प छ ११ मोहरम सन समानीन. लेखांक २७. १७०१ मार्गशीर्ष व॥ ११.
बुधवार मु।। पट्टण. श्रीशंकर प्रसन्न. २ जानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल त।। छ २४ जिल्हेज जाणून स्वकीय लिहीत गेलें पाहिजे. विशेषः-- आपणाकडील पत्र येऊन कुशल वृत्त कळत नाहीं, तरी सविस्तर लिहीत असावें. यानंतर इकडील म।। राजश्री गोविंदराव नारायण व राजश्री गणपतराव केशव यांस सविस्तर लिहिला आहे, त्याजवरून कळों येईल. निरंतर पत्रीं आनंदवीत जावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा. हे विनंति.