लेखांक १४६.
१७०२ ज्येष्ठ शु. ७. श्रीशंकर प्रसन्न. १० जून १७८०.
राजश्रीया विराजीत राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लेखन करीत जावे. विशेष. आपण सातारीयाहून निघोन लष्करांत गेलियातागाईत वर्तमान कळत नाहीं. तरी सविस्तर ल्याहावें. इकडील मजकूर राजश्री आनंदराव निंबाजी यांचे पत्रीं लिहिला आहे, त्यावरून कळों येईल. निरंतर पत्रीं संतोषवीत जावें. बहुत काय लिहिणें लोभ करीत जावा हे विनंति.