Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
उपनामव्युत्पत्तिकोश
ह्या अर्वांचीनांत हि जीं आडनांवें गोत्रनामांपासून निघालेलीं दाखविलीं आहेत, तीं अर्वाचीनांतील अत्यन्त प्राचीन व प्राचीनांतील अत्यंत शेवटलीं होत. ह्या अर्वाचीनांतील प्राचीन आडनांवांचा काल शक ७०० पासून शक १३०० पर्यंतचा धरण्यास कांहीं हरकत नाही. धैसास, गोळे, गोरे, वगैरे गोत्रोत्पन्न आडनांवें ह्या अर्वाचीनांतील प्राचीन आडनांवांपैकीं होत. गांवांवरून पडलेलीं नांवें गोत्रांवरून पडलेल्या आडनांवांनंतरचीं होत. फारशी नांवें अलीकडील दोनशें वर्षांतील आहेत. सध्यां इंग्रेजी आडनांवें पडण्याचा संभव आहे. मूळ चौदा गोत्रनामांपासून उत्पन्न झालेलें एक हि आडनांव कोकणस्थांत नाहीं. गोत्रनामांपासून उत्पन्न झालेलीं आड़नांवें देशस्थांत अति आहेत. मूळ चोवीस गोत्रनामांपासून निघालेलीं आडनांवें कर्हाड्यांत हि नाहींत. उदाहरणार्थ, आत्रे हें आडनांव देशस्थांत आहे. कोंकणस्थांत व कर्हाड्यांत हें अत्रिगोत्र आहे, परंतु उपनाम नाही. आत्रेय ऊर्फ आत्रे हें आडनांव बरींच शतकें चालू झाल्यावर तें घेऊन देशावर ब्राह्मण आले. तें घेऊन कोंकणांत किंवा कर्हाडप्रांतांत ब्राह्मण आले नाहीत. अर्थात् कोकणस्थांची व कर्हाड्य़ांची वस्ती कोंकणांत व कर्हाडप्रांतांत देशस्थांची वस्ती देशावर होण्याच्या पूर्वीची आहे, हें उघड आहे. आर्यानीं सध्यांच्या महाराष्ट्रांत म्हणजे पूर्वीच्या दंडकारण्यांत वस्ती कोंकण व कर्हाडप्रांत ह्यांत वस्ती केल्यानंतर केली, हें कित्येक वर्षापूर्वी इतर आधारांनीं मीं सिद्ध केलें आहे. त्या सिद्धीला ह्या गोत्राविवरणानें हि पुष्टि मिळते.
करवीर, कोकणे व भुसकुटे हीं आडनांवे प्रांतांवरून पडलेलीं आहेत व ही आडनांवें मूळ चौदा गोत्रांची वस्ती ****** झाल्यावर त्यांच्या वंशजांपैकीं त्या त्या प्रांतांत ज्या कोणीं वस्ती केली त्यांना मिळालेलीं दिसतात. जें चित्पावन कुल करवीर प्रांतांत जाऊन राहिलें त्याला करवीर हें आडनांव पडलें. चित्पावनप्रांतांतून जें कोंकणांत राहिलें त्याला कोकणे हें विशिष्ट उपनाम प्राप्त झालें आणि भोजकट नामक जो देश तापीतीरी विंध्याच्या दक्षिणेस होता त्यांत जो पुरुष चित्पावनप्रांतांतून जाऊन राहिला त्याला भोजकटीय, भोजकटे, भोसकटे, भुसकुटे हें आडनांव ऊर्फ आणणांव मिळालें. मूळ चित्पावनप्रांतांतून गांवोगांव चित्पावनांचा जसजसा प्रसार होत गेला, तसतशीं ग्राम-नामोत्पन्न आडनांवें प्रचलित झालीं. गोंधळेकर, कार्लेकर, कापरेकर, केतकर ह्या आडनांवांत गोंधळी, कार्ले व केतकी या ग्रामनामांचा निर्देश होतो. येथें कर प्रत्यय केर या प्राकृत प्रत्ययाचा मराठी अपभ्रंश आहे. प्रथम ह्या आडनांवांचा उच्चार गोंधळीकेरः, कार्लेकेर:, कापरेकेर: व केतकीकेर: असा होत असे. महाराष्ट्री प्राकृत लुप्त झाल्यावर ह्या आडनांवांतील केर प्रत्ययाचा कर असा उच्चार होऊं लागला. केर हा प्रत्यय तत्संबंधवाचक आहे. केतकर म्हणजे केतकीगांवचा. हा केर प्रत्यय स्मृत्यनुसार जे गोत्रनिर्णायक ग्रंथ झाले त्यांत कर्मारकेराः व वाकिनिकेरा: म्हणून जीं गोत्रनामें येतात त्यांत दृष्टीस पडतो. आतां येथें असा प्रश्न उद्भवतो कीं, केतकी गांवावरून केतकर हें आडनांव पडलें कीं कितवाः ह्या गोत्रनामावरून केतकेराः हें आडनांव निघालें ? कितवकेराः म्हणजे कितवगोत्राचे. कितवगोत्राचे जे ते कितवकेर. कितवकेर=केतकेर, अशी हि परंपरा असूं शकेल. म्हणजे गार्ग्य गोत्रांत म्हणजे कुळांत कोणी कितव नांवाचा पुरुष झाला व कर्तेपणामुळे त्याच्यापासून कितव हें उपनाम सुरू झालें. त्या कितवानें कैत ऊर्फ केत हें नवीन गांव वसविलें व त्या गांवाला आपलें नांव दिलें म्हणजे गेत्रपुरुषनामावरून गांवाचें नांव पडलें, गांवावरून पुरुषाचें नांव पडलें नाहीं, असा अर्थ होतो. आणि हें च जास्त संभवतें. गांवावरून पुरुषाचें व तदुत्पन्न वंशाचें नांव पडलें असें धरल्यास, केत ह्या पुरुषाच्या अगोदर केत हें गांव होतें असें गृहीत धरावें लागतें. अपरान्तांत हें केत गांव केतकरांच्या अगोदर कोणीं वसविलें ? आर्यांच्या पूर्वी अपरान्तांत नागांची वस्ती होती. त्यांनीं हें गांव वसविलें असें म्हणण्यास विशेष कांहीं आधार दिसत नाहीं. तेव्हां, गांवाच्या अगोदर तें गांव स्थापणारा पुरुष होता, हें मान्य करणें हा एक पक्ष रहातो. कितव नांवाचा गोत्रनामप्रवर्तक कोणी एक पुरुष गार्ग्यगोत्रांत झाला. त्याचे जे वंशज त्यांना केतकर व त्यानें जें गांव वसविलें त्याला केत हें नांव पडलें. केत ह्या नांवाला सुबकपणा आणण्याकरितां केतकीप्राम असें त्या गांवाला कोणी कवित्वसंपन्न वंशज म्हणूं लागले. मूळ नांव केतग्राम, केतकीग्राम नव्हे. मूळनाम केतकी असतें तर केतकीकर असें आडनांव प्रचलित असतें. परंतु, आडनांवाचा उच्चार केतकर असा आहे. तेव्हां मूळग्रामनाम केत हें च खरें व तें ग्राम गार्ग्यकुलोत्पन्न कि तव या प्रख्यात व कर्त्या पुरुषानें वसविलें. मेहेंदळी, गोंधळी, हीं हि ग्रामनामें महेंद्र, गोधूलि, ह्या गोत्रप्रवर्तक म्हणजे आडनांवप्रवर्तक पुरुषांपासून निघालेलीं आहेत. हा प्रकार प्राचीन ग्रामनामें व ग्रामनामप्रवर्तक गोत्रपुरुषांसंबंधानें झाला. अर्वाचीनकालीं पुण्यास राहणारा तो पुणेकर व मुंबईस राहणारा तो मुंबईकर, असा प्रघात आहे. पुणें व मुंबई यांच्या स्थापनेशीं या पुणेकराचा किंवा मुंबईकराचा बिलकुल संबंध नाहीं. प्राचीनकाळीं मूळवसाहती च जेथें स्थापावयाच्या होत्या, तेथें मूळ गोत्रप्रवर्तक पुरुषाचें नांव व नंतर त्यानें स्थापिलेल्या गांवाचें नांव, असा प्रघात होता.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
झाडू १ [ हद् १ पुरीर्षोत्सर्गे ] ( धातुकोश-झाड ११, १२ पहा)
-२ [ जाहद्] (झाडा ४ पहा)
-३ [शाड् श्लाघायां हाजी हाजी करणें = झाडू] शाडुः = झाडू a low flatterer.
झांप १ [झंप (jump) = झांप ] (भा. इ. १८३५)
-२ [ झंपा = झांप ] झंपा म्ह० उडी.
-३ [ स्वाप = झ्वाप = झाप = झाँप = (डोळे) झांप, झांपड ] डोळे झांप = नेत्रस्वाप. झ्वाप असा उच्चार अशिष्ट अद्याप करतात. (भा. इ. १८३४)
झापड १ [ स्वापः = झापड ] डोळ्यावर झापड आली (धातुकोश-झापड पहा)
-२ [ स्वपथुः = झापड (निद्रा). स्वप् २ स्वप्ने] झापड म्ह० निद्रा.
झांपड १ [ स्वाप ] (झांप ३ पहा)
-२ [श्वापहेतिः ] ( धातुकोश-झांपड पहा)
झांपा [ झंपः = झांपा ]
झांबट [ संवर्तः = झांबट ] आभाळांत मोठें झांबट आलें आहे म्हणजे मेघांचा समूह आला आहे.
झालँ [ जाल्म = झालँ ] झालं ! एथें काय करावें ? = जाल्म ! किमत्र कार्य ? (भा. इ. १८३५)
झालर १ [ झल्लरी = झालर ] (भा. इ. १८३४)
-२ [ झल्लरी = झालर ] झल्लरी म्हणजे कुरळे केस. झालर म्हणजे कुरळ्या केसासारखें कापड.
झाला १ [ जे to decay. ज = झ ]
हा मनुष्य झाला आहे म्हणजे क्षीण आहे.
-२ [ यातः = जाअ + ल = जाला = झाला ] मे ग्राम: यातः = माझा गाव झाला (पाणिनि ३-४-७६)
माझा हा गाव झाला म्हणजे मी ह्या गावाला गेलों.
-३ [ ज्या ] (धातुकोश-झा पहा)
झाला-ली-लें-कृ, अस्, भू या तीन क्रियापदांच्या पाठीमागें कोणता ही शब्द लागून संयुक्त क्रियापद संस्कृतांत तयार होतें. तो च प्रकार मराठींत होतो.
सः गंगीभूतः = तो गंगा झाला. सः ब्रह्मीभूतः = तो ब्रह्म - झाला. ब्रह्म-झालेल्याला संसार कोठचा ? = ब्रह्मीभूतस्य कुतः संसार:
येथें मराठी वैय्याकरणंमन्य ब्रह्म याचें व्याकरण करूं जातात व त्या प्रयत्नांत गडबडतात. वस्तुत: ब्रह्मझालेल्याला हा एक शब्द आहे व तो संस्कृतापासून मराठीनें घेतला आहे. ब्रह्मीभूतः या शब्दांत ब्रह्मी या शब्दाचें जसें निराळे व्याकरण नाहीं, तसें च ब्रह्मझालेल्याला ह्या शब्दांत ब्रह्म या शब्दाला निराळें व्याकरण नाहीं.
ती स्त्री राजा झाली = सा स्त्री राजीभूता.
राजा झालेल्या स्त्रीस मुगुट घातला = राजीभूतायै त्रियै मकुटः दत्तः
येथें राजा हा शब्द निराळा करून व्याकरूं नये.
गाय झालेल्या लोकांस छठूं नये = गौभूतान् जनान् मा छलत ।
येथें गायझालेल्या हा एक शब्द आहे. गाय आणि झालेल्या असे निराळे शब्द करून परिस्फोट करूं गेल्यास घोंटाळा होऊन वाट सांपडणार नाहीं. (भा. इ. १८३६)
उपनामव्युत्पत्तिकोश
ही १४ गोत्रें ऊर्फ कुळें परशुरामानें प्रथम कोंकणांत बसविलीं. परशुराम दाशरथि रामाचा समकालीन होता असें पुराणें व इतिहास सांगतात. तें मान्य केल्यास रामाच्या वेळेपासून चितपावनांची वस्ती कोंकणांत आहे, असें होतें. तें कांहीं हि असो, कोंकणस्थांचीं प्रथम १४ गोत्रें होतीं. तीं वाढत वाढत कालान्तरानें ६० झाली. साठय्ये हें ६१ वें कुळ आहे, असें कित्येक म्हणतात. परंतु, तें साधार आहे, असें म्हणण्याला जितका पुरावा मिळावा तितका मिळालेला नाहीं. साठे म्हणजे साठ व साठय्ये म्हणजे ६१ वा, असा अर्थ करून कित्येक लोक आपली स्वतःची फसवणूक करून घेतात इतकेंच. साठे या शब्दाचा अर्थ साठ नसून, हा शब्द सार्ष्टि या ऋषिनामापासून निष्पन्न झालेला आहे, हें मागें दाखविलेंच आहे, असो. हीं मूळचीं साठ कुळे येणेंप्रमाणें:--
१ काश्यप-१ लेले, २ गानू, ३ जोग, ४ लवाटे, ५ गोखले
२. शांडिल्य-१ सोमण, २ गांगल, ३ भाटे, ४ गणपुले,
५ दामले, ६ जोशी, ७ परचुरे
३ वासिष्ठ - १ साठे, २ बोडस, ३ वोक, ४ बापट, ५ बागुल, ६ धारू, ७ गोगटे, ८ भाभे, ९ पोंगशे, १० विंझे, ११ साठय्ये, १२ गोंवंड्ये
४ विष्णुवर्धन-१ किडमिडे, २ नेने, ३ परांजप्ये, ४ मेहेंदळे
५ कौंडिन्य - १ पटवर्धन, २ फणशे
६ नितुंदन - १ वैशंपायन, २ भाडभोके
७ भारद्वाज - १ आचवल, २ टेणे, ३ दर्वे, ४ गांधारे, ५ घांघुरडे, ६ रानड्ये
८ गार्ग्य - १ कर्वे, २ गाडगीळ, ३ लोंढे, ४ माटे, ५ दाबके,
९ कपि - १ लिमये, २ खांबेटे, ३ जाईल, ४ माईल
१० जामदग्नि--१ पेंडसे, २ कुंटे
११. वत्स् - १ मालशे
१२ बाभ्रव्य-१ बाळ, २ वेहरे
१३ कौशिक - १ गद्रे, २ बाम, ३ भाव्ये, ४ वाड ५ आपटे
१४ अत्रि- १ चितळे, २ आठवेले, ३ भाडभोळे, एकूण उपनांवें ६०
म. धा. ३०
ह्या साठ आडनांवांपैकीं बापट, धारू, किडमिडे, नेने, लिमये, माईल व भाडभोळे हीं आडनांवें ज्या गोत्रांपासून निघालीं तीं गोत्रे मजजवळील पांच हजार गोत्रांच्या यादींत नाहींत किंवा त्यांचा पत्ता मला लावतां आला नाहीं. बाकींच्या ५३ आडनांवांचा पत्ता लागला आहे. त्यावरून असें म्हणतां येईल कीं, ज्या कालीं गोत्रनामें प्रचारांत होतीं, परंतु तीं प्राकृत होत होतीं त्या कालीं हीं ५३ आडनांवें ऊर्फ गोत्रनामें सुरू झालीं. प्राकृत भाषा सुरू झाल्यानंतरचीं हीं साठ आडनांवें ऊर्फ गोत्रनामें आहेत. म्हणजे आजपासून अडीच हजार वर्षांपलीकडील ही साठ आडनांवें नाहींत. मूळचीं चौदा गोत्रें संस्कृत आहेत, प्राकृत नाहींत. अर्थात् तीं अडीच हजार वर्षांपूर्वीचीं आहेत. चौदा गोत्रांचा एकेक पुरुष परशुरामानें कोंकणांत वसविला ह्या दंतकथेशीं वरील निगमन चांगलें जुळतें. ह्या साठ आडनांवांचीं पुढे सुमारें, अडीचशें आणीक आडनांवें कोंकणस्थांत झालीं. तीं सर्व सापेक्ष दृष्टीनें कमजास्त अर्वाचीन आहेत.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
झव, झवणें [ धव (पुमान्) = झव. धवति = झवे ] तुझ्या आईचा मी झव = तव मातुः अहं धवः (भा. इ. १८३३)
झवणें [ (वि) धुवनं = झुवणँ = झुवणें. धवनं = झवणँ = झवणें. धव म्ह० नवरा, पति. त्याचें मुख्य कर्म धवन अथवा (वि) धुवन (रतं) त्याचा अपभ्रंश झवणें. ] (भा. इ.१८३३)
झंवाडा [ संमादक: = झंवाडा ] झंवाडा माणूस आहे = संमादकः मनुष्यः. संमादकः = Frenzied, mad, intoxi cated. यांत बीभत्स असें कांहीं नाहीं.
झळ १ [झल्लिका = झळी = झळ ] उन्हाची झळ.
-२ [ झलका = झळ ] झलका तु महाज्वाला (वैजयंती, पृ. ११, ओपर्ट). ज्वलका = झलका (अपभ्रंश संस्कृत)
झांकणें [ झष् to cover = झाँख = झाँक ] झष् बद्दल झंष् किंवा झाष् असा धातु असावा. (भा. इ. १८३४) झाखड [ जाघट्य ] (झागड पहा)
झागड [ घट् १ चेष्टायां संघाते. जाघट्य = झागड, झगड, झाखड, जखड ] ( धा. सा. श. )
झांगड १ [ हन् २ घाते. संघातः = झांगड ] ( धा. सा. श. )
-२ [ झर्झरी = झांजड = झांगड. झ =ज =ग] वाद्यविशेष.
झाँटँ [ शांतं ! (अव्यय) = झाँटँ ! ] झिटकारार्थक अव्यय.
झाड १ [ छृष् to kindle. छुष्टं = झाड (दारूचें झाड म्हणजे पेटवून जळणारा पदार्थ ) ] झाड (वृक्ष) हा शब्द निराळा.
-२ [ ( पुं.) झटि: = झाड ( नपुं. ) ] (ज्ञा. अ. ९ पृ. १४२)
झाडणी [ साधारणी (कुंचिका) = झाहारणी = झाडणी ] झाडणी म्ह० केरसुणी ( भा. इ. १८३४)
झाडणें [ (स्वठ्) स्वाठ् = झ्वाड = झाड (णें) ] संपविणें. झाडून सगळें काम केलें = स्वाठयित्वा सर्वं कर्म कृतं । (भा. इ. १८३४)
झाडा १ [ जाहत्ति. हद् १ पुरीषोत्सर्गे ] (धातुकोश-झाड ११ पहा)
-२ [ सादः ] ( धातुकोश-झड १० पहा)
-३ [ हद् (हगणें ), जहद् = झाडा ] हगणें.
-४ [ जाहद्यते = झाडा ] अतिशय निकडीनें हगावयाला होणें. झाडू म्हणजे गू काढून नेणारा scavenger.
-५ [ सातिः (मिळकत ) = झाडा ] मिळकतीचा हिशेब.
-६ [ जाहद् frequentative of हद् हगणें ) = झाडा (हगणें ), झाडू ] मला झाड्याला जावयाचें आहे म्हणजे हगावयास जावयाचें आहे.
उपनामव्युत्पत्तिकोश
९ उपरिष्ट गोत्रमालिकेंत बरींच आडनांवें ऊर्फ गोत्रनामें देशस्थांचीं आहेत. पिंगळे, वाघ, गर्गे, भारदे, व्यास, भार्गव, भवैते, पर्वते, अत्रे, कोशे, धुमे, गांडे, मांडे, मोगल, हरकारे, गायधनी, पराशरे, आसकोरे, उसणारे, देव, आथर्वण, हंस, दुर्गे, पिटके, पारधी, पारखी, पिंपळे, मध्वे, कवी, नंदे, धोत्रे, भोळे, तिखे, मुंजे, तोरो, वगैरे शेंकडों आडनांवें ऊर्फ गोत्रनामें देशस्थांत आढळतात. महाराष्ट्रांतील जे देशस्थ लोक त्या सर्वांचीं जुनीं आडनांवें जमविण्याचा उद्योग मीं चालविला आहे. त्यावरून असें दिसतें कीं, शेंकडों गोत्रनामें आडनांवें झालेलीं ह्या लोकांत आढळतील. जोशी, कुळकर्णी, देशपांडे, देशमुख, पाटील, मुश्रीम, पेशवे, मुजुमदार वगैरे धंद्यावरून पडलेलीं आडनांवें व गांवावरून करप्रत्ययान्त आडनांवें देशस्थ लोकांत बरीच आहेत. तीं वगळलीं असतां, बाकीचीं जीं आडनांवें रहातात तीं सर्व गोत्रनामांवरून निघालेलीं आहेत. देशस्थांत गोत्रें शेकडों आहेत. त्याहून कर्हाड्यांत व कोंकणस्थांत गोत्रें अगदींच कमी-कर्हाड्यांत २४ चोवीस गोत्रें आहेत व कोंकणस्थांत १४ चौदा गोत्रें आहेत.
१० पैकीं गोत्रनामांवरून कर्हाड्यांत जीं आडनांवें आलेलीं मला ओळखवलीं त्यांची यादी येथें देतों. ( यापुढें ७३ आडनांवांची यादी दिली आहे. त्या यादींतील आडनांवांचा कोशांत समावेश केला आहे. )
शोधिले तर आणीक हि दहावीस अपभ्रंश निघतील. गोत्रनामांचे अपभ्रंश होऊन जीं हीं पाऊणशें आडनांवें निघालीं आहेत त्यांहून बाकीचीं आडनांवें गांवावरून किंवा धंद्यावरून पडलेली आहेत. अंबार्डेकर, मणेरकर, हिंगणकर, फणसळकर, वगैरे करप्रत्ययान्त नांवें
ग्रामनामांवरून तत्रस्थ ह्या अर्थी पडलेलीं आहेत. सबनीस, शेखदार, सरदेसाई, पतकी, जोशी, पटवर्धन, दक्षित, हुजूरबाजार वगैरे फारशी व हिंदी नांवें धंद्यावरून पडलेली आहेत.
११. कर्हाड्यांच्या प्रमाणें च कोंकणस्थांच्या आडनांवांची त्रिविध स्थिति आहे. कांहीं आडनांवें धंद्यांवरून, कांहीं गांवांवरून व बाकीचीं गोत्रांचे अपभ्रंश होऊन पडलेलीं आहेत. पैकीं गोत्रोत्पन्न आडनांवें ओळखवलीं तेवढीं नमूद करितों. (येथें त्यांनीं १३१ आडनांवें दिलीं आहेत त्यांचा समावेश कोशांत केला आहे. )
गोत्रनामांपासून निष्पन्न झालेलीं आणीक हि दहा पांच आडनांवें देतां येतील. ह्यां व्यतिरिक्त बाकीचीं आडनांवे गांवावरून किंवा धंद्यावरून पडलेली आहेत-पळणिटकर, पाटणकर, नगरकर, पिटकर, भुस्कुटे, मंगरूरकर, माखलकर चिपळोणकर वगैरे कर किंवा इये, ए प्रत्ययान्त आडनांवें ग्रामनामावरून निघालेलीं आहेत. मंडलिक, वर्तक, पटवर्धन, भट, पुराणिक, पोतनीस, पेशवे, फडणीस, मुजुमदार, जोशी, राजवाडे, दीक्षित, देशमुख वगैरे आडनांवें धंद्यावरून पडलेलीं आहेत. देशस्थ-कर्हाड्यांच्याप्रमाणेंच कोंकणस्थांचा हि प्रघात असलेला दिसतो.
मूळ कोंकणस्थांचीं १४ गोत्रें :- १ कश्यप, २ शांडिल्य, ३ वासिष्ठ, ४ विष्णुवर्धन, ५ कौंडिन्य, ६ अत्रि, ७ कौशिक, ८ भारद्वाज, ९ गार्ग्य, १० कपि, ११ जामदग्न्य, १२ वत्स, १३ नितुंदिन, १४ बाभ्रव्य. पैकीं जामदग्न्य व वत्स; भारद्वाज, कपि व गार्ग्य; कौशिक व बाभ्रव्य; वासिष्ठ व कुंडिन; काश्यप व शांडिल्य; आणि विष्णुवर्धन व नितुंदिन; हीं समानप्रवर म्हणजे एकाच मूळ ऋषीपासून उत्पन्न झालेलीं आहेत. जामदग्न्य वत्स हीं भृगूपासून; भारद्वाज, कपि व गार्ग्य हीं भरद्वाजापासून - कौशिक व बाभ्रव्य हीं विश्वामित्रापासून; वासिष्ठ व कुंडिन हीं वसिष्ठापासून; काश्यप व शांडिल्य हीं कश्यपापासून; विष्णुवर्धन व नितुंदन हीं अंगिरसापासून जन्म पविलीं, अशी परंपरागत समजूत आहे. अत्रिगोत्र अत्रिऋषीपासून उद्भवलें. अगस्तीपासून जन्मलेलें एक हि गोत्र कोंकणस्थांत नाहीं.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
झटणें [ झट् ( संघाते) = झटणें ]
तो मला झटला म्हणजे येऊन गच्च भिडला.
झटून काम करणें म्हणजे भिडून काम करणें. ( भा. इ. १८३६)
झट् झट्ट [ संयत्त ready = झट्ट ] ready.
झड { झटी, झटा ( झट् पासून ) = झड } झडीनें, झडेनें
पावसाच्या झडीनें किंवा झडेनें पिछा पुरविला आहे. (भा. इ. १८३६)
झटकर-रि, झटकन्, झटदिनि [ चटकर पहा ]
झणीं १ [ शनैः = सणी = झणी, झणीं ] हळूहळू.
-२ [ शनै: = सणै = झणै, झणे, झणीं ] झणीं म्ह० शीघ्र (भा. इ. १८३४)
झणे, झणै [ शनैः ] ( झणीं २ पहा)
झपकन् [ जवं कृत्वा = झपकन् ] quick.
झपाझप् [ सर्पं सर्पं ] ( सप् सप् २ पहा )
झपाझप [ क्षिप्रं क्षिप्रं ] (सप् सप् १ पहा )
झपाटा [ संपातः ] ( सपाटा पहा)
झपाटिका [ सृपाटिका. सृ १ गतौ ] (झुरका २ पहा)
झपाटी [सृपाटिका (पक्ष्याची चोंच ) = झपाटी] साप गरुडाच्या झपाटींत सांपडला म्हणजे चोचींत सांपडला.
झपेट [ संस्फेट ] ( धातुकोश- झपेट ३ पहा)
झप् झप् १ [ क्षिप्रं क्षिप्र ] (सप्, सप् १ पहा )
-२ [ सर्पं सर्पं ] (सप् सप् २ पहा )
झंवट [ यमव्रत ( पक्षपात न करतां जें शासन तें ) = जमबट = झंबट = संकट ]
झबलें [ यमलं (आंगरखा) = जबळें = झबलें. यम् to bind ]
झमझम [ स्यम् १ शब्दे. (वीप्सा ) स्यमस्यम = झमझम. द्विरुक्ति चिवचिव ] ( धा. सा. श. )
झरझर १ [ अजिरं अजिरं = झरझर. अजिर quick ]
-२ [ स्राक् स्राक्] (झराझरा पहा)
झरझर, झराझर [ निर्झरं त्वरितं ह्यांतील झर पासून झरझर ]
झराझरा [ स्राक् स्राक् = झराझरा ( त्वरेनें ). = झारझार झरझर ]
झरी [ सरित् ] ( धातुकोश-झिरप पहा )
झरझर [ सृ सरणें.. सरं सरं ] ( सर् सर् पहा )
उपनामव्युत्पत्तिकोश
७ भारतवर्षांत इतरत्र गोत्रपरंपरा अद्यापपर्यंत किती राहिली आहे तें सूक्ष्मपणें सांगण्यास जशीं साधनें उपलब्ध व्हावीं तशीं झालेलीं नाहींत. तेव्हां महाराष्ट्रांतील गोत्रपरंपरा तेवढी येथें देतों, सुमारें चारशें गोत्रनामें प्राकृत भाषेंत अपभ्रष्ट झाललीं मीं जुळविलेलीं आहेत तीं देतों. त्यांवरून दिसेल कीं सध्यां देशस्थांत, कर्हाड्यांत व कोंकणस्थांत जीं कित्येक आडनांवें आहेत तीं पूर्वीचीं गोत्रनामें आहेत. तात्पर्य गोत्रनामें म्हणजे आडनांवें; दुसरें कांहीं नाहीं. संस्कृत गोत्रनामें व मराठी आडनांवें यांची यादी:- (यापुढें दिलेल्या ३९१ आडनांवांचा कोशांत समावेश केला आहे.)
८ वरील यादींत देशस्थ, कर्हाडे व कोंकणस्थ, मराठे व प्रभू यांचीं आडनांवें ऊर्फ गोत्रनामें दिलीं आहेत. जयवन्त हें आडनांव प्रभंत आहे. हें आडनांव येणेंप्रमाणें साधलें आहे.
द्रोणपर्वतजीवन्तादन्यतरस्याम् ( ४-१-१०३ )
एभ्यो गोत्रे फग् वा । जैवंतायनः जैवन्तिः वा ।
जीवन्त नामक मूळ गोत्रोत्पादक पुरुषापासून जे उत्पन्न झाले ते जैवन्तायन किंवा जैवन्ति. जैवन्ति शब्दाचा मराठी अपभ्रंश जैवन्त किंवा जयवन्त. जय (जिंकणें) या शब्दाशीं जयवंत, जैवंत या प्रभुआडनांवाचा कांहीं एक संबंध नाहीं. तसेंच, गुप्ते हें प्रभुआडनांव गौप्तेय ह्या गोत्रनामापासून आलेलें आहे. शालिवाहनाच्या चौथ्या शतकांतील गुप्त सम्राटाशीं या आडनांवाचा संबंध दिसत नाहीं. चित्रे व चौवळ हीं प्रभुआडनांवें चैत्रेयाः व चौवला: या गोत्रनामांपासून निघालेलीं आहेत. अधिकारी, अधकारी, अदकारी हें हि प्रभु आडनांव अधिकारि या गोत्रनामापासून निघालेलें स्पष्ट दिसतें. तात्पर्य, सध्यांच्या प्रभुलोकांत निरनिराळीं गोत्रनामें ऊर्फ आडनांवें आहेत. प्रभू तेवढे सर्व दाल्म्यगोत्री, हें मत इतिहासानभिज्ञ भटांचें व तदनुयायी प्रभूंचें आहे. ब्राह्मण व प्रभू दोघे हि खर्या इतिहासाला पारखे होऊन, वृथा वाद माजवून राहिलेले आहेत. जैवन्त, गुप्ते, चौबळ हीं अडनांवें जैवन्ति, गौप्तेय, चौबळ या गोत्रनामांपासून ज्याअर्थी निघालेलीं आहेत, त्याअर्थी एके काळीं हीं तिन्हीं आडनांवें ऊर्फ गोत्रें ब्राह्मणांत होतीं हें निर्विवाद आहे. ब्राह्मणांत हीं गोत्रें ऊर्फ कुळें सध्यां लुप्त झालेलीं दिसतात; फक्त प्रभूंत मात्र तीं हयात आहेत.
अवटे, घोल्ये, मांडे, काळे, पांढरे, कुटे, बाबर, भोर वगैरे आडनांवें अवट्याः, गौहल्या:, मांड्याः, कालेयाः, पाण्डाराः, कौटाः, बाभ्रव्याः, भौराः, या गोत्रनामांवरून प्राकृतांत आलीं हें उघड आहे. पोरे हें शिंपी लोकांत आडनांव आहे व तें पौरेयाः या गोत्रनामापासून निघालेलें आहे, हें कोणी हि कबूल करील. ह्या व्युत्पत्तीचा अर्थ काय ? ह्याचा अर्थ इतकाच कीं पूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व संकर ह्या सर्वांचीं समान गोत्रें असत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व ह्या तिन्हींचे अनुलोम व प्रतिलोम संकर मिळून एक कुळ होई व त्या कुळांतील सर्व व्यक्तींचा त्या कुळाच्या गोत्रनामावर हक्क असे. पैकीं ब्राह्मणादि वर्णांचा क्षय झाला असतां, प्रभू, शिंपी वगैरे जातींत हीं गोत्रनामें ऊर्फ आडनांवें अद्याप हयात असलेलीं आढळतात. ह्या दृष्टीनें महाराष्ट्रांतील अठरापगड जातींतील सर्व आडनांवें गोळा केलीं असतां आर्यवंशाच्या इतिहासावर फार प्रकाश पडेल. कोटीवरी गोत्रें होतीं म्हणून बौधायन सांगतो. त्यांपैकीं गोत्रप्रवरग्रंथांत व पुराणांत सुमारें ५००० पांच हजार सांपडतात. बाकीचीं लक्ष्यावधि गोत्रे गेलीं कोठे ? असा अंदाज आहे कीं, ब्राह्मणांत लुप्त झालेलीं हीं हजारों गोत्रें इतर जातींच्या आडनांवांत बरींच सांपडतील.
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
सुभद्रे [ सुभद्रे ] ( दासींचीं नांवें पहा)
सूनरी [ सूनरी (वैदिक ) = सुनरी, सूनरी ( स्त्रीनाम )] सुंदरी निराळी. (भा. इ. १८३३)
सूर्याजी [ सूर्यादित्य ] ( आदित्य पहा)
सोनी [ सुस्नाता = सुण्हाआ = सोण्ही = सोन्ही = सोनी किंवा सुवर्णा = सुअण्णा = सोण्णा = सोणी - सोनी (बालिकानाम)] ( भा. इ. १८३४)
सोनू [ सुतनु = सोनू (स्त्रीनाम) ]
सोनूबाई [ सुतनु = सुअणु = सोनू ]
सोम्या [ सौम्यक = सोम्या ] आयुष्मान् भव सौम्य । असा आशीर्वाद संस्कृतांत प्राचीन कालीं देत. कोणाला ही सौम्य म्हणत. ह्या सौम्य शब्दापासून मराठी सोम्या शब्द निघाला आहे. (भा. इ. १८३४)
सोसपार्वती [ सो, सोस् name of पार्वती = सोसपार्वती ]
हजारीमल्ल [ सहस्रमल्ल: = हहजरमल्ल = हजारमल्ल ] मारवाड्यांत नांव आहे.
हमजू, हमजा [अहंयु ( लढवय्या) = हंजू = हमजू हमजा ] हमजा हें नांव मुसलमानांत आहे पण तें संस्कृतोत्पन्न आहे. ( भा. इ. १८३४)
हरणी [ हरेणु र्ना सतीने स्त्री रेणुकाकुलयोषितोः (मेदिनी ) हरेणु = हरणी ] स्त्रीनाम. (भा. इ. १८३३)
हंशे [ कलहंसि = हंशे ( एकशेष ) ] ( दासींचीं नांवें पहा)
हातमल [ हस्तिमल्ल (गणपति) = हातमल ] वाण्यांत नांव आहे.
हैबत [ अहीवत् = हैबत ( राव) ] पुरुषनाम मराठ्यांत. (भा. इ. १८३४)
होणम्या [ सुवर्णमयः = होणम्या ] हें विशेषनाम आहे. होणम्या ! =रे सुवर्णमय !
हौशी [ हंसी = हौशी (स्त्रीनाम)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
झ
झक [ सहः = सघः = झग = झक (समर्थ ) ] हा माणूस लढण्याला झक आहे = अयं नरः योद्धुं सह:
झकत [ धकित्] ( झकीत पहा)
झकाकणें [ चकास्ट् दीप्तौ ] ( चकाकणें पहा )
झकास [ चकास ( चकाकणारें) = झकास ] हें काम झकास झालें म्हणजे स्पष्ट, चकचकित, नामी झालें. (भा. इ. १८३६)
झकीत [ धकित् धिगर्थे. धकित् = झाकित् = झकत ( निपात) ] तो झकत येईल म्ह० तो अपमान होऊन येईल.
झखझखीत, झगझगीत [ झष् संवरणे ] ( ग्रंथमाला)
झंगट [ संगतम् = इंगट, झेंगट ] झंगट म्हणजे सोबत, सोबती.
झगड [ जाघष्ट्य ] (झागड पहा)
झगडा [ संग्राम: ] ( धातुकोश-झगड २ पहा)
झगा १ [ झष् संवरणे ] पायघोळ वस्त्र. (झखझखीत पहा)
-२ [ षगे संवरणे. सगः = झगा ] झगा म्ह० पायघोळ आंगरखा.
-३ [ सग् ( झांकणें, आछादणें ) = झगा, झाकणें ]
झट् [ हेठ् ( शाठ्ये ) जिहेठ् = झेट्, झ्याट्, झट् किंवा जहट् ( to run, to leap ) = झट् (मागें हो ) ]
झट [ संयन्त्रित fastened = झट ) fastened, obliged, forced.
झटका १ [ झटक: = झटका. इट् गोंधळणें. ]
-२ [ स्यन्दक: = झटका. स्यन्द् to run स्यन्दते ] एक प्रकारचे वहान.
-३ [ जीर्विका ] (झिरका पहा)
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
सगुण [ सुगण् = सगुण ] आत्माराम सगुण ह्यांतील सगुण शब्द सुगण् शब्दाचा अपभ्रंश आहे. (भा. इ. १८३६)
संतीदास [ शांतिदास = संतिदास, संतीदास. शांति चें प्राकृतांत संति होतें ] संतीदास हा एक मराठी ग्रंथकार झाला.
सबरे [ शवरिके ] ( दासींचीं नांवें पहा)
संभाजी [ शंभ्वादित्य ] (आदित्य पहा)
संभू [ स्वयंभू= सअअंभू= संभू. शंभु = संभू ]
संभूजी [ शंभ्वादित्य ] (आदित्य पहा)
सयाजी [सह्यः = सय्या किंवा सखि = सया ] बहुमानार्थी सय्याजी किंवा सयाजी. तात्पर्य सयाजी हा शब्द संस्कृत सह्य किंवा सखि ह्या दोन शब्दांपासून मराठींत आला आहे. (भा. इ. १८३४)
सवरे [ शबरिके ] ( दासींचीं नांवें पहा)
सायण - मात्रज्ञ ह्या संस्कृत शब्दाचें माञन्न असें प्राकृत रूप होतें. त्याचें प्राकृतिक रूप मायण्ण. त्याचें मायण. तसेंच सर्वज्ञ ह्याचें-सायण.
सायण व मायण हे दोन्ही शब्द प्राकृतिक आहेत. द्राविडी प्राकृतापासून द्राविडी प्राकृतिक. सायणाचार्य प्राकृतिक भाषा सुरू झाल्यावर झाले. (भा. इ. १८३२)
साळू [ चारु = साळु, साळू, साळू म्हणजे सुंदर. साळू विशेषनाम ] (भा. इ. १८३६)
सिदनाथ, सिदोपंत [ सिद्ध ] (शिदू पहा)
सुंदरे [ सुंदरि ] ( दासींचीं नांवें पहा )
सुनरी [ सूनरी ] (सूनरी पहा)
सुपडू, सुपडोजी १ [सुप्रतीक (मदन) = सुपडू, सुपडोजी ( व्यक्तिनाम ) ]
सुपडोजी २ [ सुभद्र, सुपर्ण ]
-३ [ सुप्रतिवर्मन् = सुपडोजी, सुपडू (शूद्रनाम ) ]
सुबराव [ सुभ्रूक = सुब्रूअ = सुब्राव = सुबराव ] ज्याच्या भिंवया सुंदर आहेत तो सुब्राव. मराठींत व्यक्तिनाम झालें आहे.