Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

त्याजकरितां गादी कायम ठेऊन, पुढें त्यांचे हातून फिसालत न व्हावा याजकरितां वसईचा तहनामा कायम ठेऊन नवा तहनामा झाला. पांच हजार स्वार व तीन हजार पायदळ मदतीस देत जावें, असा बाजीराव साहेब यांचा पहिलाच करार होता. ती फौज कंपणी सरकारांतून ठेवावी असें होऊन फौजेचे खर्चास मुलुख लाऊन दिल्हा. तेव्हां पासून दोस्ती पहिल्या प्रमाणें चालली. नंतर पेंढारी चहूकडे रयतेस दरसाल उपद्रव करितात, त्यांत बाजीराव साहेब यांचे मुलखास बहुतच उपद्रव होता. याजकरितां पेंढारियांचा बंदोबस्त व्हावा अशी कंपणी सरकारांतून तजवीज जाहली. तेव्हां बाजीराव साहेब यांचे बोलणें पडलें जे पेंढारियांचा बंदोबस्त झाल्यानें आमची किफायत आहे, आह्मी ही फौज सामील देतों. असें खातरजमेनें बोलोन त्या बाहाण्यानें कंपणी सरकारचे आश्रयावर जो खजीना जाहाला होता तो ऐवज बाहेरचे सरदारास पाठवून त्यांस बिघडविलें व आपली फौज तयार करविली. कंपणी सरकारची फौज जवळ होती ती दूर जावी याजकरितां दोन हजार स्वार कंपणी सरकारचे फौजे बरोबर देऊन, फौज दूर गेली अशी संधी पाहून, एकाएकी कांहीं कारण व जाबसालाची तक्रार नसतां, फौज तयार करून चालून येऊन कंपणी सरकारचे फौजेशीं लढाई केली, व कोणत्याही मुलकांत चाल नाहीं तशी चाल करून इंग्रजी वकिलाचे बंगले व छावणी लुटून जाळली व कंपणी सरकारचे मुलुकाची रयत वाटसरू सल्याचा भरवसा धरून येत होते त्यांस धरून कैद केलें, व कितेक लुटले व दोन इंग्रजी सरदार मुंबईकडून येत होते त्यांस तळेगावाजवळ चोराचेंही पारपत्य करीत नाहींत त्या तऱ्हेनें, मारिलें. ते मारणार अद्यापी चाकारीवर आहेत. त्याजवरून बाजीराव साहेब यांचे हुकमाशिवाय मारिलें नाहींत असा निश्चय होतो व ज्या त्रिंबकजीनें गंगाधरशास्त्री याशीं मारिलें त्यास जवळ आणून कारभारांत वागवूं लागलें. त्याजवरून बाजीराव साहेब यांचें हुकुमाशिवाय त्रिंबकजी याणें शास्त्री यास मारिलें नाहीं. पहिल्यापासून लोक बोलतात तो मुद्दा शाबूत करून घेतला. व पेंढारी बोलावून मुलुख वाढवावा अशी तजवीज करूं लागले. या तऱ्हेचे दौलतदारीचे सांप्रदाय सोडून वर्तणूक करून कंपिणी सरकारास बुडवावें असें केलें. त्याजवरून कंपिणी सरकारांतून निश्चय झाला जे बाजीराव साहेब राज्याचे उपयोगी नाहींत, याजकरितां त्यांस बिलकुल राज्यांतून काढून कंपिणी सरकारांतून मुलुक व किल्ले काबीज करून अम्मल करावा. अशी तजवीज होऊन, एक सडी फौज बाजीराव साहेब याचे मागें रवाना करून, एक फौज किल्ले घ्यावयाकरितां जात आहे व दुसरी एक फौज अमदानगराजवळ येऊन पोंचली आहे, व एक मोठी खानदेशांत आली आहे, व जरनेल मनरो साहेब कर्नाटकाचा बंदोबस्त करीत आहे.व मुंबईकडून फौज येऊन कोकणचे किल्ले घेऊन त्या प्रांताचा बंदोबस्त होत आहे. आतां थोडके दिवसांत बाजीराव साहेब यांचा ठिकाण नाहीं असें होऊन महाराज छत्रपती सातारकर बाजीराव साहेब यांचे कैदेंत आहेत, त्यांस सोडवून घेऊन मोकळे करून, त्यांचे व त्यांच्या मंडळीचे छानछोकीकरितां कांहीं राज्य त्यांजकडे चालेल अशी तजवीज कंपिणी सरकारची होऊन, सातार किल्यावर महाराज यांचा झेंडा कायम करून, त्यांचे तर्फे लोक होते त्यांची खातरी केली आहे. त्यास, जो मुलुख महाराजाकडे होईल त्यांत न्याय इनसाफ व हुकमत व अम्मल ते करतील. कंपिणी सरकारांत मुलुख राहील तेथें कंपिणी सरकारचा अम्मल होईल. परंतु कोणाचे वतनास व इनामास व वर्षासनास व देवस्थानचे खर्चास व खयरातीस व ज्ञातीचे धर्मास खलेल न होतां वाजवी असेल तसें सुरळींत चालेल. व बाजीराव साहेब मक्तेदारास मामलती देत होते, ते महकूब होऊन कमावीसदार याजकडे मामलती सांगून जो वाजवी ऐवज असेल त्याचीच उगवणी होईल. कोणावर जुलूम जास्ती कांहीएक होणार नाहीं. येविशी कोणीही अंदेशा घेऊं नये. बाजीराव साहेब याजकडे जे चाकरी असतील त्यांनीं चाकरी सोडून आजपासून दोन महिन्यांत आपली घरीं यावें. जे कोणी न येतील त्यांचें वतन जप्त होऊन खराबी झाल्याशिवाय राहणार नाहीं. जमेदार यांणीं आपलाले परगण्यांतील जे कोणी बाजीराव साहेब याजकडे चाकरीस असतील त्यांची नांवनिशीवार याद तूर्त समजवावी. व चाकरी सोडून जसजसे घरीं येतील ते वेळेस समजावीत जावे व बाजीराव साहेब यांची कुमक करूं नये. व त्याजकडे वसूल एकंदर देऊं नये. दिल्यास सालमजकुरीं मुलखास उपद्रव लागला आहे. त्याची दरयाप्ती होऊन सूट मिळेल. बाजीराव याजकडे वसूल दिल्ह्यास तो ऐवज मजुरा न देतां दरोबस्त ऐवज घेतला जाईल. व जमीदार कुमक करतील व ऐवज देतील.

ते गांवांत शिरले आणि लुटूं लागले. त्यांनीं फार मारगिरी केली. श्रीमंतांचे मोठे लष्कर असतां इलाज चालला नाहीं. पलटणचे लोक फार मेले. इतक्यांत इंग्रजी लष्कर ब्राह्मणवाडयाचा घाट चढून चाकणाकडे आल्याची बातमी श्रीमंतांस लागल्यावरून फौज सुध्दां निघोन बोरघाटानें रावाडीस गेले. पलटणचे लोक जे शाबूत होते ते जमेती निघोन घोडनदीस गेले. श्रीमंत पाडळीस गेले. इतक्यांत कर्नाटकांतून जरनेल रफीजेरनेल साहेब फौजसुध्दां आले ते सालप्याचे घाटानें चढोन गेले. पाडळीवरून श्रीमंत निघोन पुढें गेले तें गोकाककडून फिरोन मिरजेकडून साताऱ्यास आले. रफीजरनेल साहेब व त्यांचे लष्कर त्यांचे मागें होते ते दूर राहिले. इतक्यांत इस्मीत साहेब यांचे लष्कर अथणी जवळून श्रीमंतांचे पिछावर येत होतें तें साताऱ्यानजीक येऊन पोंचतांच श्रीमंत अदरकीचे घाटानें पळोन गेले. इतक्यांत इस्मीत साहेब यांच्या फौजेची व गोखले यांच्या फौजेची गांठ नांदगिरीजवळ पडली. तेथें गोखले, निपाणकर, त्रिंबकजी सुध्दां होते. त्यांजवर गोळे मारिल्यावरून सारी फौज पळोन गेली. इंग्रजाचे लष्करचा मुक्काम वऱ्यावर जाला. तो गोखले चंदनवंदनचे अंगानें फौजसुध्दां जाऊं लागले. त्याजवर तुरुकस्वार जाऊन बुणगे लुटून आणिले. गोखले पळोन गेले. नंतर इस्मीत साहेब गेले तेथें पुण्याकडून कर्णेल बेल साहेब यांचे लष्कर मोठया तोफासुध्दां येऊन पोचल्यानंतर रफीजरनेल साहेब याचे लष्कर पुढें सावळीकडे आले. याजकरितां अल्पिष्टन साहेब व इस्मीत साहेब सारी फौजसुध्दां रहिमतपुरावर गेले. तेथें रफीजरनेल साहेब यांच्या भेटी होऊन सातारियास सारे फौजसुध्दां आले. तेथें छ ४ रबिलाखर माघ शु॥ ५ ०-२-१८ सातारा किल्ला घेऊन पहिल्यानें इंग्रजी निशाण चढवून लागलेच महाराज यांचे निशाण लाविलेवर इंग्रजी सरकारची फौज राहिली आणि महाराजांकडील विठ्ठलपंत महाजनी व शिरके वगैरे लोक यांस खर्चास वस्त्रें देऊन त्यांस महाराज लौकरच येतील असें सांगून सातारा शहरचे रखवालीस लोक ठेवावयाकरितां विठ्ठलपंत यास ऐवज दिल्हा. व बाजीराव साहेब यांचा जाहीरनामा केला कीं : जाहीरनामा सरकार दौलत मदार कंपिणी इंग्रज बहाद्दूर, सुरुसन समान आशर मय तैन व अलफ. तमाम लोकांनीं जाहिरनामा समजोन त्याप्रमाणें वर्तणूक करावी याजकरितां लिहिलें जातें जे : बाजीराव साहेब राज्यावर आल्यापासून नाना प्रकारचे बखेडे व बंडें होत होतीं. राज्यांत व मुलुखावर हुकुमत कधींही चालली नाहीं. पुढें होळकर यांचा दंगा झाला. तेव्हां राज्य सोडून पळोन वसईस जाऊन खंडेराव रास्ते यांचे मदतीनें गुदराण करून राहिले. नंतर कंपिणी सरकारची दोस्ती केली. त्याजवरून कंपिणी सरकारची फौज येऊन, बाजीराव साहेब यांस गादीवर बसवून, तमाम बंडें व बखेडे होते ते मोडून मुलुखांत बाजीराव साहेब यांचा हुकूम सुरळीत चालू करून दिल्हा. पहिल्यानें दंग्यामुळें व पुढें दुष्काळ पडला त्याणें बहुतेक देश उद्वस्त झाला, तो कंपिणी सरकारचे भरवशावर आबाद झाला. बाजीराव साहेब यांणीं मामलती मक्त्यानें लाविल्याते मक्तेदार रयतेपासून जास्ती ऐवज घेत गेले. तत्राप बहुत आबादी झाली. जे मुलकाचा ऐवज जमा झाला त्याजवर बाजीराव साहेब यांणीं दौलतीचा खर्च व आयषआराम करून खजिना बहुत जमा केला. मराठे सरदार यांजवर बाजीराव साहेब यांचा दावा बहुत दिवसांपासून नवता तो लागू करावा असें कंपिणी सरकारांतून कबूल केलें नवतें; जें वाजवी असेल तें चालू करून घ्यावें अशी कंपणी सरकारची खायष होती; त्याजवरून गायकवाड याजकडील जाबसाल ठरवावयाकरितां गाईकवाड यांणीं आपले कारभारी गंगाधर शास्त्री यांशीं कंपणी सरकारचे बहादरीवर पुण्यास पाठविले. ते येऊन बहुतेक जाबसाल लौकर उलगडावा असें झालें होतें. त्यांत बाजीराव साहेब यांची किफायत बहुत होती. इतकियांत गंगाधर शास्त्री यास बाजीराव यांचे कारभारी यांणीं पंढरपूर क्षेत्रीं मारिलें. त्या वेळेस तमाम रयत व यात्रेकरू वगैरे सर्व म्हणत होते कीं शास्त्री यांशीं त्रिंबकजीनें बाजीराव साहेब यांचे हुकुमाशिवाय मारिलें नाहीं. असें असतां बाजीराव साहेब दोस्त मोठे दौलतदार असें करवितील हा गुमान मनांत न आणितां ज्या त्रिंबकजीनें मारिलें त्यास हवाली करून द्यावा असा कंपणीसरकारचा हुकूम होऊन त्रिंबकजी हवालीं करा असें बोलणें पडलें. तेव्हां हवालीं करावा तो न केला. याजकरितां कंपणी सरकारची फौज बहुत जमा जाली. नंतर त्रिंबकजी हवालीं केला. त्यासमयीं कंपणी सरकारास खर्च बहुत जाला. तो दोस्तीवर नजर देऊन न मागतां त्रिंबकजीस हवाली करून घेतला आणि दोस्ती जुळत होती त्याप्रमाणें कायम ठेविली. नंतर बाजीरावसाहेब याणीं बाहेरचे सरदार याशीं पत्रें पाठवून त्यांची फौज तयार करावी अशी तजवीज केली व आपले राज्यांत बंड उभे करून कंपणीसरकाराशीं लढाई पडावी आणि नुकसान व्हावे अशी तजवीज करूं लागले. त्याजवरून बखेडा मोडावयाकरितां कंपणीसरकारची फौज तयार होऊन पुण्यास आली आणि बाजीराव साहेब यांशीं शहराभोंवती तंबी केली. त्या वेळेस बाजीराव साहेब हातीं सापडलें होते. मुलकाची बंदोबस्ती करावयाजोगी कंपणी सरकारची फौज बहुत तयार होती. परंतु तहनामा झाल्यापासून वक्तशीर बाजीराव साहेब यांचे बोलणें पडत होतें. जें आम्हास प्राप्त झाले, आम्ही आयषाराम करितों हें सर्व देणें कंपणी सरकारचें आहे, आमचा शुकरगुजारा कंपणी सरकारचे भरवशी आहेत, असें बहुत तऱ्हेनें बोलत होते.

(४५) मुंबईहून दोन साहेब सरदार येत होते त्यांस बिघाड जाला हें ठाऊक नाहीं, सबब वडगावाहून तळेगावास येत होते, त्यांस बाबाजीपंत गोखले फौज घेऊन मुंबईचे वाटेचे बंदोबस्ताकरितां गेले त्यांणीं त्या सरदारास धरून फांशीं दिल्हे व दोन सरदार हैद्राबादेहून पुण्यास येत होते त्यांस उरळीस धरून कांगोरीत कैदेंत ठेविलें, तेथून काढून वासोटयावर नेऊन ठेविले. जरनेल इस्मित साहेब यास लढाईचे वर्तमानाचें पत्र पावले नाहीं. परंतु डाकेचे पत्र पोचणार नाहीं ते दिवशीं पुन्हा बिघाड जाला असें समजावें असा इजरा होता. त्यावरून डाकेचे पत्र पावलें नाहीं. सबब विंचुरकराकडील फौज तैनातीस होती त्यास सांगितलें कीं पुण्याकडील वर्तमान पुर्ते समजत नाहीं, परंतु बिघाड जाला असें दिसते. याजकरितां तुम्ही लष्करांत राहूं नये निघोन जावें म्हणोन सांगोन त्यास लाऊन देऊन आपण माघारे येऊं लागले. त्याचे तोंडावर नारोपंत आपटे फौज घेऊन गेले त्याणीं वाटेनें इंग्रजाचे बंगले होते ते जाळले. इस्मित साहेब याची फौज येऊन पोचूं नये असें श्रीमंताचे मनांत होते. परंतु इंग्रजी फौजेपुढे यांच्यानें कांहीं जालें नाहीं. फौज खंडेरायाचे माळावर येऊन पोचली. अक्कलकोटकर याजकडील सरदार नारोपंत आपटे याजबरोबर होता तो ठार पडला. आपटे याणीं लष्करचे कांहीं बैल आणिले.

(४६) कार्तिक शु॥६ शुक्रवारीं १४-११-१७ रात्रीस इंग्रजी फौज छापा घालावयाकरितां तयार होऊन नदीत आणली. परंतु तोफा जावयास सोय नाहीं सबब माघारे गेले.

(४७) कार्तिक शु॥ ८ रवींवारीं छ ६ माहे मोहरमीं १६-११-१७ येलवाडयावर श्रीमंताकडील फौज अरब व गोसावी होते व बापू गोखले फौज सुध्दा होते. इंग्रजी सरकारची पलटण चालून आली त्याची मारगिरी जाली. अरब गोसावी कांहीं मारले गेले. बाकी फौज पळोन माघारी आली. श्रीमंत त्याच वेळेस रात्रीं निघोन अप्पासाहेबांसुध्दा सासवडीं गेले. फौजा झाडून उधळल्या. दुसरे दिवशीं गोखले वगैरे फौजा जमा होऊन सासवडास गेले. तेथें राहून काहीं जाबसाल करावा असें श्रीमंतांचे मनांत होतें. परंतु भोसले, होळकर, शिंदे यांचा भरंवसा होता व बापू गोखले याचा रुकार न पडे सबब श्रीमंत फौजसुध्दां पुढें माहुलीस गेले. इंग्रजबहादूर यांणीं शहरांत शनवारचे वाडयांत झेंडा कार्तिक शु॥ ९ सोमवारीं लावून शहरचे लोक हवालदील होऊन पळों लागले त्यांस दिलभरंवसा देऊन उदमी व सावकार वगैरे सर्व रयतेचा बचाव केला. पुण्याचे कामावर राबीसन साहेब यास ठेविलें, आणि अल्पिष्टण साहेब व इस्मित साहेब फौज घेऊन श्रीमंताचे पाठलागास गेले.

(४८) पटवर्धन, निपाणकर, रास्ते वगैरे जाहागीरदार यांस पत्रें पाठविलीं कीं श्रीमंतांनीं कांहीं कारण व जाबसालाची तक्रार नसतां इंग्रजी सरकाराशीं बिघाड केला; त्यास श्रीमंतांनी बिघाड केला त्यामुळें सरदार लोकांचें नुकसान व्हावें असें सरकारचें दिलांत नाहीं; याजकरितां मेहेरबानांनीं आपले जागेवर राहावें ह्मणजे लढाई पावेतों चालत आहे तसें चालेल.

(४९) करवीरकर महाराज यांस सदर्हूप्रमाणें पत्र गेलें. ते दोस्ती राखून आपले जाग्यावर कायम राहिले.

(५०) श्रीमंत, पुढें, मागें इंग्रजी लष्कर, याप्रमाणें फिरत होते. श्रीमंतांस निपाणकर कोरेगांव यावर येऊन भेटले. वासोटयास सातारकर महाराज यास ठेविलें होते त्यांस आणावयाकरितां श्रीमंतांनी नारो विष्णू यास स्वारीसुध्दां पाठविलें. त्यांनीं जाऊन महाराजांस जवळ लष्करांत आणलें. श्रीमंतांच्या महाराजांच्या भेटी झाल्यानंतर त्रिंबकजी डेंगळे फौजसुध्दां नारायणगांवास येऊन श्रीमंतांस भेटून लष्करांत उघडपणें राहिला. श्रीमंत वाडयाकडे गेले. त्याजवरून इंग्रजी फौज घोडनदीकडून नगरावरून संगमनेरावर गेली. बापू गोखले याचा पुत्र ब्राहमणवाडयावर वारला. त्याची स्त्री सती गेली. याजमुळें तेथें मुक्काम होते. इंग्रजी लष्कर संगमनेराकडून आलियाची बातमी लागल्यावरून माघारें फिरून फुलगांवास आले. पुण्याकडून घोडनदीवर सरंजाम जात होता तो वाघोलीस गेला. त्याजवर नारो विष्णू फौज घेऊन गेले तेथें गोळागोळी जाली. पठारा शिलेदार नारो विष्णूकडील तेथें पडला व घोडी व लोक जखमी ठार जाले. घोडनदीकडून पलटणचे लोक चार पांचशें पुण्यास येत होते त्यांस श्रीमंतांचें लष्कर फुलगांवावर आहे ही बातमी नव्हती, व श्रीमंतांसही बातमी नव्हती. कोरेगावाजवळ येतांच श्रीमंताकडील फौजेने पाहून सारी फौज तयार होऊन त्याजवर गेली.

(४२) अश्विन वद्य ८ रविवारी शाहासाहेब संगमावरून मुंबईस जात असतां गणेशखिंडी जवळ दिवसास श्रीमंताकडील स्वारांनीं भाला मारून त्यास जखमी करून घोडा नेला. नंतर त्यास संगमावर आणून श्रीमंताकडे परशरामपंत सावळीकर याजबरोबर सांगून पाठविले. परंतु त्यांणीं परत जाब येऊन सांगितला नाहीं. त्याजवरून बाळाजीपंत नातू यास पाठविले. तेव्हा श्रीमंतांकडून मोरदीक्षित व बाळोबाबाबा शुक्रवारचे वाडयांत खालीं बोलावयास आले ते चाल सोडून बोलों लागले कीं जखम लागली ही खरी कशावरून ? आम्ही पाठवून चौकशी करूं, कोणी भाला मारला हे ठिकाण कशानें लागेल ? तेव्हां बाळाजीपंत बोलले कीं आज पावेतों इंग्रजी सरकारचें बोलण्याचा भरंवसा होता, आतां या बोलण्यावरून दिसत नाहीं, त्यास, महाराज यांची मर्जी असेल तर तसें उत्तर सांगावें, त्याप्रमाणें साहेबास अर्ज करीन. त्यावरून विठोजी नाईक गाईकवाड यास कोठें भाला मारिला याचे चौकशीकरितां पाठविले. तें संगमावर येऊन गणेशखिंडीकडे गेले तों पिस्तुलाची घरें सांपडलीं. नंतर साहेबाकडे येऊन माघारे श्रीमंताकडे गेले. विश्रामसिंग ह्मणोन स्वार श्रीमंताचे हुजूर होता त्यानें भाला मारिला असें लोक बोलत होते.

(४३) खादेरी किला आंगरे याजपासून चिठ्ठी लेहून घेऊन त्याचे जिम्मेस ठेविला व कोकण अवचितगड वगैरे किल्ले बाबाजी बिवलकर याजकडे सांगितले व घाटबंदीचे काम त्याजकडे सांगितले.

(४४) बापू गोखले यांचे मनांत पलटणांत फितूर जाहला आहे त्यापेक्षां आपली फत्ते होईल, पलटणें थोडी आहेत तीं बुडवावीं, अल्पिष्टन यास जाग्यावर गर्दी करावी, असा मनांत निश्चय करून पटवर्धन याची फौज जवळ आली होती. त्याजकडे सांडणी स्वार पाठविला त्यास जलद आणविलें व निपाणकर यासही आणविलें, पटवर्धन याची फौज येऊन पोहोंचली. निपाणकर पोहोंचले नाहींत. घाटबंद्या केल्या, व डाका उठवावयाविशीं महालोमहालीं ताकीद केली, व मुंबईकडून कोणी येऊं न द्यावें याजकरितां स्वार पाठविलें, आणि आश्विन वद्य ११ बुधवार चंद्र २५ जिल्हेज तारीख ५ पाचवी सप्टंबर सन १८१७ या रोजीं सकाळी बापू गोखले जातीनें फौजेंत जाऊन फौजेची हुषारी केली. त्यामुळें पुणें शहरांत आवई पडोन लोक भयभीत होऊन लोकांनीं दुकानें व दरवाजे लाविले. नंतर फौज पर्वतीस जाणार या बहाण्यानें तयार होऊन वाडयावरून आली व जागा जागा आपलाले गोटातून तयार जहाले. श्रीमंताजवळ शुक्रवारचे वाडयांत बापू गोखले वगैरे जमा होऊन बिघाड सांगून पाठवावयाकरितां विठोजी नाईक गायकवाड व परशरामपंत सावरकर यास अल्पिष्टन साहेबाकडे पाठवून आपण फौज सुध्दां पर्वतीस गेले. गायकवाड व सावरकर यांणीं साहेबाजवळ सांगितले कीं खडकीनजीक लष्कर उतरलें आहे तेथून काढून माघारी जावें व गोऱ्यांचे पलटण आहे तें पुण्याजवऊ राहूं नये, घोडनदीस जावें, इंग्रजी सरकारचे दोस्ती करितां जें म्हटलें तें ऐकत गेलों हें साहेबांनीं ऐकावे. तेव्हां अल्पिष्टन साहेब बोललें कीं हें बोलणें दस्तुर सोडून आहे, याचा जाब काय द्यावा. गायकवाड बोलले कीं हें जर होत नाहीं तर महाराज आपले फौजेंत जातात. तेव्हां साहेब बोलले कीं महाराज आपले फौजेंत जात असल्यास आमचें येथें काय काम, आम्हीही जातो. याप्रमाणें विठोजी नाईक याचें बोलणें होऊन ते माघारे गेले, ते श्रीमंतापाशीं पोचावयापूर्वीच श्रीमंत बमय फौज पर्वतीस जाऊं लागले, तों पानशाचे वाडयाजवळ जरी पटक्याचा भाला मोडला. मग दुसरा घालोन पुढें गेले. सारी बायकामंडळीसुध्दा दरोबस्त पर्वतीस गेले. विठोजी नायकाचे बोलणें होऊन तें संगमावरून जातात तोच फौज श्रीमंताची तयार होऊन संगमाजवळ पोचली. इतकियांत अल्पिष्ठन साहेब याणीं पलटणचे लोक तयार करून बाहेर आले तों फौज वाडयाचे बागेच्या अलीकडे पोंचली. खडकीचा रस्ता बंद जाला. तेव्हां अल्पिष्टण साहेब नदी उतरोन खडकीचे पुलावरून खडकीकडे गेले. संगमावरून सामान सरकारी व रयतेचे व चाकर लोकाचे दरोबस्त लुटलें गेलें. इतकियांत फौज व तोफा श्रीमंताकडील तयार होऊन गणेशखिंडीनजीक पोचल्या. तें पाहून पलटण खडकीवरून निघोन पुढें गेली. त्यांत अल्पिष्टन साहेब जाऊन पोचले. पांच गोळे श्रीमंतांकडून अगोदर सुटल्यावर मग लढाई सुरू झाली. श्रीमंताचे फौजेचा मोड झाला. मोर दिक्षित, मराठे व पांडुरंग सहस्रबुध्दे निसबत पटवर्धन व काशीराव कोकरे यांचे चिरंजीव ठार झाले. आणखी लोक मेले व घोडीं पडलीं व तोफा व फौज श्रीमंताकडील पळोन माघारे गणेशखिंडीचे लगत राहिले. इंग्रजी सरकारची फौज रात्री खडकीस माघारी गेले. संगमावरील बंगले श्रीमंताकडील लोकांनी जाळले.

(११) सरजे अजंनगावचे अहदनाम्यांत व सन १८०५ इसवीचे सालांतील अहमदनाम्यांत या अहदनाम्याप्रमाणें जे एक गोष्ट लबाड होत. नाहीं बहाल राहील व हर्दू सरकारांस कौलकराराप्रमाणें शेवट करणें लाजम आहे.

(१२) हा अहमदनामा बारा कलमांचा आजचे दिवशीं करार पावला. छ ५ माहे नवंबर सन १८१७ इसवी मुबीला छ २४ जिल्हेज सन १२३२ हिजरी, अश्विन व॥ ११, मुक्काम ग्वाल्हेर.

(३६) याप्रमाणें इंग्रजी सरकाराशीं तहनामा करून आपला बचाव करून राहिले. भोसले, होळकर, श्रीमंताचे मसलतीस अनुकूळ जाले.

(३७) सदाशिव माणकेश्वर भाद्रपद व॥ १३ छ २६ जिलकादी मृत्यु पावले. त्यांनीं दत्तक घेतले त्यांचे नांव लक्ष्मण सदाशिव ठेविलें.

(३८) श्रीमंतांची स्वारी पुण्यांत आल्यावर अल्पिष्ठन साहेब याची गांठ पडोन एकटेच श्रीमंतांचे व त्यांचें बोलणें जाहलें. त्यांत सफाईच दाखविली.

(३९) विनायक श्रोती व वामन भटजी कर्वे व शंकराचार्य स्वामी असे इंग्रजी पलटणात फितूर करावयासी मसलत श्रीमंतांस देऊन त्यांजपासून ऐवज घेऊन फितूर करावयास गेले.

(४०) दसऱ्याचे दिवशी श्रीमंतांची स्वारी सीमा उल्लंघनास गेली. तेव्हां स्वारी जातांना सालाबादप्रमाणें इंग्रजी पलटण व अल्पिष्टन साहेब सलामास उभे होते. त्याकाळीं साहेबाकडे पाहिलें नाहीं. बापू गोखले खवाशींत होते. नंतर साहेबांनीं घोडा पिटवून पुढें जाऊन फिरोन सलाम केला. नारो विष्णू आपटे आपली फौज व बाणाच्या कैच्या असेजमीयतींतील पलटणीची लयन उभी राहिली होती, त्यांचे अंगाजवळून जाऊं लागले. तेव्हां पलटण मागें हटली. नंतर फिरोन येतांना पलटणाकडून यावी, त्यावरी सलामीच्या तोफा माराव्या, अशी चाल असतां तिकडून स्वारी आली नाहीं. परभारें जातों ह्मणोन विठोजी नाईक याजबरोबर सांगोन पाठविलें.

(४१) गारपिरावर इंग्रजी पलटणाची छावणी होती त्याचे लगत अश्विन वा ४ बुधवारीं चंद्र १७ जिल्हेजीं २८-१०-१७ गोसावी वगैरे लोक उतरविले. त्याजवरून कर्णेल वेल यांणीं पलटणचे छावणींतून बाहेर काढून तयार होऊन बाहेर उभे राहून अल्पिष्टन साहेब यांजकडे सांगून पाठविलें कीं हर्दू सरकारची दोस्ती जाहल्यापासून सुरळीत चालत होतें, हल्ली दस्तूर सोडून काम होऊं लागले, याणें दोस्तींत खलेल येईल. दोन फौजा दोस्तांच्या असल्या तत्रापि केवळ जवळ उतरत नाहींत असा सांप्रदाय आहे, याजकरितां फौज तेथून काढावी. तशी मर्जी नसली, खमखाम बिघाड करावा अशीच मर्जी असली, तर तें तरी करावें. इंग्रजी सरकारचे सोजीर लोकांची पलटण मुंबईहून येत आहे तीं येऊन पोंचली नाहींतों पावेतों महाराजाचे फौजेची फत्ते जाहाली तर होईल असें सांगून पाठविले व संगमावरील मडमा वगैरे दापुडीस पाठविले. श्रीमंताकडून गोडीचेच बलावणें आले त्याजवरून मडमा वगैरे खटले संगमावर आणले आणि पलटणचे लोक संगमावर कांहीं जास्त आणवून बाकीची पलटण तशीच बाहेर मुक्काम करून राहिली; नंतर शनवारीं अश्विन वा ७ छ २० जिल्हेज सोजरांची  १-११-१७ पलटण मुंबईहून आली ते गारपिरावर उतरले. श्रीमंतांचे लोक जवळ आहेत, माणमाणसानिशीं खटला होईल, हें चांगले, नाहीं असें अल्पिष्टण साहेब यांणीं मनांत आणून पलटण गारपिरावरची छावणी सोडून खडकीनजीक अश्विन वा ९ सोमवारीं छ २२ जिल्हेजीं ३-११-१७ आणवून मुक्काम केला. दसऱ्याचे दिवशीं नारो विष्णू पलटणाचे जवळून जाऊं लागले, सबब लैन मागें हटली व गारपिराजवळ लोक गेले तेव्हां पलटण छावणींतून निघोन खडकीवर गेली त्याजवरून भिऊं लागले असा निश्चय श्रीमंतांच होऊन जे बादसल्ला देत होते त्याचे बोलण्यावर भरंवसा झाला.

(८) अलिजाबहादूर कंपणी सरकारचें वचनावर व स्नेहावर भरवसा ठेवून करार करतात. जे या मोहिमेचा कस्त होईतोपावेतो हाडे अशरचे किल्यात सरकार इंग्रजांचे ठाणे करून किल्ले मजकुरची निगाहबाजी सरकार इंग्रजांकडे गुजस्त करावी, व सरकार इंग्रजांचे अहालकर यखत्यार ठेवितात जे जो कारखाना व जकीरा आह्मास लागेल तो आह्मी हरदो किल्ले व मजकुरी ठेऊन किल्ले अशर येथे झेंडा व एक किल्लेदार व पन्नास शिपाई अलिजाबहादूर याणी ठेवावे. परंतु अशर व हांडे दोनीं मकाणांस सरकार इंग्रजांचा हुकूम चालेल. शिंदे यांचेकडील जकीरा व जंगी सामान हरदू किल्यात आहे त्याची मुखत्यारी इंग्रजबहादूर राखील. जो पावेतों किल्ले इंग्रजांकडे राहतील तो पावेतो जरी इंग्रजांकडे खर्च होईल किंवा नाश होईल तरी ही मोहीम जाल्यावर हिसेबाचे अन्वये जे मोल होईल ते शिंदे यांस पावते केले जाईल. किल्ले मजकूर इंग्रजाचे कबजात येतील तेव्हा उभयता सरकारचे कारादरंदाज जकीऱ्याचे असबावबे फेरिस्त करतील. सध्या शिपायांचे ठाणे हरदू किल्यात आहे त्यास अशरचे तैनातीचे लोक खेरीज करून बाकी लोकांनी बाहेर निघोन यावें. शिंदे याजकडील पागा वगैरे किल्ले मजकूरी आहे त्यांनी या अहदनाम्याचे सहावे कलमान्वये ठिकाणी रहावे. हरदू किल्ल्याचे जे महाल आहेत ते पहिल्याप्रमाणें शिंदे यांचे अंमलदाराकडे राहतील. इंग्रजाकडून त्यांचे संरक्षण होईल. महालाचा ऐवज तहशिलीचा त्या पैकीं दरोबस्त अथवा कांहीं केला, शिंदे यांची फौज इंग्रजी फौजे समागमें तैनात होईल त्याच्या खर्च जरूर होईल तरी या अहदनाम्याचे पाचवे कलमाप्राणें इंग्रजांचे हातानें खर्चांत येईल. या मोहिमेकडून स्वस्थ झाल्यावर त्याचा वसूल व खर्चाचा वाजवी हिशेब शिंदे यांस पावता केला जाईल. पेंढारी वगैरे यांचे मोहिमेकडून स्वस्थ झाल्यावर दोन्ही किल्ले महाल सुध्दा शिंदे यांचे स्वाधीन केले जाईल.

(९) उभयतां सरकारची मुख्य थोर मतलब कीं हे वर्तणूक लुटीची जात राहावी व उभयतां सरकारांस पूर्ण खातरजमा आहे कीं या धर्मकार्याचा शेवट नीट करण्यास, कदाचित, सर्व हिंदुस्थानीं रईसास सरकार इंग्रजास सामील करून घेणें जरूर होईल. यास्तव करार निश्चय ठरला कीं सन १८०५ इसवीचे सालांतील आठवें कलमांत इंग्रज सरकारास मनाई ते सरदार मजकुराशीं अहदनामा करण्यांत लिहिलेली आहे तें कलम रद्द होईल. व इंग्रज बहादूर अकत्यार ठेवितात जे उदेपूर व जोधपूर कोटा व बुंदी येथील राजे व इतर रईस नामांकित कितेक ग्वालेरीपासून चंबळपलीकडे मुलूख आपले हातात ठेवितात त्यांशीं करार करितील. व हे खेरीज या कलमान्वयें कोणे प्रकारें सरकार इंग्रजांची इतल्ला निश्चय ठरणें प्रांत माळवा व गुजराथ येथील राजे व रईसल व तालुकादार जे शिंदे यांजकडील नि:संशय आहेत त्यांशीं अहमदनामा करण्यास्तव होणार नाहीं व आणखी निश्चय ठरला कीं यांचा हुकूम पूर्वींपासून मामलेदार वगैरे यांजवर चालत आहे त्याप्रमाणें पुढें ही हुकम बहाल राहील व सरकार इंग्रज करार करितात जे राजे व सरदार सदरीं लिहिल्या अन्वयें उदेपूर वगैरे यांशीं वचनाप्रमाणें होय, तर खंडणी मुकरार शिंदे याजकडील राजाचे मुलखांत आहेत अखंड बहाल राहील. इंग्रजांचे अहालकर आपले विद्यमानें शिंदे यांचे सरकारांत दाखल करीत जातील, व आणखी शिंदे करार करितात कीं कोणें प्रकारें राजे व सरदार यांचे कार्यासंबंधीं सहसा दाखल करणार नाहीं.

(१०) हिंदूसरकाराशीं दुसरे जे सरकार वैरत्व किंवा पेंढारी वगैरे मुफसदांची हिमायत व कुमक करील येणें कडोन जर त्यांशीं युध्द करणें पडेल तरी इंग्रजी सरकार युध्द करून फत्ते पावेल, त्या संधानांत जर शिंदे यांजकडून अहदनाम्याचे कलमबंदीप्रमाणें अंमलांत येईल तरी शिंदे यास त्याचा नफा व फायदा व मुलखाचे बढोतीचे आगत्य राखोन स्नेहमुर्वतेचें मार्गे अम्मल करूं.

(२) पेंढारियांची जमियत अलिजाबहादूर यांचे मुलकांत आणि नजीकचे प्रांतात राहिली आहे. यास्तव करार होत आहे की शिंदे यांचे मुलकांतील जे महाल व परगणे व तालुके पेंढारियांचे आहेत ते त्यांजकडून मोकळे होतांच शिंदे यांणी त्वरित आपले कबजात आणोन मुफसद व पेंढारी वगैरे यांस फिरोन प्राप्त न होता असा बंदोबस्त करावा. जे मकाण इतर रईसाचे पेंढाऱ्याचे हातात आहे, जर रईस पेंढारियांस आश्रय न देई व मिलाफ न करी, यथानशक्ति त्यांचे बीमोड करावयास व काढण्यास मेहनत करतील तरी ते मकाण त्याचे स्वाधीन करून रईसानें शरता लिहिल्याप्रमाणे न केल्यास ते मकाण अलिजाबहाद्दर यांचे स्वाधीन केले जाईल. तें मकाण सदरचे शर्ताअन्वयें शिंदे यांच्या कबज्यांत राहील. (३) अलिजाबहादर करार करतात जे पेंढारी वगैरे मुफसदांस, लुटारे यांस आह्मी व आह्माकडील सरदार पक्षपात व आश्रा देणार नाहींत व त्यांस खराब करण्यास व बीमोड करण्याविशीं आपले मुलखाचे अम्मलदार व फौजेचे सरदार याशी आज्ञा करू. जो कोणी सरकार आज्ञा अमान्य करील तरी त्याजकडून बहुत दंड घेतला जाईल. याप्रमाणें ताकीद केली जाईल. ऐशियास कोणी सरदार अथवा अंमलदार हुकूम न मानील तो शिंदे यांचा सरकश व कुंपणे सरकारचा दुश्मन. तो कर्तृत्वाप्रमाणे फळ पावेल.

(४) अलिजाबहादर करार करतात जे आमचे निजाबतीचे फौजेपैकी चांगली फौज स्वार पांच हजार पेंढारी व मुफसद यांचे पारपत्यास व स्थळांतून काढण्यास तैनात होईल ते इंग्रजी फौजेशी मिळोन राहील, इंग्रजी फौजेचे सरदारांचे विचाराप्रमाणे जे करणें ते करीत जाईल. व अलिजाबहादर आणखी करार करतात जे आपल्याकडील सर्वत्र फौजेचे सरदार व मुलखाचे अंमलदार आणि होळकर, इंग्रजी जमीयतीस जे गोष्टीचें, जे जिनसाचें अगत्य पडेल त्यापैकी जें होऊं सकेल त्याप्रमाणें खूप खरेदी करून आणून देण्यास तत्पर राहतील. यांत तीळ अंतर पडल्यास उभयतां सरकारचा दुष्मन आपले केलें फळ पावेल.

(५) अलिजाबहादर करार करतात की आपले सरकारची फौज इंग्रजी सरकारचे फौजेस सामील तैनात होईल. त्यांचा सरंजाम व घोडे जवान चांगले राहतील व फौजांस ताबेदार खर्च आमचे जातीचे व घरमंडळीचे व अहालकराचे सालीना सरकार इंग्रजांकडून नेमू करार आहेत. तीन वर्षांपावेतो सरकार दाखल न होतां इंग्रजी फौजेचे तैनातीचे सरदारांचे हातानें आमचे फौजेचे माहेवारीत खर्च होत असावे. व सरकार इंग्रज करार करतात जे ऐवज सालीना याबाबद पेंढारी वगैरे मोहिमेकडून स्वस्थ झाल्यावर फौजांचे माहेवारीचा खर्च जाऊन बाकी जो राहील, तो ऐवज शिंदे यांस पावता केला जाईल. व फौजांचे माहेवारीचे बंदोबस्ताकरितां अलिजाबहादर करार करतात की इकडील मामला जोतपूर बुंदीकोटाचे मुलकांत आहे तो दोन वर्षांपावेतो एकंदर सरकार इंग्रज याजकडे गुदस्त केला जाइल.

(६) अलिजाबहादर करार करतात जे बाहेरील स्वार व पायदळ व तोफखाना यांचा कुचमुकाम मोहिमे पावेंतों सरकार इंग्रज यांचे विचाराप्रमाणे करण्यास अंतर करणार नाही.

(७) कंपणी इंग्रज यांची जी फौज पेंढारियांचे मोहिमेस तैनात करतील व फौज तूर्त शिंदे यांचे सेवेंत सिध्द आहे ती पेंढारियांचे पारपत्य करण्यास्तव तहनाम्याचा शेवट करण्याविशीं बहुत तयार आहे. अलिजाबहादर करार करतात जे या मोहिमेपावेतो कदीम फौजा खेरीज सरकार इंग्रजांचे विचाराशिवाय सहसां ठेवणार नाही व आपलेकडील सरदारांस ताकीद की पेंढारी व दीगर मुफसदांची हिमायत किंवा मित्रत्व सहसा न करणें व त्यांचे फौजापैकी एकासहि आपले फौजेत सहसा जागा न देणे असे केले जाईल. जो कोणी सरकारची आज्ञा अमान्य करील तो सरकारचा बागी व कंपणीचा दुस्मान होऊन फळ पावेल.

(३०) इंग्रजांशी बिघाड करावयाचा, आपण अनुकूळ असावें, असे सातारकर महाराज यांस माहुलीस आणोन बोलणें होऊं लागलें, आणि महाराजाचे कबिले वगैरे ठेवावयास वासोटयास जागा तयार केली आणि माहुलीस राहिले. पुढे कार्तिकस्वामीस जावयाचें असा घाट बोलण्यांत आणू लागले.

(३१) श्रीमंतांनी गणपतीचा उत्साह ही माहुलीसच केला. फौज जमवितात याजवरून त्यांचे मनांत कसें आहे ते समजावे याकरितां अल्पिष्टण साहेब याचे बोलणे पडलें की महाराजांची स्वारी पुण्यात येत नसल्यास आम्ही येथे येतों. त्याजवरून पुण्यास भाद्रपदमासी आले.

(३२) जनरेल इस्मित साहेब सरहद्देवर जाऊ लागले. त्याजबराबर २ हजार स्वार बाळाजी लक्ष्मण विंचूरकर यांचे पुतणे कुशाबा याजसमागमें पाठविले. इंग्रजी लष्कर दूर जाईल तितके चांगले असे समजत होते.

(३३) तहनामा झाल्यावर पोटसाहेब व मोरदीक्षित अल्पिष्टण साहेब याजवळ सफईची बोलणी बोलत असत. आंतून बापू गोखले यांचे अनुमतें इंग्रजांशी बिघाड करावा असा निश्चय करून बापू गोखले याजकडे मुखत्यारी दिल्ही. कोट रुपये तूर्त तयारी करितां गोखले याजकडे देविले. त्याणीं तोफा व बाण व फौजेची तयारी चालविली. व शिंदे, होळकर व भोसले, मीरखान वगैरे बंडवालेसुध्दा याशी आपले संमतात मिळवून घेऊन त्याणी इंग्रजांशी बिघाड करावा असा नकशा केला. धूळपास सांगोन आरमारचे डागडोजीचे काम चालविलें. व किल्यांवर भरत्या गल्याच्या वगैरे व शिबंदीच्या भरत्या केल्या. व गोविंदराव काळे व आन्याबा मेहेंदळे व दादा गद्रे व राघोपंत थत्ते वगैरे जे एकजात होते त्यांस लोभ दाखवून सलामसलत त्यांशी करूं लागले. खंडो गोविंद निसबत भोसले याजबरोबर मुधोजी भोसले यांस वस्त्रे इंग्रजी बहादूर याचे सल्याशिवाय गुप्तरूपे पाठविली. गोविंद केशव कारकून मीरखान याजकडे पाठविला, इतके कारस्थान माहुलीवरून सिध्द करून भाद्रपदमासी पुण्यास आले.

(३४) श्रीमंतांचे दुर्दैव उभे राहिले याजमुळे जे आचार कोणी केले नसतील तसे करू लागले. माहुलीचे वाडयात गंगाबाई xxxx करीण, विधवा बायको, तिचे अंगावर आपला मर्दानी पोषाख जवाहीर घालून तिला गादीवर बसवून आणि आपण खिजमतगार होऊन चवरी वारूं लागले. असे अनेक प्रकारचे व्यवहार करूं लागले. ते किती लिहावे !

(३५) शिंदे, होळकर, भोसले यांशी बाजीराव साहेब याणी कारस्थान केले. परंतु शिंदे यांच्या लगत इंग्रजी सरकारची मोठी फौज आली. तेव्हा त्यांणी श्रीमंतांचा नाद धरल्याने अगोदर मसलत आपल्यावर पडोन आपण बुडोन जाऊ. इंग्रजी सरकारचे लढाईचा अनुभव त्यास पहिला होता. याजमुळे तह करावा असा विचार करून शिंदे याजकडील मुखत्यार कपतान कलुष साहेब, यांचे विद्यमाने तहनामा झाला त्यातील हांशील :-

(१) उभयतां सरकारांपैकी हरएकांनी आपापली फौज व आपले षरीकाची आणखी पदरच्यांनी फौज पेंढारी अथवा जितके मुफसदांची जमियत आहे त्याजवर तैनात करून त्यास उतरले स्थळाहून बाहेर करून द्यावे, आणि त्यांचा जमाव फोडोन किरकोळ करावे, फिरोन त्यांचा जमाव होऊं न शके. ही गोष्ट अमलात आणावयाकरिता दोन्हीं सरकारच्या फौजा व उभयतांचे षरीकांचे फौजांसमेत पेंढारियांचा व मुफसदांचा पिच्छा करून हा मतलब पुरता न होय तो पावेतो बसून रहावे. याउपरि शिंदे करार करतात जे पेंढारी सरदारांचे कुटुंबांसुध्दा हस्तगत करण्याविशी सई करून कंपणी सरकारचे स्वाधीन केले जाईल.

(१९) वर लिहिल्याप्रमाणे हालीं महाल तूर्त हवाली करून येथील महाल मजकूर खर्च वाजवी वजा होऊन बाकी पैकी बेरीज ठरेल ती चवतीस लक्ष वसुली पुरवून चवतीस लक्षांचे भरतीची बाकी राहील त्यास जे महाल लागतील ते कर्नाटकपैकी कंपणी सरकारचे उपयोगी व सरहद साफ होई असे लावून द्यावे.

(२०) हाली महाल हवाली होत आहेत त्यांची पक्की बेरीज ठरोन भरतीस महाल कर्नाटकपैकी द्यावयाचे ठरतील तेथील मृगसालपासोन श्रीमंतांचे सरकारचे मामलतदारांनीवसूल घेतला असेल तो तहनाम्याचे नववे कलमाप्रमाणें कंपणी सरकारांत परत द्यावा.

(२१) महाल हाली हवाली होत आहेत त्यांची पक्की बेरीज ठरावयाकरितां दफ्तराचा अजमास वगैरे कागद वीस वर्षांचे पलीकडील खातरजमेमोफक जे लागतील ते आजपासून पाच रोजी आणून द्यावे. याप्रमाणे तहनामा ठरला.

(२२) तहनाम्याचे भरवश्याकरितां त्रिंबकजीची मुलें माणसें कैदेंत ठेविली.

(२३) वकील व अबकरनीस व बाहेरचे सरदार जवळ होते त्यांस येण्याविषी पत्रें पाठविली.

(२४) पुण्यास बाहेरचे सरदारांचे वकील होते त्यांस निघोन जावे ह्मणोन ताकीद केली.

(२५) त्रिंबकजीची मुलेंमाणसें कैदेंत ठेविली व वकील अकबरनीस आणविले त्याजवरून तीन किल्ले श्रीमंतांस इंग्रजांनी परत दिल्हे.

(२६) श्रीमंतांनी किल्ले इंग्रजी सरकारांतून माघारा दिल्यावर जवाहीर व पैका वगैरे चीजवस्त सिंहगड, रायगड वगैरे किल्ल्यांस रवाना केली व वाडयातील देव व थोरली स्त्री वाराणशीबाई रायगडास पाठविली. धाकटी स्त्री सरस्वतीबाई व आपासाहेबांची स्त्री दोघी उभयता जवळ राहिल्या.

(२७) तहनामा झाल्यावर श्रीमंतांची स्वारी पंढरपुरी गेली. तेथून सालाबादप्रमाणें पुण्यास यावें तें न करता, श्रावण मास अधिक आहे सबब कृष्णा स्नानाचें निमित्ताने माहुलीस जाऊन तेथे राहिले.

(२८) श्रावणमासाची दक्षणा पुण्यात चौथाई दिल्ही.

(२९) पेंढाऱ्याचे बंदोबस्ताचे बोलणें बोलावयाकरितां सरजन मलकमसाहेब चिनापट्टणाकडून हैदराबादेवरून डाकेवर श्रावणमासी पुण्यास आले. त्यांस रामचंद्रपंत करंदीकर सामोरे गेले. स्वारी श्रीमंतांची पुण्यास येत नाहीं याजकरिता मलकम साहेब माहुलीस गेले. श्रीमंतांजवळ बोलणें झालें की पेंढारचे पारपत्यास लाटसाहेब जातीनें आले व कर्नाटकांतून जनरेल इसलाफ साहेब येत आहेत, फौज पेंढाऱ्यावर जाईल तेव्हा निघून दुसरे मुलकांत शिरतील याजकरितां आपले मुलकांत येऊ न पावता अशा बंदोबस्ताकरितां घोडनदीची पलटणे सरहद्देवर जात आहेत. व श्रीमंतांनी आपलेकडील फौज द्यावी असें बोलणें पडलें. फौज अधिक ठेवावी असा श्रीमंतांचा मनसोबा होता व ठेवीतच होते. याजकरिता सरहद्दीवर आपली फौज आह्मीहि ठेवितो असा रुकार देऊन उघडपणें फौज जमा करू लागले. मलकम साहेब पुण्यास येऊन मोर दीक्षित यांचे घरी मेजवानी घेऊन माळव्यांत गेले.

(१५) श्रीमंत याणीं शहर व सुभे अमदाबाद काठेवाडचे खंडणीखाते जितका श्रीमंताचा हिस्सा आहे त्याचा मक्ता गायकवाड यास सालीना साडेचार लक्ष रुपयांस ठरावून दिला होता. त्यांपैकी काठेवाड हाल्ली सातवे कलमाचे रुईने इंग्रजी सरकारांत दिल्हे आहेत, खेरीज करून श्रीमंतांचे सरकारांतून गायकवाड यास शहर व सुभे व अमदाबाद येथील सालीना साडेचार लक्ष रुपयांचा भक्ता करून देत आहे. शहर व सुभे अमदाबादची जमा अधिक आहे व गायकवाड याजवर श्रीमंतांचे सरकारचा दावा होता तो आजपासून सुटला. बाकी ऐवजीं चार लक्ष रुपये सालीना गायकवाड याजला ठरत आहे. याणें श्रीमंतांचे नुकसान होतें याजवर नजर देऊन काठेवाडचा मामला खेरीज करून साडेचार लक्ष रुपयांचा मक्ता ठरला आहे.

(१६) कर्नाटकचे जहागीरदारांचे बंदोबस्ताकरिता इंग्रजी सरकारांतून सहा कलमें तयार होऊन पेशजी श्रीमंताचे सरकारांत गुदरली आहेत. त्या कलमांची श्रीमंतांचे सरकारांतून कांही तबदील करून मंजूर केले तें कलम आता या तहनाम्यांतील कलमान्वये बहाल व बरकरार त्यास पेशजीचे यादीची नक्कल या तहनाम्याबराबर लागली आहे. जहागीरदारांचे हाजरीबरहुकूम व चाकरीचे मतीबरहुकूम तेव्हांपासून रदबदली बहुत पडली. त्यास हाल्ली श्रीमंत कबूल करिताहेत जे इंग्रजी सरकारचे सल्लेने हाजरीचा व चाकरीचा जबाब सवाल ठरेल त्याप्रमाणें श्रीमंतांचे सरकारांतून केले जाईल. त्यास त्या सरदारावर इंग्रजी सरकारचे मसलती शिवाय हुकूमत श्रीमंताचे सरकारांतून करू नये. सरदारांचे सनदेतील जमीन श्रीमंतांचे सरकारांत असल्यास ती जमीन त्या सरदारांस द्यावयाचे श्रीमंत कबूल करीत आहेत. माधवराव रास्ते यांची जहागीर सन खमसांत सरकारांत जप्त केली आहे. ती इंग्रजी सरकारचे शिफारशीवर नजर देऊन त्याजकडे बहाल करिताहेत. जसें पेशजी इंग्रज सरकारचे बहादरीनें त्याजकडे चालत आहे. त्याचप्रमाणे चालेल ह्मणोन श्रीमंत कबूल करीत आहेत.

(१७) मळेघाट व त्या इलाख्यातील जो मुलूक इंग्रजी सरकारचे मसलती शिवाय श्रीमंतांचे फौजेने सन इहिदे अशरचे सालांत घेतला आहे त्याणें मुशारीख यास बहुत इजा होते आहे. याजकरितां त्याजवर नजर देऊन मळेघाटांतून लष्कर काढून आणून तो मुलूक सोडावयाचा करार श्रीमंत करीत आहे. व याशिवाय सन इहिदे अशरचे सालांत आणखी मुलूख श्रीमंतांचे फौजेने घेतला असल्यास तोहि सोडून द्यावयाचा कबूल करताहेत. त्या मुलखावर श्रीमंतांचा दावा राहणार नाही.

(१८) हा तहनामा अठरा कलमांचा लिहिला असे. ता. १३ माहे जून सन १८१७ इसवी,  छ २६ रज्जब सन १२३२ हिजरी. मुकाम पुणें.
(१८) तहनाम्यातील सातवे कलमांत श्रीमंतांचे सरकारांतून इंगजी सरकारांत मुलूक लावून द्यावयाचा करार जाहाला आहे. त्याचा कागद ह्या तहनाम्याबराबर दिल्हा आहे असे कलमांत लिहिले आहे तो कागद. मुलूक लावून द्यावयाची बेरीज रुपये ३४००००० यासी कलमें :-

(१) तूर्त महाल हवाली करावे :- बेलापूर व वोटगाव प्रांत कल्याण व त्याचे उत्तरेस गुजराथ पावेतों सह्याद्रीचे घाटापासून समुद्रापर्यंत जितका श्रीमंतांचे सरकारच मुलूक व अंमल आहे तो दरोबस्त.

(२) प्रांत गुजरात येथील प्रांत अमदाबाद व उर्पाड व गायकवाड याजकडील सालीना खेरीज करून बाकी जितका श्रीमंतांचे सरकारचा मुलूक व अंमल आहे तो दरोबस्त.

(३) काठेवाडची खंडणी खेरीज करून ठराव रु. ४०००००
[ ४ ] तालुके धारवाड व कुशेगळ.
____