पत्र फत्तेसिंग भोंसले यांस अजमुलमुलक लेखांक ६९. १७१४ पौष शुद्ध ११.
यानी मागीतले याजवरून दिल्हे छ ९ जावल.
राजश्री फत्तेसिंगबावा भोंसले गोसावी यांस- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्रेा गोविंदराव कृष्ण आसीरवाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहीत असावे विशेष मौजे जेऊरगी बुा पा आबजलपूर या गांवी स्वारी करून तेथील चीजबस्त व मवेसी आपण नेली येविषईचा बोभाट माहलीहून नवाब शमषुलउमरा बाहादूर यांजकडे आला त्याजवरून नवाब मवसूफ याणी आह्माकडे सांगोन पाठविले की मोकाशाचे मामलत समंधे बाकी पा मारी कांहीं राहिली असल्यास हली पा मारचे आमीलीचे काम सिदी इमामखां यांजकडे जाले हे एथोन माहलांत गेल्या नंतर फैसला करून देवितील मवेसीची व चीजवस्त गांवची माघारी देवावी त्यावरून आपल्यास लिहिले असे त्यास मामलतीची बाकी असेल त्याचा फडशा सिदी इमामखां माहली आल्यानंतर आपल्याकडील कमाविसदाराकडे करून देण्याचा करार केल्याबमोजीब करतील मौजे मारीची चीजवस्त व मवेसी नेली असेल ती माघारी देऊन रसीद घ्यावी सिदी इमामखां लवकरच महाली येणार मामलतीचा फडशा करून देतील दिकत पडावयाची नाही आपण मवेसी नेली आसेल ती देवावी आनमान करूं नये रा छ ९ जावल बहुत काय लिो लोभ आसो दीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)