पै।। छ १६ लेखांक २०९. १७०३ फाल्गुन शु।। २.
इसन्ने समानीन. श्रीशंकर प्रसन्न. १४ फेब्रुवारी १७८२.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करित जावें. विशेष, आपण पत्र पो। तें पावलें. मकरसंक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले ते पावोन अत्यादरें स्वीकार केला. निरंतर पत्रीं संतोषवित जावें. रा। छ १ रोवल बहुत काय लिहिणें लोभ करीत जावा हे विनंति.
पो। लक्ष्मणराव भिकाजी व गंगाधरराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरि आपण मकरसंक्रांतीचे तीळ शर्करायुक्त पाठविले ते स्वीकार केला. बहुत काय लिहिणें लोभ करीत जावा हे विनंति.