Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
वीसा ठायीं च लोह निर्वचैल।।
२२॥ लोह होईल॥ पूर्ण यश पाविजैल ॥
हातीयेरें सांडिती।। पल होईल॥
अदित्यवारी॥ शनिवारी ।।
वृषभ, कन्या, मकर, मिथुन, तूल, कुंभ हे खोचिति ॥
सोमवारि, बृहस्पतवारि मिथुन, तूळ कुंभा पडतीं ॥
कर्क, वृश्चिक, मीन हे खोंचती॥
मंगळवारीं॥
शुक्रवारी॥
कर्क, वृश्चिक, मीनु, धनु, सिंह, मेषु हे सा ६ राशी मरती ॥
वृषभकन्यामकरु हे खोंचती।।
बुधवारिं वृषभ, कन्या, मकर पडती॥
मिथुन, तूल, कुंभ हे खोंचती।।
तिथिवारु जे दिशे यात्रा किजे ।।
ते दिशा येकत्र किजे।।
तिंहि भागु दिजे ॥
उरे शेष तो धृवक रांशींचें जीव-नक्षत्र।
२ ने गुणिजे ॥ ध्रुवक मेळविजे॥
तिंहिं भागु दिजे॥ शेष उरे तो ग्रहो-जाणिजे ।।
जयाचे राशीवरि बुध, गुरु बैसती तिये राशिचेयांकरवी।
यात्रा कर्विजे। दुर्गयात्रा बुध जया विये॥
राशीवरी बैसे।। तया कर्वि कर्विजे।।
आउ। नि। पू । वा । द। ई । प।
सूर्योदयाचीये ठाउनु येणें क्रमें चौ घडिये भ्रमण जाणावें।।
जयाचिये पाठि पडे तो जयो पावे ॥६॥
इति श्रीभूपाळवल्लभः समाप्तिमुपागमत्॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक १६.
१७०३ ज्येष्ठ शुद्ध १०.
पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति आमचें वर्तमान तर :- ज्येष्ठ शु॥ १० दशमींस यमुनास्नानास निंगबोधास गेलों होतों. त्यास, यमुनातीरीं, लतापत-अल्ली-खान ह्मणून खोजा वजीराकडील चों पलटणांनिसी पातशहाचे तैनातीस आहे त्यास, परस्परें कजिया माणसामाणसी जाला. त्याजकडील जमाव भारी. दोन माणसें मारली गेलीं. आह्माकडील एक खितमतगार मारला गेला व प्यादा एक जखमी जाला व हत्तीस सात जखमा जाल्या व आह्मास च्यार जखमा जाल्या. भुंवईवर एक व हातावर एक व पोटावर एक व पाठीवर एक, ऐशा चार जखमा जाल्या त्यांत पोटावरील जखम भारी होती. परंतु आपले प्रतापें व पुण्येंकडून वांचलों. जखमा बऱ्या जाल्या. एक महिना मानसिक स्नान जालें. आतां स्नान करीत असतों. तात्पर्य, आज आठ दहा वर्षें जालीं, सरकारची फौज इकडे आली नाहीं आणि नजबखान बळावला. याजकरितां व इंग्रजी पलटणें पुण्यासमीप आलीं त्यांचे पारपत्य खातरखा न जालें व ग्वालेरीपासीं पलटणें आहेत त्यांचें पारपत्य अद्यापि खातरचा होत नाहीं, हा रंग रांगडे पाहून आपलाले ठिकाणीं बदमस्त जाले आहेत. कोण्हास खातरेस आणीत नाहींत. व आह्मापासीं जमाव तों तैनाती बाळाजी गोविंदाकडील सरकारांतून देविला तो त्यांनीं न दिधला. जुजबी माणसें व दक्षणक्ष कोण कोठें आहेत, हाही मजकूर कोणाचे ध्यानांत राहिला नाहीं. परंतु या काळांत आपले प्रतापेंकडून पूर्वील पारटीवर भ्र व सर्वांसी स्नेह आहे त्यावर जीव आबरू आहे. कपर्दिकेची प्राप्त याजकडून नाहीं इतकेंही असोन सरकारकामास्तव जडाव राखून आपली अब्रू रक्षून स्वामीचे नांवयशाप्रमाणें आजपावेतों श्रीनें रक्षिलें. पुढें पोस्तसर काम होऊन शत्रूचें पारिपत्य सेवकाचे हातें करविणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होय. तो सुदिन. हे.वि.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक १५.
१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.
पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्र आज्ञा कीं :- गाडर वसईहून मगरूरीनें दहा बारा पलटणें, कवाइती, हजार गोरा, वीस पस्तीस तोफा या सरंजामानिसी घाट चढून वर आला. त्याचे मुकाबिल्यास राजश्री हरिपंत व तुकोजी होळकर व परशरामपंत वगैरे फौज व सरंजामानिसी होते. त्यास, इंग्रजांस मयदानांत काढून सजा करावी ही तजवीज होती. परंतु सरकारी फौजेचे लढार्सचे मुकाबिल्यामुळे मैदानांत यावयाची जुर्रत न करतां घाटमाथां अडचणीच्या जागा पाहून राहिला. तेव्हा राजश्री परशरामपंत यांस फौजेसुद्धां घाटाखालीं इंग्रजांची रसद बंद करून महासरा द्यावयाकरितां पाठविले. त्यास, परशरामपंत याणी इंग्रजी रसद येत होती त्यास महासरा करून, सातआठ हजार बैल गल्ल्याचे कुल लुटून आणिलें व कित्येक इंग्रजी लोक यांस तंबी करून गारत केले. याजउपरी पनवेलीहून पांच सहा पलटणें, आठ दहा तोफा, ऐसे सरंजामसुद्धां घाटरुखें गाडर याचे कुमकेस येतात, ही बातमी सरकारची आली. त्यावरून राजश्री हरिपंत यास वमय हुजुरात फौज, तोफा व गारदी घाटावर गाडराचे मुकाबिल्यास येऊन तुकोजी होळकर यांस वमय फौज सरंजाम घाटाखाले पाठविलें. त्यास तुकोजी होळकर व परशरामपंत याणी पनवेलहून पलटणें येत होती त्यांस महासरा देऊन लढाई दिल्ही. होळकर यांणी शुतरनाळांची व करोलची मारगिरी दिल्ही व लढाई चांगली जाहली. इंग्रजांकडील कवायती लोक व गोरे पांच सहासे ठार, सिवाय जखमी जाहले. सरकारचे लोकही फार कामास आले. सेवटी पलटणें झाडीचा आश्रय करून बहुत मुशकिलेनें गाडर याजपाशी जाऊन पोहोचली. त्या दोहों दिवसांत हरिपंत याणींही घाटावरून निकड करून गाडरासी मुकाबिला केला. दुतर्फा लढाईची निकड बहुत जाली. रसद बिलकुल पोहोंचेना. तेव्हा बेताबा होऊन छ २३ रबिलाखर रात्रौ घाट उतरून + + + + + + + फौजसुद्धां घाटाखाली गेले. येकीकडून हरिपंत याप्रमाणें व येकीकडून होळकर व परशरामपंत याप्रमाणे इंग्रजांसी दुतर्फा घेरून, दोन तीन लढाया निकडीच्या जाहाल्या. तोफा व बाणाची मारगिरी जाली. लोकांनीही घोडे घालून लगट फार केली. याजमुळे इंग्रज बहुत घाबरा जाहला. येक तोफ व बंदुका व दारूगोळ्याचे संदूक व छकडे, रथ वगैरे सरंजाम बेशुकर पाडाऊ आला. मिस्तर पारकल नामे गाडराचे बराबरीचा सरदार लढाऊ व तरतूदकार होता तो गोळीची जखम लागून जायां जाला. गोरे व कवायती लोक मिळोन सात आठसें पडले. सिवाय जखमीही बहुताद आहेत. सरकारचीही घोडी व लोक बहुत कामास आले. शेवटी गाडर ज्यान बच्याऊन पळाला. थोडका आसबाब पनवेलीदऱ्याने आसरियास जाऊन पोहोंचला. सरकारच्या फौजाही पनवेलीजवळ मुक्काम करून आहेत. तुह्मास कळावे ह्मणून लिहिले असे. बादशहा व नबाब नजबखान यांसही कळवावें. इंग्रजांची शिकस्त श्रीमंताचे प्रतापेकरून मोठी जाली व त्याचा नाशही फार जाला, ह्मणोन लि॥. त्यास आज्ञेप्रमाणे या पत्राची फारसी करून पातशहास व नवाब नजबखानास सविस्तर मार समजाविला. वाचून बहुत संतोष पाऊन उत्तर केले कीं, र्इश्वर हमेश त्याप्रोंच श्रीमंताची फत्ते करो व इंग्रजांचा कदम पातशाहींतून निघून लयाते पावो. ह्मणून आशीर्वाद ममतापूर्वक देऊन नजबखानास आज्ञा केली की, तुह्मीही काही उद्योग कराल किंवा नाहीं ? नजबखान याणी अर्ज केला की, तोफखाना वगैरे सर्व तयारी आहे, कुंजपुरीयाकडील फौज रिकामी जाली ह्मणजे सर्व गोष्टी मर्जीनुरूप घडण्यांत येतील. याप्रमाणे बोलिले. पुढे आमलांत येईल ते मागाहून विनंति लिहूं. इंग्रजांचा नि:पात करणियाची तदबीज नबाब बहादूर विशेषच सांगतात. परंतु स्वामीचे प्रत्ययास येऊन आह्माकडून लिहविले व यांनी सेवेसी लिहिले ते खरे होय तो सुदिन ! कृपा केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
आतां मराठीचें बिनफारशी असें निर्भेळ शुद्धरूप पाहिजे असल्यास, जेथें मुसुलमानांचा अंमल भासला नव्हता, तेथील लेख पाहिले पाहिजेत. मुसुलमानांचा अंमल नव्हता असे इ. स. १४१६ च्या सुमारास नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत व पश्चिमसमुद्रापासून पूर्वसमुद्रापर्यंत महाराष्ट्रांत दहा पांच प्रांत होत, इ. स. १४०० च्या सुमारास उत्तर व दक्षिण कोकणांत राणे, दारणे, शिर्के, सावंत, वगैरे कांहीं मराठे स्वतंत्र राहिले होते. त्यांच्यापैकीं सावंत ह्यांच्या राज्यांतील एका गांवीं असलेला एक लेख देतों. वेंगुर्ल्यापासून चार मैलांवर मठ म्हणून एक गांव आहे. तेथें वाडीच्या सावंतांच्या पूर्वजांची देवळें आहेत. त्या देवळांतील देवाच्या प्रभावळीवर शके १३१९ त लिहिलेले तीन मराठी लेख आहेत. पैकीं एक लेख येणेप्रमाणें: -
स्वस्ति श्री सालीवान सकु कु १३१९ वरीसे चीत्रभानु संवत्सर आदीक बाहुळ ३ गुरुवारी चांदगडाडुजीपती न-यसी देवाचा दळवै यानें याचा पीता भाम सावंतु तदोद्दीसी उपभागासी देण वीडा धुणा तेला द्वेया उपभोंगासी दत्त रौप्य टाके १४ आखेरतोपी टांके चौदा उपभोगासी देउळाच्या कामाया वेचू द्राम १५०० दळवैपणोचे जाले दीनु आर्थे एखंधर याची ला दीनु नीची वेचू द्राम १००० आखेरतोपी सासु उफरासी भाम सावता वेळाचा दळवै यदोद्दीसी भूमी भ-याया २ मडायी मेव ओंयू व्ययी मेरं नेयी मेरखंडे खडीचे यी मेर आंभ-ययी.
ह्या लेखांत शके १३१९ ला चित्रभानु संवत्सर दिला आहे. तो वर्तमान असून बार्हस्पत्य संवत्सरापद्धतीचा आहे. ह्या संवत्सराला अधिक मास पंचागांत नाहीं. परंतु पुढील सुभानु संवत्सराला ज्येष्ठ अधिक आहे. तो अधिक कदाचित् त्यावेळच्या कोंकणांतील ज्योतिषांनीं चित्रभानु संवत्सराला आणिला असल्यास न कळे, मूळ लेखांतील शक कदाचित् १३१७ असाही वाचतां येईल. परंतु १३१७ ला विक्रम संवत्सर असून चित्रभानु नाहीं. लेखांतील सवत्सर कांहीं असो, साल १३१७ किंवा १३१९ ह्यांपैकीं कोणतें तरी एक आहे ह्यांत संशय नाहीं. प्रस्तुत प्रसंगीं कालनिर्णयापेक्षां भाषास्वरूपाकडे विशेष लक्ष असल्यामुळें इ. स. १३९५ किंवा १३९७ च्या सुमारास मराठी भाषेचें स्वरूप का होतें तें पहावयाचें आहे. ह्या लेखांतील अक्षरें जाधवांच्या तेराव्या शतकांतील अक्षरांसारखी आहेत. ह्या लेखांत सकु, सावंतु, दीनु, हे शब्द जुनें मराठी धर्तीचे आहेत. दळवै (सेनापति), आखर (अक्षर), टाक, द्राम, वरीसें, हेहि शब्द जुने मराठी आहेत. ह्या लेखांत फारशी शब्द किंवा प्रयोग एकहि नाहीं. ह्यावरून शके १३१९ त म्हणजे इ. स. १३९७ त दक्षिण कोंकणात सावंतांच्या राज्यांत शुद्ध मराठी भाषा चालत होती असें दिसतें. आतां ह्या इ. स. १३९७ च्याहि मागें जाऊन इ. स. १३५६ तील एक मराठी लेख देतों. पूर्वी पर्शरामपंडितकृत पर्शरामोपदेश नांवाच्या ग्रंथाचा उल्लेख केला होता. ह्या ग्रंथाच्या शेवटीं खालील मराठी वाक्ये आहेतः –
गत तिथि दुष्णा ॥ वारु चतुर्गुणा॥
नक्षत्र मेळविजे ॥ ध्रुवक ४ मेळविजे॥
तिंहिं भागु॥ उरलेये शेषे लोह पाहिजे।।
एकें जल॥ दाहो स्थल॥
शून्य आकाश ।। स्थलीं सावली ॥
जलीं आडाउ॥ आकाशीं साबलीये।।
आडाउ तीर दार।। हे जयेति॥
आड वार।। आदित्या पासौनु ॥
नक्षत्रें ९ उत्तमें। दाहावें मध्यम ।।
तयापुढील २ उत्तमें ॥ वरिला तिहिं खेळु पांडु १७ उत्तमें।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक १४.
१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.
पु।। श्रीमंत राजश्री नानासाहेब स्वामीचे सेवेसी :-
विनंति की : पूर्वी सरकारासी इंग्रजांनी इनामप्रमाण देऊन किल्ले व प्रांत त्यांणी घेतला आहे तो सोडवणे मान्य केलें. व दोघे गोरे सरदार बोलीस देऊन बदरका स्वामीपासोन घुसून सुरतेस गेले व तेथें जाऊन करणेल गाडर इकडून गेला त्याचे विचारे फिरोन बेमानी केली. त्यावेळेस सोडिले यास्तव व त्यांचे बेमानीस्तव आजवर झुंज लांबले. तेच समई मारून ताराज केले असते तरी जेरबंदी होती. यादिवसांत नजबखान पुसत होता की, पूर्वी श्रीमंतांचा त्यांचा कौल-करार कसला ठरला ? त्याचें उत्तर आह्मी दिधले की, त्याणी इमान सोडल्याचा तपसील काय, त्यांचे दोघे गोरे सरदार आजपावेतों वोलीस आहेत, इतके श्रवणांत आलें आहे. वरकड तपशील श्रीमंतांस लेहून पाठवायास आपले मर्जीप्रो लिहितो. इतके बोलोन सेवकानें यांजला सांगितले कीं, त्याची भानगड आपण करावया योग्य ते नाहींत. तेव्हां बोलिले कीं, त्यांजला शरमिंदे करा. वयास्तव व बेमानी त्यांची त्यांचे अंगी लागावयास्तव तुह्मांस वर्तान पुसिलें, तें तुह्मी लेहून उत्तर आणावे.सलाह यास मारण्याची आहे, फौजेचे जोरानेंही मारावें व याजपासून सो घेऊनही यास मारणे प्राप्त, हस्तगत करावा, तपसील कसकसा करार- मदाराचा जाहला तो जरूर लेहून आणवणें की, असफद्दौला त्याचे इमानप्रमाणावर सर्वस्व गेले असतां गाफील आहेत त्यांस फोडून आपले करून घेऊं, व पठाण रोहिले सिद्धच आहेत. याप्रो। बोलोन सेवेसी ल्याहावयास सांगितलें. त्याप्रो।। लि।। असें. उत्तरीं तपसील लिहिणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पो. दर्शनलाभ होय तो सुदिन. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक १३.
१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.
पु।। श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं : नबाब नजबखान यांचे जाणें शिंद्याकडे न होय तरी कोण्ही उमदा सरदार त्याजबरोबर फौजे पोत्ख सामान देऊन जरूर रवाना करावा, ह्मणजे तिकडील फौज मिळोन दुहिरी शहानेंइंग्रेजी पलटणें शिकस्त होतील. ह्मणून लिहिलें. त्यास, याअन्वयें लिहिल्याप्रमाणेंच बोलून, महमद बेगदानी ढवळापुरी आहे त्यास पत्र व अनुपगीर गोसावी जयपुरी नजबखानाकडून मामल्याचे ऐवजास वसूल करावयास गेला आहे त्यास पत्रें नजबखानाची कीं, तुह्मी आपले फौजेनसी सरंजामसुद्धां जाऊन राजश्री पाटीलबावास सामील होणें, व पाटीलबावाचे नांवे पत्र कीं, तूर्त दोन्ही पथकें तुह्मांकडे रवाना केलीच आहेत ते येऊन सामील होतील. बादजबरसाल शिखाकडील फौज रिकामी झाली ह्मणजे आह्मीही पातशहासहित बाहेर निघतों. याप्रमाणें तीन पत्रें तयार केली. इतक्यांत कलकत्याहून हालसाहेब इंग्रज आला होता, त्याजकरितां ते पत्रें आह्मांपाशी न देता आपलेपाशींच ठेवून घेतली. आता तो गेलियावर फिरोन हाटकिलें. त्यावरून पुन्हां पत्रें द्यावीसें ठराविलें आहे. पत्रें हातास आलियावर पाटीलबावाबरोबर रवाना करितों. परंतु हे इंग्रजास भितात. फार खुलून बोलत नाहीत. पुढे अंमलात येईल ते मागाहून विनंति लिहूं. कृपा केली पाहिजे. भेट होय तो सुदिन. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक १२.
१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.
पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचें सेवेसीं :-
विनंति ऐसीजे : पातशहा व नजबखान दिल्लीत आहेत. याजकडील सरदार मिरजा सफीखा नामें कुंजपुऱ्याकडे पाठविले होते. त्यांणी गणपतसिंग जाटाचा मामला सहा लक्षांचा करून त्याप्रोाा तीन लक्ष रुाा वसूल घेऊन, त्याचे पुत्रास वोलीस ठेवून, त्यास वस्त्रें देऊन मार्गस्थ केले. तीन लक्ष रुाा राहिले ते किस्तीप्रों. येथील कलकत्याकडील बातमी आली कीं, मिस्तर इष्टीन यांस कांही नक होऊन वेडा जाला. +++++++++++ याप्रों लेखन लिहून वर्तमान आलें कीं, इंग्रजांनी वजिरास सांगितले जे आमच्याने तुचा मुलूक राखवत नाहीं. तुह्मीं आपली फौज ठेवून मुलुकाचें संरक्षण करणें. त्याणीं उत्तर दिल्हें की, आमची फौज होती ते तुह्मी खराब केली, आता आह्मी नवी फौज ठेवावी तरी आह्मांपासी पैका नाहीं. याप्रों उत्तर देऊन, स्वार होऊन, सिकारीस गेले व कारभारी यास आज्ञा केली कीं, फौज मिळेल ते ठेवणें. याप्रों वजिराकडील वृत्त आले ते श्रुत व्हावयास लिाा असे. इंग्रजाकडील जहाज कलकत्यास इष्टीनचे बदलीचा सरदार येत होता ते जहाज आंग्रे यांणी मारिले बुडविले, हे वृत्त कलकत्तेकराने श्रवण करून संतोषी जालें. पुढे येईल ते विनंति लिहू. दर्शनलाभ होय तो सुदिन. कृपा केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक ११.
१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.
श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी:-
पो। पुरुषोत्तम महादेव कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता।छ ५ माहे जमादिलाखर मु।। दिल्ली जाणून स्वानंद लिहिला पाहिजे. विशेष. छ १५ रा।वलची पत्रें सरकारचे जोडीसमागमें पाठविली ते छ ५ माहे मजकुरी पावली. त्यास इकडील वर्तमान पैदरपै विनंतिपत्रें हुजूर पाठविली ते पावून वृत्त श्रुत जालेंच असेल. हाली वर्तमान तरी: पातशाहा व नजबखान दिल्लीतच आहेत. व राजश्री महादजी शिंदे शिपरीकोलारसेस आहेत. इंग्रजांचे व यांचे लष्करांत महागाई आहे. पाटिलबावापाशीं कडील रांगडी व देशची भारी फौज आहे. पुढें होईल ते विनंति लिहूं. वरकड वृत्त पुरवणीपत्रावरून श्रुत होईल. नबाब नजबखान यांनी स्वामीस पत्र लिहिले आहे व पातशाचा शुका सो पाठविला आहे त्यावरून वृत्त कळेल. उत्तरीं कृपा करून लिहावयास आज्ञा करावी कीं, लिहिलेप्रमाणें सत्वर अंमलात आणावें. ह्मणजे लिहिल्याचें व सेवकाकडून वारंवार फौजेचा बोझ लिहिल्याचें सार्थक होईल. विशेष मर्जीस येईल ते ल्याहावें. सेवाश्रम केलियाचे सार्थक होईल तो ईश्वरकृपेनें सुदिन. विलायती आनारें या दिवसांत तेथवर गर्मीमुळें न पावतील, यास्तव रस काढून रुबा करून पा॥ आहे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
ह्या लेखात प्लव संवत्सराला प्लवंग म्हटलें आहे. ही केवळ लेखकाची चूक आहे लहान शब्दापेंक्षा मोठा शब्द योजणें जास्त प्रौढ दिसतें, अशा भ्रमानें ही चूक झालीं आहे. ह्या लेखांत १ मौजे, २ व, ३ वा, ४ कसबे, ५ बितपसिल, ६ गल्ला, ७ कैली हे सात शब्द फारशी आहेत. वा हा शब्द व च्या बद्दल योजिला आहे. पाटेलु, बितपसीलु, सकु वगैरे शब्द ज्ञानेश्वरींतील उकारांत शब्दासारखे आहेत. ह्या पत्रांतील भाषेपेक्षां एकनाथाच्या भाषेंत उकारांत शब्द कमी व रामदास वगैरे पेष्तर ग्रंथकारांच्या ग्रंथांत तर त्याहून कमी येतात. ह्या पत्रापेक्षां इ. स. १५५८ तील खालील पत्रांत फारशी शब्द जास्त आहेत.
श्री.
स्वस्ति श्री (स) के १४७९ पिंगळ संवत्सरे माधु सुधु त्रयोदसि वारु मंगळु तदीनीं व्रीतपित्र इनाम लिहिलें. लीखीते चांगो पाटीलु बीन गोंद्य पटैलु मोकदम, व काळशेठी बीन रामसेटी गुठाळु चौगुळा, व एळबो पाटेलु सुपगुडा बीन परसा पाटेलु, खेळ, पाटेलु बीन राघो पाटेलु जें लेकरूं बाबसेठी बीन एकसेठी विगोवी, आपो पटेलु बीन याको पाटेलु सुपगुडा, हीरो पाटेलु बीन भोया पाटेलु हागवणा, कुलुम सेठी बीन हरी सेठी काळोखा, कोयाजी बीन आलोजी मोरीया, जान पटेलु जाधव, व काळी पाटेलु सुपडा, व माद सेठी सेठिया व वणगो माळी मेहतरी व चांगो मेहतरी साळी व समस्त मुजेरीप्रजा व बीजे मोहतर्फा व बलुते व आडाण मौजे निंव प॥ वाई आत्मसुखें सदानंद गोसावी याचे सेवेस व्रीतपित्र इनाम लिहूनु दिल्हें ऐसें जे निमे चावराचा फाळा व पायपोसी व कारकुनु सारा व दमामा व उटआदा व तकदम सारा व बाजे नकददाती बी॥.
ऐनू | आवटु | व | साणेपाळु |
व बीजे फरी व वेसळी व गांवखंडी व पाणीपासोडी वा तकसीमा ११ बाद ता।। ३ बी॥ दळें, आघाडी, फर्साटे. बाकी तकसीम ८ तालुके, रयानी ८ बी॥ त॥ सुतळी, पान, मद, लोह, गवतकडबी, सीरडीबकरा व आर्गतनिर्गत, वेठविजे, सीवबि-हाड दिल्हें आहे. हें पारंपार चालवूनु लेकुरांचा लेकुरीं आवलादी व आफलादी चालऊन हें सत्य. यास जो चुके तो सदानंद गोसाव्याचा द्रोही. चंद्रसूर्यो तपे तववरी रवरवीं पचे. हा नींमु करुनु समर्पिलें. हें कार्या वाचामा जए सत्य.
ह्या इ. स. १५५० च्या सुमाराच्या दोन लेखांत फारशी शब्द बरेच आहेत. परंतु दियानतरावाच्या पत्रांतल्याप्रमाणें मराठी प्रयोग फारशी प्रयोगांच्या धर्तीवर केले नाहींत. चुके, तपे, पचे, समर्पिलें, करुनु, वगैरे क्रियापदांचे प्रयोग शुद्ध जुने मराठी आहेत. वणगो, चांगो, आपो, हीरो, माघु, सकु, वारु, मंगळु, पाटेलु, वगैरे नामेंहि जुन्या मराठींतल्याप्रमाणें ओकारान्त व उकारान्त आहेत. इतकेंच नव्हें तर बीतपसीलु, ऐनु, ककुनु वगैरे फारशी शब्द देखील उकारान्तच योजिले आहेत. हा लेख लिहिणा-यांना फारशी येत नसल्यामुळें, व्यवहारांत रूढ झालेल्या फारशी शब्दांखेरीज जास्त फारशी शब्द किंवा प्रयोग त्यानीं योजिले नाहींत हें उघड आहे. मराठीचें जुनें रूप ह्या दोन लेखांत बरेंच पहावयास सांपडतें.
इ स १५५० च्या अगोदरचे म्हणजे इ. स. १४९५, १४७१, १४१६ वगैरे सालांतीलहि दरबारी फारशी-मराठी लेखांत फारशी शब्द बरेच आढळतात. जेथें जेथें म्हणून मुसुलमानांचें राज्य कायम झालें होतें, तेथें तेथें दरबारांतील सर्व मराठी लिहिण्यांत फारशी शब्दांचा भरणा विशेष असे. दरबारापासून दूर अशा गावीं व सरकारी अधिका-यांचा जेथें संबंध नाहीं अशा गांवकीच्या किंवा धर्माच्या किंवा गोतकीच्या खटल्यांत जे कागदपत्र होत, त्यांत फारशी शब्दांचीं संख्या कमी असे. परंतु त्यांतहि फारशी शब्द बिलकुल नसत अशी मात्र गोष्ट नव्हती. इ. स. १४१६ च्या सुमारास मुसुलमानांचें राज्य महाराष्ट्रांत होऊन बराबर ९८ वर्षे झालीं होतीं व मुसुलमानी भाषेचा देशांत इतका प्रचंड संचार झाला होता कीं दरबारापासून अलिप्त राहणा-या मनुष्याच्याहि बोलण्यांत व लिहिण्यांत फारशी शब्द नकळत येत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
५४. तेव्हां ह्या विकृत इतिहासाला फार जपलें पाहिजे. परभाषांतून किंवा स्वभाषांतून लिहिलेल्या किंवा लिहिवलेल्या असल्या इतिहासांचा दुष्ट परिणाम टाळावयाला एकच उपाय आहे. तो हा कीं, सशास्त्र पद्धतीनें प्रामाणिक इतिहास स्वभाषेंत स्वदेशांतील तज्ज्ञांनीं लिहिला पाहिजे. परदेशांतील लोक स्वेतर देशाचा इतिहास नि:पक्षपातबुद्धीनें लिहितील ही गोष्ट अनेक कारणांस्तव अशक्य असते. एक तर, जो ज्या देशांत जन्मला, वाढला व शिकला, तो त्या देशाच्या संस्कृतीनें भारून जाऊन, इतर देशांची संस्कृति कमी दर्जाची साहजिकपणेंच मानूं लागतो. स्वतःचा देश व स्वतःची संस्कृति पृथ्वीवरील सर्व संस्कृतींहून अत्युत्तम व सर्व संस्कृतीचा केंद्र आहे, असा अभिमान प्रत्येक देशांतील बहुतेक सर्व लहानमोठ्या इतिहासकारांचा असतो. गिझो, फ्रेंचराष्ट्र, व्हिको, इतालियन राष्ट्र, हेंगेल, जर्मनराष्ट्र, व बकल, इंग्लिश राष्ट्र पृथ्वीवरील सर्व संस्कृतींचें केंद्र समजतो. आतां प्रत्येक राष्ट्र एकाच वेळीं पृथ्वीवरील सर्व संस्कृतींचें केंद्र असूं शकणार नाहीं, हें स्पष्ट आहे. कोणतें तरी एक राष्ट्र केंद्र असणें संभवनीय आहे. कदाचित् निरनिराळ्या गुणांचें प्रामुख्यानें अधिष्ठान एकेका राष्ट्राच्या ठायीं असण्याचा संभव व शक्यता आहे. अशी स्थिति असून स्वतःचें राष्ट्र सर्व गुणांचें अधिष्ठान आहे, असें मतप्रदर्शन अभिमानानें व ममत्वानें तत्तद्देशीय इतिहासकार करतात. जिंकलेल्या राष्ट्रावर तर सर्वांचीच इतराजी असते. तशांत तें राष्ट्र पूर्वेकडील असल्यास, पुसावयालाच नको. त्याच्या माथीं असतील नसतील ते सर्व दोष मारण्यांत पाश्चात्य इतिहासकार एकमेकावर चढाओढ करतात. हिंदुस्थानासंबंधानें, तर, त्यांचें ग्रह फारच विपरीत व विपर्यस्त झालेले आहेत. रानटी, पोरकट, खुळा, म्हातारचळ लागलेला, अर्धवट सुधारलेला, भटाभिक्षुकांनीं नाडलेला, दास्यांत डुबलेला, खोटा धर्म पाळणारा, विलासी, संन्यस्त, जादूनें भारलेला, भोळा, लुच्चा, खोटा, खरा, अशीं नाना प्रकारचीं विसंगत विशेषणें हिंदुस्थानाला लावण्यांत पाश्चात्य इतिहासकार मोठा प्रामाणिकपणा समजतात. सर्व चराचर सृष्टीशीं समबुध्दि ठेविल्यानें शक, यवन, किरात, म्लेंछ, मुसुलमान, इंग्रज, फ्रेंच, डच, फिरंगी, वगैरे पश्विमेकडील अर्धपोटीं, बुभुक्षु, व असंस्कृत समाजांना हिंदुस्थानांत पाय घालता आला, हें कोणीच लक्षांत घेत नाहीं. अत्युत्कट कोटीप्रत पावलेलीं Cosmopolitanism हिंदुस्थानाला राष्ट्रत्त्वाच्या दृष्टीनें घातक झालेली आहे, हें तत्त्व विसरणें, ह्या लोकांना सध्यां सोईचें दिसतें. पाश्चात्यांचीं हीं आपमतलबी विधानें स्वदेशांतील तज्ज्ञ इतिहासकारांनीं स्वदेशाचा स्वभाषेंत इतिहास लिहून खोडून टाकिलीं पाहिजेत. इतकेंच नव्हे तर, पाश्चात्यांचे हे आपमतलबी विचार स्वदेशांतील साध्याभोळ्या तरुणांच्या अपरिपक्क मनावर बेमालूम ठसण्याचा जो कल दिसत आहे, तोहि वेळींच काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाश्चात्यांचें मतलबी अपविचार व स्वदेशीयांचें तदुध्दूत भ्रष्ट विचार खोडून टाकण्याचा हा प्रयत्न दोन त-हांनीं केला पाहिजे. सशास्त्र पद्धतीनें प्रामाणिक इतिहास एतद्देशीयांतील तज्ज्ञांनीं लिहिल्यानें पहिलें कार्य साधणारें आहे. दुसरेहि कार्य ह्याच प्रयत्नानें साधेल; परंतु त्याची व्याप्ति स्वदेशीय समाजाच्या अत्यंत संकुचित प्रदेशावर होणार आहे. सूक्ष्म पृथक्करणानें लाखों बाबींचा ज्यांत विस्तृत खल झाला आहे, असले व्यापक इतिहास राष्ट्रांतील फारच थोड्या व्यक्तींच्या उपयोगाचे होतात. इतिहासाचें सूक्ष्म व खोल परिशीलन करण्याची अपेक्षा बाळगणा-या व्यक्ती कोणत्याहि कालीं कोणत्याहि राष्ट्रांत फारच थोड्या असतात. व्यक्ति, वर्ग, राष्ट्र, लोक व अखिल मानवसमाज इत्यादींच्या गुणावगुणांचे व स्वभाववैचित्र्याचें ज्या मुत्सद्यांना व विचारवंताना सूक्ष्म ज्ञान करून घ्यावयाचें असतें, त्यांना हे विस्तृत व गहन इतिहास बहुमोल होत. स्वराष्ट्राच्या व मानवसमाजाच्या इतिहासाचें स्थूल ज्ञान झालें म्हणजे ज्यांची ज्ञानभूक शांत होते, अशा लोकांना हे इतिहास फारसे उपयोगाचे नसतात; आणि असल्याच लोकांचें प्रमार कोणत्याहि राष्ट्रांत अधिक असतें. अशा लोकांना--स्वराष्ट्राच्या व परराष्ट्रांच्या---इतिहासाचें ज्ञान करून देणें अनेक कारणांस्तव राष्ट्रचालकांना इष्ट असतें. पाठशालांतील व शालांतील विद्यार्थी, शेती, उदीम व व्यापार करणारे धंदेवाले, आणि इतर सामान्य स्त्रीपुरुष, यांना स्वदेशाच्या व परदेशाच्या इतिहासाचें योग्य ज्ञान झाल्यास, राष्ट्रीय हेतु सफल होण्यास फार साहाय्य होतें. स्वदेश, स्वधर्म, स्वराज्य, स्वभाषा, स्वसंस्कृति वगैरेंचे स्थूल ज्ञान सामान्य जनांना झाल्यास, त्यांच्या ठायीं स्वदेशादिकांच्या संबंधानें यथार्थ प्रेम सहज वृद्धिंगत होतें आणि स्वसमाजाशीं ताडून पहातां, परसमाज कोणत्या बाबींत समविषम आहेत, तें कमजास्त प्रमाणानें स्पष्ट कळूं लागतें. इतिहासाच्या स्थूल ज्ञानापासून असे नाना प्रकारचे महत्त्वाचे फायदे असल्यामुळें, इतिहास व विशेषतः स्वेतिहास लोकप्रिय करण्याकडे राष्ट्रांतील विचारवंत पुढा-यांची स्वाभाविक व अत्युकट इच्छा असते. ही सदिच्छा सफल करणारी जी इतिहासाचीं पुस्तकें त्यांना इतिहासज्ञानप्रसारक हें विशेषण यथास्थित शोभतें.