पो। छ ९ मोहरम सन. लेखांक २०६. १७०३ पौष शु.१०.
इसन्ने समानीन. श्री. २५ डिसेंबर १७८१.
विनंति ऐसीजे. आपण आह्मांस रुइदार आंगरखा सिवऊन देतों ऐसें ह्मणाला होता. त्यास बहुत दिवस जाले, विस्मृती जाली असेल. सांप्रत झगा सिवणे करितां गुजराथी शाहणा सिंपी सावनूरचा आणविला आहे. आपण आंगरखा सिववणें जाहल्यास आपल्याकडे घेऊन येतों. याचें उत्तर पाठवावें. हे विनंति.
माझे शरीरीं समाधान नाहीं, याजमुळें गोष्ट राहिलीः छीट सिद्ध आहे. आंगरखा आपले आंगचा बेतून तयार करावा. हे विनंति.