Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
तवखीर [ त्वक्क्षीरिः = तवखीर ] एका झाडाच्या त्वचेपासून काढलेलें पीठ.
तवंग [ तरंगः = तवंग ] पाण्याचा तवंग म्हणजे वर तरंगणारा मळाचा भाग.
तवर [ तमरं = तवर (कानडींत कथील)]
तवली [ तपनी ] (तपेली पहा)
तवँ (त्मन् (वैदिक even etc.) = तवँ ] (भा. इ. १८३५ )
तवंसें [ त्रपुसं = तउसँ = तवंसें, तौसें ] एक प्रकारची कांकडी. (भा. इ. १८३७)
तवा १ [ तपकः = तवआ = तवा ]
-२ [ तपः, तापकः = तवा (लोखंडाचा ) (भा. इ. १८३६)
तवाका [तु वृद्धौ ]
तवाना ( ताजा ) [ तवीयान् ( powerfull ) = तवाना ( ना-नी-नें ); तवानः ( तु to be able, powerful ) = तवाना ] powerful.
ताजातवाना-फारसी तवाना संस्कृत तु पासून निघालेल्या तवान चें च अपभ्रष्ट रूप आहे.
तसनस [ तस् ( क्षीण होणें ) + नस् ( अपव्यय करणें- वैदिक) = तसनस ] तसनस म्ह० नासधूस. (भा. इ. १८३७)
तसर १ [ त्रसर (कोळ्याचें सूत) = तसर] ( भा. इ. १८३७)
-२ [ त्रसर (रेशीम) = तसर ]
-३ [ तिसृक् = तसर ] a kind of silk worm.
तळपट - हा मराठींत अपशब्द आहे. तालपट्ट = टालपट्ट = तलपट = तळपट ] डोक्याच्या किंवा माथ्याच्या कातडीच्याखालील सपाट हाड. तुझें तळपट होवो, म्हणजे तूं मरून, तुझ्या डोक्याच्या करवंटीवरील कातडें कुजून जावो. (स. मं.)
तळवट [तलपट्ट: = तळवट ] ओटुंबर तळवटीं.
तळवा [ तलपाद = तळपाअ = तळवाअ = तळवा ] ( स. मं.)
तळहात [ तलहस्त = तळहात) (स. मं.)
तळी [(वैदिक) तळित् इति अंतिक नाम (निघंटु) तळित् = तळिअ = तळी ] तळी म्हणजे जवळ. झानेश्वरीच्या पहिल्या अध्यायांत, भीष्मा तळी, असे शब्द येतात; तेथें तळ या शब्दाचा अर्थ जवळ असा आहे. (भा. इ. १८३४)
उपनामव्युत्पत्तिकोश
गरदे - हें आडनांव कर्हाड्यांत आहे.
अगारदाही गरदः कुंडाशी सोमविकृयी (मनुस्मृति तृतीयोध्याय, १५८ )
गरदः मरणहेतुद्रव्यस्य दाता (कुल्लूक)
गरद ब्राह्मण म्हणजे मारण्याच्या हेतूनें विषद्रव्य देणारा वैद्य ब्राह्मण- गरद याचा मराठी अपभ्रंश गर्दे, गरदे. (भा. इ. १८३४)
गर्गे - गार्ग्या: (स)
गलगिल्ये - गालगिलाः (क )
गांगल - १ गांगाः = गांगल (स्वार्थे ल) (कों) (स)
-२ गांगायन: (कों)
गाडगीळ - १ गालगिलः (स)
-२ गालगिला: ( कों )
गाडवे - गालवाः (स)
गांडे - गांड्या: (स)
गांड्ये - गांड्याः (स)
गात - गाथिनाः ( स )
गाथ - १ गाथिन: ( कों )
-२ गाथिनाः ( स )
गांधारे - गांधारायणाः (कों)
गानू - ज्ञानायनाः (कों)
गायकवाड - गोकवाट = गैकवाट = गायकवाड.
गोक + वाट = गोकवाट. वाट = क्षेत्र, जमीन, थळ.
गोक नांवाच्या थळाचे वतनदार. गोचें गै असें जुन्या मराठींत रूप आहे. शूद्रादि लोकांच्या बोलण्यांत हें जुनें अपभ्रष्ट रूप येतें. (ग्रंथमाला)
गायतोंडे - १ गोतुंडाः = गायतोंडे ( गोत्रनाम ) (भा. इ. १८३६)
-२ गोतुंडिक: = गायतोंडे ( आडनांव ) गोतुंड हें ऋषिनाम आहे.
गायधनि - गाधिनाः ( स )
गायधनी - गाधिनः ( स )
गारदी - हें आडनांव महाराष्ट्र ब्राह्मणांत आहे.
अगारदाही = ( अलोप ) गारधी = गारदी. फ्रेंच Guarde पासून निघालेला गारदी शब्द निराळा.
( भा. इ. १८३४ )
गिरणे - गैरायणाः (स)
गिरमे - ग्रेष्मायणः ( स )
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
तरतरित [ तृ to be young = तरतरित denominative form a lost root meaning to be young-to be seen in तरुण young. my own guess; no other authority.
तरम [ तर्मन् (वर्ष ) = तरम ] तरम म्हणजे वर्षाचें देणें शेतकर्याचें.
तर मग [ तर्हि मक्= तरी मग, तर मग ] (भा. इ. १८३३)
तरवणी [ तरत् पानीयं = तरावणीअँ = तरावणी = तरवणी ] ताकाचें तरवणीं. ( भा. इ. १८३४)
तरवळा [ तृपला (लता) = तरवळा (उष्णादि १०९) ] तरवळा म्हणजे दाढी१ भाजण्याकरितां जमविलेला पालापाचोळा, वेली वगैरे. (भा. इ. १८३३)
तरांडें १ [ ( पुं) तरांधुः = तरांडें (न. ) ] a boat.
-२ [तरन्ती = तरांडी, तरांडें ] (भा. इ. १८३३)
तरि [ तर्हि + ] ( शा. अ. ९ पृ. १ )
तर्कारी [ तर्कारी ( टांकळा) = तर्कारी ( भाजी ) ]
तर्र [ तरल = तर्र tremulous with intoxication ] ( धातुकोश-तरार २ पहा)
तर्हा [ त्र्यहः = तर्हा ] त्याची तर्हा झाली म्हणजे तो तीन दिवस कंठत बसला. (भा. इ. १८३५)
तर्हीं [ तर्हि अपि ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ९ )
तर्हेवायिक [ त्र्यहैहिकः । ईहा चेष्टा तस्यां भवं ऐहिकं । त्र्यहपर्याप्तं ऐहिकं धनं अस्य अस्ति इति त्र्यहैहिकः ॥ ( मनुचतुर्थीध्याय ७, कुल्लूक ) त्र्यहैहिक = तर्हैहिक = तर्हेवाइक ] तर्हेवाईक म्हणजे तीन दिवसांपुरतें धान्य ठेवणारा, निरिच्छ, बेफिकीर. (भा. इ. १८३४)
तर्हैं [ तर्हि + अपि ] ( ज्ञा. अ ९ पृ. १ )
तलवट [ तलपथ = तलवट ] level, lowest level.
तवकीर [ त्ववक्षीरी क्षीरिका शुभा ॥ केयदेव-पथ्यापथ्यविबोध). त्ववक्षीरी = तवखार = तवकीर] (भा. इ. १८३४)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
तडातडा [ तड् भाषायाम्] (तडतड पहा)
तणाणा [ तानगुणः = तणाणा ] ताण देणारा वेलाचा तुकडा, tendril.
तणार [ तृणागार ] ( धवलार पहा)
तंतोतंत [ अत्यन्तात्यन्तं = ( अ लोप ) तंतोतंत ] भांडें तंतोतंत भरलें म्हणजे अत्यन्त भरलें म्हणजे अंतापर्यंत भरलें.
तनसडी [ तृणसटा a braid of grass = तनसडा ]
तपकीर [ तपकक्षिरिः = तपअखीर = तपखीर = तपकीर ] तंबाखूचें अति प्राचीन नांव तपक असें होतें. अमेरिकन इंडियन्स तंबाखूला तपक स्वभाषेंत म्हणत.
तपली [ तपनी ] (तपेली पहा)
तपेली [ तपनी = तपली, तपेली, तवली, टवळी ]
त मग् [ तद् माङ् ] ( त पहा )
तमण्णा [ उत्तमर्णः = तमण्णा ( उ लोप ) ] तमण्णा म्हणजे धनिक, धनवान्.
प्रश्न - तूं कोण तमण्णा लागून गेला आहेस ?
उत्तर - मी तमण्णा नाहीं; ढमण्णा आहें. (भा. इ. १८३४)
तमुक [ तत् + अमुष्य = तमुक ] that one. अमुकच्या धर्तीवर.
तरणें [ तृ = तरणें. तरय् - तारय्=तरविणें ] तरणें व तारणें हीं दोन अगदीं भिन्न क्रियापदें आहेत. (भा.इ.१८३६)
तरतर [ त्वरं त्वरं = तरतर चालणें to wall quaveringly ]
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
त
त [ तद् = तअ = त. तद् माङ् = त मग ] हें अव्यय मराठींत तर ह्या अर्थी योजतात. येतो त ऊठ = यामि; तद् उत्तिष्ठ.
तकलादू, तकलुफी-पी [तकिल (खोटें) = तकल. तकिल + आदः = तकिलादू= तकलादू]
तकलादू [ तकिल fraudulent = तकलादू ] superficial, fraudulent.
तकलुपी, तकलुफी [ तकलादू पहा ]
तग १ [ तक् ( सोसणें) पासून तकः = तग ] तग लागणार नाहीं म्हणजे सोशीकपणा टिकणार नाहीं.
-२ [ तक् १ सहने. तक = तग ] सोशीकपणानें उरून रहाणें. ( धा. सा. श. )
तंग [ तंच् to contract = तंग ] आंगरखा तंग झाला म्हणजे got contracted.
तंगडी [ टंगा ] (टांग २ पहा)
तगादणें [तकाजा (आरबी) नामधातू = तगादणें ] तगादा करणें.
तज [ त्वचं = तज ] दालचिनी.
तटबंद [ तटबंध: = तटबंद (नाम) तटबद्धः = तटबंद (विशेषण) ]
तंटा [ तंडा = तंटा ]
तट्ट [ तट् १ उच्छ्राये, फुगणें. तटित अथवा तट्ट (प्रांतिक) = तट्ट ] जेवून तट्ट झाला म्हणजे फुगला. तटतटून फुगला, तट्ट फुगला अशी द्विरुक्ति मराठींत आहे.
तट्ट [ तस्थृ (standing erect ) = तट्टू, टट्टू ] stud, a young horse very erect and untamed.
तडक १ [ त्वरकम् swiftly, straight = तडक ] swiftly, straight.
-२ [ तथका (अकच्) = तढका = तडक ] बरें म्हणून, तसाच, थेट.
तंडणें [ तंड मारणें ] (भा. इ. १८३३)
तडतडणें [ तड् भाषार्थे ] (ग्रंथमाला)
तडतड, तडातडा [ तड् भाषायां ] तडतडा शिव्या देणें. तडातडा म्हणजे कर्कश बोलणें.
तडस [ त्रसः = तडस ] दुःख.
तडा [ तर्द्मन् scratch ] चिरा, भिंती यांना तडा पडला.
तडाका १ [ तडाकः = तडाका ]
-२ [ तटाघातः; तडाघातः = तडाखा, तडाका ] तडाघात म्हणजे हत्तीच्या सोंडेचें मारणें. त्यावरून सामान्यतः जोरानें मारणें ह्या अर्थी मराठींत तडाका शब्द योजतात. ( भा. इ. १८३७)
उपनामव्युत्पत्तिकोश
ख
खरे - खरिका: ( स ) ( कों )
खाडे - खाडायनाः (स)
-२ खाडाः (स)
खांडे ( कर ) - खाडायनाः ( क )
खानखोजे - [ कान्यकुब्जः = कान्हकुज्जा = खानखोजा ( एकवचन ) खानखोजे (अनेकवचन ). खानखुजा हें मधलें रूप.
हें खानखोजे आडनांव ब्राह्मणांत व इतर जातींत आहे. तेलंग, कानडे, बंगाली, गुर्जर, भुसकुटे (भोजकटीय) हीं आडनांवें जशीं देशावरून पडलीं आहत, तसेंच खानखोजे हें आडनांव देशावरून पडलें आहे.
खापरडे - खर्परवाट = खापरवाड. खापरवाडचा राहणारा तो खापर्ड, खापरडे. (ग्रंथमाला )
खांबेटे - स्कांभायणाः (कों)
खारकर - कारकर: (agent) = खारकर ( परभू आडनांव) पाणिनि ३-२-२१
दिवा-विभा-निशा-प्रभा-कार-कर्मणि सुपि करोतेः टः
खेर - १. खदिराः (स)
-२ खेलकः ( क )
खैर - खदिराः (स)
खोडके - क्षौद्रक्याः = खोडके
बाहीक देशांतील एक आयुधजीवि संघ. खोडके हें मराठ्यांत एक आडनांव आहे.
खोले १ कोहल: (स )
-२ कहोलाः ( स )
ग
गणपुले - १ गणपूरक = गणपुले
गणपूरक means the whip who secured the quorum at a meeting of the गण.
-२ गणपाः = गणपुले (स्वार्थे ल) (कों)
-३ गणपतीच्या पुळ्याचे राहणार (स)
गद्धव - गर्धभः (स )
गद्रे - गाधरायणाः (स) ( कों)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ण
णक्षा [ णक्ष् गतौ-नक्षः ] ( नक्षा २ पहा )
णंदा [ ननांदृ=नणांद = नणंद = नंदा = णंदा. (स. मं.)
णिचरा [ निःस्रावः ] हा शब्द मराठींत णादि आहे. (निचरा ३ पहा)
णारें [ज्वलनार्ह लकुटं = जळणारें लांकूड
मरणारा अपराधी = मरणार्ह: अपराधी
शिक्षणार्ह: पुत्रकः = शिकणारा पोर इ. इ. इ.]
णूक [ ०निका =०णीक = ०णूक ]
वर्तनिका = वर्तणूक सर्जनिका = सोडवणूक
वगनिका = वागणूक छलनिका = छळणूक
क्रमणिका = करमणूक इ. इ. इ.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ढालगज [ (द्राघीयस् + जंघी) = दीर्घजंघी=ढालजँग = ढालजग = ढालगज ] जिच्या जंघा लांब आहेत अशी स्त्री-अशा बाईसारखी वागणारी मुलगी. द्राघ = ढाल. (भा. इ. १८३४)
ढास [ ऊर्ध्वश्वास = ढास. उड्ढआस = ढ्ढास = ढास ] (भा. इ. १८३४)
ढासण १ [ अध्यासन seat = ढासण ]
-२ [ ध्वंसनं ] (निर्धास्त पहा )
ढाळक [ ध्वल. ध्वालक = ढाळक ] (धा. सा. श.)
ढाळणें [द्राह् = द्राहर = ढाल = ढाळ. द्राह् थकणें ] ढाळणें म्ह० थकणें. (भा. इ. १८३४)
ढीग [ दिह् २ उपचये, to increase. दिह् = ढीग ]
[दिह् to increase = डिघ् = ढीग ] रास.
ढुंगण १ [ ढु + अंगण (अवयव ) (ढु = ढोपर शब्दांतील ढूर्) ] (स.मं.)
-२ [ अधोंऽग = ढोंग = ढुंग = ढुंगण (+ ण ) ] (भा. इ. १८३६ )
-३ [ अधोंगम् = ढुंगण ] ढुंगण म्ह० गुह्यांग, गांड. ढुंगण धुणें हें वाक्य गांड धुणें याबद्दल संभावित बोलतात.
-४ [ दृंहण ( दृढीकरण ) = ढुंगण ] शरीराला दृढ करणारें अंग.
ढुस्स [ धूश् १० कांतिकरणे - to burn shiningly चकाकणें = ढुस्स ] shinig black. ( धुश्श पहा) (काळें) ढूस १ [ धूसर = ढूसअ = ढूस ] (भा. इ. १८३४)
-२ [दूषिः (कृत्या) = ढूस ] काळी ढूस म्हणजे कृत्येसारखी काळी (अथर्व वेद)
ढेकर [ द्रेक् १ शब्दे ] (धातुकोश-ढेकर पहा)
ढेंकुण [ दंशकृमि = डंखकुण = डंखुण = ढेंकुण ] (भा. इ. १८३२ )
ढेप [ डिप् गोळा करणें. डेप = ढेप ] गुळाचा गोळा. ( भा. इ. १८३४)
ढेपसा [ द्रप्सः lower thin part of curds = ढेपसा ]
ढेरणें [ ध्रेकृ शब्दे । ध्रेक्= ढेर्=ढेरणें किंवा ढोरणें ] गुरूं ढोरतें म्हणजे झोंपतांना विशिष्ट शब्द करतें. मूळ धातू ध्रोोकृ असा हि असावा. ( भा. इ. १८३४)
ढोंपर [ ' कूर्पर ' शब्दाप्रमाणें ‘ ढुर्पर ' शब्द असावा व तो पायाच्या त्या भागाला लागत असावा. सध्यां संस्कृतांत हा शब्द लुप्त आहे. ( स. मं. )
ढोर [ धुर्यः (beast of burden) = ढोर ]
ढोरणें [ धेकृ शब्दे ] (ढेरणें पहा)
ढोल [ ढोलः वाद्यविशेष. ढक्का ढोलप्रिया (रुद्रयामल ) ] (भा. इ. १८३४)
ढोसणें १ [ अध्यसनं = ढोसणें ] ढोसणें म्ह० अति भरणें. पानीयं अध्यस्यति = पाणी ढोसतो.
-२ [ अध्यशनं = ढोसणें ] ढोसणें म्ह० आति खाणें. (भा. इ १८३६)
-३ [ अध्यशन = ( अ लोप ) ढोसणें ] अध्यशन म्हणजे भरल्या पोटीं खाणें. ढारू ढोसणें म्हणजे वाजवीपेक्षां जास्त दारू पिणें. (भा. इ. १८३७)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ढ
ढ १ [ढः (कुतरा) = ढ ] मराठींत ढ म्हणजे मंदबुद्धि.
-२ [ ढः निर्गुणः इति एकाक्षर कोशः ] ( भा. इ. १८३४ )
ढकणें [ दक्ष् १ वृद्धौ ] ( धकणें पहा)
ढकलणें १ [अधःकलनं = ढकलणें ](भा. इ. १८३६)
-२ [ अधिकृ = ( अ लोप ) ढिकरणें = ढिकलणें = ढकलणें ] त्याला त्यांनीं न्यायाधिशापुढें ढकलला = तैः सः न्यायाध्यक्षस्य पुरतः अधिकृतः (भा. इ. १८३४)
ढक्का [ धक्क: ] ( धक्का पहा )
ढंढण [ ध्वन् १ शब्दे-दंध्वन्य = ढंढण (धा. सा. श.)
ढण् ढण् ढण् [ ध्वन् ध्वन् ध्वन्]
ढपसें [द्रप्स (ताक) = ढपसें ] (भा. इ. १८३३ )
ढब्बू १ [ अधिभूः (स्वामी, नायक) = (अलोप) ढिबू= ढबू] पुढारी माणूस.
-२ [ अधिभू = ( अ लोप) ढिबू= ढबू = ढब्बू ] ढब्बू म्हणजे मोठा माणूस, त्यावरून लठ्ठ, आयदी. (भा. इ. १८३४)
-३ [ अधिभृ master, superior = ढब्बू ] अधिकारी वरिष्ठ म्हणविणारा.
-४ [ लठ्ठ पैसा तो ढब्बू (पैसा)] (भा. इ. १८३४)
ढमण्णा [अधमर्णः = ( अ लोप) ढमण्णा] ढमण्णा म्ह० दरिद्री, गरीब, देणेदार. (भा. इ. १८३४)
ढवळ [ दवृ अंगीकारे. द्वर = ढवळ. द्वराद्वर = ढवळ ] ( धा. सा. श.)
ढवळाढवळ [ दवृ to appropriate अंगीकारे. द्वरः= ढवळ. द्वराद्वर = ढवळाढवळ ) appropriation and nonappropriation meddling.
ढवळार [ धवलगृहं (राजवाडा) = ढवळार ] ढस [ धासस् ] (धस पहा)
ढांचेंढुचें [ ध्वस्तंध्वस्तं = ढाचेंडुचें ] ढाचेंढुचें म्हणजे मोडकें, अद्वातद्वा.
ढापण १ [धापनं = ढापण ]
-२ [ अर्प् १०. अध्यर्पण = ढप्पण = ढापण = मडक्यावर ठेवावयाचें झांकण ] ( धा. सा. श.)
ढाराढूर १ [ द्रायंध्रायं = ढाराढूर. द्रै स्वप्ने व ध्रै तृप्तौ ]
ढाराढूर म्हणजे निद्रैंत तृप्त असणें अशा प्रकारें (क्रियाविशेषण).
-२ [ द्रै + धु किंवा द्रा + धु. द्रै - द्रा (निजणें) धु (स्थैर्य, निश्चळ असणें) = ढाराढूर] to be fast sleeping
ढाल [ दारु ] ( दाल पहा)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
डुरवणें [ अय् १ गतौ. दुर+ अयू= दुरयति =डुरवतो] ( धा. सा श. )
डूक [दूष्= डूख = डूक. दु:ख = डुक्ख = डुक ] डुक म्हणजे दुःख.
डोकें १ [ बोडकें (बुड् = हजामत करणें ) = हजामत ज्याची करतात तो अवयव = डोकें ] (स. मं.)
-२ [डक् (झोंपतांना जो अवयव विशेषतः डुकलतो तो). याचें एक रूप = डोसकें. डोसकें याचें रूपांतर = डोचकें] (स. मं.)
-३ [ स्तोमकं] ( डोंबल पहा )
डोचकें १ [ स्तोमकं ] (डोंबल पहा)
-२ [ डुक् ] ( डीकें २ पहा)
डोचणें [ द्रुह - दुह्यति = डुज्जे = डोचे ] द्वेष करणें. (भा. इ. १८३३)
डोंबल १ [ स्तोमकं ( head) = डोकें, डोचकें, डोंबल ( occiput ) ]
-२ [ पाण्यांत बुडतांना प्रथम भाग बुडवितात तो = डुंब्= डुबणें ] ( स. मं. )
-३ [ दौर्बल्य = डोब्बल = डोंबल ] उ०-डोंबल तुझें = दौर्बल्य तुझें.
मराठींत लहान माणसावर रागावून हे शब्द मोठीं माणसें योजतात. ( भा. इ. १८३२ )
डोमकावळा [ द्रोणकाकः = डोणकावळा = डोमकावळा ] डोमकावळा म्हणजे कृष्णकाक.
डोरली [ दुष्प्रधर्षिणी = डोरिणी = डोरली ]
डोल [ दोला = डोल ] डोलानें म्हणजे दोलायंत्रासारख्या भांड्यानें विहिरींतून पाणी काढतात.
डोला १ [ F दोला = डोला M. in Marathi ] दोला processian in हस्तिनापूर was very ancient adopted by the Mahomedans.
-२ [दृष्टि = दुट्टि = दोडा = डोला, डोळा.
द्योतः = डोला, डोळा ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ४३ )
डोली [ दोली = डोली ]
डोसकें [ डुक्] - ( डीकें २ पहा)
डोह [ द्रह, द्रह a deep lake डोह ]
- हद पासूनच निर्वचिलें पाहिजे असें नाहीं.
डोहणा १ [ द्रोहणः = डोहणा. द्रुह् to hate ] hatred.
-२ [ द्रोहणा = डोहणा ] डोहणा म्हणजे खुनस.
-३ [ द्रोहणा = डोहणा ] hatred.
डोहो [ द्रुह = डोह, डोहो. बहुवचन ] द्रुह म्हणजे तडाग. ( ज्ञा. अ. ९ पृ. ७ )
डोळ [दुर्लू= डोळ ] वाईट रीतीनें फोडलेले, न फेडलेले द्विदल दाणे. सुलुः चांगले फोडलेले दाणे = सोले.
डोळा १ [ लोचनक = लोअणअ = डोअलअ = डोळा. ल=ड; न=ण=ल=ळ ] डोळा या शब्दाची ही व्युत्पति खरी.
-२ [ डोल हलणें ( ज्ञानेश्वरी ) जो अवयव पाहाण्यासाठीं हलतो तो = डोला = डोळा ] (स. मं.)
-३ [ दृष्टि, द्योतः ] ( डोला २ पहा )
डौर [ डमरु = डवँरु = डौरु = डौर ] एक वाद्य आहे.
डौराचीं गाणीं म्हणजे डमरूच्या नादावर म्हणण्याचीं गाणीं.