Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
तिमाराव देशपांडे यांस सैदमुजवरखां लेखांक ११०. १७१४ पौष वद्य ८.
व बाजीराव यांची पत्रे घेऊन पाठविली.
सैदमुजवरखान यांचे तिमारावजी सलमहु रावसाहेब मेहरबान दोस्तां आज तारा सैदमुजवरखांजी.
सलाम बाजद सलाम महवल मकसूद आं की एथील खैर छ २१ माहे जावल मुा शहर हैदराबाद जाणून तुह्मी आपली खुशखबर लिहून दिलआरामी करीत जाणे दिगर मार रावसाहेब मेहरबान राव गोविंद कृष्ण यांची तनखा सरकारातून चाळीस हजार रुपयांची पेशजी जाली त्याचे नवाजषनामे दोन अखेर रावलचा वायदा वीसहजाराचा व दुसरा वायदा अखेर शाबान वीस हजाराचा या दो वायद्यापैकी अखेर रावलचा करार गुजरून गेला एथे त्यानी ऐवजाकरिता निकड लाविली याजवरून आपणास लिहिलें जाते जे रावसाहेब गोविंद कृष्ण यांचे मोहरेनसी रसीद विसा हजार रुपयाची व हें पत्र भुकणदास व्यंकटीदास साहूकार यांचे गुमास्ता हे दोन्ही दस्तऐवज घेऊन येतील ते आपणाजवळ ठेऊन ऐवज त्यांचे पदरी घालून सावकाराचे गुमास्तियाचें कबज घ्यावें व नवाजष-नामा या वायद्याचा रावसाहेब गोविंद भगवंत पुनियास गेले त्याचबरोबर गेला सबब मुजरद हरकारा यांचे पत्र नवाजषनामा आणावयास पा असे तोहि आठ चव रोजानी येईल आणि चाळसा हजार रुपयांचा तमसुक आहे त्याजवर वसूल मांडून देऊ ऐवज देणियास दिकत हरगीज न करावी पत्र पावताच ऐवज घ्यावा ज्यादा काय लिा हे किताबत ताजाकलम सावकाराचा गुमास्ता वसमतीस येणार नाही तुह्मी गोपाळ नाईक सराफ याजबराबर सदरहू रुपये नांदेडी पाठवून साहेब मोहिदीन यांचे मारफातीने देऊन कबज रसीद घ्यावी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रसीद वीस हजाराची बाजीराव लेखांक १०९. १७१४ माघ शुद्ध ५.
अमील व तिमाराव देशपांडे
वसमतकर यांचे नावें.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाजीराव अमील व तिमाराव देशपांडे पा वसमत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि पा उमरखेड या माहालापासोन शाहामिर्जा याणी ऐवज घेतला तो नवाबाचे सरकारांतून येणे त्याऐवजी पा मारचे ऐवजी चाळीस हजार रुपयाची तनखा आमची तुह्मावर जाली त्याचे नवाजषनामे दोन पैकी अव्वल हप्ता माहे रावल अखेरचे वायद्याचा रुपये २०००० वीस हजार सदरहू वीस हजार रुपये मा मेहरबान सैदमुजवरखान अमील पा मार दिल्हे ते पावले असेत छ ३ जाखर सुा सलास तिसईन मया व अलफ सन १२०२ बहुत काय लिहिणे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
तिमाराव देशपांडे वसमतकर यास लेखांक १०८. १७१४ माघ शुद्ध ५.
पत्र मुजरद जासुदाबराबर व्यंकटीदास
याचे गुमास्त्यासमागमे रवाना.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमाराव देशपांडे पा वसमत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून खकीये लिहीत जावे विशेष श्रीमंताचे सरकारचा ऐवज नवाब बंदगानअली यांचे सरकारातून येणे त्याऐवजी चाळीस हजार रुपयाची तनखा सैदमुजवरखान यांजवर पा मारचे ऐवजी जाली त्याचे वायद्याचा करार माहे रावल अखेर वीस हजार व अखेर माहे साबान बीस हजार यात्रा दोन मुदतीने चाळीस हजाराचा फैसला करून देण्याचा करार खानमार व राजश्री बाजीराव अमील पा मार याणी करून करारनामा लेहून दिल्हा त्यास माहे रावल अखेरचा वीस हजाराचा वायदा गुजरून अधिक दिवस जाले ऐवजाकरितां खानमार व बाजीराव उभयतांस तगादा केला मारनिलेचे बोलणें की माहाली वीस हजार रुपये जमा आहेत कोणी आपल्याकडील पाठऊन ऐवज घ्यावा त्यावरून एथून हरकिसनदास साहुकार व्यंकटीदास भुकणदासाकडील पाठविला आहे खानमार व बाजीराव उभयतानी तुमचे नांवें पत्रें वीस हजार रुपये नांदेडी हरकिसनदास याजपासी पोंहचाऊन देऊन रसीद व कबज घेण्याविषई ता लिहिलें आहे त्यास पत्र पावतांच वीस हजार रुपये हैदराबाद चलनी नांदेड एथें हरकिसनदास याजपासी पोंहचाऊन देऊन त्याजपासोन रसीद आमची मोहरेनसी व कबज घ्यावें ऐवजाचा वायदा होऊन फार दिवस जाले याउपरि लिहिल्याप्रा बेदिकत ऐवज पोंहचाऊन द्यावा यास दिवसगत लागो नये हरकिसनदास अथवा राजाराम दोघातून एक नांदेडी येतील त्यांचे पदरी सदरहू वीस हजार रुपये घालून रसीद व कबज घ्यावी दिकत न करितां राजाराम साहुकार याजला नांदेडी ऐवज पावता करून द्यावा रा छ ३ जाखर बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
छ ३ जाखरी रवानगी पत्रें राजे लेखांक १०७. १७१४ माघ शुद्ध ५.
व्यंकटपा नाईक यांचे पत्राचा जवाब.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहेरीबाहादूर गोसावि यास- सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष आपण पत्र पाठविलें ते पावलें शिवापास यापूर्वी रवाना केलें त्यासमागमें पत्रें पावोन कळलें असेल सुभराव व गोविंदपास पुण्याकडे तिमापा व श्रीपतराव समागमे देऊन रवानगी केली तेथें जाबसाल ठरेल तो राजश्री गोविंदराव आपणास लिहितील सरसुभेदार यांजबाबत लाख रुपयाची रसीद चौघा मारनिलेबराबर पुण्याकडे पाठविली इतके दिवस शरीरी समाधान नवतें सबब दिवसगत लागली हली पुण्याकडे यांची रवानगी केली तोपावेतो मंत्रीची मर्जी सुधारणे आपल्याकडे ह्मणोन ता लिहिलें त्यास सिवापा यांची रवानगी आपण केली मारनिले एथें आले पत्र दिल्हें त्याचे उत्तर इकडून पेशजीच रवाना जालें पोंहचून मार समजला असेल सुभराव गोविंदआपास तिमापा श्रीपतराव बराबर देऊन पुण्याकडे पाठविलें तेथे जाबसाल ठरून मग इकडे ल्याहावयाचें त्यास पूर्वी आपल्याकडून जाबसालास तिमापा व श्रीपतराव उभयतां आले त्यासमई मंत्रीसि किती प्रकारें व कसें बोलणें जालें हैं उभयतांनी सांगितल्यावरून समजण्यांत आलें असेल एक महिन्याचा करार ठरला कीं जाबसालाचा मुनका करून यावें असें असतां च्यार महिने होत आले अद्याप प्रथम दिवस मंत्री नित्य सांगोन पाठवितात कीं आपले मारफातीचा जवाब सवाल याजकरितां करार गुजरून गेला असतां सबूरी करण्यांत आली याउपरि जाबसालाचे काय तें सांगावें त्यास याचे दर जवाब आजपर्यंत करावयाचे प्रकारें करून मंत्रीचे मर्जीचे संधान राखण्यांत आलें मातबर जाबसाल यास इतका विलंब असो नये चौघे मारनिले पुण्यास पोंहचून तिकडील पत्रें यावी तेहि अद्याप आली नाहीत पुढें या जाबसालाचा निश्चय व सिद्धांत कसा काय तो ल्याहावा त्याप्रा मंत्रीसी बोलतां येईल संस्थानचे कामाविषी इकडून पेशजीपासोन दुसरा प्रकार नाही पुण्याकडून जाबसाल येई तोपावेतों मंत्रीची मर्जी संरक्षण करावी ह्मणोन लिहितां त्यास मंत्रीची मर्जी संरक्षण करावी असी तुह्माकडून वर्तणूक होत नाही मीरअलमबाहादूर यांजकडील गांव व पागेवाले यांचे तालुक्यास तुह्माकडून इजा पोंहचून तेथील बोभाट मनस्वी हजुरात येतात येविषी पेशजी तुह्मास दोन पत्रें पाठविलीं हली कृष्णपा नाईक यांस गुप्तरुपें तुह्मी मदतगारी करून नाईक याणी जमीदार यांचा आश्रय करून ताडपत्री एथील पेंठ मारली याचा बोभाट आला याविसी अजमुलउमरा याणी तुमचे नावें आह्मास पत्र मागितलें तें सांडणीस्वार याजबराबर तुह्माकडे रवाना केलें त्यास ऐसे बोभाट येतात हीं कारणें मंत्रीची मर्जी दुरुस्त राहावयाची दिसत नाहीत त्यास जसें तुमचे लिहिण्यांत येतें त्याप्रा अमलातहि येत गेल्यास चांगले रा छ ३ जाखर बहुत काय लिा। लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
राजे व्यंकटपा नाईक यांचे नावें लेखांक १०६. १७१४ माघ शुद्ध ३.
पत्र अजमुलउमरा बाहादूर याणी
लेहून आह्मास पत्र ल्याहावयाकरिता
रुका व आपले पत्राचा मसोदा पा
तो पारसी जुजांत लिहिला आहे
एथून आह्मी पत्र एणेप्रा बेहरी
बाहादूर यांस लिहिले आणि आनंदराव
सभापंत यांचे हवाली केलें रा छ २
जाखर सन १२०२ फसली.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहेरीबाहादुर मुतहवरुदौला रोबजंग बहरुलमुल्क गोसावि यांसि- सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित असिलें पाहिजे विशेष हजुरांत अखबार गुजरली कीं तुमची कांहीं जमयेत स्वार व प्यादे सुरापुराहून तालुके प्यादली एथें कृष्णापा नाईक यांजपासी गेली व नाईकमार कोण्ही एक जमीदार याचे हिमायतीत बसोन सरकारअलीचे तालुक्यांत हांगामा करितात व तालुके ताडपत्री एथील पेंठ मारून लाखोची मालीयेत लुटून नेली त्यास हे गोष्ट करणे दानाई व दूरंदेशीपासोन दूर आहे हे आखबार हाजरतीनी वाचून ईर्षा केला कीं तुमचा वास्ता दरम्यान आहे याजकरितां शामूल जाला नाहीं तरी याचा तदारूक करणे लाजम आहे तुह्मी वारंवार नाईक बळवंत बहेरीबाहादूर यांचे एकनिष्ठपणाची व दूरंदेशीची अर्ज करितां आणि त्याची चाल या रितीची त्याजवरून आह्मी व नवाब अजमुलउमराबाहादुर याणी हुजूर अर्ज केला कीं आह्मी पत्र लिहिल्याचा इर्षाद जबान मुबारकेने आला कीं मुख्य ख्वाही करून लिहितील मी एकनिष्ठ आहे मजकडोन अंतर पडले नाहीं त्यास हे गोष्ट आह्मी ऐकणार नाहीं मगर याचे खरेपण तेव्हाच की कृष्णापा नाईक यांस तिघा भावासुद्धां बहेरी याणी आपल्याजवळ बोलावून घ्यावे त्याचे योगक्षेमाविसीं तुह्मी हुजूर अर्ज कराल त्याप्रो पिजिरा होईल मगर त्याचे राहणे प्यादली तालुक्यांत न व्हावें तरीच बहेरीबाहादूर यांची दौलतख्वाही व निखालसता हुजुरांत जाहेर होईल नाही तर तदारुक आमलांत येईल याप्रो मर्जी खपा होऊन फर्माविलें त्याजवरून बाहादूर मवसूफ याणी पत्र लिहिलें आहे ऐसियास तुह्माविसी आह्मी हुजुरांत बारहा अर्ज मारून करितों की राजे बहेरीबाहादूर हाजरतीचे कदमाखेरीज दुसरा अर्थ जाणत नाहीत असे अस्ता आपल्याकडोन अशा वर्तणुकी घडतात यास काय ह्मणावें त्यास याउपरि कुष्णापा नाईक यांस त्याचे भावासुद्धा आपल्याजवळ बोलावून घ्यावे त्याचे योगक्षेमाविसीं तुह्मी अर्जी करावी आह्मी व बाहादूर मवसूफ मिळोन त्यांचे योगक्षेमाविसी अर्ज करून नेमून देविले जाईल प्रस्तुत अशा चालीवरून आमचे वास्तेकरीस हाजुरांतून शब्द ठेविला त्यास याउपरि नाईकमजकूर यांस बोलाऊन घ्यावें यांत दौलतख्वाही जाहेरीत येईल नाही तरी गोष्ट कठीण पडेल सदरहू लिहिल्याअन्वये पुर्ता विचार मनांत आणून बहुत दूरंदेशीकडे दृष्ट देऊन कृष्णापा नाईक यांस त्याचे भावीसुद्धा आपलेपासीं बोलावून घ्यावे त्याचे योगक्षेमाविसीं हाजुरांत अर्ज करून बंदोबस्त करून देविला जाईल ह्मणोन अजमुलउमराबाहादूर आह्मांसी बोलिले आहेत व तुह्मासहि नवाबमवसूफ याणी पत्र लिहिले आहे तरी त्याप्रा अमलांत यावे यांतच चांगले रा छ २ माहे जाखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
वो राजश्री वरदराजाच्यार्य मणूरमाशालकर लेखांक १०५. १७१४ पौष वद्य १४.
यांचे पत्राचा जाब रा छ २७ जावल सन १२०२.
वेदमूर्ति राजश्री वरदराजाच्यार्य स्वामीचे सेवेसी-
विद्यार्थिं गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित असिले पा विशेष आपण पत्र पा ते पाऊन मारि समजला मौजे दिकसिंगी पा अफजलपूर हा गांव आह्माकडे बहुत दिवस स्वराज्या व जागीर सुधा होता दरम्यान जागिरीचे अमलास खलेल जहाला नंतर सरकारचे वकिलानी जागीरदारांसी बोलून तीनसे रुपये मख्त्यावर करार करून दिल्हा तो आजपावेतो चालला हाली सिदी इमामखान आले याणी हरकत केली आहे त्यास येविसी आपण बंदोबस्त करून दिल्हा पा ह्मणोन राजश्री नरसिंगराव कारकून यांस पा त्यास आपले लिहिल्यावरून नवाब अजमुलमुलूक बाहादूर यांस सांगोन त्यांचे पत्र सिदी इमामखान बाहादूर यांचे नांवे करून दिल्हे आहे की तीनसे रुपये दरसाल घेऊन मौजे मजकूरचा जागीर व स्वराज्याचा अमल चालवणे तुह्मी मुजाहीम न होणे त्यास पत्र नरसिंगराव घेऊन येतील त्याजवरून सविस्तर कळेल याउपरि गांव चालावयास दिकत होणार नाहीं रा छ २७ जाविल बहुत काय लिो लोभ असो द्यावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रामचंद्र सिवाजी सोलापूरकर लेखांक १०४. १७१४ पौष वद्य १४.
यांस पत्र नारायणराव देशमुख
मार्डी-कर याणी मागितल्यावरून.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रामचंद्रपंत सुभेदार स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष राजश्री नारायण जिवनराव देशमुख देशपांडे पा मार्डी यांची बहिण मैनाबाई राजश्री देशपांडे सोलापूरकर यांचे वडील पुत्रास दिल्ही त्याचा काल जाल्यापासोन या मुलीचें संगोपन यथास्थित विच्यारें धाकटें दीरानी करावें तें घडत नाही वृत्ति-विषय व श्रीमंताचे सरकारातून असामीचा अनुभव घेतात या बाईचा सांभाळ करावा तें करीत नाहींत याजकरितां मुलीचे वस्र-प्रावर्णाचा वगैरे बंदोबस्त त्याजला ताकीद करून देविला पाहिजे रा छ २७ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
नारायण जिवनराव देशमुख लेखांक १०३ ब. १७१४ पौष वद्य १४.
मारडीकर यांचे पत्राचे उत्तर आवजी
माणकेश्वर याबराबर छ २७ जावल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नारायण जिवनराव देशमुख देशपांडे पा मारडी स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष तुह्मी पत्र पाठविलें ते पावलें मुलीचें लग्न आहे याजकरितां लग्नाचे साहित्यास ऐवजाविषईं लिहिलें व राजश्री आवजी माणकेश्वर याणी सांगितल्यावरून समजलें त्यावरून राजश्री अंताजी निराजी यांस तुह्मास लग्नाकरितां पांचसे रुपये कर्जाऊ देण्याची चिटी आवजीपंतापासी दिल्ही आहे ते देऊन ऐवज सदरहु घ्यावा रोखा द्यावा व लग्नाची कार्यसिद्धी करून घ्यावी फर्मासीविषई व साहित्य करण्याकरितां अंताजीपंत यांस लिहिलें आहे रा छ ३७ जावल सलास तिसईन मया व अलफ हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
बापू जनार्दनाचे पत्राचा जाब. लेखांक १०३ अ. १७१४ पौष वद्य १३.
राजश्री बापू जनार्दन स्वामीचे सेवेसी-
सेवक गोविंदराव कृष्ण नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष तुह्मी पत्र पा ते पाऊन मारि समजला मौजे भोगांव पा मारडी एथील पाटीलकीचे वगैरे कागदपत्र समजोन घेण्याविसी राजश्री गोविंदराव आणास पत्र यावें ह्मणोन रा बाबाराव याणी आपल्यास पत्र लिा आहे त्यास मी सेवक मंजकडून कधीं असत्य गोष्ट व्हावयाची नाही इत्यादिक मार लिहिला तो सर्व समजला ऐसियास राजश्री बाबाराव यांचे लिहिल्यावरून राजश्री गोविंदराव यांस पत्र लिहिले आहे रा छ २६ जावल हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
र।। बाबाराव गोविंद वकील याचे लेखांक १०३. १७१४ पौष वद्य १३.
व बापू जनार्दन यांची पत्रें आली की
बापू जनार्दन यांचे कागदपत्र भोगांव
पा मारडी एथील पाटीलकीसमंधी
पाहाण्याविसी रा गोविंदराव भगवंत
यांस पत्र मागविले त्याप्रो लिा ते
गोविंदराव याचे जुजांत लिा आहे व
उभयतास पत्राचे जाब रा छ २६ जावल.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री बाबाराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष तुह्मीं पत्र पा तें पाऊन मजकूर समजला राजश्री बापू जनार्दन देशमुख व देशपांडिये मारडीकर यांचे कागदपत्र आह्मी पाहून आपणास लिजा होते परंतु आपले पत्र अनमानीत आलें कमाविसदाराचा व देशमुखाचा रुणानुबंध ऐसा नाही की ते यांजविसीं लिहितील यास्तव एथे राजश्री गोविंदराव भगवंत व बाळाजी रघुनाथ यानी मनास आणून कमाविसदारास ल्याहावें त्याप्रो कादारानी करावें असे पत्र यावे ह्मणूनं लिा त्यास तुमचे लिहिल्या प्रा राजश्री गोविंदराव यांचे नावें पत्र पा आहे बापू जनार्दन याणी मौजे भोगांवचे पाटीलकीचे खरीदपत्र करून घेतलें तें मालकापासोन किंवा कसे याची चौकशी गोविंदराव करून लिहितील त्याप्रा कादारास लिहिले जाईल रा छ २६ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.