Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

महमद अनसान विज्यापुरी याचे                                                 लेखांक १०२.                                                         १७१४ पौष वद्य १३.
वकील यशवंतराव दत्तात्रय यांचे
मागीतल्यावरून दोन पत्रे लिहा त्यास
बळवंतराव हरी धारासीवकर यांचे
पत्र खाजगीच जुजांत लिा आहे व
निंबाजी नाईक निंबाळकर याचे पत्र
रा छ २६ जावल.

राजश्री निंबाजी नाईक निंबाळकर गोसावि यांसी-
5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असले पाहिजे विशेष महमदअनसान बिज्यापुरी जागीरदार देहात पा कांठी व पारडी यांची अर्जी नवाब बंदगानअली यांस आली कीं निंबाजी नाईक निंबाळकर याणी जमाव करून मौजे वडगाव पा कांठी आमचे जागिरीपैकी मारून ताख्तताराज करून चीजवस्त नेली व ठाणे घेतले आहे त्यास येविसीचा बंदोबस्त जाला पा ह्मणोन त्याजवरून बंदगानअली यांचे फर्मावण्यात की तुह्मीं पत्र लेहून मौजे मारचे ठावे व चीजवस्त काय नेली आहे ते देवावी नाही तर याचा तदारुक केला जाईल त्याजवरून हे पत्र लिा असें की मौजे मारची चीजबस्त वगैरे काय नेली असेल ते व ठाणे माघारें द्यावें उगाच खटला करणे ठीक नाही अथवा कांही जाबसाल असल्यास लेहून पाठवावें त्याप्रो एथें बोलून बंदोबस्त करून द्यावयास येईल रा छ २६ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

राजश्री आबाजी बलाळ फडके                                                     लेखांक १०१.                                                         १७१४ पौष वद्य १३.
अवरादकर यांचे पत्राचे उत्तर त्यांचे
माणसा बार रा छ २६ जावल.

राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री आबाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराघ कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित आसिलें पाहिजे विशेष तुह्मी पत्र पाठविलें तें पाऊन मार समजला मौजे अवरादकर मुलाणा व मौजे किटे पा कल्याण एथील येलम याणी जमयेत गोळा करून किट्यात जाऊन तेथील मखदूम पाटील यास जिवे मारून अवरादेस आले यांचे वर्तमान आह्मास ठाऊक नव्हते समजल्यानंतर मुलाण्यास धरावयास पा तो मुलाणा पळोन गेली त्यांचे घरांत येलम व आणिक तीन आसाम्या सांपडल्या ते आणून कैद केलें याचे वर्तमान मीरसादतअलीखान अमील कल्याणकर यांस समजल्यानंतर त्याणी आसाम्या मागविल्या प्रथम आह्मी टाळा दिल्हा दुसरी वेळा पत्र पा तेव्हां येलमास त्याचे हाती दिल्हे हालीं तीन आसाम्या आणखी मागतात नाही तरी गांवावर पेठेवर हांगामा करणार त्यास येविसी काय आज्ञा ह्मणोन लिहिलें ऐसियास आसाम्या त्यांचे हाती न द्याव्या हे गोष्ट मार्गाची परंतु तुह्मी जे पत्र खानमार यांस लिहिलें त्यांत तुमचा दस्तैवज गुंतला आहे की आसाम्या आह्मापासी आहेत जे वेळेस मागाल ते समईं पाठऊन देऊ ते पत्र खानमार याणी नवाब ममताजुलउमराबाहादूर यांजपासी पा त्याणी आह्मास पाहावयास पा त्यात दस्तैवज जिमा जाल्या प्रो आहे याउपरि आसाम्या न देण्याविसी बळ करावें तरी मौजे मारचे आसपास अगदी पागावाले व कल्याणकर याचा उपद्रव गांवास जाल्यानंतर गांवची व पेठेची खराबी होईल याजकरितां तुह्मास पत्र लेहून दिल्हे आहे व नवाब मवसूफ यांचे थोरले मोहरेचा कौल गावास व बेपारी वगैरेस व एक पत्र खानमार यांचे नावें तुमचे व गावचे व पेठेचे साहित्याविसी घेऊन पा आहेत त्यास तीन आसाम्या खानास देऊन तुमचे व आमचे पत्र व आसाम्या पावल्याची रसीद घ्यावी व मुलाण्याचा शोध करून धरून कैद करावे त्याची रांडापोरे गावात असतील त्यास कैदेत ठेवावें असे बखेडेखोर लोक असतील त्यास वरचेवर जपून असावें गांवचा बखेडा जाल्यास राजश्री तात्याचा शब्द लागेल ते न करावें वरचेवर तेथील वर्तमान लिहित जावें रा छ २६ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

गोपाळराव नळेगांवकर याणी                                                      लेखांक १००.                                                         १७१४ पौष वद्य १२.
गोविंदराव यांचे पत्र आपले कार्याकरितां
घेऊन पा होते त्याचे उत्तर गोविंदराव
याचे जुजांत लिा आहे व रावमजकूर
याचे पत्राचा जाब रा छ २५ जावल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोपाळराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष तुह्मी पत्र पा ते पाऊन मार समजला सजावरुदौला फौजेसुधा माठीचे गढीचे बंदोबस्ताकरितां नळेगांवानजीक आहेत त्यास न जाणो दगा करतील याजकरितां नवाब अजममुलउमराबाहादूर यांसी बोलून त्याचे पत्र दौलास यावे की नळेगावचे नाव न घ्यावे ह्मणोन लिहिले त्यास दौला एथील आज्ञे प्रो फौजसुधां तिकडे आहेत नळेगावास उपद्रव कसा करतील आज आपणहून बाहादूरमार यांस स्मरण करून पत्र मागणे हे ठीक नाही त्यास हरएक प्रकारें बोलून बाहादूरमार यांचे पत्र घेऊन पाठविण्यात येईल येविसी आह्मासहि आगत्य आहेच तुह्मीं ल्याहावेंसे नाही रा छ २५ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

आबाजीपंत फडके यांचे पत्राचा                                                       लेखांक ९९.                                                         १७१४ पौष वद्य १२.
जाब रा छ २५ जावल सन १२०२.

राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री आबाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष तुह्मी पत्र पा तें पाऊन मजकूर समजला मौजे आवराप एथील मुलाणा व येलम मौजे किटे पा कल्याण याणी कांहीं जमयेत करून किट्यास जाऊन तेथील मखदूम पाटील यास जीवें मारून आले हें वर्तमान आह्मास कांही ठाऊक नाही समजल्यानंतर मुलाणा याचे घरी त्यास धरावयास पाठविलें तो मुलाणा पळोन गेला हाती लागला नाही एक येलम व दोन व दोन तीन चाकरमाणसें हाती लागलीं त्यास धरून कैद केले आहे हें वर्तमान मीर सियादतअलीखान अमील पा कल्याण यांस समजल्यानंतर त्याणी आह्मास पत्र लिहिले की आसाम्यास पाठऊन द्यावें प्रथम आह्मी थाक लागूं दिल्हा नाही दुस-याने पत्र आलें तेव्हां ऐलमास त्यांचे हाती दिल्हे बाकी असाम्या कैदेत आहेत त्या मागतात त्यास असाम्या न दिल्या तर गांवावर व पेठेवर हांगामा करणार एक पेठेस धका बसल्या बाजार मोडतो त्यास येविसीं जसी आज्ञा येईल तसें करीन ह्मणोन लिहिलें त्यास तीन आसाम्या कैदेंत आहेत त्या मीरमजकूर यांचे हवाली करून तुमचे पत्र सियादतअलीखान बाहादूर यांजपासी आसाम्या आह्मांपासी आहेत जे वेळेस मागाल ते वेळेस पाठऊन देऊ ह्मणोन आहे ते माघारें हे पत्र घेऊन तीन आसाम्या मीरमवसूफ यांचे हवाली करून रसीद घ्यावी व एथून नवाब मुमताजउलउमरा बाहादूर यांचे मोठे मोहरेचा कौल गांवास व पेठेस व बेपारी वगैरेस घेतला तो व एक पत्र मीरसियादतअलीखान अमील पा कल्याण यांचे नावे नवाब-मवसुफ यांचे तुमचे हरएकविसी साहित्य करण्याकरितां व कौल देण्याविसी वगैरे एकूण दोन पत्रें पा आहेत पावतील पावलि याचे उत्तर पाठवावें र॥ छ २५ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

जाब आनंदराव मोरेश्वर यांस                                                         लेखांक ९८.                                                         १७१४ पौष वद्य १२.
छ २५ जावल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आनंदराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावे विशेष तुह्मी पत्र पो ते पो आंबे सुमार २० वीस पो ते पोंहचले गैर मोसमात आंबे आले यावरून कौतुक वाटलें तुह्मी आपल्याकडील वरचेवर वर्तमान ल्याहावे ऐवजाच्या वराता जाल्यावरून मोठी निकड लागली येविषई नवाब अजमुलउमराबाहादूर यांसी बोलून मनाईचे बंदोबस्ताविषई तपसीले लिो त्यास नवाब मवसूफ यांसी निक्षुण बोलावयाचे प्रकारे बोलून मागाहून तुह्माकडे लिहिण्यात येईल रा छ २५ जावल बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.

घटाले यांचे नावें रसीद तिमणी                                                      लेखांक ९७.                                                         १७१४ पौष वद्य १०.
नाईकाचे पत्रांत रवाना केली खांसाहेब
मेहरबान दोस्तांमहमद हुसेनखां
बाहादूर सलामत.

5 आजदिलयेखलास गोविंदराव कृष्ण सलाम आंकी पा मंगथल वडमान अमरचिता व कडेचूर एकूण च्यार महाल एथील मोकासा बाबती व सरदेशमुखीचें मामलती बाबत सन ११९९ फसली सालचा ऐवज रुपये १७२५० सतरा हजार दोनसें पंनास सदरहुची तनखा आपल्यावर नवाब बंदगानअली यांचे सरकारांतून आली त्याचे फडच्याचा करार छ १२ माहे जमादिलावल सन १२०२ चे वायद्याचा केला सदरहु सतरा हजार आडिचसें रुपये आपण दील्हे ते पावले असेत छ माहे जाखर सुरा सलास तिसईन मयां व अलफ फसली १२०२ महमदहुसेनखान घटाले यांचे नावें पारसी पत्र सदरहु मजकुराचें रवाना केलें तें पारसी जुनावर दाखल जालें.

                                                                                               लेखांक ९६.                                                         १७१४ पौष वद्य १०.
पु।। राजश्री तिमणा नाईक स्वामीचे सेवेसी-
विनंति उपरि घटाले यांस व अमोलिकराम वकीलाचें दोन पत्रें पारसी लखोटे पाठविले हे देऊन सतरा हजार अडिचसें रुपये त्यांजकडून घेऊन स्वार प्यादे मागोन घेऊन ऐवज नगदी रवाना करावा सदरहु ऐवजाची रसीद खानमार याणी आमची मागीतल्यास रसीद पा आहे ऐवज सवासतरा हजार झाडून पदरी घेऊन मग रसीद द्यावी ऐवज बहुत माफजादीने एथें पोहचत करावा हुंड्याची सोय असल्यास हुंड्या करून पाठवाव्या त्याची हुंडावन भावा प्रा खानमार याणी दिल्यास हुंड्या पाठवाव्या हुंडावन देण्यास दिकत करतील तर नगदी ऐवज हैदराबादेस आपले प्यादे स्वार देऊन पोंहचता करावा ऐसें बोलावें येविषी त्यांजला आह्मी व अमोलिकराम याणी लिहिलें आहे ऐवज घेऊन रसीद अमोलिकराम यांजपासी देऊ यात्रा प्रथम बोलावें रसीद घेतल्यासिवाय ऐवज देण्याची दिकतच पडली तर ऐवज झाडून घेऊन मग रसीद द्यावी थोडाबहुत ऐवज देऊं लागल्यास रसीद देऊ नये माघारी पाठवावी समजोन लिहिल्याप्रा चौकसीने काम करून पाठवावें रसीदीवर तारीख घालण्याची जागा टाकिली आहे ज्या दिवसी ऐवज पदरी पडेल ते तारखेचा आंख रसीदीवर घालून देणे बहूतकरून रसीद तेथे देऊ नये एथें अमोलिकरामापासी देऊ ऐसें बोलावें अथवा सदरहु ऐवज पावल्याचें कबजपत्र आमचे नावें तुह्मी लेहून घटाले याजपासीं द्यावें की रुपये पावले रसीद अमोलिकराम यांस आपण द्यावी या प्रा पत्र तुह्मी द्यावें तें पत्र अमोलिकरामापासोन घेऊन रसीद एथें देऊ यास्तव तुह्मी तेथें रसीद न द्यावी इतक्यावर रसीदीचा फारच आग्रह पडल्यास द्यावी ऐवजाच्या हुंड्या घेऊन पाठवाव्या हुंडावन देण्यास घटाले दिकत करूं लागल्यास हुंडावनीचा भाव तेथें काय हें लेहून पाठवावें इकडून लेहूं त्याप्रा हुंड्या करून पाठवाव्या नगदी ऐवजासमागमे स्वार प्यादे जमा व बादरका चांगला दिल्ह्यास ऐवज रवाना करावा नाही तर पांच च्यार प्यादे देऊ लागल्यास ऐवज येण्याची निभावणी होणार नाही यास्तव नगदी ऐवज पाठवण्याचें न करावें हुंड्याची सोय करून रवानगी करणे नगदी ऐवज आणावयाची सोय नाही वाटेचे जखमेचा घोर याजकरितां हुंडावनीचा भाव सेंकडा काय आहे याचा शोध नारायणपेंठ वगैरे जागीं करून ल्याहावें एथून लेहुं त्याप्रा हुंड्या करून पाठवाव्या रा छ २३ जावल हे विनंति.

तिमणी नाईक भागवत दलाल                                                      लेखांक ९५.                                                         १७१४ पौष वद्य ६.
अमरचितेकर यांजला जासुदाबराबर
पत्र र।। छ १९ जावल.

राजश्री तिमणा नाईक भागवत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जाणें विशेष महमहुसेनखान बाहादूर घटाले याजवर नवाबाचे सरकारातून तनखा पा मंगथल अमरचिता वडमान कडेचूर या च्यार माहालचे स्वराज्याचे मामलतीबाबत आह्माकडे ऐवजाचा फडच्या करून देण्याच्या जाल्या

१७२५०  सन ११९९ सालबाबत याचा वायदा खानमार याणी छ १२ जावल पौष–मासचा केला.

१७२५०  सन १२०१ बाा याचा वायदा छ १२ रमजानचे मुदतीचा खान मारनिले यांचा.
-----------
३४५००

चवतीस हजार पांचशे रुपयांच्या दोन तनखा याचे वायदे सदरी लिहिल्याप्रा खान मारनिले याणी करून करारनामा लेहून दिल्ही त्यापैकी छ १२ जमादिलावल पौष–मासचा वायदा गुजरून गेला सतरा हजार आडिचसें रुपये यावे याजकरितां एथें त्याजकडील वकील आमोलिकराम यांजला तगादा केला मारिनिलेनी करार केला कीं मंगथल एथें महमहुसेनखान आहेत त्यांस पत्र लेहून देतों तें आपले पत्रासुधा त्यांजकडे पाठऊन ऐवज घ्यावा याप्रा नवाब अजमुलउमरा बाहादूर यांजपासी करार करून अमोलिकराम याणी खानमार यांस पत्र लेहून दिल्हें तें व आह्मी आपलें पत्र पाठविले आहे दोन्ही पत्रें तुह्मी खानमार यांजकडे मंगथळास अथवा जेथे असतील तेथे नेऊन द्यावी आणि ऐवजाची निकड करून सवासतरा हजार रुपयांच्या हुंड्या हैदराबादचे साहुकारावर त्यांजकडून घेऊन जासुदासमागमे पत्राचे जाबासुधा रवाना कराव्या हुंड्याची सोय नसल्यास नगदी ऐवज त्यांजकडील स्वार व प्यादे समागमे देऊन एथें पोहचता करावा याप्रा खानमार यांचे पत्रीं अमोलिकराम यानी लिहिले आहे तरी तुह्मी पत्र पावताच त्यांजकडे जाऊन लिहिल्याप्रो ऐवजाचें काम करून लौकर पाठवावें वायदा गुजरून अधिक दिवस जाले यास्तव निकड करून ऐवजाच्या हुंड्या अथवा नगदी लिा प्रा रवाना करावा रा छ १९ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

गोविंदराव व मल्हारराव व्यंकटेश                                                    लेखांक ९४.                                                         १७१४ पौष वद्य ६.
निा सरदेशमुख कलबर्गे यांस.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव व मल्हारराव स्वामीचे सेवेसी. पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जाणे विशेष मौजे तिन्ही व मौजे कपनूर वगैरे देहात पा कलबर्गे जागीर मीरइभराईमआलीखान बाहादूर एथील चुकोती सालगुदस्ताची सरदेशमुखीची तुह्मी करून घेतली नाही जागीरदार माजून तगीर होऊन हली यांजकडे जागीर जाली त्यास यांचे विद्यमाने सालगुदस्ता व सालहालची चुकोती करून वसूल घ्यावा व सालमारी खुष्क-साली जाली आहे त्यास रयतीस कांही सूट देतील त्या प्रा स्वराज्याकडूनहि देवावी ह्मणोन राजश्री राजे रायेरायां बाहादूर याणी सांगून पाठविले त्याजवरून हें पत्र लिा असे कीं सालगा व सालमारची चुकोती जागीरदारमार यांचे विद्यमाने करून मामुल प्रा वसूल घ्यावा ज्यादा तलबी न करावी व जागीरदार यांचे हरएकविसी साहित्य करीत जावें रा छ। १९ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

रायेराय याणी पत्रें कलबर्गेकर                                                        लेखांक ९३.                                                         १७१४ पौष वद्य ६.
मौकासी व सरा मुख्यांस मागितलीं
सबब रघुनाथ गोविंद व गोविंदराव व
मल्हारराव व्यंकटेश-निा सरदेशमुख
यांस दोन पत्रें छ १९ जावल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रघुनाथपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जाणे विशेष मौजे तिन्ही व कपनूर वगैरे देहात पा कलबर्गे जागीर मीरइभराईमअलीखान बाहादूर एथील चुकोती सालगुदस्ताची चौथ वगैरेची तुह्मी करून घेतली नाही जागीरदार तगीर होऊन हली यांजकडे जागीर जाली त्यास यांचे विद्यमाने सालगुदस्त व सालहलची चुकोती करून वसूल घ्यावा व सालमारी खुष्कसाली आहे त्यास रयेतीस कांही सूट जागीरदार देतील त्याप्रा स्वराज्याकडूनहि देवावी ह्मणोन राजश्री राजे रायेरायां याणी सांगून पाठविलें त्यावरून हें पत्र लिा असे कीं सालगु।। व सालमारची चुकोती जागीरदार यांचे विद्यमाने करून मामुल प्रा वसूल घ्यावा ज्यादा तलबी न करावी व जागीरदार यांचे हरएकविसी साहित्य करीत जावें रा छ १९ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.