Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
(७) वरच्या कलमांत खर्च द्यावयाचा करार झाला आहे त्याचे बेगमीविशी आलाहिदा कागद या तहनाम्याबराबर दिल्हा आहे, त्यांत मुलूख व अमल लिहिला आहे तो हमेशाकरितां इंग्रजी सरकारांत श्रीमंतांचे सरकारांतून दिल्हा आहे. त्या मुलकावर श्रीमंतांचे सरकारचा हक्क व दाया हरतऱ्हेचा नाहीं. असेल तो दरोबस्त सोडून दिल्हा व तेथील सरदार, भुमे,जमेदार वगैरे याजवर इखलाख ठेवणार नाहीं. याप्रमाणें श्रींमंतांचे सरकारांतून करार होत असे.
(८) मुलुख द्यावयाचे कलमावर लिहिले आहे. त्यास, जो मुलुख करार होईल त्यांत जो इंग्रजी सरकारचे उपयोगी नसेल तो फिरवून त्याचे मोबदला इंग्रजी सरकारची सरहद्द साफ होईल असा लावून द्यावा. सातवे व आठवे कलमाबरहुकूम मुलूख लावून दिल्हा जातो यांत इंग्रजी सरकारचा हुकूम राहील, श्रीमंतांचे सरकारचा दावा राहणार नाही.
(९) मुलुख जो इंग्रजी सरकारांत दिल्हा जातो त्याविषी श्रीमंताचे सरकारांतून आपले अंलदारांस हल्ली तूर्त मुलूख हवाली करावयाविशीं ताकीदपत्रें द्यावी. मृगसालापुढे त्या मुलकातील ऐवज श्रीमंतांचे सरकारचे अंलदारांनी वसूल केला असेल तो इंग्रजी सरकारांत परत द्यावा, बाकीविशीं वगैरे द्यावा त्या मुलकावर करूं नये.
(१०) अलाहिदा कागदांत जो मुलूक लिहिला आहे त्या मुलकांत जे किल्ले असतील ते मुलकाबरोबर कुंपणी सरकारचे हवाली होतील. श्रीमंतांकडून करार होत आहे जे किल्ले जसे आहेत तसे हवाली होतील.
(११) जो मुलूक इंग्रजी सरकारचे हवाली होत आहे त्यांत फंदफितवा वगैरे जाल्यास इंग्रजी लष्कर श्रीमंतांचे सरकारचे तैनात आहे त्यापैकी जितके कारण लागेल तितकें पाठविण्याविशीं श्रीमंतांचे लष्करातून इनायत होईल.
(१२) किल्ले अमदानगर व त्याचे आसपास जें मैदान आहे त्यापैकी रेवणीचे बाहेरचे हद्दीपासून चौफेर चार हजार हात जमीन श्रीमंत इंग्रजी सरकारांत हमेशाकरितां देत आहेत. व इंग्रजी लष्कराचा मुकाम जेथें जेथें आहे तेथे कही करिता छावणीजवळ कुरणे श्रीमंतांचे सरकारांतून इंग्रजी सरकारांस लावून देत आहेत. वसईचे तहमान्याचे रुइने तहनामा अमलांत आणावयाकरिता जितके इंग्रजी लष्कर श्रीमंतांचे मुलकांत आणावे लागेल तितके आणावें. त्यांत शुखन पावावयाकरितां श्रीमंतांचे सरकारांतून करार होत आहे की तैनाती लष्कराशिवाय जितके लष्कर इंग्रजी सरकारचें श्रीमंताचे मुलकांत राहील त्याविशी मनाई नाहीं. जाजती लष्कर येईल जाईल व मुलकांत राहील त्याचा खर्च या तहनाम्याचे रुईनें श्रीमंतांकडून इंग्रजी सरकार मागणार नाही.
(१३) सुभा बुंदेलखंड बमय सागर व झाशी व गोविंदराव गंगाधर यांचा मुलूक यांजवर श्रीमंतांचे सरकारचा हक्क, दाया व हुकूमत जमिनाचा व ऐवजाचा असेल तो दरोबस्त श्रीमंत इंग्रजी सरकारांत हमेशाकरितां देत आहेत. त्या जिल्हेच्या सरदारांशी श्रीमंतांचा इलाखा कांही एक राहिला नाहीं.
(१४) श्रीमंतांचे सरकारांतून हाल्ली करार होत आहे जे माळवे वगैरे मुलकांत श्रीमंतांचे सरकारचा दाया व हुकूम चालत असेल तो नर्मदापारचे मुलुकांत श्रीमंतांचा दावा व हुकूमत असेल ती, सुभे गुजराथ खेरीज करून, दरोबस्त श्रीमंत इंग्रजी सरकारंत हमेशाकरितां देत आहेत व पुढेहि हिंदुस्थानचे मुलुकांत मोबदला करणार नाही असा करार करीत आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
(२) वसईचे मुक्कामी १९ कलमांचा तहनामा व पुणे मुक्कामी सात कलमांचा जाहला आहे. त्यातील कलमांस हल्लीचे तहनाम्यांतील कलमांने व्यत्यय न येईल ती कलमें बहाल आहेत.
(३) वसईचे तहनाम्यांतील अकरावें कलमांत लिहिले आहे जे फिरंगस्थानाचे कोणी दवलतदार इंग्रजी सरकाराशीं लढत असतील त्यांची रयत श्रीमंतांचे सरकारांत लयेऊन इंग्रजी सरकारचे नुकसानीची तजवीज करतील त्यांस श्रीमंत आपले मुलखांतून दूर करतील. हल्ली श्रीमंतांचे सरकारांतून करार होत आहे जे फिरंगस्थान येथील दुनयापैकी कितीएक सरकारवाले आहेत, त्याजकडील रयत कोणी श्रीमंतांचे सरकारचे मुलखांत आल्यास इंग्रजी सरकारचे इतल्याशिवाय त्यांजला जागा देणार नाहीं
(४) वसईचे तहनाम्याचे सतरावे कलमांत श्रीमंतांचे सरकारांतून करार केला जे इंग्रजी सरकारचे इतल्याशिवाय कोणी एक सरदाराशीं कांहीएक जाबसाल कोणताही सुरू करणार नाही. त्या कलमाचे मजबुदीकरिता श्रीमंत करार करतात जे सरदार व दवलतदार यांजकडील वकील व अकबरनीस व हर कोणी कारकून व कामदार आपले सरकारांत ठेवणार नाही. जो काहीं जबाब सवाल करणे असेल तो इंग्रजी सरकारचे वकिलाचे मार्फतीनें करू. पहिले तमाम मराठे सरदारांध्यें इलाखा होता तो सुटला व त्या सरदारांवर हरतऱ्हेचा दाया आदाया असेल तो सोडून दिल्हा. तुंगभद्रा व नर्मदेध्ये व मोंगलाई मुलकाचें पश्चिमेस जे सरदार श्रीमंतांशी रुजू आहेत त्यांजवर श्रीमंतांचा दाया हक्क असेल त्यास वर लिहिलें आहे त्याणें खलेल येणार नाहीं. महाराज करवीरकर व सावंतवाडीकर यांजवर श्रीमंतांचे सरकाराचा दावा नाहीं. शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड यांचा जो मुलूक वगैरे दाया तुंगभद्रा व नर्मदेच्या मध्ये व मोगलाई मुलकाचे पश्चिमेस इलाख्यांत असेल त्याजवर श्रीमंतांचे सरकारचा दावा नाही.
(५) वरचे कलमांत मराठे दवलतीचे सरदारांवर दावा असेल तो श्रीमंताचे सरकारांतून सोडून दिल्हा, त्यात गायकवाड यांजवरहि जो दावाहुकुमत कोणतेहि तऱ्हेचा असेल तो सोडून दिल्हा असें लिहिलें आहे; व वसईचे तहनाम्यांत चवदावे कलमांत श्रीमंतांचे सरकारचा गायकवाड याजवर कागदपत्राच्या रुईनें जो जावसाल असेल त्याची दर्याफ्ती इंग्रजी सरकारचे मारफतीनें होऊन गायकवाड याजकडे जे लागू होईल त्याप्रमाणें फडशांत येईल, असें कलम लिहिले आहे. त्यांस कागदपत्राचे रुईने श्रीमंताचे सरकारचा दावा आजपर्यंत जो लागू होईल तो बहाल आहे. त्यास, श्रीमंत करार करीत आहेत की गायकवाड बशर्त सालदरसाल चार लक्ष रुपये द्यावयाचे कबूल करीत असल्यास हाही दावा सुटला, कबूल करीत नसले तरी गायकवाड याजवार श्रीमंतांचे सरकारचा दावा जो असेल तो वसईचे चवदावे कलमाप्रमाणे फडशा होईल. शिवाय कोणताहि दावा राहिला नाही.
(६) पुण्याचे मुक्कामी सात कलमें करार झाली. त्यांस चवथे कलमात करार की लढाईचे वेळेस पांच हजार स्वार व तीन हजार पायदळ व तोफा व सामान लढाईचे द्यावें व शिवाय तामगदूर आणखी फौज द्यावी असें लिहिले आहे. तें महकूब होऊन त्या ऐवजी करार जाहाले जे श्रीमंत करार करतात की पांच हजार फौज व तीन हजार पायदळ व तोफखाना व सामान याचा खर्च देऊं, ह्मणजे पुण्यांतील चवथे कलम दूर जाहाले. लढाईचे वेळेस मुलकांत जितकी फौज तामगदूर तयार होईल ती द्यावी असा श्रीमंतांचा करार आहे तो बहाल आहे. व इंग्रजी सरकारची सहा पलटणें तैनाती आहेत त्या शिवाय लढाईचे वेळेस आणखी फौज पैदा होईल ती करून द्यावी असा करार आहे तो बहाल आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
(११) प्रभाकरपंत जोशी याणीं श्रीमंतांस खोटी मुदत झाली असें सांगितल्यावरून वैशाख व॥ ८ शुक्रवारीं ८-५-१७ छ २० जमादिलाखरी कैद करून कांही दिवस संगमावर कैदेंत ठेवून साष्टीस रवाना केले.
(१२) किल्ले हवाली केल्यावर त्रिंबकजीस धरण्याची तजवीज करून इंग्रज सरकाराशी दोस्ती कायम राखावी हा मार्ग श्रीमंतांनी सोडून, निघोन जावें असा विचार मनांत करूं लागले. फौजा नेहमी वाडयाजवळ तयार रहात होत्या व मसलतीस बापू गोखले यांचाच भरवसा श्रीमंतांनी धरिला. गोखले याणी चिंतामणराव यास अनुकूल करून घेतलें, श्रीमंतांची खात्री केली की सरकारची फौज व होळकर, भोसले, मीरखान, शिंदे असा चहूंकडे बिघाड झाला असतां या मुलकांत इंग्रजांचे माणूस नाहीसें करूं, व त्याचे लष्कर असेल तेथे आसपास फौजा फिरोन त्यास चारा अनाज न मिळे असें करू, भोवताले आगी लावून त्यास खावयास न मिळे असें झाले ह्मणजे आपले आपण जेर होतील. अशी सल्ला दिल्ही. त्याजवरून श्रीमंतास भरंवसा आला. परंतु येवेळेस बिघाड करावा तर बरसात जवळ येऊन पोहोचली, शिंदे, भोसले, होळकर यांच्या फौजा दूर राहिल्या, निभावणी होणार नाही. तेव्हां जसे ह्मणतील तसे कबूल करून बरसात जाऊं द्यावी, आपलीहि फौज आणखी तयार करावी, नंतर बिघाड करावा, असा विचार करून, सफाईचे बोलणे बोलावयास पाट साहेब व मोर दीक्षित व बाळाजी लक्ष्मण साहेबाकडे जाऊं लागले.
(१३) बाळोजी कुंजर वैशाख व॥ ९, छ २१ जमादिलाखर, पंढरपूरचे मुक्कामी मृत्यू पावले.
(१४) चतुर्सिंग कांगोरीच्या किल्ल्यावर कैदेंत होते, तेथेच मृत्यू पावले.
(१५) लाडया न्हावी प्रतिनिधीचे फार लोभांत, आपलेपेक्षा त्याचा इतमाम अधिक व सारा भार त्याजकडेस, असे झालें होते. त्याची वर्तणूक नीट नाहीं, सबब गोखले यांनी कैद करून कांगोरीस पाठविला. त्यास किल्ल्यावरून लोटून दिल्हा.
(१६) चिमणाजी नारायण याजवर इतराजी होऊन त्यास कोकणांत रवाना केले. त्यांचे ऐवजी रामचंद्र भिकाजी करंदीकर कामांत वागूं लागले.
(१७) श्रीमंतांचे तर्फेने मोर दीक्षित व बाळाजी लक्ष्मण यांनी साहेबाजवळ बोलणी बोलोन तहनामा ठरविला. त्यांतील हांशील वसईचे मुक्कामी १९ कलमांचा तहनामा ठरविला. त्याजवर पुणे मुक्कामी सात कलमांचा तहनामा झाला. त्याजवर मध्ये खलेल आला होता तो दूर करावयाकरितां, पहिले तहनामे झाले आहेत. त्यांचे मजबुतीकरितां हल्ली त्याच तहनाम्यांची कलमें लिहिली जात आहेत.
(१) गंगाधरशास्त्री कारभारी व वकील निसबत आनंदराव गायकवाड यास त्रिंबकजी डेंगळे यांणी मारिलें. त्यास, असें कर्म केलें त्याचें पारपत्य व्हावें व पुढें कोणी असे कर्म न करी अशी दहशत सर्वांस पडावी हें करणें दोहीं सरकारास लाजीस आहे. त्यावरून त्रिंबकजी डेंगळे इंग्रजी सरकारचे हवाली जाहाले. तेथून कैदेतून निघून गेले. आणि बंड जमा करून लोकांस मारावें व लुटावें असें करूं लागले. हा दुसरा अपराध केला. त्यास, श्रीमंत अंत:करणापासून स्वच्छतेने करार करतात ते त्रिंबकजीस आश्रय न देतां मगदूर प्रयत्न करून इंग्रजी सरकारचे हवाली होईल याप्रमाणें करार करतात. त्यास तो हाती येईतोपर्यंत त्याचे कबिले व मुलें सरकार कंपणी इंग्रज यांजवळ असावी. व त्याचे बंडांत सामील आहेत त्यादिवशीं श्रीमंतांनी सनदा लिहिल्या आहेत त्याप्रमाणें जे सरकारांत रुजू न होतील त्यांचे पारिपत्य चांगले तऱ्हेनें होईल याप्रमाणें श्रीमंतांचें सरकारांतून होत आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
(६) पेंढारियांचे बंदोबस्ता करितां लाट साहेब यांचें पत्र आलें.
(७) चिंतोपंत देशमुख फाल्गुन शु॥ १४, छ १३ रबिलाखर, पुण्याचे मुकामीं वारले.
२-३-१७.
(८) अल्पिष्टण साहेब बोलतात हे लाट साहेब यांचे हुकुमानें बोलत नाहींत असें श्रीमंतांस कोणी भासविलें. त्याजवरून लाट साहेब यांजकडे वकीलीस अन्याबा राहितेकर यांस पाठवावें असें ठरवीत होते.
(९) अल्पिष्टण साहेब यांणीं श्रीमंतांस पाटसाहेब याजबराबर बहुत तऱ्हेनें सांगून पाठविलें व चिठया पाठविल्या कीं त्रिंबकजीकरितां इंग्रजी सरकारची दोस्ती बिघडल्यानें महाराजाचा फायदा होणार नाहीं, नुकसान आहे, याजकरितां वारंवार सांगतों, हे महाराजांनीं मनांत आणून त्रिंबकजीस धरून हवाली करावा, अगर आपले मुलकांतून काढून द्यावा. असें सांगत असतां तें श्रीमंतांस पसंत वाटलें नाहीं आणि आंतून त्याची पुरवणी करू लागले व फौज जमा करू लागले व शिंदेहोळकर यांस अनुकूल करून घेण्याकरितां कारस्थान चाललें होतें त्याची वृध्दी करूं लागले. त्रिंबकजी धरल्यापासून दिवसेंदिवस गोखले यांजवरच श्रीमंतांचा भरंवसा होत गेला. शंभूमहादेवाचें रानात त्रिंबकजी आहे असें समजल्यावरून इंग्रजी सरकारची फौज त्याजवर गेली. त्यांस गांववालें बातमी देखील न देत. याजवरून इंग्रजी सरकारचा निश्चय झाला कीं त्रिंबकजीस सरकारचा आश्रय आहे, त्यापेक्षा श्रीमंतांसच कांहीं अडचण पडल्याशिवाय त्रिंबकजी हवालीं होत नाहीं. असें मनांत आणून जनरेल इस्मित साहेब फौजसुध्दा पुणेनजीक वैशाखमासीं आले. नंतर वैशाख व॥ ६ बुधवारीं छ १८ जमादिलाखर श्रीमंतांस अल्पिष्टणसाहेब याणीं चिटी पाठविली की एक महिन्यांत त्रिंबकजी हवाली करावा, याचे भरवशा करितां रायगड व सिंहगड पुरंधर तीन किल्ले इंग्रजी सरकारांत ठेवावे, हें आजचे रोजांत न झाल्यास शहराभोवतीं इंग्रजी सरकारच्या फौजेची तंबी होईल, अशी पाठविली. व दुसरी चिठ्ठी पाठविली कीं पहिली चिटी गेली आहे त्याप्रो महाराजांनीं केल्यास गादी कायम राहील. कृष्णराव गोपाळ सदाशिवपंतभाऊ यांचे घरी नेहमी जाऊन बसलें सारा दिवस तसाच गेला. मध्यरात्रींस प्रभाकरपंत जोशी व बापू कवडीकर श्रीमंतांकडून चार रोजांची मुदत मागावयास आले. साहेबांनी मुदत दिल्ही नसतां श्रीमंतांस मुदत मागून घेतली असें जाऊन सांगितलें. श्रीमंताकडून तीन प्रहर रात्रपर्यंत कांहीं जाबसाल न येई. सबब इंग्रजी सरकारची फौज तयार होऊन शहराभोवती वेढा वैशाख व॥ ७ गुरुवारीं छ १९ जमादिलाखरीं पहाटेस सूर्योदयाबरोबर दिल्हा. प्रात:काळी श्रीमंतांनी भाऊस सांगोन पाठविलें कीं चार रोजांची मुदत प्रभाकरपंत करोन आले आहेत, तुह्मी रूजू करून घ्यावी. त्याजवरून भाऊंकडील जयवंतराव, कृष्णराव गोपाळ व प्रभाकरपंत असे संगमावर गेले. तेथें मुदत दिल्ही नाहीं असें साहेबांनीं सांगितलें, नंतर माघारे गेले. साहेब निघोन पर्वतीनजीक आपले फौजेंत गेले. तेथें भाऊकडील बाळाजीपंत कारकून तीन किल्ल्यांच्या चिठया सोडणेविशीं घेऊन आले. त्या साहेबांनी घेऊन किल्ले हवाली करून घ्यावयाकरितां तीनहि किल्ल्यास फौजा रवाना केल्या. जनरेल इस्मित साहेब विठ्ठलवाडीकडे जाऊन राहिले. अल्पिष्टन साहेब संगमावर गेले.
(१०) श्रीमंताकडे अल्पिष्टण साहेब यांणी सांगून पाठविले कीं बापू कवडीकर यास प्रभाकरपंत याचे रुजुवातीकरितां पाठवावें. त्याजवरून श्रीमंतांनी पाठवून दिल्हे. त्याणीं जबानी लिहून दिल्ही की साहेबांनी मुदत दिली नसता आम्ही बोललों याचें कारण माधवराव नारायण यांचे वेळेस मुंबईस कोणी तकशीरदार फाशी द्यावयाचा ठरला असता श्रीमंताचे मर्जीबद्दल माफ केला, असें होत आलें. तेव्हां हेंहि घडेल, याजकरितां बोललो. असें लिहून दिल्यावर जबानी साहेबांनी श्रीमंतांकडे पाठविली आणि सांगितलें की प्रभाकरपंत यांस आह्मी कैद केले, बापू कवडीकर सरकारचे चाकर, जसें मर्जीस येईल तसें करावें. त्यावरून बाह्यात्कारी त्याचे घरी श्रीमंतांनी चौकी बसविली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
१८१६ व १८१७ सालांतील हकीकत.
शके १७३८ धातानाम संवत्सरे, सु॥सबाअशर मया तैन व अलफ, सन १२२६,
संवत् १८७३, राजशक १४३, इ.स. १८१६।१८१७
(१) धर्माजी प्रतापराव वणजारे याणें बिडाकडे बंड केलें. त्याचें पारपत्यास इंग्रजबहादूर याचे फौजेबरोबर सरकारची फौज बळवंतराव अठवले पाडणीकर यांजबरोबर देऊन पाठविली.
(२) श्रीमंतांची स्त्री कुसाबाई हरिपंत ढमढेरे यांची कन्या, गरोदर होती ती प्रसूत व्हावयास माहुलीस पाठविली. तेथें भाद्रपद वद्य ४, छ १७ सबालीं आवशीचें दहा घटका रात्रींस प्रसूत होऊन पुत्र झाला. त्यास उपजत दंत होते. तो मुलगा अकरावे दिवशीं, भाद्रपद वद्य १४, छ २७ सवाल, अस्तमानीं मृत्यू पावला. पुढें कार्तिक व॥ ७ छ २० मोहरम मध्यरात्रीस माहुलीचे मुक्कामी कुसाबाई मृत्यु पावली.
(३) त्रिंबकजी डेंगळा साष्टीस कैदेंत होता. तेथून भाद्रपद व॥ ६ स पळोन, वरघाटी येऊन, स्वार जमा करूं लागला. श्रीमंतास इंग्रजबहादूर याणीं कळवून श्रीमंतांचे मुलकांत आल्यास धरून आमचे हवालीं करावा असें सांगितलें. त्याजवरून श्रीमंतांनी मामलेदारांस त्रिंबकजी सापडेल तेथें धरून सरकारांत हवालीं करावा ह्मणोन सनदा पाठविल्या, तमाम मुलकांत जाहीरनामे रवाना केले. त्रिंबकजी शंभूमहादेवाचे डोंगरांत राहून स्वारांचा जमाव केला. इंग्रजांचे कैदेंत त्रिंबकजी पडला. तो सुटावयाचा नाहीं, असें असतां सुटला, तेव्हां हें ईश्वरी कृत्य, असें श्रीमंतांचे मनांत येऊन, त्याजकडे ऐवज पाठवून, त्याची आंतून पुरवणी श्रीमंत करूं लागले. ती बातमी इंग्रजी सरकारास लागत गेली; व त्रिंबकजीकडील कारकूनाकडे श्रीमंतांनी नातेपुतें महाल, शंभूमहादेवानजीक आहे, त्याची मामलत सांगितली, यामुळें भास्करपंत फडके यास जिवें मारिलें व आणखी हि माणसे मारिलीं; श्रीमंतांनीं आपले किल्ले पुरंधर व सिंहगड व त्रिंबक, रायगड, असे मोठमोठे किल्ले यांजवर लढाई सरंजामाची तयारी गल्ला वगैरे याची भरती करूं लागले व फौज हि जासती ठेवूं लागल्यामुळें; दिवसेंदिवस इंग्रजी सरकारचे मनांत किलाफ वाढूं लागला.
(४) श्रीमंत पुण्याहून फुलगावी रथात बसून जात होते. पांडुरंगपंत ढमढेरे यांची स्त्री श्रीमंतांजवळ त्यांत होती. फुलगांवचे नजीक श्रीमंतांचा रथ लवंडला. तेथें श्रीमंतांचे आंग दुखावलें. सबब, कांहीं दिवस स्वारी फुलगांवास राहिली होती तेथें भोसले यांची नजर येऊन पोंचली, घेतली, व मोर दिक्षित यांचे कन्येचें लग्न फुलगांवी केलें. त्रिंबकजी फुलगावास येऊन श्रीमंतास चोरून भेटूं लागला, व पेंढार ह्मणून स्वार त्रिंबकजीचे फुलगांवास आसपास फिरो लागले व त्रिंबकजी बराबर स्वार घेऊन, कोकणांत जाऊन परशराम, मुरूड वगैरे गांव पेंढारियाचे बहाण्यानें लुटून बहुत खराबी केली.
(५) आपटयास पेंढाऱ्यांवर इंग्रजी सरकारचे लोक व आबा पुरंधरे याचे स्वार गेले होते. तेथें पेंढाऱ्यांची बातमी येतांच इंग्रजी सरकारचे लोक जाऊन, छापा घालून, कांहीं पेंढारी धरिले. आणि ते माघारी जाग्यावर जावयाचे वेळेस पुरंधरे यांचे स्वार तयार होऊं लागले. याजवरून पेंढऱ्यांविशीं श्रीमंतांची नाखुषी नाही असे लोकांचे मनांत येऊ लागले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
परित: गर्जिताभ्रपटलात्स्फुटच्चंद्रमंडलानीव खटखटितोध्दाटितपाटवातायनान्निर्गतानि
राजदर्शनोत्सुकानि सौधांगनामुखानि रेजु: ॥ मंगलपटहाद्यखिलवाद्यध्वनिध्वनितसकल-
सुरासुरनिक कराराधितश्रीपुरद्वारमिववधूद्वारं प्राथवारणादवतार |सर्वगंधर्व-
वर्गस्ववींकृतवारांगनागानोत्तुंगमृदंगवीणारवप्रपूरिते सभ्यसभासंशोभिते वधूविताने
वेत्रधारीप्रदर्शितमार्गोत:प्रविशति राजा । तत्वमूलानुकूले वरिष्ठेष्टपुष्टे मकरकेतुशरप्रमितसद्वर्गे
लसिततुलांशप्रभाकरोत्तुंगासनोदये विविधविवाहप्रेरितवधूजनकदत्तमधुपर्काद्यलंकृत:
श्रीमन्माधवरायो वधूतातसमर्पितजगत्पालनलक्ष्मीकरकमलं जग्राह ।
तरलायतदिव्यलोचनाया:
करकंजं सुविभो र्विभाति हस्ते ॥
सुखसांद्रतरा प्ररोहितेव
स्मरलावण्याविमोहनाद्यवल्ली ॥२४॥
श्रीधररूपारोपे कन्यादातु: प्रशंसनं लोके ॥
मुख्ये कन्यादानं त्वगण्यपुण्याय भवति, किं चित्रं ॥२४॥
अत्र तु सांगमांगल्यांगश्रृंगाररितश्रृंगाररसप्रसृतांगणलक्ष्मी मालोक्य सूत्र
प्रायपूर्वग्रथितफलकलापा ज्योति:शास्त्रीयफलोल्लेखने मम लेखनी न चलति । इदानीं
बहलकौतूहलालंकृतलक्ष्मी: सुचिरमास्त्वित्याशीर्वच्चनरचनाश्चातुर्याचरणमेव परम-
धर्मइतिमन्यमानो वच्मि ।
पंतप्रधानकुलकामलतावितान -
प्रोत्फुल्लपल्लवसमुल्लसितोत्फलार्ध्दि:
आकल्पमस्तुशतमन्युमुखैकवंद्या
प्रेमार्द्रभूसुररविप्रकरप्रसादात् ॥२५॥
शुभंभवतु । वसिष्टगोत्रोत्पन्नोपनामकवाळिंबे सदाशिवसूनुबाळेन लिखितम् ॥छ ॥छ
॥छ॥
अक्षराणि सशीर्षाणि वर्तुलानि घनानिच ॥
परस्परमसंलग्नतरुणीकुचकुंभवत् ॥१॥
॥ समाप्तम् ॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
तत्र स्वत्ययनार्थं सरसरसालपल्लवोल्लसितसतसूत्रअधिकतकलधौतकलश-
विलासितचतुष्कोणस्नपनचतुष्कोच्चंलापर्काचनीभिश्चंरीकचयांचितकांचन रचितचषक
स्थचांपेयतैलेनालेपितांगं उद्वर्तनश्रमस्वेदबिंदुमंदीकृतमुक्ताफलकलापाभिर्यक्षकर्द-
मोद्वर्तितहरिद्रांकितशरीरं
विकचितलोचनबालालेपितपीताविभातिगौरांगे ॥
कांचनशैलेबालातप इव माधववरस्य लग्ने ॥१९॥
शुकसारिकाकलकल इव मंगलकलकलोत्कुलोत्फुल्ला स्नपनारंभसंभारानयनार्थ
मितस्ततश्चपला इव परिभ्रममत्सुवासिन्य: स्नपनपीठोपविष्टं श्रीमन्माधवरायं मुख्य-
प्रधाननिधानप्रभुवरवर मभिषिषिंचु:। तत: पीतांबरपरिधान: सकुंकुमसुंगंधिगंधोल्लसित
भाल: मुक्ताफललघुमालिकालसत्कंठ: । चंपकरुचिचयरुचिरे मौक्तिकमाला विभाति कंठे
या ॥ श्रृंगाररसराया मुदयति सत्कीर्तिबीजराजीव ॥२॥
स्वत्ययनमंत्रनिमंत्रितजलकणचित्रितानेकमणिभूषण: प्रधानोपि छत्रपतिप्रपूजित: कुमारोपि
वधूकरग्रहणतत्परो लघुभूषणोपि शार्दूलविक्रीडित: धृतदशावतारै: कृतभूभारोत्तरण मभूषणं
मन्यमान एकेनैवावतारेण तत्कर्तुमुचित मितिश्रीपंतप्रधानान्वये
श्रीमदादिविष्णुनाधृतापरावतार: श्रीमन्माधवराय: । आनंदानंदमदमुदितसुंदरोंदिरासदृशनं
दिन्यादिदेवताकदंबसंभृतसुहाटकपटवटितमुक्तागुच्छाच्छादिततटोत्कटमंडपे ।
विकचकमललोचनो मंदहास्यानन: केशरांकोल्लसद्भातवालातपैकप्रभ: । शुककलकलभाषणो
रत्नसद्भूषणो बाललीलाविलासप्रसंशोत्कल: पेशल: ॥
खलदलदलनोध्दताबध्दसत्पध्दतिक्रुध्दासिध्द: प्रसिध्द: प्रधानेज्यसधीरक:
मुदितमदनकोल: प्रेमलानंदचंद्रो रराज प्रजापालको बालकै: संवृत: ॥२१॥
तत: विवाहमुख्यदिने चंद्रचमत्कारांबराद्यलंकारचारमरप्रकारश्रृंगारितवारण:
परिस्फुरन्मुकुररचितचित्रासने युगपत्सहस्रसूर्यकरराशि:
उद्दामोद्दामशोभा भरभरितदिशामंडलैर्मंडलेशै:शुंडादंडप्रचंडोत्कटकरटतटोत्तुंगमातंगसंघै: ॥
विद्वद्वयै: प्रतूर्थै : X X X X X X X X संग्रहार्थं त्रिभुवनविजयी निर्जगामप्रधान: ॥२२॥
परित: गर्जिताभ्रपटलात्स्फुटच्चंद्रमंडलानीव खटखटितोध्दाटितपाटवातायनान्निर्गतानि
राजदर्शनोत्सुकानि सौधांगनामुखानि रेजु: ॥ मंगलपटहाद्यखिलवाद्यध्वनिध्वनितसकल-
सुरासुरनिक कराराधितश्रीपुरद्वारमिववधूद्वारं प्राथवारणादवतार | सर्वगंधर्व-
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
चक्रवक्राकृतमर्यादातिक्रमितोष्णीषधरै विविधपट्टघटितक्कचित्प्रखरतरवारितृटित-
पृथुलकवचभयंकरै: पट्टीशचर्मविराजितकरै र्बालतृणजाटलपृथुवल्मीकबिलाल्लंबाय-मानव्याल
इव धु्म्रनलिकतुंडै: प्रचंडो द्दंडचंडवरिवरै र्विराजमान:
सुधातडागात्कलहंसमाला
समुत्थितेवात्यगमंडपाध्दि ॥
निमंत्रणोतसाहभरात्स्मरस्य
लावण्यलक्ष्मीमधरीचकार ॥१४॥
हरिद्राकुंकुमांकितमुखपंकजा: श्रीमत्प्रवरनीराजनोत्साहसंभ्रमा:
विचित्रचटकावलास्फुटितपिंजरान्निर्गत:
(सुधा) रुचिरमंडपास्फुटसुवासिनीनांघट: ॥
सकुंकुमरसाक्षतै: पुरपुरंध्रिकापूजनं
चकार करकुड्मलैर्बहलमंगलै: प्रार्थनाम्॥१५॥
पुरस्थसदनांतिकेकमललोचनीनांगणो
निमंत्रणमहोत्सवप्रसृतसंभ्र: सुभ्रुवाम् ॥
यथासकलमंडलीसहितलोकमातांगता
तथावरकरोद्यता निबिडदुंदुभीनांरवै: ॥१६॥
श्रीमान् मुख्यप्रधान: प्रतिगृहमलस्तोत्रवाग्भिर्गृहस्थान् स्तुत्वा माझ्या प्रभूच्या परिणयनमहामंडपा
प्रत्य यावें ॥ शोभावृध्दिप्रभावें परमसुखद हें लग्न सिध्दीस न्यावें इत्यंत:
प्रेमलोभात्सकलापुरजने प्रार्थनां संचकार ॥१७॥
तत: पुण्येहनि वसंतपंचम्यां प्रविशतिवासरमिषेणगुरु: ।
श्रमान्मुक्ता: सर्वे त्विति बहलकीर्ते: प्रसरणं
शनि: श्रुत्वा मुक्त्वा सुरवरगुरुं गौरवभरात् ॥
त्वरातस्त्वं गच्छ प्रभुवर विवाहाद्यदिवसे
तथेत्युक्त्वा यात: तरलतरनीचासनगत: ॥१८।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
तत: प्रविशति वारो नक्षत्रंच ।
वृषं समारुह्य तुषोरुभानु:
सरोहिणीरंजितपूर्वभाग: ॥
कुटुंबयुङ्ममंडपमंडनार्थ
मावाहनोल्लेखफलं चकार ॥१०॥
मत्प्राज्यराज्योध्दरणोद्ध्दुरस्य
करग्रहांनद मवाप चंद्र: ॥
स्फुरत्प्रभासंभृतचंद्रिकाभि:
पूर्णाभिषिक्त:किलतुंगसंस्थ:॥११॥
लग्नांशादिफलकलाप: वक्ष्यमाणविवाहवेलाविवर्णने लिखितोस्ति । तदानीं तान्
दक्षणादिभि:संपूज्य, तिथिं नियम्यश्रीमन्मंगलाल्हादिहृदया, द्विजवरा: सर्वे निष्क्रान्ता: ।
तत: नमस्कारप्रियो गोदानतत्प्रियो निरंतरप्रसृतकरो हिरण्यगर्भो दक्षिणांसकुचितकरो
मंत्रमुख: स्फुरत्प्रचंडमार्तंड इव प्रविशति पुरोहित: । श्रीमन्मुख्यामात्यकुलतिलकं
विज्ञापयति । महाराज,
माघशुक्लनवमींदुवासरे
संत: प्रभुवरस्य विवाह: ॥
अक्षतावितरणोत्सवं कुरु
प्रांतपट्टणपुरेषु सादरम् ॥१२॥
अत्युद्दामप्रतार्पंदंदुभिध्वानध्वनितै:स्वानुरागकुंकुमाक्तसत्कीर्तिमुक्ताफलाक्षतैर्भक्त्या
श्रीन्मंगलमूर्ति वाचा सरस्वतीं तेजसा धनंजय मैश्वर्येणेद्रं लावण्येन मकरध्वज मपांगेन
करुणापूरतरंगयशसासुधासांद्रमंदाकिनीकीर्त्यादिगंतप्रकरंश्रीमन्माधवराय:-स्वयमामंत्रयति।
नानादेशाधिपानुचिताधिकारिप्रमुखै रावाह्य स्वपत्तने निमंत्रणोत्साहं चकार ।
धिमिधिमिधिमिध्वाननिस्साणढक्कामिलस्कालसारावकालाहलै: ।
सुखकरतरताररागप्रकारोध्दारधीरस्वनोन्दारवादित्रकै: ॥
परममधुरतालकालानुषंगप्रसंगानुवारांगनागानतानस्वरै: ।
सुरुचिरवरमंडपान्मंडितामात्यसन्मंडलीपंडितोमंडलाधीश्वरै: ॥१३॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
मुसलमान यांनीं तोफा पुढें करून डावे बाजूस अफगाण लोकसुध्दां सुजायतदौला व नजीबखान व उजवे बाजूस अमेदखान बंगष व रोहिले. मध्यें शहाअल्लीखान वजीर व या सर्वांचे डाव्या बाजूस शहापसंतखान होता. इब्राहिमखान यानें आपल्यासमोर अमेदखान रोहिला होता त्याजवर चाल करून याचे ८००० लोक मारिले. भाऊसाहेब वजिरावर गेले. युध्द मोठेंच झालें. फार लोक पडले. अडीच प्रहर सुभेदार शहापसंतखान मध्यें येऊन वजिरास कुमक केली. मोठें हातघाईचें युध्द झालें असतां विश्वासराव यास जखम लागली. सबब भाऊसाहेब हत्तीवरून उतरून होळकर यास निरोप पाठविला कीं, तुह्मास पहिलें जें सांगितलें तें आतां करावें. असें सांगून घोड्यावर बसून गर्दीत शिरले ते दिसेनासे झाले. तो निरोप होळकर यास पोहोंचताच होळकर निघाले व गायकवाडही निघाले. सर्व बायकामुलें शिपाई वगैरे जवळच पानपत गांवांत शिरले. दिवस गेला. रात्र झाली. रात्री अफगाणांची टोळी येऊन त्या गांवासभोंवती वेढा पडला. नंतर प्रात:काळीं त्यांनीं मराठे लोकांस बाहेर काढून अफगाणांनीं बायकामुलें वांटून घेतलीं. पुरुषांच्या दावणी देऊन डोकीं उडविलीं. त्यांचे शिरांचे ढीग आपल्या डे-यापुढें ठेविले. विश्वासराव याचें प्रेत सांपडलें. तें अहमदशा अबदलीजवळ राहिलें व सुजायतदौला यानीं अर्ज करून मराठ्यांचें हाती दिलें, तें हिंदूंनी जाळलें. जनकोजी शिंदा व इब्राहिम गार्दी जखम होऊन शत्रूहातीं लागले. तेव्हां त्यांनीं त्यांस मारून टाकिलें. यशवंतराव रणांत पडले. समशेरबहादर जखम होऊन पळत असतां कोणी गांवकरी यानीं त्यास मारिलें. विठ्ठल शिवदेव व नारो शंकर व दमाजी गायकवाड व मल्हारजी होळकर वगैरे फौज जी गेली, त्याचे चौथे हिशानें परत आली. सुरजमल्ल जाटाकडे गेली, त्यानें त्यांचा समाचार चांगले प्रकारें घेतला. इकडे श्रीमंत नानासाहेब याजकडील वर्तमान श्रीमंत छ १२ रबिलावल (१२ अक्टोबर १७६०) बुधवारीं स्वारीस निघाले. जानोजी व मुघोजी भोसले बरोबर होते, दादासाहेबसुध्दां. बरोबर सखारामबापूही होते. छ ३ रबिलाखर बाळाजी गोविंद यांनीं पठाणास बुडवून भेटी घेतल्याची बातमी आली. छ २१ रबिलाखर अशेरीचा किल्ला घेतल्याची खबर आली. छ १८ जमादिलावल नानासाहेब यांनीं आपलें दुसरें लग्न देशस्थ ब्राह्मण नारोबानाईक पैठणकर यांच्या कन्येशीं केलें. नंतर दादासाहेब यांची स्वारी छ ११ जमादिलाखर रोजीं वेगळी होऊन सखारामबापूसुध्दां निघून गुडमटकलाकडे गेले. ते अखेर सालीं गुडमटकल घेऊन छ १७ रमजानीं परत आले. श्रीमंतांची स्वारी भेलशास होती. तेथें पानपताचें वर्तमान समजलें. छ १३ साबान रोजीं रामगड पहाण्यास गोपाळराव गोविंद यास छावणीस ठेवून देशीं निघाले. छ १ जिल्काद सुमारें टोक्यास वैशाख शु॥ १३ चें बाजीरावाचें श्राध्द करून, परत पुण्यास आले. श्रीमंतांची स्वारी नर्मदातीरीं असतां पौष शु॥ १३ रोजीं पानपतचा काशीद सावकार लोकांचा पांचा दिवसांत औरंगाबादेस जाण्याचे करारानें निघाला तो सहावे दिवशीं श्रीमंतांस भेटला. अबदालीची व दक्षिणी फौजेची लढाई झाली, फौज बुडाली, असें सांगितलें. त्याजवळ एक कागद मिळाला त्यांत, दोन मोतीं गलत व दसबीस अशरफात व रुपयाको गणत नहीं, इतका मजकूर होता. कोणीं कोणास लिहिलें तें नांव वगैरे लिहिलें नव्हतें.