पै।। छ ११ मोहरम, सु।। लेखांक २४. १७०१ मार्गशीर्ष व॥८.
समानीन, बुधवार, मु।। पट्टण. श्री. ३० दिसेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं:--
सेवक आनंदराव नरसिंह कृतानेक सां।। नमस्कार विनंति. येथील क्षेम मार्गशीर्ष व॥ अष्टमी गुरुवारपावेतों आपले कृपेंकरून यथास्थित जाणून स्वकीय कुशल लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेषः-आपण सुमुहूर्त करून स्वार होऊन गेलियानंतर, हजरत नवाबसाहेब यांनीं लग्नपत्रिकेच्या थैल्या, श्रीमंत राजश्री पंतप्रधान आदिकरून सर्वांस पाठविल्या, त्या पावत्या करून संतोष समाचार सांगितला. त्यावरून श्रीमंत इत्यादिकांनीं वस्त्रें जवाहीर षुतरस्वारां ब॥ आपणांकडे र॥ केले आहेत. आपण मजल दरमजल गेलेच असतील. पट्टणास जाऊन पावलियानंतर नवाबसाहेबांची भेट होऊन बोलणें जाहलियाचे संतोषवृत्त कळवावें. बहुत काय लिहिणें ? कृपा असावी हे विनंति.