Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
निजामअल्लीखानास व खंडोजी भों। यांसी शुकें स्वामीचे आज्ञेप्रमाणे लिहिविली आहेत, ती तयार करून सेवेसी मागाहून पाठवितों. नजबखानानीं करार केला आहे की, पातशहास अंतर्वेदीतील डेरेदाखल करतों व इंग्रजाचे कलकत्याकडे भोंसले यांणी तान सरदारांनी त्यांचा पिच्छा न सोडावा. कर्णे स्वामीचे स्वाधीन आहे. एविषयी हुजूर विनंति लिहावयासी सेवकास सांगतात कीं, सलूख कदाचित् केला तरी पुढे जड जाईल. इंग्रजीच जाली तर हिंदुस्थानात गेलें, कोणाचे बरें नाही ह्मणतात. ते सेवेसी लि।।. असे. आपण समयोचित उत्तर असेल ते करावें. स्वामीप्रतापें र्इश्वर फत्ते करील तो सुदिन. पूर्वी ही एक दोनदा सेवेसी विनंति लि।। की, नजबखानांनी श्रीमंतांचे पत्रांत अलकाब केवल हलका स्थितीप्रो. मुनसी लिहितात. त्यासी करून राप्रमाणें पत्रांत श्रीमंत स्वामीकडोन आणावयास आज्ञा केली पाहिजे. वाढऊन लिहिणियानें मनास उछाह होऊन कामास तत्पर विशेष होतील ते करावें. हलके फारसे लिहावें, यास्तव विषम मानतील. आहश्रुत केलें की, आमची पत्रें श्रीमंतांस पावली. याजवर वजिराप्रोंच लिहितील याप्रमाणें सांगोन समाधान केले. श्रुत होय. कृपा केली पाहिजे. येथील बाह्य अंतर सविस्तर ध्यानारुढ असावें, याजकरिता लि।।. अधिक विस्तारें करितां रागास यावें. श्रीमंत स्वामीस पातशाई इनात टिक्का वगैरे घेऊन यावें यास्तव उत्कंठा. कर्जदारीमुळें एकादसी, सिवरात्र मोडावयास्तव बाळाजी व गंगाधर गोविंदास सरकारची सनदापत्रें पाठविली, त्यांचे उत्तरही न देत. मग नेमणुकेप्रों. बाकीचें पाठवणे व वसुलीजमेचे गांव लाऊन देणें कळतच आहे. तुह्मांस हुजूर लिहावें त्यांचे उत्तर याजवरच ताकिदीनें आज्ञापत्रें येतात. ते उत्तरही न देत. पांच-साला-एक-साला-कमाल जनेचे गाव लाऊन दिल्हे आहेत, त्याच गावांवर दुसाला कर्ज दहा हजार कालपी प्रांतीचे साहुकारांकडून आणविले. एकही कर्ज मागील देणें गावांवरील आले आहे याजमुळे न मिळे. दुसरे कारण खंडेराऊ, हरि पवार वगैरे फौज ग्वालेर प्रांत सोडून झांसी प्रांत व काचेकालपी फटमार करावयासी पोट भरावयासी गेले आहेत. कछ व घरांत गोहदकराचा अंमल जाला. इंग्रजसहित गोदकराने रात्रौ छापा घातला. पांच सहासें घोडें, माणूस जमविलें. आतां सुरक्षित भोडरीस आहेत. हेंही कारण जालें. या दिवसांत सेवकाचे हुजूर येणे व येथे ठरवणे दुस्तर जालें जाणून मान्य करून, बाळाजी गोविंदाचे कारभार सत्वरच जाऊन एकसाला रुपये येथें उपवास पा। कीं येथील देणें वारून सेवेसी येऊन बुंधीलकंडाचे व झांसीचे रु।। कुल-ब-साल कांही स्वामीस पावत तो व च्यार श्रुत करूं. बाळाजीपंत कायम राहून सरकारकाम होई तें करावेंसी मर्जी जाल्यास विनंति करू. सेवकाची नेमणूक दिली यास्तव लिहीत नाही. त्याचे अस्तायस्तपणे सरकार काम होत नाही, ह्मणोन तात्पर्य लि।। असे. तरी हरएक साहुकारापासून कर्ज घेऊन सेवकास दहा हजार रु।। जरूर पाठविणार स्वामी समर्थ आहेत. व या रुपयांची तनखा साहुकारांची बाळाजी गोविंदाचे कारकुनावर करी की त्यास तिडीक लावून रु।। हुजूर आणोन देईल तें केले पाहिजे. निराश्रित सेवकास दर्शनलाभ देऊन सनाथ करावायासी आपण समर्थ आहां. स्वस्थ चित्ते बुध्धी य: संभवती कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होई तो सुदिन. श्रीचे कृपेकरून स्वामीचा प्रताप अधिकोत्तर होय ते सुघडी. बहुत काय लिहूं ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
येणेंप्रमाणें ज्ञानेश्वरांच्या वेळेस लिहिण्याच्या कामीं कागद प्रचारांत येऊ लागले होते, हें स्पष्ट आहे. ही गोष्ट केवळ अनुमानानेंच सिद्ध आहे असें नाहीं ज्ञानेश्वरांचा समकालीन किंवा किंचित् प्राचीन जो मुकु्दराज त्याच्या विवेकसिंधूची मूळ अस्सल प्रत जोगाईच्या आंब्यास मुकुंदराजाच्या शिष्यशाखेकडे आहे व ती कागदावर लिहिलेली आहे. ह्या मूळ प्रतीवरील अक्षरें तेराव्या शतकांतील जाधवांच्या शिलालेखांतील अक्षरांप्रमाणें असून तीं मुकुंदराजाच्या सध्यांच्या शिष्यांना, बाळबोध लिहिलीं असूनहि, वाचतां येत नाहींत, असें सांगतात. ह्यावरून
इतके सिद्ध होतें, कीं मुकुंदराज व ज्ञानेश्वर ह्यांच्या वेळीं लिहिण्याच्या कामीं कागदाचा अंशतः उपयोग लोक करू लागले होते. ताडपत्रें, भूर्जपत्रें व वस्त्रपट ह्यांचाहि उपयोग होत होताच. परंतु ह्या नवीन जिन्नसाकडे लोकांची प्रवृत्ति बरीच पडत चालली होती. ही प्रवृत्ति मुकुंदराज व ज्ञानेश्वर ह्यांच्या पूर्वी, इतकेंच नव्हे तर, हेमाडपंताच्याहि पूर्वी पांचपंचवीस वर्षे, होत होती. अशावेळी दफ्तरावरील मुख्याधिकारी जो हेमाडपंत त्यानें मोडी लिपी महाराष्ट्रांत नव्यानें सुरू केली. ह्या मोडी लिपीचाहि उल्लेख ज्ञानेश्वरानें वरील उता-यांतील पहिल्या ओवींत केला आहे असें दिसतें. पंतोजी अक्षर वेगानें लिहितो, ह्मा वाक्यांतील वेगानें हें पद विचारणीय आहे. बाळबोध अक्षर वेगानें लिहितां येत नाहीं. तेव्हां त्यासंबंधानें वेगवंत हा शब्द योजण्यांत काहीं विशेष अर्थ नव्हता. तो मोडी अक्षराच्यासंबंधानें मात्र सार्थ आहे. ह्यावरून असें दिसतें कीं ज्ञानेश्वरीच्या पूर्वी मोडी अक्षर प्रचारांत आलें होतें. ज्ञानेश्वरी इ. स. १२९० म्हणजे शके १२१२ त लिहिली गेली. त्यापूर्वी तीस चाळीस वर्षे म्हणजे इ. स. १२६० पासून पुंढे हेमाद्रि जाधवांचा दफ्तरदार होता. हेमाद्रि दफ्तरदार होण्याच्या वेळीं उत्तर हिंदुस्थानांत मुसुलमानांचे राज्य होऊन ऐंशी नव्वद वर्षे झाली होतीं. सिंघण राजानें माळवा वगैरे विंध्याद्रीच्या पलीकडील प्रांत जिंकले होते. तेव्हां मुसलमानांची उर्फ म्लेंछांची ओळख मराठ्यांना झाली होती. ही ओळख होत असतांना, मुसुलमानांची कागद करण्याची कला महाराष्ट्रांत सुरू झाली व ही सुरू झाल्यावर मोडी लिहिण्याची पद्धत हेमाद्रीला सुचली. ही मोडी लिहिण्याची पद्धत हेमाद्रीनें मुसुलमानांच्या शिकस्ता नामक लेखनपद्धतीवरून घेतली. फारशींत लिहिण्याच्या पद्धती अनेक आहेत. त्यांत नस्ख व शिकस्ता ह्या आपल्या इकडील बाळबोध व मोडी ह्यांच्याशीं जुळतात. नस्ख अक्षर बाळबोधाप्रमाणें स्पष्ट व सुव्यक्त असें लिहितात व शिकस्ता अक्षर मोडून लिहिलेलें असतें. फारशींत शिकस्तन् ह्या क्रियापदाचा अर्थ मोडणें असा होतो. जलदीनें लिहिण्यातं खडें अक्षर मोडून लिहिण्याचें जें वळण त्याला फारशींत शिकस्ता म्हणतात. मोडी हा शब्द फारशी शिकस्ता ह्या शब्दाचें हुबेहूब मराठी भाषांतर आहे. मोडी ह्या अर्थाचा वाचक शब्द संस्कृतांत किंवा महाराष्ट्रींत नाहीं. हा शब्द हेमाडपंतानें फारशी शिकस्ता ह्या शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देऊन मराठींत अक्षर लिहिण्याच्या एका पद्धतीला नव्यानें लागू केला. हेमाडपंतानें अक्षर लिहिण्यांत ही नवी सुधारणा केली. तोपर्यंत महाराष्ट्रांत सर्व लेखी व्यवहार बालबोध अक्षरांत होत असे. ह्या नवीन सुधारणेवरून ही एक गोष्ट ध्यानांत धरण्यासारखी आहे कीं, महाराष्ट्रांतील विचारी पुढारी लोक परदेशस्थांची एखादी चांगली रीती उपयोगी असल्यास ती स्वीकारण्यास फार पुरातन कालापासून तयार असतात. इ स १२५० च्या अगोदर म्हणजे हेमाद्रीच्या पूर्वी शंभर दीडशे वर्षे महाराष्ट्राच्या उत्तरेस हिंदुस्थानांत मुसुलमान आले असतां त्यांच्या शिकस्ता लिहिण्याच्या त-हेवरून ब्रज भाषा मोडीनें लिहिण्याचा प्रचार तिकडील विचारी पुरुषांनीं पाडलेला दिसत नाहीं. व महाराष्ट्रांत मोडी लिहिण्याचा प्रघात आज साडेसहाशें वर्षे चालू असतां भरतखंडांतींल इतर कोणत्याहि भाषेला हा प्रघात उचलण्याची आवश्यकता दिसली नाहीं. गुजराथी वगैरे इतर भाषांत पत्रें वगैरे रोजच्या व्यवहारांतील लिखाण किसबीड अशा मूळ बिनओळीच्या बाळबोध अक्षरांनीच करतात. मोडी हा शब्द फारशी शिकस्ता ह्या शब्दांचे भाषांतर आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक ५.
१७०२ ज्येष्ठ वद्य ३.
पो। छ २५ रमजान
विनंति कीं :- स्वामीचे आज्ञापत्राप्रमाणें नजबखानासहित पातशहा यासी इंग्रजांचे पारपत्याची तहबीर करावयाची शफत घेतली. व श्रीमंत स्वामीनीं सामील व्हावयासी निजाम अल्लीखानास त्यांचे वकिलाकडोन नजबखानानीं लिहिले. त्याची पत्रें स्वामीस व श्रीमंतांस घेऊन पाठविलीं आहेत. त्याजवरून पातशहाचा शुका पाऊन वृत्तांत श्रुत होईल. तात्पर्य, अंत:कर्णातून इंग्रजाची नड पातशाहींतून काढावी व सरकारचे फौजेस सामील व्हावें. परंतु कदाचित आपण तिकडे सलूख केला तर इकडे इंग्रज यांसी समीप आहेत हे त्यांचे पारपत्य करितीलसें दिसत नाहीं, पेचांत येऊं, यांत शंकित. तेच सेवकांनी खातरजमा केली. फिरोन सेवेसी विनंति लिहावयासी बहुत ममतेनें नजबखानास सांगितले. ते श्रीमंत स्वामीचे सेवेसी विनंति लिहिली आहे. त्याजवरून श्रुत होईल. मुख्याचे मनांतील भाव, इंग्रजांसी आपण सलूख न करावा, ते जेर जालियावर यांनी त्यांचे प्रांतासी खलष करावयाचे समई सरकारचा एक सरदार मातबर फौजेचा, नि:कपट, पातशहापासीं असल्यास नजबखान चाकरी करील, यांत संदेह नाहीं. इंग्रजांची ताबेदारी न करावी, स्वामीचे फत्ते व्हासवी, हें अंत:करणापासून शफत वाहून वारंवार बोलतात. इंग्रजासीं स्वामींनीं एकोपा केलियास सरदार फौजेसहित येऊन जाटाचा प्रांत व जयपूर प्रांत नजबखानापासून सोडवितील व धाकांत शंकितही आहेत. यास्तव स्वामीशीं नि:कपटता करून सरकारची फौज सामील करून घेऊन, इंग्रजासी बिघाड करून, आपले प्रांतास उपद्रव न लागावा या मनोदयास्तव सरकारच्या फौजेची इच्छा करितात उभयतां सरदार एकचित्त होऊन, हिंदुस्थानांत येऊन, यांचे संरक्षण करून, पुढे यांजला दाढी देतील हा यांजला भरंवसा पुरता पुरत नाहीं. सेवकानें सरदारांकडोनही खतरजमा केली व पत्रोपत्रीं स्नेहवृध्दि सरदारांची यांची केली.परंतु मनांतून शंकित होऊनही म्हणतात कीं, इंग्रजासरें तुह्मी सलूख कराल तर इंग्रजही दिल्लीस येतील, तेव्हां आह्मांस कुमक कोणाची येणार ? यास्तव वारंवार सलूख न करावा एविषई नजबखानानीं सेवकास सांगितलें व सेवेसी पत्रांतही याच प्रकारे लि।। आहे, ते श्रुत होईल. पातशहाचे मनांत नजबखान नसावा व याचे कबजांत न रहावें, स्वामीचे काबूंत रहावें. दिल्ली-अगरियांत स्वामीचा बंदोबस्त असलियासी पातशहास सुख आहे. परंतु नजबखान नसावा हे अंत:कर्ण पातशहाचें आहे. यास्तव सेवेसी वि॥ रा। हरिपंत अथवा रा।। महादजी सिंदे एकाने दिल्लीस राहून दोन लक्ष रु।। दरमहा पातशहास खर्चास देऊन हे स्थलीं करोडोंची हस्तगत करावी व पातशाही हुकूम आपले ताबे ठेवणार स्वामी समर्थ आहेत. नजबखानानीं पत्रें बहुत स्नेहवृध्दीनें लिहिली आहेत. यांची उत्तरे पाठवावी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
ह्यावरून एवढें सिद्ध होतें की मंत्र व यंत्रे लिहिण्यास भूर्जपत्रें व वस्त्रपट ह्यांचा उपयोग इ. स. १३२६ च्या सुमारास व पूर्वी लोक करीत असत. ज्ञानेश्वरींत चामावर म्हणजे चर्मावर व कापडावर लिहिण्याचा उल्लेख आहे. कायमचीं दानपत्रें तांब्याच्या पत्र्यावर लिहिण्याचा प्रघात इ.स. १३२६ त होता, ह्याला अनेक ताम्रपत्रांचा पुरावा आहे; इतकेंच नव्हे तर १३२६ च्या पुढें तीन चारशें वर्षे ताम्रपत्रांवर लिहिण्याचा प्रघात चालू होता, असें व पेशव्यांच्या रियासतींतील ब-याच ताम्रपत्रांवरून उघड होतें. सारांश, भूर्जपत्रे, ताडपत्रें, वस्त्रपट, ताम्रपंत्रे व चर्मपत्रें, ह्यांवर १३२६ पर्यंत व कचित् प्रसंगीं पुढें बरींच वर्षे, लेख लिहिण्याचा महाराष्ट्रांत बराच प्रचार होता. परंतु ह्यासुमारास म्हणजे १३२६ च्या पन्नास साठ वर्षे अगोदर लिहिण्याकरितां दुसरा एक जिन्नस प्रचारांत येऊं लागला. तो जिन्नस कागद हा होय. ह्या कागदावर लिहिण्यासबंधांनें ज्ञानेश्वरींत काही दूरचे उल्लेख आहेत.
हें बहू असो पंडितू।
धरूनु बालकाचा हातू।
बोली लेहे वेगवंत्।
आपणचि. ॥अध्याय १३ ,ओवी ३०७॥
सुखाची लिपि पूसिली. ॥अध्याय ३, ओवी २४६॥
दोषांची लिहिलीं फाडीं ॥अध्याय ४, ओवी ५२॥
आखरें पूसिलेया न पुसे
अर्थ जैसा॥ अध्याय ८ ओवी १७४ ॥
*ह्या उता-यांत 'सुखाची लिपि पूसिली' हें वाक्य मोठं अर्थप्रचुर आहे भूर्जपत्रें, ताडपत्रें, ताम्रपत्रें व वस्त्रपट ह्यांवर काढलेलीं अक्षरें पुसून टाकता येत नाहींत; फार तर खोडून टाकितां येतात ताम्रपत्रांवर लोखंडी लेखणीनें काढिलेली अक्षरें आडव्या रेघा मारून खोडून टाकितात. भूर्जपत्रें व ताडपत्रें ह्यांवर लोखंडी लेखणीनेंच लिहावें लागतें व तें लिहिणें पुसतां येत नाहीं. ह्यांच्यावरील लिहिणें नाहीसें करावयाचें असल्यास हरताळ वगैरे जिनसांचा उपयोग करावा लागतो. वस्त्रपटावरील लेखांनाहि हरताळाचाच लेप द्यावा लागतो. एकट्या कागदावरील ओल्या अक्षरांना मात्र “पुसून” टाकतां येतें. “दोषांचीं लिहिलीं फाडलीं” हेंहि वाक्य असेंच अर्थप्रचुर आहे. ताम्रपट तर मुदलांतच फाडितां येत नाहींत. भूर्जपत्रें व ताडपत्रें उभीं फाडतां येत नसल्यामुळें त्यावरचीं लिखितें फाडून तुकडे करून टाकितां येत नाहींत. फार झालें तर त्यांच्या आडव्या चिरफळ्या करतां येतात. आतां रहातां राहिलें वस्त्रपट. वस्त्रपटांवरील लिखितें फाडतां येतील. परंतु ज्ञानेश्वरींत ग्रंथ, पुस्तक वगैरे शब्द आलेले आहेत; व वस्त्रपटांचे ग्रंथ, किंवा पुस्तकें होणें अशक्य आहे. तेव्हां ज्ञानेश्वरांनीं उल्लेखिलेलीं “लिहिलीं” म्हणजे कागदावरील लिखितें होत ह्यांत संशय नाहीं. शिवाय, वर दिलेल्या उता-यांतील पहिल्या ओवींत, पंतोजी जलदीनें वोळी लिहितो असें विधान केलें आहे. आतां, ताम्रपत्रें, भुर्जपत्रें, ताडपत्रे किंवा वस्त्रपट, ह्यांवर जलदीनें वोळी लिहितां येणार नाहींत हें उघड आहे. तेव्हां जलदीनें लिहितां येणयासारखा ज्ञानेश्वरीला माहीत असलेला जिन्नस म्हटला म्हणजे कागदच होय ह्यांत संशय नाहीं. आतां इतकें खरें आहे कीं ज्ञानेश्वरींत कागद हा शब्द कोठेंहि आलेला नाहीं व येणें शक्यहि नाहीं परंतु कागद ह्मा अर्थी ज्ञानेश्वरानें दुसरा एक शब्द योजिलेला आहे, तो शब्द पाट हा होय,
पाटेयावरिलें आखरें।
जैसीं पुसता येतीं करें।lअध्याय १८, ओवी १०९९.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक ४.
१७०२ ज्येष्ठ वद्य ३.
पो। छ २५ रमजान.
श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
पो पुरुषोत्तम महादेव कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता। छा।- १६ माहे जमलादिलावर मुक्काम दिल्ली जाऊन स्वकीय लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. छ २६ रबिलावरची पत्रें पाठविली छ २३ जमादिलावली पावलीं.
पत्रीं आज्ञा की :- अलीकडे तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. त्यास, सविस्तर वरचेवर लिहीत असावें. सरकारांतून पातशाहास अर्जी व नबाब नजबखानास पत्रें आह्मांकडून खानमजकुरास पत्रें पाठवली आहेत. ती त्यांस देऊन लिहिल्याप्रमाणे सर्व गोष्टी घडून येत तें करावें. फारसी सवाल मजकूर तुह्मांस कळावे याकरितां पत्रें पाठविली आहेत त्यावरून कळेल. कितेक मा। अलाहिदा पु।।-पत्रीं लि॥ त्याप्रों अमलांत आणणें, ह्मणोन लि॥. विनंतिपत्र सु।। पाठवितों, उत्तरेंही सेवकास येतात. व आज्ञेप्रो पत्रें आपली व सरकारची पातशहास नजबखानास देऊन त्यांस इंग्रजांचे शाक करावेसें वारंवार बोध करून ठेविला आहे. त्याचा ता। सरकारांत विनंतिपत्रें लि॥ आहेत. त्याजवरून ध्यानास येईल. यथाज्ञानेकरून जे चाकरी घडून येईल तीस अंतर करणार नाही. लोकांचे येथील देणें वारून स्वामींदर्शन घडे तें करणार आपण आहेत. खर्चाची आबाळ विशेष. यास्तव विनंति करणार स्वामी समर्थ आहेत. सविस्तर पुर्वणीपत्रावरून श्रुत होईल. नजबखानांनी स्वामीस पत्र बहुत स्नेहवृध्दीनें सरकार उपयोगी लि।। आहे. याचे उत्तरी विशेष लोभानें व पातशहास इंग्रजांचे मोहिमेस घेऊन निघता ह्मणोन सेवकाने तुचे जबानी लि।। त्यावरून बहुत संतोष जालियाचें ल्याहावयासी आज्ञा करावी. कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होय तो सुदिन. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक ३.
पौ छ २५ रमजान
१७०२ ज्येष्ठ वद्य ३.
पु।। श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामींचे सेवेसी :-
विज्ञप्ति ऐसीजे :- पत्री आज्ञा कीं : पातशहास अर्जी व नवाब नजबखान जुनफुकार द्दौलेबहादूर यांस सरकारांतून पत्रें इंग्रजांचे तेंबीविशई रवाना केलीं आहेत, व द्दौलेबहादूर यांस राजश्री बाळाजी जनार्दन यांनी विस्तारें लिहिलें आहे, हा मजकूर तुह्मांस समजावा सबब मसोदे पाठविले आहेत, त्याजवरून कळेल त्याप्रों बोलून इंग्रजांची मसलत लिहिल्याप्रों विष्कलित होऊन सरकाराकाम अमलांत येईल तें कर्णे. सविस्तर बाळाजी जनार्दन लिहितात त्याजवरून कळेल. म्हणून पत्रीं आज्ञा. त्यास, स्वामींचे आज्ञेप्रों पादशहास वरचेवर उत्तेजन देऊन इंग्रजांचा यांचा स्नेह संपन्न होता तो तोडिला. सेवकासी पातशहानीं व नबाव नजबखानानीं शफत वाहून सांगितलें कीं जें नानानीं लिहिलें आहे हेंच आमचे चित्तांत आहे. याप्रोंच करूं. ह्मणोन वचन दिधलें. वजीराकडील च्यार हजार फौजेनिसी पातशहाचे तैनातीस लताफत आहे, त्याचा आमचा जोड आहे, आपले सेवेसी फौज दोन हजार सेवकापासीं आसल्यास पातशहाचे मनास आल्हाद होईल, अत:पर श्रीमंतांस लेहून आपले सरकारची फौज हुकुमांत राहिसी जलदीनें हजुरांत ते करणें, ह्मणून सो लिहावयासी सांगितले तें लिहिलें असे. व आपला मातबर माणूस सेवकाचे समागमें देऊन सों रवाना करिन ह्मणतात. अमलांत येईल तें मागाहून विनंति लिहू. त्याची जागा या स्थलीं सरकारची फौज असिल्यास यांजवर दक्ष राहून शत्रूचे पारपत्याची तजवीज वरचेवर होईल ते सेवक करितील. प्रथम पातशहापासीं खर्चाची तंगी. त्याज एक उमराव त्याजला दुसरियाचें नाही. त्यांत मोगल लोक काबूची. सेवेसी विनंति लिहिली आहे. तर असलियासी एक दोन पथकें घोडो व पवार तऱ्ही सेवकाचे तेनातीस प।। कीं, सरकारचे फौजांची आमदनी कळून याजला नवा प्रांत घेऊन खर्चाची तंगी दूर करावयाची उमेद दाखऊन कंबर बांधऊन, डौल दाखल करऊन ते चाकरी करूं. इंग्रज तूर्त खर्चास रु॥ देऊ ह्मणतात. आह्मी फारसी गोष्ट फौजेस सांगून नफे भारी दाखऊन, स्वामी ज्ञेप्रों आजवर इंग्रजांचा रुपया हास घेऊं दिधला नाही व वचनीहि देत नाही. पातशाह स्वामीस रु।। मागत नाहींत, फौज आणा ह्मणतात. यास्तव वेसीं लिहिलें असे. गोदहप्रांतीं पथके आहेत त्यांपो। एखाद दोन पथके सेवकापासी राहिल्यास सरकार उपयोगी आहे. श्रुत उत्तम असेल तें करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक २.
१७०२ वैशाख शु॥ २.
सेवेसी विनंति. राजश्री बाळाजी गोविंद व गंगाधर गोविंद यासी लिहितां व कारकुनाचे मुशारे देतां थकलों. परंतु पत्रोत्तर सहा सहा महिने न पाठवीत. मग बाकीचे रु।। वसुलीजमेचे गांव लाऊन देणें कळतच आहे ! कदाचित् पत्रोत्तर आलें तर आपला वोढा लिहून उमेदवारी लिहितात. याचा विस्तार पूर्वी वरचेवर सा। विनंति लिहिली व उत्तरे त्यास ताकीदपत्रासहित आलीं ते त्यांजकडे पाठविली. उत्तरें येतील ते सा। पाठऊं. तूर्त सेवकास हुजूर पातशाहीची ठिमा घेऊन यावयाची त्वरा व वर्षाकाळ समीप आलियामुळें फैसाव होईल. बहुत दिवस दर्शनलाभ न जाला, या उत्कंठेत अत्यंत चिंताग्रस्तता, दुसरे, स्वामीस शत्रूचें पारपत्य करावयाचें अहिर्णिसी उदेगाकरितां चित्त उद्विग्न. यांत सेवकानें आपली अवस्था लिहिणें परमसंकट जाणून, विनंति लिहिली की, बुंदेल्याचे मातबर तेथे असतील त्याजपासून कर्ज रुपये दहा हजार स्वामींनीं घेऊन पाठवावे. तरच जीवनोपाय होऊन दर्शनलाभ घडेल व स्वामींचा शब्द लागणार नाही व उर्जित होईल तो सुदिन करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. हुजूर येणें व तेथे रहाणें खर्चाचे तंगीमुळें दुस्तर जालें.याकरितं दर पत्रीं विंनति लि।।. याचा अपराध क्षमा केला पाहिजे. केतकीचे फुलाचा अर्क एक सिसा सा। पावलें. प्रात:कालीं पूजनोत्तर अथवा जेव्हां सरबत घेणें मर्जीस येईल त्या समई एक तोळाभर पाणियांत घालून घेतल्यास सुगंध येईल. घरीं तयार ब्राह्मणाकडून करऊंन सेवेसीं रवाना केला असे. सुरक्षित पावल्याचें उत्तरी कृतार्थ केलें पा।. दर्शनलाभ घडेल ते सुघडी. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १.
१६९२ माघ शुद्ध १२.
चिरंजीव राजमान्य राजश्री नारायणराव बल्लाळ यांसी :-
माधवराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विशेष. बिचूमिया वगैरे कारवान हैदर नाईक याजकडे घोडी वगैरे बैल मिळोन अडतीस सुमारी घेऊन जात होते. त्यास ता। सावनूर येथे तुम्हास आढळले ते जप्त करून सरकारात हुजूर रवाना केलेत, त्यास ई॥ छ ६ रजब ता। छ २६ रमजान पावेतो गु।। नरसो बल्लाळ कारकून तालुके धारवाड चंदी वगैरेबरोबर खर्च जाला तो व ता। करावान मा। यांजकडे रुपये ४९५। चारशे सवा पंच्याण्णव रुपये खर्च लेहून देविले असत. तरी कारवान मजकूर याजपासून सदरहू ऐवज हुजूर घेतला जाईल. तुह्मी तालुके मा।पें।। कारवान याचे तसलमातीस खर्च लिहिणें. तुह्मांस मजुरा पडतील. जाणिजे. छ २९ रमजान, सु।। ईहिदे सबैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे ? हे आशीर्वाद.
पौ छ ११ सवाल,
मंगळवार,
सु॥ इहिदे सबैन,
माघ शु॥ १२,
दोन प्रहर दिवस.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
७. ह्या खंडांत शिवाजीची एकंदर ३६ पत्रें आहेत. त्यांच्यासंबंधानें पहिली विचार करण्यासारखी बाब म्हटली म्हणजे अक्षराची होय. मोडी अक्षर प्रथम इस १२६० पासून १३०९ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य करणा-या महादेव व रामदेव जाधव ह्यांच्या कारकीर्दीत दफ्तरदारीचें काम करणा-या हेमाडपंतानें सुरू केलें, अशी एक फारा दिवसांपासून चालत आलेली ऐतिहासिक कथा आहे; व ही कथा खरी आहे असें पुढील कारणावरून दिसतें. इ. स. १२६० सालापूर्वीचे एकोनएक लेख शिलांवर, ताम्रपटांवर किंवा ताडपत्रांवर लिहिलेले आढळतात. ह्या तिन्ही जिनसांवर प्रत्येक अक्षर हात थांबविल्यावांचून लिहितां येत नाहीं. अर्थात्, एका हातासरशीं दहापांच अक्षरें जलद लिहिण्याची सोय आपल्या ह्या देशांत बाराव्या शतकापर्यंत माहीत होती असें दिसत नाहीं. त्यावेळीं व्यवहारांतील सामान्य पत्रें ताडपत्रांवर, भूर्जपत्रांवर, कातड्यावर व ब-याच वेळां कापडावर लिहून पाठवीत असत असें विधान करण्यास हवा तितका आधार आहे. मजजवळ पर्शराम पंडितानें केलेला भूपालवल्लभनामक ग्रंथाचा सारभूत पर्शरामोपदेश नांवाचा एक यंत्रग्रंथ आहे. त्याच्या परिसमाप्तीचा श्लोक येणेंप्रमाणें:-
श्रीशालिवाहनशकेष्टमुनिद्विचंद्र १२७८।।
संख्ये गते सति च दुर्मुखनाम्नि वर्षे॥
आषाढमाससितयुग्मतिथौ सुरेज्य।
धिष्ठ्ये दिने व्यरचयदि्द्वजपर्शरामः ॥३४॥
ह्या श्लोकावरून पर्शरामोपदेश हा ग्रंथ शक १२७८ त म्हणजे इ. स. १३५६ त लिहिला गेला, असें होतें, ह्या ग्रंथांत प्रथम शक १२४८ पासून म्हणजे इ. स. १३२६ पासून प्रभवादि संवत्सरांची फलें दिली आहेत, व नंतर शेकडों यंत्रांच्या आकृति कशा व कशावर काढाव्या तें सांगितलें आहे.
हरिद्रा तालकशिलामेषमूत्रसमन्चिता।
कोकिकाख्यस्य लेखन्या नीलरक्तपटे लिखेत्॥९६॥
कालेयरोचनाचंद्रैर्लज्जलुगजवारिभिः ।
मदनद्रुलेखन्या यंत्रं भूर्जे लिखेदिदम् ॥१०५॥
रोचनाकुंकुमाभ्यां तु भूर्जपत्रे सुशोमने।
सुवर्णमयलेखन्या पद्मगष्टदलं लिखेत् ॥१३२॥
व्रणहीने भूर्जपत्रे खरवामाश्रवोसृजः ।
वीतांगारेण संयुक्तः कृष्णोन्मत्तरसेन च ॥ १४३॥
विलिखेत्।।१४४॥
आनयेन्निर्व्रणं भूर्ज ग्रंथिहीन सुशोभनं ॥१७०॥
पर्शरामोपदेशे भूपालवल्लभे मंत्रयंत्रप्रकरणम् ॥
हे श्लोक इ. स. १३२६ पासून १३५६ पर्यंतच्या तीस वर्षात केव्हां तरी लिहिले आहेत. इ. स. १३१८ त मुसुलमानांचें राज्य महाराष्ट्रांत सुरूं झालें. १३१८ च्या पूर्वी २५ वर्षे म्हणजे इ. स. १२९३ त अल्लाउद्दिन खिलजीनें यादवांच्या देवगिरीवर पहिली स्वारी केली. १२९३ सनापूर्वी बराबर शंभर वर्षे म्हणजे इ. स. ११९३ त शहाबुद्दिन घोरीनें दिल्लीच्या पृथ्वीराज चव्हाणाला जिंकिलें. इ. स. ११९३ त देवगिरीस म्हणजे महाराष्ट्रांत यादववंशी जैत्रपाळराजा राज्य करीत होता. इ. सन ११९३ पासून १२९३ पर्यंत जैत्रपाळ, सिंघण, कृष्ण, महादेव व रामचंद्र असे पांच राजे देवगिरीस झाले. रामदेव १३०७ व त्याचा मुलगा शंकरदेव १३१२ त वारला. १३१८ त रामचंद्राचा जावई हरपाळ याला सुलतान मुबारिकानें ठार मारिलें व देवगिरी कायमची घेतलीं. त्यानंतर आठ वर्षांनीं पर्शरामपंडितानें आपला पर्शरामोपदेश नांवाचा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथांत भूर्जपत्रें व कापडाचे तुकडे यांवर यंत्रे लिहावीं असें अनेक ठिकाणी म्हटलें आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
अनेक कलमांचा कित्ता या शब्दानें प्रारंभ झाला आहे. परंतु हा कित्ता कोणत्या मूळाचा त्याचा पत्ता नाहीं. सर्व कलमें मूळांतल्याप्रमाणें दिलेली आहेत किंवा नाहीं ह्याचा खुलासा नाहीं. मूळ रोजनिशी केवळ जावक पत्रांची आहे, हें छापील रोजनिशीचीं सर्व कलमें तपशिलीं असतां स्पष्ट होतें. मूळपत्रांचा जावकांत कारकुनांनी संक्षेप किती केला ह्याचा सापेक्ष तपशील संपादकांनी दिला नाहीं. तसेंच मूळरोजनिशींतून व इनाम कमिशनाच्या रोजनिशींतून कोणतीं कलमे गाळलीं व तीं कोणत्या धोरणावर गाळलीं ह्याचाहि खुलासा झाला नाहीं. अशा नाना प्रकारच्या शंका ह्या रोजनिशीसंबंधानें उद्भवतात. एकंदरींत ही रोजनिशी पाहून माझें असें मत झालें आहे कीं, शाहू छत्रपतीची मूळ रोजनिशी जशीची तशीच छापिली असती व त्यांत संक्षेप किंवा विस्तार यत्किंचितह केला नसता, तर फार उत्तम गोष्ट होती. जे जे कोणी ही छापील रोजनिशी साक्षेपानें वाचतील व इतरत्र उपलब्ध झालेल्या अस्सल माहितीशीं ती ताडून पाहतील त्यांना मूळ रोजनिशी जशीची तशी छापिली नाहीं, ह्याबद्दल फार खेद वाटेल. ह्या रोजनिशीला अर्थनिर्णायक म्हणून एक कोश! दिला आहे. त्यात ब-याच शब्दांचें अर्थ चुकले आहेत* व खरोखर कठीण व दुर्बोध अशा शब्दांचा मुळी उल्लेखच नाहीं. सारांश ऐतिहासिक लेख छापण्याचे बहुतेक सर्व जगन्मान्य नियम ह्या रोजनिशीने मोडले आहेत.
(* कोशातील कित्येक चुकलेले शब्दार्थ व त्याचा खरा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
४. ही रोजनिशी न्यायमूर्ती रानडे यांच्या अनुमतानें झाली असें ऐकिवांत आहे. न्यायमूर्तीनीं ह्या रोजनिशीवर एक निबंधहि एशिआटिक सोसायटीपुढें वाचलेला प्रसिद्ध आहे. परंतु एवढ्यावरून ऐतिहासिक साधनें कोणत्या पद्धतीने तयार करावीं व छापावीं ह्याचा तपशिलवार मसुदा त्यांनी रा. वाड यांस करून दिला होता असें म्हणणें मुष्किलीचें आहे. रा. वाड हे ब-याच वर्षांचे पदवीधर होते, तेव्हां हें काम ते चोख करतील, असा न्यायमूर्तीचा समज असावा. परंतु रा. वाड ह्यांचा हा व्यासंग नसल्यामुळें ऐतिहासिक साधनांच्या व्याप्तीचा अंदाज करण्याची ताकत त्यांना आली असण्याचा संभव फारच थोडा होता. खरें म्हटलें म्हणजे शाहूमहाराजांची जी मूळ अस्सल रोजनिशी आहे ती संक्षेप किंवा विस्तार न करतां जशीच्या तशीच छापिली पाहिजे होती. एखादें नांव चुकलें, एखादी तारीख वाकडीतिकडी पडली, तर केवढा घोटाळा होतो तो तज्ज्ञांना माहीत आहे. ह्या गोष्टीचा अंदाज डेक्कन ट्रान्सलेशन सोसायटीचे अध्यक्ष जे डॉ. भांडारकर त्यांना उत्तमोत्तम होणार आहे. बारकाईनें प्राचीन लेख तपासण्याच्या व अस्सल व नक्कल ह्यांच्यांत किती अंतर असतें हे पहाण्याच्या पद्धती त्यांना अवगत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालीं चालणा-या संस्थेच्या हातून असले गबाळ ग्रंथ बाहेर पडावे, ही मोठ्या खेदाची गोष्ट होय.
५. माझ्या मतें जुने ऐतिहासिक लेख येणेंप्रमाणें छापावे. (१) प्रथम, लेख जसेच्या तसे शुद्ध छापावे. (२) ते मिळाले कोठून, ते अस्सल आहेत किंवा नक्कल आहेत, ते आहेत कोणत्या स्थितींत, वगैरे माहिती पूर्ण द्यावी. (३) त्यांतील कठिण व दुर्बोध एकोनएक शब्द व वाक्यें छानून तपासावीं व त्यांचा अर्थ द्यावा. (४) त्यापासून अनुमानें काय निघतात तें मुद्देसूद लिहावें, (५) व शेवटीं त्यापासून संगतवार वृत्तांत काय निघतो ते दाखवावें.
६. प्रस्तुत खंडांत छापिलेलीं बहुतेक पत्रें अस्सल आहेंत. तीं मिळालीं कोठून हें उपोद्धातांत सांगितलेलें आहे. आतां ह्या उपप्रस्तावनेंत दुर्बोध स्थलें विशद करण्याचा व पत्रांतील मजकुरापासून अनुमानें काय निघतात तें दाखविण्याचा मनोदय आहे; व शेवटी त्यापासून संगतवार वृत्तान्त काय निघतो तें पहावयाचें आहे. पैकीं शिवाजी, संभाजी, राजाराम व धाकटा शिवाजी ह्यांच्यासंबंधीं संगतवार वृत्तांत देण्याचा समय अद्याप आला नाहीं. आणीक एक दोन खंडांत ह्या कारकीर्दीसंबंधानें लेख यावयाचे आहेत तें आल्यावर संगतवार वृत्तांत मुख्य प्रस्तावनेंत देतां येईल. बाकी राहिलेल्या कोल्हापूरच्या संभाजीसंबंधानें व बावडेकरांच्यासंबंधानें मात्र संगतवार वृत्तांत येथें देण्यास हरकत नाहीं.