Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
जनू [ जन्य (कर्तरि, कर्मणि ३-४-६८ = जनू ] what is born. जनू म्हणजे बालक.
जंत्री [ यंत्री = जंत्री ]
कोणत्या हि व्यवहारांत वाट दाखविणारी ती जंत्री.
जप, जप्ति [ ज्ञप् ज्ञाने, ज्ञापने ] मी त्याची मर्जी फार जपतों म्हणजे खुष करतों. ज्ञप्ति = जप्ति. ( धा. सा. श.)
जप्ति [ ज्ञप्ति ( वध करणें ) = जप्ती ] पहिला अर्थ वध करणें, दुसरा अर्थ धनादिकांचा बंध करणें.
जंबाड १ [ बध् १० संयमने. संबाधः = जंबाड ] जंबाड म्हणजे गुंतलेले केस, वेली इ. ( धा. सा. श. )
-२ [जंबाल = जंबाड ] जंबाड म्ह० शेवाळाची जूड, चोथा. ( भा. इ. १८३५)
जम [ यम: = जम ]
जमदाड [ यमदंष्ट्रा = जमदाड ] शस्त्रविशेष.
जमनीक [ जवनिका = जमनीक ]
जमविणें [ समवे = जमवि ( णें ) ] (भा. इ. १८३५)
जमाव १ [ समवाय = जमआय = जमाय = जमाव ] (भा. इ. १८३५)
-२ [ सम् + अव + इ २ गतौ ] (धातुकोश-जम २ पहा]
जयजय [ जेजेति, जेजय = जयजय ( Freq-lmp-२nd-sing.) ]
जरा [ अचिरात् = जिरा = जरा ] जरा म्ह० थोडें, अल्प, अव्यय. अचिरात् गत्वा प्रत्यागछामि = जरा जाऊन येतों. (भा. इ. १८३६)
जरि [ जर्हि ] (ज्ञा. अ. ९ पृ. ४ )
जरीपटका [जर्जरीक पटकः = जरीपटका ] जईरं म्हणजे इंद्रध्वज
जर्जर [ झर्झर - जर्जर ]रे रे गुर्जर झर्झरोसि समरे-( प्रतापरुद्रीयम्) ( भा. इ. १८३४)
जर्हैं [ जर्हि अपि ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ४ )
जयकिरा १ [ यव + क्रयः. यवक्रयः = जवकिरा ] धान्य वगैरे विकत घेणें.
-२ [ क्री ९ द्रव्यविनिमये. चवक्रय = जवकिरा. अवक्रेणी = उग्रेणी = उग्राणी. विक्रेणी = विग्रेणी = बिग्राणी ] ( धा. सा. श. )
जवळ - ज्ञानेश्वरींत जावळिक म्हणजे जोडींतला, सोदर, अशा अर्थाचा शब्द आहे. हा जावळिक शब्द = युगल, युगलक, या संस्कृत शब्दापासून आला आहे. जुळें, जावळें हे शब्द मराठींत प्रसिद्ध आहेत. हा मूल त्या मुलाच्या जावळिकेंतील आहे, असा प्रयोग पूर्वी होत असे. जावळिकेंतील म्हणजे एकाच उदरांतील. समानोदरत्वावरून जावळिक म्हणजे निकटसंबंधी असा अर्थ होऊन व शेवटीं मराठींत छाटछाट होऊन जवळ याचें शब्दयोगी अव्यय निष्पन्न झालें. (स. मं.)
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
३ अमरकोश- प्रथम कांड- स्वर्गवर्ग- ७२
" स्यात् किंनरः किंपुरुषस्तुरंगवदनोमयुः "
या श्लोकांतील मयुः हा शब्द व नाण्यांवरील Maues शब्द एक आहेत. Maues या अक्षरांचा उच्चार मयुस् अथवा मयुःमयुस् हा किंनरवाचक शब्द आहे, म्हणून अमरसिंह सांगतो. तें जर खरें असेल, तर Maues हा राजा किंनरवंशीय होता, a Indo-Parthian नव्हता, असें म्हणावें लागतें.
४ विष्णुपुराणांत अकरा मौनांनीं राज्य केलें, असें सांगितलें आहे. Vincent Smith मयुंची याद येणेंप्रमाणें देतो :-
( १ ) Maues. ( २ ) Onones. ( ३ ) Azes I (४) Azilises. (५) Azes II ( ६ ) Gondophares or Guduphara. ( ७ ) Abdagases. ( ८ ) Orthagnes ( ९ ) Arsakes. ( १० ) Pakores. (११) Sanabares.
Vincent Smith हि विष्णुपुराणांतल्या प्रमाणेंच अकरा मयूंनीं राज्य केलें, असें हिंदू व यूरोपीयन शोधकांच्या शोधांवरून म्हणतो. अर्थात् विष्णुपुराणांतील मौन म्हणजे युरोपीयन शोधकांचे व अमरसिंहाचे मयू होत ह्यांत संशय नाहीं. मयु पासून मौन हा अपभ्रंश असा निष्पन्न होतो. मयु तील यु चा उच्चार सानुनासिक होत असावा.
मयुँ = मऊँ = मउन = मौन
अनुनासिकाचा न असा उच्चार होतो. मयुन, मउन अशा परंपरेनें मौन असें अपभ्रष्ट रूप साधलेलें आहे व तें च विष्णुपुराणकर्त्यानें स्वीकारलेलें आहे. अमरसिंहानें मूळ मयु असें शुद्ध रूप दिलेलें आहे.
५ हे मयु ऊर्फ किंनर लोक अलकेस राहणार्या किन्नराधिपतीचे म्हणजे कुबेराचे परिचारक होत. अलका हें नगर काश्मीराच्या उत्तरेस आहे. ह्या प्रदेशाच्या शेजारींच पश्चिम दिशेस किंपुरुषवर्ष आहे. किंपुरुषवर्ष म्हणजे किन्नरांचा देश जंबुद्वीपाचा एक भाग आहे. मौर्यांचें राज्य बुडाल्यानंतर जो गोंधळ उडाला व जी बजबजपुरी माजली त्या कालांत कुबेराच्या ह्या मयु नामक परिचारकांनीं काबुल व पंजाब या दोन प्रदेशांत कांहीं काल आपली सत्ता उभारली.
६ तात्पर्य Maues ऊर्फ मयु वंशांतील राजे किन्नरजातीय होते, Indo-Parthian ऊर्फ पारदजातीय नव्हते, असें निश्चयानें म्हणतां येतें. (भा. इ. १८३५)
म-या १ [ मर्य a young man = मर्या ] a name of a man.
-२ [ मर्य a young man = मर्या ] a name of a man.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ज
जखड [ जाघट्य ] ( झागड पहा)
जखम [ यक्ष्मन् = जख्खम = जखम ] भयंकर आघात. (भा. इ. १८३४)
जंग ( लढाई), जंगजंग [ जंज् युद्धे (ज् = ग् ) = जंग (लढाई) ] जंगजंग पछाडले.
फारशी जंग संस्कृत जंज् पासून निघाला आहे किंवा त्याचें रूपान्तर आहे किंवा सहोदर आहे.
जगडंबर [ जगदंबर = जगडंबर ]
जगणें [ ( गम्) जंगम् = जगणें ]
जंगम् म्हणजे सातत्यानें जाणें.
जगणें म्हणजें सातत्यानें जगांत असणें. (भा. इ. १८३६)
जघन्य [ जघन्यं ( नीचतमं ) = जघन्य ] त्यानें जघन्य शिव्याशाप दिले म्हणजे नीचतम शिव्या दिल्या.
जंघी [ जघ्निः = जंघी ] हत्यारविशेष.
जंजाळ [ जंज् १ युद्धे ] ती अगदीं आगजंजाळ आहे, म्हणजे लढाऊ भांडखोर आहे. जंजाळ हा शब्द जंज्वल् या क्रियापदापासून हि निघतो.
जजु [ यज्यु ( यजुर्वेदज्ञ ) = जज्यु, जजु ] (भा. इ. १८३६)
जटा [ जटा = जटा ] (स. मं.)
जड [ संहत ( घट्ट ) = जड ] weighty, thick.
जडाव [(जतु) जातव = जाडव = जडाव ] जडावाचा दागिना म्हणजे लाखेनें मिश्र असा सोन्याचा दागिना. (भा. इ. १८३४)
जणु १ [जणु इवार्थे अपभ्रंशे ] उ०-तो जणु आला (भा. इ. १८३२)
-२ [ यथा + नु ] (जाणो पहा)
जती [ यांत्रिकः = जत्तिअ = जती. यति = जती ]
महायांत्रिक म्हणजे ज्योतिषी. जती या शब्दाचे मराठींत दोन अर्थ आहेत. (१) यति व (२) ज्योतिपी. व दोन अर्थ दोन निरनिराळ्या संस्कृत शब्दांपासून आलेले आहेत. (भा. इ. १८३४)
जनाँत [ जनान्त (भोंवतालचा देश ) = जनाँत ] जनाँत काय म्हणतील म्हणजे प्रांतांतील लोक काय म्हणतील. जनाँत हें येथें अनेकवचनी नाम आहे.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
छाया (घर) [ छाया । शर्म । अज्म ।
इति द्वाविंशतिः गृहनामानि ॥ ( निघंटु ) ]
बसायला कुठें तरी छाया पाहिजे, ह्या वाक्यांत छाया या शब्दाचा अर्थ गृह असा आहे व तो प्रथमतः वैदिकांनीं निघंटुंतून वापरलेला असून नंतर सामान्य लोकांत पसरला. (भा. इ. १८३४)
छावणी [ छादनी roof = छावणी ] छप्पर.
छावा १ [शावः = छावा ]
२- [शावक = छावा. शावकः शिशुः । ( अमर) ] (भा. इ. १८३४)
छिचोर [ छित्वर = छिच्चुर = छिच्चोर ] छित्वर म्ह० कपटी, धूर्त.
छित् [शिट् अनादरे ] ( शिट् पहा )
छिपटी [ शिफा ] (शेपाटी पहा)
छी: [ शिट् अनादरे ] (शिट् पहा )
छीथू [ छि: + थुत् = छीथूअ = छीथू] छिः म्हणजे निंदा आणि थुत् म्हणजे थुंकणें.
छुप्पापाणी [ छुप् ] (छुप्यो पहा )
छुप्यो [ छुप् ६ स्पर्शे = छुप्यो, छुप्पापाणी, छप्पापाणी, छप्पोपाणी ] हातानें स्पर्श करून खेळण्याच्या खेळाला छुप्पोपाणी म्हणतात.
छुमकत [ शुन्+मक्क गतौ ] (धातुकोश–छुमक पहा)
छु, छ्यू [छ्यु गतौ छ्यवति=छ्यू, छु (लोट् मध्यम पु. १) (जा, पळ) ] जा, पळ म्हणून कुत्र्याला सांगणें. कुत्र्याच्या गतीला छ्यु म्हणून उत्तेजन देतात.
छे [ शिट् अनादरे] (शिट् पहा)
छे ! छेच्छेः !!! [चेच्चेत् hush, be quiet, by no means, not at all = छेच्छेः, छेः, छेह् ]
छेडी १ [ छिदिः = छेडिः = छेडी ] छेडी म्हणजे लहान कुर्हाड.
-२ [ छैदिक: (वेत) =छेडी, छडी ]
छेह् [ छे ! पहा ]
छोटें [ क्षुद्र = छुट्ट = छोटँ = छोटें - टा - टी ] (ग्रंथमाला)
छ्यु, छ्यू [ छ्यु १ गतौ ]
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
छप्पो पाणी १ [ छुप् to touch = छुपो पाणी = छप्पो पाणी. छुपः पाणिः = छुपोपाणी ]
-२ [ छुप् ६ स्पर्शे ] (छुप्यो पहा)
-३ [ छुपः पाणिः ]
छव [ छविस्तुरुचिशोभायां (अनेकार्थसंग्रह संवत् १२०८) = छब, छबि, छबिला, छबुकडी, छबडी ] (ग्रंथमाला )
छवडी, छबि [ छब पहा ]
छबिना [ शिबिकायानकं = छिबियाना = छबिना ] देवाची पालखी.
छबिला [ छब पहा ]
छवी [ छवि: = छवी (रंग, वर्ण ) ]
छबुकडी [ छब पहा ]
छर्रा [ शरः = छरा = छर्रा ] बंदुकींतून सुटणारा बाण.
छाकछुक [ संकसुक (अस्थिर) = छंकछुक = छकछुक = छाकछुक ] ( भा. इ. १८३४)
छा छू [ चहः चहुः = छाछू. चह् शाठ्ये, फसवणें ] छाछू म्ह० शाठ्य, लुच्चेगिरी, फसवाफसवी.
छांडणें [स्यन्द्= छंड = छांड + णें = छांडणें ] पाणी छांडणें म्ह० पाणी वर काढून वाहातें करणें. (भा. इ. १८३५)
छाटणें [ शासनं = छाटणें ] (भा. इ. १८३४)
छाताड १ [ छाती + हाड (अस्थि) = छाताड ] (स. मं.)
-२ [ वक्षस्तटी = (व लोप) छाताड ]
छाती १ [ वक्षतिः = (व लोप) छाती ]
-२ [ वक्षःस्थिति = वच्छत्ति = छाती ] ( स. मं. )
छान् [ सांद्र = चान् = छान ]
सांद्रशीतल = छान श्याळू.
छानदार १ [सांद्रं = छांदर = छानदार ] सांद्रछाया = छानदार साउली.
-२ [ सान्दं = छानदार = छानदार, शानदार ] सांद्र म्हणजे नीट, सुंदर, दाट विणलेलें; त्यावरून नीट, सुंदर, सुरेख. (भा. इ. १८३५)
-३ [सांद्र = सानदार = शानदार, छानदार, छांदार, शांदार ] (भा. इ. १८३४)
छाननें [ क्षालनं = छाननें (परटाची भाषा ) ] (भा. इ. १८३४)
छापा [श्वापः = छापा ]
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
मनाई [ मनायी ( मनोःस्त्री) = मनाई = मनी ( स्त्रीनाम ). मनावी ( मनोः स्त्री ) = मनाउई = मनू]
(भा. इ. १८३४)
मनी १ [ मनसा = मणहा = मणी = मनी, मनु. (कारंडव्यूह किन्नरकन्यानामानि)] (भा. इ. १८३४)
-२ [ मनावी, मनायी (मनुचें स्त्रीलिंग) = मनी ]
मनु [ मनसा ] (मनी १ पहा)
मनू [मनावी ] ( मनाई पहा )
ममती [ममता (स्त्रीनाम) = ममती ] ममती हें नांव शूद्रांत फार. (भा. इ. १८३३)
मम्मट - मन्मथ ह्या शब्दाचें अपभ्रंशांत वम्मह असें रूप होतें. व चा ब होऊन बम्मह आणि म्म च्या दैर्घ्यामुळें ब चा बा होऊन बामह. बामह ह्या प्राकृतिक शब्दाचें संस्कृत संस्करण भामह. मन्मथ ह्याच शब्दाचें न्म चें म्म व थ चें ट होऊन मम्मट.
प्राकृतिक म्हणजे मराठी वगैरे भाषा सुरू झाल्यावर हे दोघे ग्रंथकार झालेले अहित, हें पाहिलें म्हणजे मम्मट व भामह हीं नांवें प्राकृतिक आहेत, हें तेव्हांच ओळखतां येतें. (भा. इ. १८३२)
मयु-१ “The earliest of these Indo-Parthian kings apparently was Maues or Mauas who obtained power in the Kabul valley and Panjab about १२० B.C., and adopted the title of Great king of Kings'.
ह्याप्रमाणें Vincent Smith ( Early History of India, P. २०२ First Edition), Maues हा कदाचित् Indo-Parthian वंशाचा राजा असावासा दिसतो, असें लिहितो. तात्पर्य, Maues Indo-Parthian असावा किं नसावा ह्या बद्दल इतिहासकारांस संशय आहे. Maues हा Indo-Parthian वंशाचा नाहीं, हें सिद्ध करण्यास मजजवळ कांहीं सामग्री जुळली आहे, ती इतिहासज्ञांच्या पुढे मांडण्याची परवानगी घेतों.
२ विष्णुपुराण-चतुर्थांश-अध्याय २४-अंक-१३ :-
" ततश्चाष्टौ यवनाः चतुर्दश तुषाराः मुंडाश्च त्रयोदश एकादश मौनाः । ”
असें वाक्य आहे. ह्यांत मौनाः म्हणून जो शब्द आहे तो व Maues हा शब्द एकच आहेत, असें मी म्हणतों.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
छ
छइल्ल [ शैलीविद: = छइला (कर्पूरमंजरी ) ] हा शब्द संस्कृतोत्पन्नच आहे. केवळ बिलकुल देशी नव्हे.
छकडा [ शकट: = छकडा (यानविशेष ) ] (भा. इ. १८३३)
छकड्या [ शाकटिकः छकड्या ] छकड्यानें प्रवास करणारा ( ४-४-८ )
छकल १ [ शल्कलं = छकल ]
-२ [शकल = छकल ] (भा. इ. १८३६)
छकली [ शिशुल-ली = छकुली ] child endearing term for a child. ये माझी छकुली.
छक्का [ षट्कः = छक्का (पत्त्यांच्या डावांतील) ]
छक्कापंजा १ [ षट्क: पंचक: = छक्कापंजा ]
-२ [छेकपंजक=छक्कपंजअ = छक्कापंजा. छेकोत्किर्वक्रभणितं] (ग्रंथमाला)
छक्कित १ [ शक्-शंक् १ शंकायाम् ] ( धातुकोश-छक ४ पहा)
-२ [ स्थग् ४ गोपने ] ( धातुकोश-छक ६ पहा)
छकुडी [ शक्वरी = छकुडी ] भली बळकट मुलगी.
छकुली [छेक (पाळलेलें प्रिय पांखरूं) + स्वार्थे ल = छकुली ] लहान मुलाला किंवा स्त्रीला प्रमानें हा शब्द लावतात.
छचोर [ छित्वर = छित्तर = छिच्चर = छिचोर. छित्वरो धूर्त: ( उणादि २८८ ) ] (भा. इ. १८३३)
छट् [ पाट् ! = छाट् !, छद् ! ]
छट [शठ = छट ] तो मोठा छट आहे म्ह० शठ आहे.
छडी १ [ छेदक: छेदिका (वेत) = छेडी = छडी ]
-२ [ छैदिक: (वेत )] (छेडी २ पहा)
छत् [ शिट् अनादरे ] (शिट् पहा)
छत [ छद ( आच्छादणारें ) = छत ]
छत्तरी [ छत्वर ] (छप्पर पहा )
छप्पर १ [ छत्वर = छत्तर = छप्पर छत्तरी (स्त्री ). छत्वरो गृहकुंजयो (उष्णादि २८८ ) ] (भा. इ. १८३३)
-२ [ छत्वरकं ( लतागृह ) = छप्पर. त्व = प्प ]
छप्पापाणी १ [ शप्तकपाणि = छप्पअपाणि = छप्पापाणी ] (भा. इ. १८३२)
-२ [ छुप् ६ स्पर्शे ] (छुप्यो पहा )
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
मढरी (पुत्र) [माठर (गोत्रनाम) माठरी (स्त्री) = माढरी = मढरी. वाशिष्टीपुत्र, गौतमीपुत्र, मढरीपुत्र, हीं नांवें शातवाहनांच्या वंशांत येतात. माठरक हें विदूषकादींचें नांव संस्कृत नाटकांत येतें. माठरोस्मि गोत्रेण ( पतंजलि, महाभाष्य, Vol. I, P. ४५२ Kielhorn ) (भा. इ. १८३३)
मध्व - मध्वाचार्य हा समास मधु + आचार्य किंवा मध्व + आचार्य असा दोन प्रकारांनीं सोडवितां येतो. म्हणजे द्वैतसंस्थापकाचें नांव मधु व मध्व असें दोन प्रकारचें असावें, असा निष्पाद होतो. मधु या शब्दाचा अर्थ गोड (विशेषण) व मध (नाम) असा आहे. (मध्व) मध्वक या शब्दाचा अर्थ भुंगा असा आहे. मधु हें संस्कृतांत देवदैत्य व मानव यांचें नांव आढळतें. मध्व हें नांव संस्कृतांत मनुष्याचें मध्वाचार्य ह्या समासाखेरीज इतरत्र कोठें आलेलें मला माहीत नाहीं. तेव्हां, प्रश्न असा उद्भवतो कीं, ह्या द्वैताचार्याचें मूळ नांव मध्व कां मधु ? दोन्ही नांवें एकाच व्यक्तीचीं असू शकणार नाहींत. एक मधु तरी मूळ नांव असेल किंवा मध्व तरी असेल. मधु हें जर मूळ नांव असतें, तर त्यापासून तद्धित शब्द माधव असा होता. पण माधवमत असें कोणी म्हणत नाही. मध्वमत असा बोलण्याचा व लिहिण्याचा प्रचार आहे. सबब, द्वैताचार्याचें मूळ नांव मध्व होतें, हा पक्ष खरा मानावा लागतो. मध्वक म्हणजे षट्पद, भुंगा, मध गोळा करणारा. परंतु मध्वक म्हणजे कांहीं मध्व नव्हे. मधु + अक = मध्वक, असा जर विग्रह असेल, तर मध्वक हा मूळ शब्द होईल, मध्व होणार नाहीं. मध्व हा शब्द अपभ्रंश म्हणावा लागेल. मध्व असा स्वतंत्र शब्द संस्कृतांत मध्वाचार्याच्या पूर्वी नाहीं. तेव्हां एकच तोड रहाते. मध्व हा मध्वक शब्दांचा अपभ्रंश आहे. तात्पर्यं, मध्व हा एका प्रकारचा प्राकृत शब्द आहे, असें म्हणावं लागतें. मध्वाचार्य फार विख्यात पुरुष झाला, त्यामुळें मध्व हा प्राकृत शब्द स्वतंत्र संस्कृत विशेषनाम म्हणून योजिला जाऊं लागला इतकेंच. ( भा. इ. १८३५ )
मनसाराम १ [ मनसा हें सापाच्या विषापासून संरक्षण कणार्या देवीचें नांव.
दुर्गाराम, सीताराम, तसा मनसाराम.
मनसाराम हें मराठी विशेषनाम आहे. ] (भा. इ.१८३६)
-२ [ मनस्रः संज्ञायां ( ६-३-४) ह्या सूत्राप्रमाणें मनसा + राम = मनसाराम हा तृतीया अलुक् समास आहे] कांहीं वर्षापूर्वी भाऊ मनसाराम हें नांव पुण्यात बरेंच ऐकूं देत असे. ( भा. इ. १८३६)
-३ [ मनीषारामः ( मनीषा + आरामः) = मनसाराम ]
म. धा. २९
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
चोथा १ [ चोतः = चोथा (भिजलेलें फडकें वगैरे) चुत् भिजणें ]
-२ [(कोंडा, धूळ) तुस्तः = चुत्थ: = चोथा ]
-३ [ श्चोतः = चोथा ]
-४ [ चुस्त chaff = चोथा ]
-५ [ चुस्तः = चुथ्या = चोथा ] (भा. इ. १८३६)
चोदणें [ चोदन ] (चोलणें पहा)
चोपडें [ चतु:पद्रं = चउपडें = चोपडें ] (भा. इ. १८३६)
चोमडा, चोमडी [ चुंदा ( Procuress ) = चोमडा, चोमडी ]
चोर [ चतुर = चउर = चोर ] चोर म्ह० शहाणा. अरे चोरा ! कोठें लपला होतास ? असें लहान मुलाला प्रेमानें बोलण्यांत चोर ह्या शब्दाचा अर्थ चतुर असा आहे. (ग्रंथमाला)
चोरा वर मोर १ [ चतुरं परि मुखरः ] चतुर परंतु मुखदुर्बळ मनुष्यावर वक्तृत्वसंपन्न मनुष्याचा पगडा बसतो.
-२ [ चतुरस्य उपरि मधुरः = ( चउर ) चोर व ( महुर ) मोर] चोरा वर मोर म्हणजे चतुरा हून मधुर व्यक्ति श्रेष्ठ. चतुर इष्ट पण मधुर इष्टतर.
चोरी [ चौरिका (पंचतंत्र ) = चोरी ]
चोलणें [ चोदन = चोदणें = चोलणें ] (भा.इ. १८३२)
चोळखण [ चुल्लिक्षणः = चोळखण ] चुल्लि म्हणजे मोठा दिवाणखाना. चोळखण म्हणजे मोठा खण.
चौकडी [ चतुष्कटि: ] (ज्ञा. अ. ९ पृ. ६४ )
चौकस [क्रुश् १ आव्हाने, रोदने. चोक्रुश्य = चौकस, चोकस ] ( धा. सा. श. )
चौचाल [ चतु:शाला = चउचाल = चौचाल ] एक शाला म्हणजे घर धरून न राहतां, चार घरें जी स्त्री हिंडते ती चवचाल स्त्री.
चौरस [ चतुरस्र = चउरंस = चौरस ] all-round.
चौवड [ चतुष्पदा ] (दुवड पहा)
चौसा [चतुर्वषीयः = चौसा ]
च्छू ! [ श्वन् ! = च्छूं= च्छू ] कुत्र्याला बोलावितांना किंवा पाठवितांना श्वन् म्हणून संबोधन संस्कृतांत करीत. त्या संबोधनाचें मराठी अपभ्रष्ट संबोधन च्छू आहे. संबोधना खेरीज मराठींत च्छू या शब्दाची दुसरी विभक्ति नाही.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
चूरण [ चूर्णि (small cowrie) = चूरण (खुर्दा) गुजराथी ] गुजराथी ]
चूल [ चुलुकः ] (ज्ञा. अ. ९ पृ. १०५)
चुलभाणवश्या [ चूलिकाभहानसिकः १= चूलभाणवश्या ]
चेंगट [ उच्चिंगट (तामसी माणुस ) = चेंगट ] दिरंगाई करणारा माणूस. ( भा. इ. १८३४)
चेटका [ चाटुकारिन् = चेटका ] चेटका म्हणजे मिठें भाषण करणारा. (भा. इ. १८३६)
चेटुक [ चाटुक (मिठें भाषण) = चेटुक ] (भा. इ. १८३६)
चेडा - गोमांतकांत लहान मुलाला चेडा व लहान मुलीला चेडी म्हणतात. चेटः = चेडा व चेटी = चेडी. महाराष्ट्रांत एका समंधाचें नांव चेडा आहे. ब्राह्मणाच्या मुंज झालेल्या पोराच्या भुताला मुंजा म्हणतात. इतर जातींतील पोराच्या भुताला चेडा म्हणतात. (स. मं. १८२६)
चेंदामेंदा १ [ छिद् + मिद् ]
-२ [ चिंद्धि भिंद्धि ] ( धातुकोश-चेंदमेंद पहा )
चेव १ [ चि ५, १ द्वेषे. चय = चेव ] ( धातुकोश-चेव २ पहा)
-२ [ चेतन = चेअँ =चेवँ = चेव ] (स. मं.)
चेंव [ चितिः (पुल्लिंगी) = चेॐ = चेव ] चेव म्हणजे जागेपणा. (भा. इ. १८३६)
चेहरा (फारसी ) (स. मं.)
चोकस [ चोक्रुश्य ] ( चौकस पहा)
चोख [ चोक्ष = चोख्ख = चोख ] (भा. इ. १८३२)
चोखटेल [ चोक्षतैलं = चोखटेल ] चोखंदळ [ चोक्ष + चोक्ख = चोख ] (भा. इ. १८३३)
चोखाळ [ चाखल्य] (चखाळ पहा)
चोचा [ चुच्यः = चोचा. चुच्य अवयवानां शिथिलीकरणं ।] चोचा म्हणजे डाग देऊन अवयव सैल करणें.
चोज [ चोद्यं ( आश्चर्य, कौतुक, चमत्कार ) = चोज्ज = चोज ] (ज्ञा. अ. ९ पृ. ८ व भा. इ. १८३६)
चोतकर [ चतुः कृत्वा = चतकुर = चतकोर = चोतकोर ]
अचा उच्चार ओ होऊन चोतकोर झालें. (भा. इ. १८३३)