Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

किंकरे - कैंकरायणाः (स)

किराणे - करायणाः (क )

कुकडे - कौकंटिः (स)

कुंचे - कृत्स्नः (स)

कुंजे - कौंजायनाः (स) 

कुटरे [ सं. कोटकर-महा. कोट्टरअ-मरा. कुटरे ] ( म.) ( इतिहाससंग्रह )

कुटे - कौटाः ( स ) 

कुंटे - कौटाः (मूळ कुटे-अनुनासिक आगंतुक) ( कों ) ( स )

कुबेर - कौबरिकेयाः (स)

कुसळे - कौसल्यायनिः (स)

कुसे - कृत्स्नः (स) 

केतकर - केतकीकेर - ग्रामनामावरून. (कों)

कैकेणी -किकायनाः (स)

कोकटे - [ सं. कर्कोटक - महा. कक्कोडअ - मरा. कोकटे - गोकटे ] (म) ( इतिहाससंग्रह)

कोकणे - प्रांतावरून (कों) 

कोंकणे - सं. कुकुण (म) (इतिहाससंग्रह) 

कोकरे - सं. कुकुर. (म) (इतिहाससंग्रह)

कोकीळ - कोकिलाः (स)

कोटिभास्कर - १ कौटिश्चासौ भास्कर: (क)
-२ कुटः ( कौटिः ) चासौ भास्करः = कौटिभास्करः कौटि गौत्रांतील भास्कर. कौटिभास्कराचे वंशज जे ते
कौटिभास्कर, कौ = को (कोटिभास्कर ) (स) 

कोटे - कौटाः ( स ) 

कोठरे - कौठाराः ( स ) 

कोतवाल - कोट्टपाल = कोटवाल = कोतवाल. (भा. इ. १८३२)

कोरडे - कौरंडजाः (स)

कोरवे - कौरव्याः (स)

कोले - क्रोष्टुकिः ( क )

कोल्हे - १ क्रोष्टुकि: (क)
-२ क्रौष्टुकिः (स)

कोशे - १ कौशीतकेयाः (स)
-२ कौशिकाः (स)
-३ कौत्साः ( स )

कौशिक - कौशिकः (स)

क्षीरसागर-(क्षीरह्रद = क्षीरसागर) = क्षीरसागर (स)

डावली १ [ दात्रम्, दात्रः, दात्री ] ( डाव ५ पहा)

-२ [ दर्वी = डवली, डावली ] दर्वी म्हणजे लाकडी पळी. मांजराच्या पंज्याला हि साम्यानें डावली म्हणतात. रेफाचा विपर्यय.

-३ [ङ्वालिः (ड्वल् १० मिश्रीकरणे) = डावली ]

डाह [ दाह: = दाहा, दहा, धा. दाह = डाह ] (भा. इ. १८३४)

डाहद [ दात्यूह = डाहद ] जलकाक. ( भा. इ. १८३७)

डाहळा [ लाङ्गल: = डागळा = डाअळा = डाहळा ] नालिकेरस्तु लाङ्गली (अमर). लांगलवत् शाखा अस्य लांगली ( क्षीरस्वामी). डाहळी म्हणजे लहान फांदी. (भा. इ. १८३४)

डाळ, डाळें [ दाल = डाळ, डाळें ] (भा. इ. १८३२)

डिंक [ दिग्ध ] ( डीक पहा)

डिघी [दीर्घिका = डिघिआ = डिघी ] विहीर

डिचका [ डित्थकः = डिचका ]
श्यामरूपो युवा विद्वान्सुंदरः प्रियदर्शनः ।
सर्वशास्त्रार्थवेत्ता च डित्थ इत्यभिधीयते ॥
मराठींत डिचका म्हणजे शहाणा. (भा. इ. १८३४)

डिच्या [ डित्थ = डिच्च = डिच्या (लघुत्वदर्शक, अल्पीभावदर्शक) ] डिच्या हें लहान मुलाचें आवडतें नांव. (भा. इ. १८३३)

डियो ! [दृष्ट्या !=डियो !] डियो हा हर्षदर्शक उद्रार आहे.

डिवडिव करणें [ दिव् to lament. देवति = डिवडिव करणें ] To be vexed.

डीक [ दिह्-दिग्ध unguent = डीक, डिंक ]

डुक [द्रुह (ध्रुक्=द्वेष) = डुक] त्याच्या पोटांत माझ्याविषयी डुक आहे म्हणजे द्वेष आहे.

डुकर [ डुःकर = डुकर ] डु: डु: शब्द करणारा प्राणी. (भा. इ. १८३२ )

डुक्का [ दौष्कः ( दोश्चरति दौष्कः ) = डुक्का ] दौष्क म्हणजे रात्रिंचर, लक्षणेनें चोरून काम करणारा, लुच्चा.

डुचक [ दुष्कृत = डुसकिअ = डुचकिअ = डुचक (का- की-कें ) ] (भा. इ. १८३४)

डुडळ [ डुंडुल: = डुडुळ, डुडळ] घुबड. (भा. इ. १८३४)

डुरकणें [द्रेकृ शब्दे । द्रेक् = डिरक्. धातू द्रोकृ असा असावा. द्रोक्= डुरक्] डुरकणें म्हणजे बैलाचा शब्द. (भा. इ. १८३४)

डाकिणी, डाकीण [मूळ संस्कृत दक्षायणी; त्याचें प्राकृत दख्खायणी; त्याचें डखाअणी; त्याचें डाकिणी, त्याचें डाकीण ] ( स. मं.)

डाग १ [दग्घ = डग्घ = डाग, डाक, ] डाग + ल (स्वार्थक) = डागलेला, डाकलेला.

-२ [ द्राख् to adorn द्राखः ornament = डाग ] ornament.

डांबरट १ [ डंब् = उपहास करणें. डंब = डाँब. डाँबर= डाँबर. डांबर म्हणजे उपहासास्पदीभूत इसम, त्याचें लघुत्वदर्शक रूप डांबरट. (बहिरट, हगरट, मुत्रटप्रमाणें) डांबरट. ] ( भा. इ. १८३३)

-२ [ डामर ( अतिशयार्थक ट) = डामरट, डांबरट ] डामर म्हणजे दंगेखोर.

-३ [ डंबरिष्ठः = डांबरट, डामरट ]

डांबीस [ दांभिकीयस् = डांबीस ]

डाभ [ दर्भ = डब्भ = डाभ ] गवताचे तुकडे.

डामरट १ [ दस्म (लुच्चा) = डाम्ह = डाम. दस्मतर = डामअर = डामर. ( क्षुद्रभावदर्शक) डामरट ]
डामरट म्ह० अति लुच्चा.

-२ [ डामर ] ( डांबरट २ पहा)

-३ [ डंबरिष्ठः ] ( डांबरट ३ पहा)

डाराडूर [ द्रा to sleep = डार + ध्रु to be fixed ) = ढूर = डाराडूर, ढाराढूर] गाढ निजणें.

डाल, डाली [ डल्लकं = डाल (वंशपात्रं ) ] (भा. इ. १८३४)

डाव १ [ दात्रं = डाव. दौ to cut. दातृ असा शब्द, त्याचें डाउ = डाव ] डाव ] डाव म्ह० हत्यार.

-२ [दाय, share = डाव ] मिळकतींत माझा चौथा डाव म्हणजे हिस्सा.

-३ [ दाव: (दुनोतीति दावः ) = डाव ] डाव धरणें म्हणजे दुःख देण्याची इच्छा धरणें.

-४ [ द्रम्म = दाम = डावँ = डाव ] पैसे लाऊन खेलणें = डाव खेलणें.
पैसें टाकून खेलणें = डाव टाकणें. (भा. इ. १८३२)

-५ [ दात्रम्, दात्रः, दात्री = डाव a weapen to cut डावली nails to cut, as of a cat ] मांजर डावली मारतें.

डावखोरा हात [ खोर् to be lame. खोर a lame man, hand etc. डावखोरा one lame in the left
hand असा मुळ अर्थ. नंतर one using the left hand as a fault.

 काणे - १ कानीनाः (स) ( कों ) 

-२ कर्णायनाः (कों)
-३ कर्णायनः (स)
-४ काण्वाः ( कों )

काण्हेरे - काणिकेरः (स) 

कातरणे - कातरायणाः (कों) 

कातरे - कातरायणाः (स) 

कात्रे - कर्तृणः ( क ) ( स ) 

काथवटे - काक्षीवताः (स) 

काथे - कथकाः (स) 

कानडे - १ कार्णाटाः (कों) ( क ) (स ) 
-२ [ कर्णाढकाः (the decendants of कर्णाटक proper name of a man) = कानाडे = कानडे ] 
हें महाराष्ट्रांत कोंकणस्थ ब्राह्मणांत आडनांव आहे. 

कानिट ( करः ) - कनिष्ठयः ( स ) 

कानिटकर ( केर प्रत्यय ) - कनिष्टिः (कों)

कानेटकर (केरः ) - कनिष्ठयः ( क ) 

कान्हेरे - काणिकेराः (कों) 

कापडी - कापटुः (क) 

कापरे - कार्पूराः ( कों ) ( स )

कापरेकर - कापरेकेर - ग्रामनामावरून ( कों )

कापशे - कापिश्यायनाः ( कों ) ( स ) 

कापसे - काप्याः = कापसे ( प्य = पिय = पिज = पिस ) (स) 

कांबळे - काबल्याः (स)

कामळे - कंबलायनः (स) 

कार्लेकर - कार्लेकेर - ग्रामनामावरून. (कों)

कालरस - कालशीर्षि: (स)

कावळे - १ कावल्या: (क) (स) 
-२ कामलायन from कमल or कामल. कामल=कावळा-ळे. महाराष्ट्र ब्राह्मणांत आडनांव आहे. 
-३ कामलाः (स) 
काळीयै [ सं. कालीय - महा. कालीअ - मरा. काळीयै, काळ्ये, काळे ] (म) (इतिहाससंग्रह ) 

काळे - १ कालेया: ( स) (क) ( कों ) 
-२ काल्यायना: (स) 
-३ कालीच (म) (काळीयें पहा) 

काळ्ये - कालीय. (म) ( काळीथै पहा)

डंका  [ दंडढक्का = डंका ] वाद्यविशेष.

डगलें १ [ दुकूलं = डुगूलँ = डगलें ] (भा. इ. १८३३)

-२ [ दुकूल = दुगुल्ल = डुगुल्ल = डगलं= डगलें-ला-ली ] वस्त्रविशेष. (ग्रंथमाला)

डग्गा [(स्त्री) ढक्का = डग्गा (पुल्लिंग ) ] वाद्यविशेष. (भा. इ. १८३४)

डचणें १ [दश् = डस् = डच् (डचणें ) ] (भा. इ. १८३२)

-२ [ दय्यते = डचतें ]

डबा १ [ दृब्धः = डबा, डबी ] डबी म्हणजे लांकडाची, धातूची किंवा दगडाची पेटी सारखी वस्तू, इमारत, हौद वगैरे. दृब्धं गुंफितं.

-२ [ द्रव्यकं = डब्बअ = डब्बा = डबा, डबोले ] बापानें डबा पुरून ठेवला आहे, येथें डबा म्हणजे द्रव्य. ( भा. इ. १८३४)

डबी [ दृब्धः ] ( डबा १ पहा )

डबू [(वैदिक) दभ्र (अल्प) = डब (अल्पदर्शक) डबू] (भा. इ. १८३४)

डबोले [ द्रव्यकं] ( डबा २ पहा )

डबोलें १ [ द्रव्यमूलं = डबोलें ]

-२ [ द्रव्यबलं = डब्बबलं = डबोलें ]

डब्ब १ [ स्तब्ध ] ( दब्ब पहा )

-२ [ दृब्धं = डब्ब] पोट डब्ब झालें आहे म्हणजे डब्यासारखें फुगीर झालें आहे.

डर [ दर (भय) = डर] (भा. इ. १८३६, १८३७)

डरणें १ [दु-द्रव = डरणें ] पळणें. (भा. इ. १८३४)

-२ [ दर = डरणें ] भिणें. (भा. इ. १८३४)

डवली [दर्वी ] (डावली पहा)

डाक [ दग्ध ] ( डाग पहा)

ठी १ [ स्थिति = ठ्ठिइ = ठी ] (भा. इ. १८३२)

-२ [ स्थितिः = ठिइ = ठी ]

ठीक [ स्थाने (युक्ते) = ठीक ] (भा. इ. १८३४)

ठुलमांडी [ स्थूलमंडिका = ठुलमांडी]
ठुलमांडी म्हणजे पायाची जुडी करून चौक्या वर स्थिर बसणें.

ठेच [हेठ् प्रतिघाते. जेहेठ्य = ठेच ] (धा. सा. श.)

ठेण्या [ स्तेनकः = ठेण्या thief ]
ठेण्या पळाला thief has run away applied to a bug runing away.

ठेप [ टिप् पाठवणें धाडणें. टेप =ठेप ]
जन्मठेप = जन्मभर पाठवणें. (भा. इ. १८३४)

ठेला [ अति + स्था ] (धातुकोश-ठे १ पहा)

ठेली [ स्था १ गतिनिवृत्तौ ] (धातुकोश-ठे २ पहा)

ठेव १ [ स्थेमन् = ठेवं = ठेंव ] कायम ठेवलेला पदार्थ. ( भा. इ. १८३३)

-२ [ स्थेय = ठेव ] (ज्ञा. अ. ९ पृ. १७९)

ठेवणाईत [ स्थापनायत्त =ठवणायत =ठेवणाईत ]

ठेवणें [ स्तेपनं = ठेवणें. स्तेप = फेंकणें ] त्यानें एक ऐसा चेंडू ठेऊन दिलान् म्हणजे फेकलान्. (भा. इ. १८३५)

ठेवाठेवी [ स्थेयास्थेयता. स्थेयः म्हणजे दोन पक्षकारांत निवाडा करणारा न्यायाधीश. कायद्यांतील पारिभाषिक शब्द अह. स्थेय + अस्थेय; तस्य भावः स्थेयास्थेयता ] (ज्ञा. अ. ९ पृ २६ )

ठोकणें (धूम) [ त्वंगति (उड्या मारीत पळणें) = ठोकतो ] धूम ठोकतो म्हणजे धूम पळतो. (भा. इ. १८३६) ठोकणें (लांकूड) [ त्वक्षति (कापणें) = ठोखणें = ठोकणें ] सुतार लांकूड ठोकीत बसला आहे = सूत्रधार: लकुटं त्वक्षति. (भा. इ. १८३६)

ठोठाव [ स्ट्याय स्त्याय = ठोठाव ] (ठाव पहा)

ठो [ तु हिंसायां = ठो देणें. तुः = ठो ] to strike the head against a stone.

ठोठो [ ष्ट्यायः स्यायः = ठावा = ठो. ष्ट्यौ स्यै शब्दे ] ठोठो करणें म्हणजे शब्द करणें.

ठोणा [ स्थूणः = ठोणा (खांब ) ]

ठोंब १ [ स्तुंभ = ठुंब = ठोंब, ठोंब्या ] (भा. इ. १८३३)

-२ [ स्तंवः (मूर्ख) = ठोंब, ठोंब्या ]

ठोंब्या [ स्तुंभ = ठुंब = ठोंब, ठोंब्या ] ठोंब म्हणजे बुद्धीनें थांबलेला, स्तब्ध, मूर्ख. ( भा. इ. १८३५)

ठेला [ स्थूल ] (ठोल्या पहा)

ठोल्या [ स्थूल = ठ्ठोल = ठोल (ला-ली-लें ) स्थुलिक = ठ्ठोल्लिअ = ठोल्य (ल्या, ल्यी, ल्यें ) ] (भा. इ. १८३३)

औटे - अवट्या (स)

कंक - कंक ( क्षत्रिय ) = कंक. एसाजी कंक हें नांव प्रसिद्ध आहे. हें घराणें भोराजवळ आहे. (भा. इ. १८३३)

 कटके - काठकाः (कों) (स)

कट्टी - कृष्टि: = कट्टि, कट्टी. हें कानडा देशांत आडनांव आहे. कृष्टि म्हणजे विद्वान् माणूस. (भा. इ. १८३५)

कणव - कण्वाः ( स )

कपटे - कापटुः (स)

करकरे - कर्तृकरः ( agent ) करकरे (ब्राह्मण आडनांव कर्‍हाडे). (पाणिनि ३-२-२१)

करंजे - कौरंजिः (स)

करमरकर - कर्मारकेराः (स ) (कों)

करवीर - प्रांतावरून (कों)

करवे [ सं. करवीरकर- महाराष्ट्री - करवीअअ - मराठी - करवे ] (म) (इतिहाससंग्रह )

कर्वे - कौरव्याः (स) 

कर्वे (कोर्वे ) - १ कौरव्या: (कों ) ( क ) 
-२ [ कौरव्या: = कोरवे = करवे = कर्वे] कौरव्याः
ब्राह्मणाः ( कौमुदी ) 

कलवडे - कलवाट = कलवाड = कलवडे. कलवड गांवचा राहणारा तो कलवडे. (ग्रंथमाला) 

कवंडळे - कामंडलेयाः (स) 

कवडे - कौहड: = कोवडे = कवडे. 

कवी - काव्याः (स) 

कळके - कालकिः (स.) (क) 
 कळशे [ सं. कलश - महा. कलस - मरा. कळशे ]
 (म) ( इतिहाससंग्रह ) 

काखवटे - काक्षीवताः (स) 

काजळे - कासलय: (क) (स) 

काटे - कताः (स) 

काठे - क्राथकाः (क) (स) 

कांठे - क्राथकाः (क) 

कांडदरे - कांडोदरिः (क) 

काणव - कण्वाः ( स )

ठाणें [ स्थानीयं = ठाणें ] स्थानीय म्हणजे नगर, शहर.

ठाम १ [ स्तामं = ठाम. स्तम् अवैक्लव्ये ]
ठाम सांगतों म्हणजे अवैक्लव्यानें सांगतों.

-२ [ स्थाम्ना = ठाम ]

ए १ ठाय [ स्था १ स्थायति, स्थाति (ठाए) । ]
स्था हा धातू पूर्ववैदिककालीं स्थाति, स्थायति असा साधा चाले. ती चाल मराठींत राहिली आहे ।
पाय (ए) हृदय गवसूनि ठाय ( ए )
या चा उच्चार ए ।
श्रीगुरूचे पाए । हृदय गवसूनि ठाए ।
तैं एवडें भाग्य होए । उन्मेषासि ॥ ५ ॥ ज्ञा. १३-५

ठार १ [ स्तृह् = ठरह् = ठार. स्तृह् इजा करणें ] (भा. इ. १८३४)

-२ [ स्तृह् ६ हिंसायाम् ] ( धातुकोश ठार पहा )

ठाव १ [स्त्यै १ शब्दे. स्ट्याय स्त्याय = ठाव, ठोठाव. ष्ट्यायः स्त्यायः = ठावा, ठो ] ठोठो करणें = शब्द करणें. (धा. सा. श.)

-२ [ स्थामन् = ठाव ] मला ठाव द्यावा पायीं ।

ठावा [ ष्ट्यायः स्त्यायः = ठावा ] ( ठाव पहा)

ठावें [ स्ताव्यं = ठावें ] known. मला ठावें नाहीं.

ठासून [ स्थास्नु - ठासून ] त्यानें ठासून भापण केलें. तेन स्थास्नु भाषणं कृतम्. येथें ठासून हें विशेषण आहे. (भा. इ. १८३३)

ठाळ [ स्थाल = ठाळ ] जेवायचें पात्र. ( भा. इ. १८३४)

ठिकडें [ स्त्री = ठी ] प्रेमदर्शक कडें प्रत्यय लागून ठिकडें. स्त्रीला प्रेमानें ठिकडें म्हणतात. माझी टिकुडी, माझें ठिकड़ें, असा प्रयोग स्वस्त्री संबंधानें नवरा करतो.

ठिकाण १ [ त्रिकस्थान = ठिकाण, ठिकाणा ]

-२ स्थितिकर्णः = टिकाण, टिकाणा ] 

ठिक्कर [ तिग्मतर = ठिक्कर ] काळा ठिक्कर.

ठिपका [ स्तिप् गळणें ] (थिबकणें पहा )

ठग [ स्थग ( लुच्चा, भामट्या ) = ठग ] (भा. इ. १८३३ ).

ठणठण, ठणाठणा [ स्त्यानं स्त्यानं = ठाणँ ठाणँ - ठाणठाण = ठणठण = ठणाठणा ] स्त्यानं नाम शब्दायमानं. (भा. इ. १८३४)

ठण् ठण् ठण् [ स्तनस्तनस्तन् = ठणठणठण् ]

ठंठणाट [ तंस्तनायते] (धातुकोश-ठंठण १ पहा)

ठणाणा [ स्तननं = ठणण ( णा-णी-णें ) ] (भा. इ. १८३३)

ठसा [ स्थासक: = ठासा = ठसा ] स्थासक: देहविलेपनं

ठळठळित १ [ स्थल् १ स्थाने ] ( धातुकोश-ठळ पहा)

-२ [ तलतलित = ठळठळित ]

ठळठळीत [ स्थल् १ स्थाने ] (धातुकोश-ठळ पहा)

ठाउक [ स्तावुक = ठाउक ] known.

ठाओ [ स्थामन् = ठाव = ठाओ ] स्थामन् म्हणजे शक्ति, प्राबल्य, अहंकार.
उ०-जेणें निवातकवचाचा ठाओ फेडिला (ज्ञानेश्वरी )

ठाणदिवी [स्थानदपिका = ठाणदिवी = ठाणवी = ठाणवई ]

ठाणबंद [ स्थाणुबद्ध: = ठाणबंद ] fixed to a permanent post.

ठाणावी [ स्थाणुबद्ध ] (ठाण्यादिवी पहा)

ठाणसुध [ स्थानशुद्ध = ठाणसुध. शालाशुद्ध = साळसुध]

ठाणाईत [ स्थानायत, स्थानायत्त = ठाणाईत, ठाणाइत ]

ठाणांतरी ( स्थानान्तरिक one who changes place
everyday, a traveller (नित्य प्रवाशी) ] ना. को. ११

नित्य प्रवाशाला दिवसा लंगडत चालावें लागतें व रात्रीं बोचकें संभाळीत जागावें लागतें तसें -
उ०- दिहा खोलणें रात्रीं जागोवा ।
ठाणांतरिया जैसा पांडवा ॥
अहोरात्रिं विसांवां । भेटे चि ना । ज्ञाने. १६-३३८
पाहारेकरी इ. अर्थ बाष्कळ.

टेवण [टेवण (अपभ्रष्ट ठेवण) = टेव (रूप, नखरा) ] ( सा. मं )

टोक, टोंक [ तोक्म = टोक्क = टोक टोँक, ]
मनुष्यान् रसान् रागान् गैधान् अन्नं चर्म गवां
वशां श्लेष्मोोदके तोक्मकिण्वे पिप्पलीमरीचे धान्यं
मांसं आयुधं सुकृताशां च ॥ १२ ॥

आपस्तंबीयधर्मसूत्र १-७-१०-१२
हरदत्तः उज्ज्वलायां :-

तोक्मानि ईषदंकुरितानि व्रीह्यादीनि.
तोक्मन् = मोड, त्यावरून टोंक
तोक्म = टोक्क = टोक, टोँक (भा. इ. १८३२)

टोकडा [ तोक (पोर) = टोक, टोकडा (लघुत्वदर्शक) टोकडा म्ह० पोरगा. (भा. इ. १८३५)

टोकडें [ स्तोक + ट ] ( तोकडें पहा)

टोंग १ [ तौंग्यं ( तुंगिमा ) = टोंग ] एक बाजूचा फुगारा.

-२ [ तौग्यं ( तुंगत्व) टोंग ] उंचवटा. पागोट्याचें टोंग म्हणजे अस्थानीं उंचवटा.

-३ [ तुंग: = टोंग ] उंचवटा.

-४ [ तौंग्र्यं = टोंग ] उंचटपणा.

-५ [ तौंग्यम् = टोंग ) Prohiberance

टोंच [ त्रोटि = टोंटि = टोंच ] पक्ष्याचें तोंड. (भा. इ. १८३७)

टोचणें [ तोदन = टोचणें. द = च ] ( भा. इ. १८३४)

टोणगा [ १ तर्णकः = टोणगा. अ = ओ ] तर्णक = टणक.

-२ [ स्तुनकः (बोकड ) = टोणगा ]

-३ [ तर्णक (young one) = टोणगा. अ = ओ ] a young of buffalo.

टेणिपा [ स्थूलात्मा = टोलप्पा = टोणपा ] स्थूल मनाचा, मूढ.

टोणा [स्थूणा = ठोणा = टोणा ]

टोप [ स्तुप उछ्राये । स्तुप म्हणजे उंच बांधलेली इमारत. स्तुप एव स्तोपः । स्तोप = टोप ]
टोप म्हणजे बौद्धांचें उंच देऊळ. स्तुपः उछ्रितं शिखाभूतं अंगं (माध्यंदिनीय वाजसनेयसंहिता, महीधरकृत वेददीप २५-२) मस्तकावर ठेवण्याचें वस्त्रविशेष. टोप शब्दाचें स्त्रीलिंग टोपी. (भा. इ. १८३३)

टोपरा [ तूपरः = टोपरा ] बिनशिंग्या बैल.

टोपी [ टोप पहा ]

टोलवणें [ तर्जनं = टलअणं = टोलवणं ] (भा. इ. १८३४)

टोलवाटोलव १ [ तुल् १ संभ्रमे ] ( धातुकोश-टोलव १ पहा)

-२ [ तूलिमन् = टोलव. द्विरुक्तीनें टीलवाटोलव ]
टोलवाटोलव म्हणजे आंगाबाहेर टाकणें.

टोला [ तूल: = टोला ] टोला काठीनें लांब फेंकणें.