ॥
पंचतंत्र-द्वितीय तंत्र-कधा ६ (भा. इ. १८३५)
दहावा [ शंभरावा पहा ]
दह्या [ ( दघ्ना भक्षयति ) दाधिकः = दघ्या.
दघ्या, दुघ्या, साखर्या, आंबट्या, इत्यादि शब्द चरति ( ४-४-८ ) या पाणिनीय सूत्राप्रमाणें झाले आहेत.
दळिद्र [द्रारिद्र्य ]
दळ्या [ दरिद्रः = दळिद्दो, दळिओ = दळिया = दळ्या़ ] दळ्या म्हणजे भिकार.
दा [ अदात् = देणें. अयछत् = एचणें, वेचणें ] (भा. इ. १८३४)
दाई [ धात्री = धाई = दाई ] (स. मं.)
दागिना [ आघ्यग्नेय property given to bride, at wedding = दागिना ] ornament.
दाघ [ द्राघ् सामर्थ्ये. द्राघः = दाघ ] सामर्थ्य.
उ०-जेणें प्रकाशा कांति चढे । ब्रह्मानंदाचा दाघु मोडे ॥
जें व्रह्माचेनि जीवन सौरभ्यें जोडे । वेधवतिये ॥
ज्ञा. अ. ११-२२०
दाठर [दृढतर = दढअर = दढार = दाठर ] (भा. इ. १८३२)
दांड [ दंडक = दांड, दांडगा ] दंड म्हणजे धृष्ट, गर्विष्ट.
दाडकन् [ द्राड् विशरणे ]
दांडगा [ दंडक ] (दांड पहा)
दाडदाड १ [द्राड् विशरणे ]
-२ [ द्राड् १ अवयवे, विशरणे. द्राडंद्राडं] (धाडधाड पहा)
दांडपट्टा [ दंडपट्टिश ] (भा. इ. १८३७)
दांडा [ दंडक = दंडअ = दांडा (नाकाचा) ] (स.मं.)
दांडी १ [ दंडिका (काठी)= दांडी ] धोत्रें वाळत घालण्याची आडवी काठी किंवा तागडीची काठी.
-२ [ दंडिका = दांडी ] दंड, दंडिका म्हणजे निमुळता कोना कोपरा. कुलाबदांडी म्हणजे कुलाब नांवाचा मुंबई बेटाचा कोपरा.
दाढ, दाढी [ दंष्ट्रा = दढ्ढा = दाढ. दाढेच्या बाहेरील केस = दाढी ] (ग्रंथमाला)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
दधात १ [ दध् १ दाने ] ( ददात पहा)
-२ [ दद्यात् = दधात ] (ग्रंथमाला)
दध्या [ ( दध्ना भक्षयति ) दाधिकः = दध्या ] (दह्या पहा)
दबदबा [ दरीदर्पः = दबदबा. दृप् to pride ] magesty, awefulness.
दब्ब [ स्तब्ध = थब्ब = डब्ब = दब्ब ] wellstuffed
दमट [ द्रविष्ट ] ( धातुकोश-दमट २ पहा)
दमडी [ द्रम्म ] ( द्रम्म पहा)
दमदमित [ दंदम्यित = दमदमित. दम् ४ उपशमे ] दमदमित जेवण झालें = भूक शमेलसें जेवण झालें.
दमा [ ध्मा ] ( धातुकोश-दम ३ पहा)
दयाळ (प्रिय) [दयित + ल (स्वार्थक) = दइअल = दयाळ (ळा-ळी-ळें ) ] लावण्यांत व कवितेंत दयाळा
(संबोधन, पुल्लिंग) दयाळे (संबोधन, स्त्रीलिंग) हे शब्द येतात व त्यांचा अर्थ प्रिया, प्रिये असा आहे. दयाळु (मायाळु) या शब्दाशीं या दयाळ शब्दाचा कांहीं एक संबंध नाहीं. (भा. इ. १८३४)
दरद १ [ दरत्स्त्रियां प्रपाते च भयपर्वतयोरपि (मेदिनी) दरत् (पर्वत) = दरड ] (भा. इ. १८३३)
-२ [ दलाढ्या = दलड = दरड = दलद ] नदीच्या तीरावरील चिखली जमीन.
दरदरून १ [दृ to split ] दरदरून घाम आला.
-२ [दर्दर्त्वा ( दृ vedik) to kill, hurt ) = दरदरून ] दर्दरून घाम सुटला म्हणजे वाजवीपेक्षां फाजील इजा करणारा घाम सुटला.
-३ [ दृ ९ विदारणे-दर्दरीति ](धातुकोश-दरदर १ पहा)
दर्शन [ दर्शनं नयनस्वप्नबुद्धिधर्मोपलब्धिषु इति मेदिनी ] रामदासांना रामाचें दर्शन झालें, या वाक्यांत दर्शन याचा अर्थ स्वप्न असा करणें उचित आहे.
दलद [ दलाढ्या ] (दरद २ पहा)
दंव [ द्रव = दव = दँव ] (भा. इ. १८३२ )
दवडत [ द्रवत् ( पळत, झटकर) = दवडत ] स आ वह देवान् द्रवत् ( १-९-४४-७)
दवली [ दार्विकावल्ली = दवली ] पाथरी.
दस्त १ [ दस्-दस्त (दस् नाश करणें ) ] त्यानें त्याला दस्त केलें म्हणजे त्याचा नाश केला.
फारसी दस्त शब्दाहून हा संस्कृत दस्त शब्द निराळा. ( भा. इ. १८३४)
-२ [ फारसी ] (स. मं.)
उपनामव्युत्पत्तिकोश
दर्वे - दार्भि: (कों)
दर्व्ये - दार्भि: ( स)
दवणे - दामनीयाः= दावणे - दवणे. अष्टाध्यायी ५-३-११६
दळवी - (शेणवी पहा)
दांडके - दांडकीयाः = दांडके, दंडके.
दाबक - ज्ञापक = दापक = दाबक (ग्रंथमाला)
दांडे - १ दंडि: (स)
-२ दाण्डाः ( स ) ( कों )
दांडे (कर, केर प्रत्ययापासून) - दांडिनायनाः (कों)
दांडेकर - दांडिनायनाः = दांडेकर (केर) (स)
दातार - दात्रेयाः ( कों )
दाते - १ दातेय: (कों)
-२ दात्तेया: (स)
दाभणे - दार्भायणाः (स)
दामले - १ दामाः = दामले (स्वार्थे ल) (कों)
-२ दामाः (स)
दारवटेकार - द्वारप्रकोष्टहारी = दारवठेकर, दारवटेकार.
दारवठेकार - द्वारप्रकोष्ठहारी,
दरवठेकार-द्वारपथ = दारवठा, दारोठा, दारवंठा, बारोठ.
दावलभक्त - दावालः = दावल. दावालश्चासौ भक्तश्च
दावलभक्त. (स)
दीक्षित - धंद्यावरून (क) (कों) दिमोटे - द्वैमत्या (स)
दुर्गे - दौर्गायणाः (स) दुळीप [ सं. दिलीप. मरा - दुळीप, धुळप ] (म) (इतिहाससंग्रह )
देव - १ दैवदत्याः - देव (एकशेष ) (स)
-२ देवाः ( कों ) ( स ) ( क )
देवल - देवल: (कों)
देवळे - देवल हें आडनांव सध्यां मद्वाराष्ट्र ब्राह्मणांत आहे. ( मनुस्मृति-अध्याय तिसरा. श्लोक १५२ कुल्लूकः ) - देवलः प्रतिमापरिचारकः । देवकोशोपभोजी च नाम्ना देवलको भवेत् ।
देवल म्हणजे प्रतिमेचा परिचारक ब्राह्मण. देवल हें आडनांव निराळें. तें देवल ऋषिनामापासून आलें आहे. (भा. इ. १८३४)
देवस्थळी - देवस्थानिः (स) ( क)
देशमुख - धंद्यावरून (कों)
देसाई - दशपति = देसवई = देसाई.
( ग्रंथमाला - मंगळवेडें येथील शिलालेख)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
द
दगड ( निपात ) १ [ धगित् = दगिड = दगड ] ते काय दगड काम करते ? (भा. इ. १८३४)
-२ [ दग्धः = दगड, दगड्या ] दग्ध म्हणजे निंद्य. तूं दगड आहेस म्हणजे निंद्य आहेस.
दगदग [ दघ् ८ घातने, दघदघ = दगदग ] दगदग म्ह० घात, नुकसान, आयास. ( धा. सा. श. )
दंड [दंड (प्रणाम) = दंड ] फारसींत ज्यांना जोर म्हणतात त्यांना च मराठींत दंड म्हणतात. दंड काढले म्हणजे जोर काढले. दंडप्रणाम म्हणजे काठीसारखें जमिनीवर पडून नमस्कार करणें.
दडपणें [ दर्भयति ( दृभी भये ) = दरभ = दडब = दडप + णें = दडपणें ( अकर्मक, भिणें या अर्थी ) ] माझी छाती दडपली म्हणजे भयाली. (भा. इ. १८३७)
दडप्या १ [ दर्पयति = दडपणें. दर्पकः = दडप्या ]
-२ [ दृढपतिः = दडपइ = दडप्या ] तिचा दडप्या म्ह. धणधाकट नवरा.
दंडवत [ दंडवत् पतनं असा संस्कृत प्रयोग. पैकीं प्रथमार्धक जो दुंडवत् शब्द् तोच मराठींत रूढ झाला आहे.] दंडवत् म्हणजे मूळार्थ दंडाप्रमाणें, लाकडाप्रमाणें. दुसरा अर्थ शूद्रादिकांचा प्रणिपात.
दंडुक्या १ [ दंडुक: ( wicked वैजयंती) = दंडुक्या ]
-२ [(सं.) दुंडुक (लुच्या, अप्रामाणिक) = दंडुक; दुंडुकिक = दंडुक्या ] मूळचा अर्थ लुच्चा; दुसरा अर्थ शिरजोर. (भा. इ. १८३३)
दणका [दंडढक्का = दणका ] दणक्याचें (दंडढक्कीय) लग्र.
दणकाव [धृष् १० प्रहसने. धृष्णजकाम्य = दणकाव] ( धा. सा. श. )
दणक्या [धृष्णक् = दणक्या ] धृष्णक् म्हणजे अविनीत, उद्धट, इ. इ.
दंताळें [ दात्रालि = दाताळें = दंताळे] शेतकर्याच्या औतांपैकीं एक.
दंताळ्या [ दंतिल: = दंताळ्या ]
ददात [ दद् १ दाने. ददतिः = ददात
दध् १ दाने. दधतिः = दधात ]
हे दोन्ही उच्चार आहेत व दोन्ही निरनिराळ्या धातूंपासून निघाले आहेत. (धा.सा.श.)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
थैथै [ थैथै (वाद्यध्वनि ) = थैथै ]
थोकडें [ स्तोक + ट ] ( तोकडें पहा)
थोटा १ [ स्थूणमुष्टिक = थोट्टिअ = थोटा ]
-२ [ स्थपुटः (unevenly raised) = थोट = थोटा ] ज्याचा हात लांबींत विषम म्हणजे आंखूड आहे तो.
थोडक्यात् सांवरला [स्तोकात् संवारितः = थोडक्यात् सांवरला. स्तोकात् मुक्तः = थोडक्यात् मोकलला. स्तोकिष्ट = थोकिट = थोकड = थोडक ( का-की-कें ). येथें थोडक्यात् पंचमी आहे ] ( भा. इ. १८३३)
थोडें [ स्तोक = थोक = थोकडे (र्हस्वत्वदर्शक) = थोडकें (वर्णविपर्ययानें ) = थोडें. ] (ग्रंथमाला)
थोपटणें [ अत्यास्फोटनं = थोपटणें ( अ लोप ) ] (भा. इ. १८३५)
थोपणें १ [ स्तुंभ् ( थांबणें ) = थोप + णें = थोपणें ] (भा. इ. १८३७)
-२ [ स्तुभ = थोब = थोप + णें = थोपणें. स्तुभ् थांबणें ] (भा. इ. १८३७)
थोंब [ स्तंब cluster = थों, ठोंब ] cluster, crowd, multitude.
थोबाड [ स्तम + अस्ति = थोब + हड्डि = थोब + हाड = थोबाड ] ( स. मं. )
थोबाडणें [स्तुब्धापनं = थोबाड अणं = थोबाडणें. स्तुभ् रोधने ] थोबाडणें म्हणजे अवरोध, अटक करणें. ( भा. इ. १८३६)
थोर १ [ स्थूल = स्थूर = थ्थोर = थोर ] ( ग्रंथमाला )
-२ [ स्थूल = स्थूर = थोर. आक्रमणं स्थूराभ्यां (वाजसनेयसंहिता २५-२ ) ] स्थविरपासून थेर, थेरडा हे शब्द निघाले आहेत. स्थूल, स्थूरपासून थोर (मोठा, अवजड, अगडबंब, दांडगा) हा शब्द निघाला आहे. थोर दगड, थोर इमारत, थोर वासा इ. इ. इ. ( भा. इ. १८३३)
थोराड १ [ स्थूराढ्य ] (उंटाड पहा)
-२ [ स्थविराढ्यः = थोराड ]
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
थालीपिठ्या १ [ स्थलपथिकः = थालपिठ्या. प = पि ] थालपिठ्या माणूस म्हणजे सामान्य गांवोगांव स्थलमार्गानें जाणारा क्षुद्र माणूस. तुलना कांतारपथिक, जलपथिक इत्यादींशीं आहे.
-२ [ स्थालीपीठं अर्हति इति स्थालीपीठीयः । स्थालीपीठीयः= थालीपिट्या ] थालीपिठें पागोटें म्हणजे थालीच्या पृष्ठासारखें पागोटें.
थाळें [ स्थालं भाजनभेदे स्यात् (अनेकार्थसंग्रह संवत् १२०८ ) स्थाल = थाळ = थाळँ = थाळें ] (ग्रंथमाला)
थिजर्णे [ ( स्त्यै ) स्त्यायति = थिजते स्त्यै संघाते जलस्य.] (भा. इ. १८३६)
थिनलें [(स्त्यै ) स्यानं = थिनलें (स्वार्थक ल) ] ( भा. इ. १८३६)
थिबकणें [ स्तिप्र (गळणें) = थिब, थिबकणें, ठिपका ] (भा. इ. १८३३)
थिल्लर [ शिथिलतर = थिलअर = थिलर = थिल्लर ] (भा. इ. १८३२)
थीत [ स्थिति = थीत ]
थुः [ स्थिवः ] ( धातुकोश-थु पहा)
थुई [ स्थूति ] ,,
थुक, थुंक [ ष्ठिव् १ निरसने. तुष्ट्यूष = ठुख = थुक, थुंक] ( धा. सा. श. )
थुकर, थुंकर, थुकरा, थुंकरा [धातुकोश-थु पहा]
थुका, थुंका, थुकी, थुंकी [स्थ्युका ] ,,
थुत् [ धातुकोश-थु पहा ]
थुलथुलीत [ स्थूल् (द्वित्व ) ] ( धातुकोश-थुलथुल १ पहा)
थुय्यो [ स्थूतु Imp. ३rd per. sing. ] ( धातुकोश-थु पहा )
थेट [ स्थेष्ठ =थेठ्ठ =थेट ] थेट म्हणजे अति स्थिर, कायमचा. थेट रस्ता म्हणजे कायमचा सरळ रस्ता. (भा. इ. १८३३)
थेंब [स्तेम =थेबँ =थेबँ ] स्तेम म्हणजे ओल. (भा. इ. १८३३)
थेर [ स्थाविरम् = थाइर = थेर - स्थविरस्य भावः स्थाविरम् ] थेरडेपणाचा भाव किंवा कर्म म्हणजे थेर=म्हातारवळ.
थेरडा १ [ स्थविर = थइर = थेर = थेरड = थेरडा - डी-डें (र्हस्वत्वदर्शक)] (ग्रंथमाला)
-२ [ स्थविर = थर ( जुन्नर शिलालेख नं. २२ ) = थेरड ( ममतादर्शक) =थेरडँ = थेरडें-डा-डी ] (ग्रंथमाला)
उपनामव्युत्पत्तिकोश
त
तखे [ सं. तक्षक - महा. तखअ - मरा. तखे, तिखे ] (म ) ( इतिहाससंग्रह )
तट्टू - हें आडनांव देशस्थ ब्राह्मणांत आहे. ( त्वष्ट्, ऋ ) त्वष्टृ = तट्टु = टट्टू, तट्टू. ) (भा. इ. १८३३) तळेकर - सं. तलकर = तळेकर ( तल प्रांतांत राहणारे) (इतिहाससंग्रह)
ताटके - तार्का: (क) (स)
तांबे - ताम्रायणाः (स) (क)
तांबोळी - तांबुलिक: (वागळे पहा)
ताम्हणे - ताम्रायणाः (स)
तारणे - तार्णायनाः (स)
तिके - तैकायनिः ( स )
तिखे - १ तैकायनिः (स)
-२ तृक्षाः ( स )
-३ तितिक्षाः ( स )
-४ तक्षक (म) (तखे पहा)
तितरे - सं. तित्तिरि (म ) (इतिहाससंग्रह)
तिरशिंगे - त्रैशृंगः ( स )
तुरुक - तरुक्षा: (स)
तुळपुळे - १ तौल्वलयः (कों )
२ - तौल्वलय: (स)
तुळवे - तौलमीयाः (आडनांव आहे)
तेले - तैलेयः ( स )
तोरो - तरुक्षाः (स)
थ
थिटे - आधिथेयाः ( स )
द
दंडके - दांडकीया: (दांडके पहा)
दडपे - दण्डपायनाः (स)
दंडे - दंडिः ( स )
दत्ते - दात्तेयाः (स) (क)
उपनामव्युत्पत्तिकोश
ठ
ठकार - स्व्यागारिकः one who polices the harem = ठकार, ठकार.
ठाकरे - तत्करः ( टाकरे पहा )
ठाकूर - ठक्कुर - ( देवप्रतिमा ) ठक्कुरिक one who serves a deity = ठाकूर (आडनांव)
ठोंबरा - १ स्तंबेरमः = ठोंबेरा = ठोंबरा
-२ स्तंबेरमः = ठंबेरा = ठोंबरा
ठोले - स्थौलाः (स)
ड
डाकणे - दाकायनाः (स)
डुबल - दुर्बल = डुब्बल = डुबल. दुर्बल म्हणजे षंढ, खोजा, अंतःपुररक्षक. डुबल हें आडनांव ब्राह्मणांत व मराठ्यांत आहे.
डिके - दिश्या: (स)
डेकणे - दाकायनाः (स)
डोळे - दौलेयाः (स)
ढ
ढवळे - धवलाः (क) (स)
ढेकणा -- दिदृक्षेण्यः (ढेकणे पहा)
ढेकणी - दिदृक्षेण्यः (ढेकणे पहा)
ढेकणे - १ दिदृक्षेण्यः worthy to be seen ( vaidik) = ढेकण्या, ढेकणे-णा-णी (हें महाराष्ट्रांत ब्राह्मणांत आडनांव आहे).
-२ दाकायनाः (स)
ढोर -धौर ( कुलिका: ) (क) (स )
ढोले - धौला: (क) (स)
ण
णंदे- १ नानान्द्रः (स)
-२ सं. नंदक (म) (नंदे पहा)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
थ
थंड [ स्तब्ध = थड्ड = थंड. थचें दैर्घ्य आकारानें होण्याच्या ऐवजीं अनुस्वाराने झालें. थंडगार म्हणजे स्तब्ध गुरु ] (भा. इ. १८३३)
थना [स्तनः = थना ] गाईच्या आचुळाला थना म्हणतात.
थबकन् [ स्तब्ध = थब्ब = थब. स्तब्धकारं = थबकन्] (भा. इ. १८३४)
थबकन् [ स्तब्ध् ] ( धातुकोश-थबक १ पहा)
थयथय [ तय् १ गतौ. द्विरुक्तीनें तयतय = थयथय ] थयथय नाचर्णे.
थरूं [ त्सरु, त्सुरु = थरूँ ] सुरीची मूठ. (भा.इ. १८३७)
थवा १ [स्तबक = थवअ = थवा ] (भा. इ. १८३३)
-२ [ स्तवकः = थवा ] स्तबक असा बकारयुक्त शब्द मूळ नसून स्तवक असा वकारयुक्त शब्द महाराष्ट्रींतून मराठींत आला.
थळ [ स्थळ a place, थळ a field ]
थांग [ स्थानांक (स्थान + अंक) = थांग ] the marking of the exact spot.
थाट [ स्थातिः = थाट ] थाट म्ह० व्यवस्था.
थाटूनमाटून [ तट् १ उच्छ्राये + मड् १ मंडने ] ( धातुकोश-थाटमाट पहा )
थाडकन्, थाडदिनि [ चटकर पहा ]
थातुर् मातुर् [ तंत्रं मंत्रश्च = थातुर् मातुर ]
थान [ स्तन = थान ] (स. मं.)
थाप १ [ स्तै संघाते. स्त्याययति, स्त्यापयति = थाप ] श्रोत्यांची थाप म्हणजे गर्दी.
-२ [ ( praise ) स्पाव = थाप (lie, canard.) व= प ]
थापटणें [ हस्तस्फटनं = हत्थ्थापटणँ = अत्थ्थापटणँ = थापटणें ( अ लोप ) ] (भा. इ. १८३५ )
थापट्या [ स्थापत्यः = थापट्या ] थापट्या म्ह० गांडू.
थारा १ [ त्रै १ पालने. त्रायः = थारा. पादत्रा = पायजारा = पैजारा ] ( धा. सा. श.)
-२ [ ( स्तृ to protect ) स्तारः = थारा ]
-३ [ स्तृ ५ आच्छादने. स्तार:= थारा. विस्तार = बिस्तारा ] (धा. सा. श.)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
तोंड [ तुंड = तोंड ] (स. मं.)
तोंडखीळ [ तुंडकीलिका = तोंडखीळ ]
तोडणें १ [तुड् फोडणें, फाडणें ] फोडणे. (भा. इ. १८३३)
-२ [ तुड्ड अवमाने. तुड्डन = तोडणें ] त्याला तोडूं नको = त्याचा अपमान करूं नको. ( भा. इ. १८३३)
तोंडली १ [ तुण्डिकेरी = तोंडएली = तोंडेली = तोंडली ]
-२ [ तुण्डिकावल्ली = तोंडली ] (भा. इ. १८३७)
तोडा [ तोडर = तोडअ = तोडा] पायांत घालावयाचा अलंकार विशेष. (भा. इ. १८३७ )
तोंडाळ [ तुंडिलः = तोंडाळ (मुखर ) ]
तोफ [ तुफा = तोफ. तुफ् हिंसायां ] तोफ आली म्हणजे क्रूर भांडखोर बाई आली. (तुफान पहा)
तोबरा [ ( खादाड ) तूबरः = तोबरा ]
तौसें [ त्रपुसं ] ( तवंसें पहा)
त्येणें [ त्य + अनेन ] ( एणें पहा)
त्यो [ सः = तो; स्यः = त्यो ] त्यत् या सर्वनामाची एकवचनी प्रथमा स्यः म्हणून देतात; परंतु त्यः असें हि रूप असावें. त्यः = त्यो. हा त्यो शब्द अशिष्ट लोक सध्यां योजतात. (भा. इ. १८३४)
त्रयस्थ [ तीरस्थ = तरस्थ = त्रयस्थ ]
त्रा - कित्येक जुन्या लेखांत गुर्जरत्रा असा शब्द येतो. ह्याचा अर्थ कित्येकांनीं गुर्जर लोकांनीं जिंकलेला किंवा वसाहत केलेला प्रांत असा केला आहे. त्याला सबळ आधार ते म्हणण्यासारखा कांहींच देत नाहींत. माझ्या मतें गुर्जरत्रा या शब्दाचा अर्थ गुर्जर लोकांतून किंवा गुर्जर लोकांत. गुर्जरत्रा हें नाम नाहीं, अव्यय आहे, किंवा क्रियाविशेषण आहे. अर्थात्, गुर्जरत्रा या अव्ययापासून गुजराथ, गुजरात, हें नाम निघणें अशक्य आहे. शिवाय या व्युत्पत्तीला दुसरी एक अडचण आहे. त्रा चें प्राकृत त्ता, ता होईल; त, थ होणार नाहीं. गुर्जरत्रासारखा च कुरुपंचालत्रा असा वेदभाषेत एक प्रयोग आढळतो; त्याचा अर्थ कुरू व पंचालांतून किंवा कुरू व पंचालांत असा होतो. तो च प्रकार गुर्जरत्रा या अव्ययाचा आहे. ( भा. इ. १८३५ )
त्रेधा [ त्रेधा = त्रेधा ] त्याची त्रेधा उडाली म्हणजे त्याला हें करूं कां तें करूं कां असें करूं, असे तीन प्रकार झाले. ( भा. इ. १८३७ )