पौ। छ ९ मोहरम सन. लेखांक २०५. पो। १७०३ पौष्य शु॥ १०.
इसन्ने समानीन. अलीफ. २५ डिसेंबर १७८१.
राव अजम कृष्णराव साहेब सलाम लाहुतालाः-
रावसाहेब मुषफक मेहरबां करमफर्माय मोखलिसां अजीं दिल ऐखलास नूर महमदखां लोहाणी सलाम बादज सलाम खैर्यत अंज्याम मोहवल मकसूद आं कीं येथील खैर सला जाणून साहेबीं आपली खैरखुषी कलमीं करीत आलें पाहिजे. दिगर मेहरबानगी करून साहेबीं च्यार पांच खत राव रास्ते यांच्या विद्यमानें पाठविलें तें व हुजरेबराबर एक पत्र पाठविलें तें पाऊन फार खुषी हासल जाहली. आह्मींहि दोनी तिनी खत साहेबांचे खिदमतेमध्यें पाठविलें तें पोंहचले असतील. साहेबीं आपणावर हजरत नवाबसाहेब फार मेहरबानी करितात ह्मणोन लिहिलें होतें. तर खोदाके फजलसे साहेबांस उमदे खानदानी वजेनें हजुरचे मर्जीदान जाणोन दया करीत जातात. आह्मीं साहेबाचे सबवजेनें मोखलिस एकदिल असों व फजल इलाही नवाब साहेबांची मेहरबानी साहेबांवर रोज बरोज ज्यादा होत जाईल. येथील हकीकत व कामकाजाचा मनसुबा सब आपले कडील लिहित असतील. हमेषा षफकत नानाकडून दिलषाद करीत आलें पाहिजे. जैसें हजरत नवाब साहेबाकडून दुषमनाची तंबी दिनप्रति होत जाते त्या प्रकारें इकडेहि दुषमनावरी ताण बसवणेंत मनसुबेस इतके दिन लागते. या मजकुरास आपण पदोपदीं मदारुलमहाम यांस लिहित असाल. कसल मेहरबानगी ठेविली पाहिजे. दराज काय लिहिणें ? हे किताबती.
बरखुनदार अल्लिमियाकडून फार फार सलाम महसूल केलें पाहिजे.
निजसेवक कोनेरी नरसिंह कृतानेक साष्टांग नमस्कार. पूर्ण वात्सल्य ठेवून कृपापत्रीं सनाथ करावें. हे विनंति.
महाराज राजेश्री कृष्णराऊ स्वामींचे सेवेसीं. सेवानुसेवक आंचे व्येंकटरमणैय्या सं॥ नमस्कार. पूर्ण कृपावात्सल्यपुरःसर ममता करावें. सर्वज्ञास विशष लिहणेस शक्त न हो.