श्री.
लेखांक १.
१६९२ माघ शुद्ध १२.
चिरंजीव राजमान्य राजश्री नारायणराव बल्लाळ यांसी :-
माधवराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विशेष. बिचूमिया वगैरे कारवान हैदर नाईक याजकडे घोडी वगैरे बैल मिळोन अडतीस सुमारी घेऊन जात होते. त्यास ता। सावनूर येथे तुम्हास आढळले ते जप्त करून सरकारात हुजूर रवाना केलेत, त्यास ई॥ छ ६ रजब ता। छ २६ रमजान पावेतो गु।। नरसो बल्लाळ कारकून तालुके धारवाड चंदी वगैरेबरोबर खर्च जाला तो व ता। करावान मा। यांजकडे रुपये ४९५। चारशे सवा पंच्याण्णव रुपये खर्च लेहून देविले असत. तरी कारवान मजकूर याजपासून सदरहू ऐवज हुजूर घेतला जाईल. तुह्मी तालुके मा।पें।। कारवान याचे तसलमातीस खर्च लिहिणें. तुह्मांस मजुरा पडतील. जाणिजे. छ २९ रमजान, सु।। ईहिदे सबैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे ? हे आशीर्वाद.
पौ छ ११ सवाल,
मंगळवार,
सु॥ इहिदे सबैन,
माघ शु॥ १२,
दोन प्रहर दिवस.