पै॥ छ ११ मोहरम. लेखांक २३. १७०१ मार्गशीर्ष व॥७.
सन समानीन, पौषमास, मुक्काम पट्टण. श्री. २९ दिसेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं : -
पो॥ हरी बल्लाळ सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः- नवाब हैदरआलीखां बहादूर यांणीं पुत्राचे शाद्वीचे थैली पत्र पाठविलें, तें पोहचू (न) बहुत संतोष जाला. इकडून शादीचा आहेर वस्त्रें व सिरपेंच रकम एक पाठविली, त्याची याद अलाहिदा आहे. त्याप्रमाणें तुह्मीं व राजश्री नरसिंगराव मिळोन इकडील आहेर नवाबांस प्रविष्ट करावा. अदवानीचा हांगामा सत्वर मना व्हावा. नाहींतरी मोठे पेंच आहेत. याजकरितां नवाबबहादर यांसी बोलून, हांगामा मना होऊन बहादरांचें निघणें चेनापट्टणाकडे लौकर व्हावें. दिवस कांहीं राहिले नाहींत. नवाब निजामआलीखां बहादूर यांची सर्व तयारी जाली. अदवानीचा महसरा ऊठला ह्मणजे करारप्र।। सिकाकोल राजबंदरीकडे जातील. इकडील फौजा गुजराथ प्रांतीं गेल्या. सरदारही सत्वरच जातील. भोंसले यांचीही फौज जमा जाली. थोडे दिवसांत बंगाल्यांत नमूद होतील. करारप्र॥ तुह्मीं कारभार उगऊन लौकर यावें. वरकड सविस्तर श्रीमंतांचे पत्रावरून कळेल. र॥ छ २० जिल्हेज बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
राजश्री गोविंदराव व गणेशपंत स्वामींस सं॥ नमस्कार विनंति उपरी. लिहिलें परिसीजे. लोभ असो दीजे. हे विनंति.
श्री.
यादी नवाब हैदरआलीखानबहादूर यांजकडे शादीबद्दल बहुमान येणें प्रों। हरी बल्लाळ
७ | सनगें तमामी |
१ चिराबादली | |
२ जामेवार जोडी | |
१ किमखाप | |
१ पटका जरी | |
२ शाला फर्द | |
----- | |
७ | |
१ | जवाहीर सिरपेंच |
--- | |
८ |
सात सनगें व एक जवाहीर रकम त॥ सांडणीस्वार छ २१ जिल्हेज.