Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र व्यंकटराम पिला चिनापटणकर लेखांक १२०. १७१४ माघ शुद्ध ७.
यांस छ ५ जाखर.
राजश्री व्यंकटराम पिला गोसावि यांस-
७ अखंडीतलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष अलीकडे तुह्माकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाही त्यास पत्र पाठवित जावे जिनसाची रवानगी लवकर करितो ह्मणून पेशजी लिो होते त्यास कधी रवानगी केली हे अद्याप लिा येत नाही तर लिहून पाठवणे विलायती ताजवे वजन करावा-याचे ता लिहिला आहे त्याप्रो पाठवावे.
३ जवाहीर वजन करावयाचे ताजवे लहान
३ सोनें वजन करावयाचे ताजवे पंचवीस तीस तोळे वजन करावयाजोगते.
३ रुपे वजन करावयाचे कांटे एकदाच पांचसे रुपये वजन करावयाजोगे.
२ प्रा अडिचसे रुपये एकदाच वजन करावयाजोगे.
१ प्रा पांचसे रुपये वजन करावयाजोगा.
---
३
----
९
एकूण नऊ ताजवे. एवढे न मिळाले आणि याजपेक्षा लाहान मिळाल्यास पाठवणे कांटे विलायती चांगले मजबूत ज्यांत बालाबरोबर फरक नाही आशा तारफेलायक घेऊन पाठवणे व नयमूनचे तेल असल चांगले वजन पके च्यार सेर सदरहूप्रो जरूर पाठवणे पत्राचा जबाब लवकर पा कुसलपुरी पिला याचे नावे लखोटा पुण्याहून सुबराव याणी पा तो त्यास पावता करावा रा छ ५ जाखर बहुत काय लिो हे आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक ११९. १७१४ माघ शुद्ध ७.
पु।। राजश्री भीमराव स्वामीचे सेवेसी -
विनंति उपरि.
पीर पातशाहसाहेबाचे सासरे सोफीशाह पालखी दोन घोडे व वीस माणसासुधा करनुळास आलें गुत्तीस जाणार होते सबब अलफखानबाहादूर याणी दोन स्वार बार देऊन पागट रास पा ह्मणोन लिा ते कळले १. आसदअलीखान यांची जमयेत कडमधे आहे ह्मणोन लिा ते कळले १. |
अलफखानबादादूर याणी कलम ज्यारी केलें पठाण वगैरे लोक उमदे दरमहा करून ठेवितात ह्मणून लिहिले ते समजलें १. टिपूसुलतान याणी पांच हजार स्वार व पांच हजार बार पटणाहून रवाना केला अलीकडे वीस कोस आले ह्मणून लिहिलें ते कळलें स्वार व बार गुत्तीस येणार ऐसे तुमचे लिहिण्यात त्यास गुत्तीस पोहचलें किंवा मागेच आहेत हे वर्तमान ल्याहावे १. |
एकूण कलमे रा छ ५ जाखर हे विनंति. |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक ११८. १७१४ माघ शुद्ध ७.
पु।। राजश्री भीमराव स्वामीचे सेवेसी -
विनंति उपरि अलफखानबाहादूर यांस मातमपुरसीचीं वस्त्रें सरकारांतून रवाना करावयाविसीं इकडोन सरकारांत विनंति लिहिली होती त्यावरून मातमीचीं वस्त्रें करनुळास रवाना केली याप्रो आज्ञा आली वस्त्रें पोंहचतील कळावे सबब लिहिलें असे रा छ ५ जाखर हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
भीवराव श्रीपत वकील करनूळकर लेखांक ११७. १७१४ माघ शुद्ध ७.
याचे पत्राचे उत्तर छ ५ जाखर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष तुह्मी पत्रें छ १५ जावलची पा ते छ २६ माहे मारी पोंहचून लिहिल्याप्रा मार समजला राजश्री बाळाजी व्यंकटेश छ ११ रोजी करनुळास येऊन अलफखानबाहादूर यांची भेट जाली दौलतीचा बंदोबस्त करण्याचा अभिमान आपल्यास येविषी घरोब्याचे बोलणे बोले मुस्तफाखान सर्व सांगतील ऐवज पावता करून बाळाजीपंताची रवानगी लौकर करितात ह्मणोन तपसिले लिहिलें ते समजले त्यास नवाब-रणमस्तखानबाहादूर मरहूम यांसी दोस्ती व घरोबा पहिलेंपासोन इकडील क़सा व कोणे प्रकारचा होता हे कांहीं लोपलें नाही अलफखान बाहादूर याजला व तुह्मास सर्व माहितच आहे त्यापक्षीं इकडोन विस्तारें ल्याहावे असे नाही त्याचे मागे संस्थानचा बंदोबस्त यथास्थित रीतीने नीट मार्गे असावा हेच इकडील ख्वाहष संस्थानसमंधे साहित्य व दौलतख्वाहीविषी इकडून पूर्वीं अनमान जाला नाही व पुढेंहि व्हावयाचा नाही मुस्तफाखान एथे आल्यास बहुत दिवस जाले अद्याप इकडे येऊन वर्तमान समजलें नाही गोपाळराव येतात त्यासी बोलण्यात येते मारनिलें लिहित असतील ऐवजास किती दिवस जालें तुमचे लिहिण्यांत वरचेवर की ऐवज आतां रवाना करितो परंतु येत नाही ऐसी चाल असो नये या उपरि व्याजसुधां ऐवजाच्या हुंड्या मय हुंडावन बाळाजी व्यंकटेश याजबार देऊन मारनिलेस लौकर पाठवावें येविसी दिवसगत लागो नये इकडील ऐवजाची कळकळ तुह्मी वागऊन मागेच ऐवज रवाना करावा तें न केलें आतां तरी अलफखानबाहादूर यांसी बोलून ऐवज लिहिल्याप्रो पत्र पावतांच हुंड्या देऊन बाळाजीपंतास आधी रवाना करावें ऐवजाची निकड जाणून लिहिले असें आलसा खाले व विलंबावर न टाकितां निकडीने एथें ऐवज पोहचे ऐसे करावें वरचेवर तिकडील वर्तमान लेहून पाठवीत जावें अलीकडे तुमचे पत्र छ २३ जावलचे एथील जासुदाबार आले ते छ २ जाखरी पावलें त्यांत अलफखान नंदपाळास गेले समागमे तुह्मी व बाळाजी व्यंकटेश गेला ऐवज लोकाकडे येणे तो वसूल करून पाठवितों खोजी चांगलमरीस गेले आहेत नवाब मरहूम यानी ऐवज दिल्हा होता तो याणी घेतला रुो पावते करितों ह्मणतात ह्मणोन लिा त्यास नवाब मरहूम याणी ऐवज तुह्मापासीं दिल्हा तुह्मी वरचेवर इकडे लिहित आला कीं पैका मजपासी जमा आहे कोणी पाठऊन न्यावा त्यावरून बाळाजी व्यंकटेश यांस पाहाली याप्रो लिहितां अपूर्व आहे याचे उत्तर काय ल्याहावें क्षणात एक क्षणात दुसरें ऐसे लिहिणें लिहितां हे चाल तुमची असो नये या उपरि टाळाटाळीचा अर्थ न करितां झाडून ऐवज व्याजसुद्धा देऊन बाळाजी व्यंकटेश यांस रवाना करावें रा छ ५ जाखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
छ ४ जाखरी पत्रें रवानगी लेखांक ११६. १७१४ माघ शुद्ध ७.
बाळाजी व्यंकटेश यांस.
राजश्री बाळाजी व्यंकटेश स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सा नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जाणे विशेष तुह्मी छ १४ जावलचें पत्र पा तें छ २६ माहे मारी पावलें करनुळास पोंहचून अलफखानबाहादूर यांची भेट जाली ऐवज लवकरच पावता करितों ह्मणोन बोलले मागाहून ता लिहितों ह्मणोन लिा त्यास आजपर्यंत ऐवजाचा निर्गम करून दिल्हा असल्यास उत्तम आहे हली राजश्री भीवराव यांजला ऐवजाकरितां बहुत लिा आहे मारनिलेस निकड करून रणदुलाखान व खोजियांसी बोलोन ऐवज एकंदर हिसेबाअन्वयें व्याजसुधां याच्या हुंड्या घेऊन तुह्मी लौकर यावें या ऐवजास फार दिवस जाले एथें निकड जाणून लिा असे तरी तुह्मी तेथे निश्चिंत न बसतां निकडीनें ऐवजाचा उलगडा जलदीने करून सत्वर ऐवजसहित येऊन पोंहचणे तुमचें पत्र अलीकडे जासुदाबराबर छ १९ जावलचें छ २ जाखरी पावलें त्यांत अलफखान याणी नंदपालास बोलाविलें सबब गेलों बारा हजार रु।। पटणचे स्वारी बा देवितात ईभराइमखान यांस दाहा हजार मरहूम नवाबानी देविले ते त्यासीं समजावें ह्मणतात मामलतीचे बाकीबाबत ऐवज लोकाकडे गुंतला तो वसूल करितों याप्रा आहे ह्मणोन ता लिहिलें त्यस अलफखान यांसी बोलोन भींवराव खोजियांस निकड करून झाडून ऐवजाचा उलगडा करून यावें ऐवज देतील तो हस्तगत करून पुढे राहिले कलमाची निकड वरचेवर करून गुंता उगऊन घेऊन यावें येविषी आह्मी अलफखान यांस व भींवराव यांजली ल्याहावयाचे रीतीने लिहिलें आहे तुह्मी लागू होऊन गुंता उगऊन घ्यावा अलफखान याणी मुस्तफाखानासमागमे आह्मास पत्र पा त्याचा जाब व ऐवजाविसीं पत्र याप्रा लखोटा पारसी एथून पाठविला आहे तुह्मी अलफखान यांस देऊन बोलावे कोणेहि प्रकारें ऐवजाचा फडच्या करून घ्यावा भींवराव यांस पत्र लेहून पा हे त्याजला द्यावें रा छ ५ जाखर सलास तिसईन हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सिदी ईमामखानास पत्र जगनाथ लेखांक ११५. १७१४ माघ शुद्ध ५.
रघुनाथ यांजकडे पाठविले.
खांसाहेब मेहरबान दोस्तां सिदी इमामखां बाहादूर सलामत-
७ अजदील एखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैर आफियत जाणून आपली खैर खुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून पा चीठगोपें एथील स्वराज्याचे मामलतीची बाकी सन १२०१ फसली सालची व सन १२०२ साल मारचा ऐवज हंगामसीर राजश्री जगनाथ रघुनाथ कादार यांजकडे फडच्या करून द्यावा मारिनिलेस ऐवज देणे तो बट्याचा देतां ह्मणोन बोभाट आला त्यास जागिरीकडे गांवगना वसूल तहसिलेस जो ऐवज घेतां त्याप्रा स्वराज्याकडील कादारास देत जावा बट्याचा ऐवज घेणार नाहीत कडबा तीनसाला येणे त्या पो दाहा हजार पुळयाचा ऐवज माहालचे निरखाप्रा रोख तूर्त देण्याचा करार जाल्या बमोजीब ऐवज घेऊन बाकीचे कडब्याचा फडच्या करून द्यावा येविसी मेहरबान अजमलमुलुकबहादूर याणी रुबरू आपल्यास सांगितलेच आहे याउपरि दिकत न होतां फैसला करावा बोभाट न ये तें व्हावें पा चिंचोली एथील मोकासा वगैरे मामलतीचा ऐवज सन ११४६ व सन ११८७ सालचा येणे त्याची किस्तबंदी साह साला ठरावांत आली पैकी च्यार साला किस्तीचा ऐवज येणे राहिला येविषीहि राजश्री त्रिमलराव नवीन अमलदार यांसी बोलणें जालें मारनिलेचें ह्मणणें की हा खटला मागील त्यांचे अमलातील यास्तव सिदीइमामखान यासी समजोन घ्यावे त्यावरून लिा असे तरी सदरहु च्यार साला किस्तीचा ऐवज सन १२०० व सन १२०१ सालचे सिवाय जमे बाबत मोकाशाचा फडच्या करून द्यावा रा छ ३ जाखर ज्यादा काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
राघो अनंत चिटगोपेकर कादाराचे लेखांक ११४. १७१४ माघ शुद्ध ५.
पत्राचे उत्तर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री राघोपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष तुह्मी पत्रें दोन पा ती पावोन लिा प्रा मार समजला पा चिटगोपेसमंधी बोलणे होऊन महमद अजीमखां याणी सिदी इमामखान यांजला रुबुरू फडच्याविषई सांगितलें व ताकीदहि घेऊन पाठविली आहे. सन १२०१ सालचे बाकीचा फडच्या करून घेऊन सन १२०२ साल मारचा वसूल हंगामसीर घ्यावा कडब्या पो तूर्त दहा हजार पुळयाचा ऐवज माहालाचे नीरखा प्रा नगदी घेऊन बाकीचा फडच्या करून घ्यावा ऐवज माहाली तहसिलेस जागीरदार घेतील त्याप्रा तुह्मास देत जावा ऐसे बोलण्यांत आलें व सदरहू अन्वयें ताकीदीतहि लेख आहे याउपरि लिहिल्याप्रा फैसला करून घेऊन ल्याहावें कसगीप्रकर्णी मार लिहिला तो समजला येविषीची ताकीद मागाहून पाठवण्यात येईल रा छ ३ जाखर बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जगनाथ रघुनाथ यांचे पत्राचें उत्तर. लेखांक ११३. १७१४ माघ शुद्ध ५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री जगंनाथपंत खामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष तुह्मी पत्र पा ते पावलें पा चिटगोपें एथील सन इसनेची बाकी व सालमारचा ऐवज व कडबा तीन साला व ऐवज त्रिणामली देतात त्यांत नुकसान पडतें येविषीचा बंदोबस्त व्हावा व पा कानकुडती एथील मोकाशाचा इसने सालचा फडच्या करून देवावा ह्मणोन ता। लिहिलें व चिटगोपे प्रकर्णी राजश्री नाना यांचे पत्र पाठविलें ते पावलें राजश्री गोविंदराव यांचे पत्रावरून सविस्तर मार लिहिल्या प्रा समजला त्यावरून महमद अजीमखान यांसी तपसीले बोलण्यात येऊन सिदी इमामखां अमील पा मार यांजला समक्ष ताकीद जाली व ताकीदपत्रहि खानमार यांचे नावें घेऊन पा आहे सन इसनेचे बाकीचा फडच्या करून सालमारचा ऐवज हंगामसीर पावता करावा व कडब्या पो तूर्त दाहा हजार पुळयाचा ऐवज रोख माहली निरखा प्रा देणे व तहसिलेस जो ऐवज गांवगना घेतात त्या प्रा कादारास ऐवज देणे या प्रा ठरून निक्षुण रुबरू सांगितले व ताकीदहि पाठविली याउपरि सदरहू प्रा दिकत न होतां फडच्या करावा ऐसें येथे ठरलें आहे कानकुडती एथील मोकाशाचे ऐवजाकरितां नवाब अजमुलउमराबाहादूर यांसी बोलण्यांत आलें फडच्या जाल्यानंतर मागाहून लिहिण्यांत येईल रा छ ३ जाखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सिदी इमामखां यांस पार आबजलपूर लेखांक ११२. १७१४ माघ शुद्ध ५.
सरामुखी विषी पत्र खांसाहेब
मेहरबान दोस्तां सिदी इमामखां बाहादूर. अजदिलएखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैर आफीयत जाणून आपली खैरखुषी कलमी करावी दिगर मजमून पा आबजलपूर एथील सरामुखीची मामलत केशवराव हरिकडे आहे त्यास सन १२०१ ची बाकी पा मजकुराकडे राहिली आहे त्याचा फडच्या करून देण्याविषी मेहरबान अजमलमुलूक बाहादूर यांचें खत आबूतुराबखान यांचे नावें पाठविलें आहे तरी बाकीचा फडच्या करून देऊन सन १२०२ सालचे मामलतीचा फैसला मारनिलेकडे करून द्यावा दिवसगत लागो नये दिगर गांवसुधा बाकी सालमारिचा इनफिसाल करून द्यावा बोभाट न ये तें करावें रा छ ३ जाखर ज्यादा काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
बाजीराव यांचे पत्र. लेखांक १११. १७१४ पौष वद्य ८.
श्रीमंत राजश्री रावजी स्वामीचे सेवेसी-
सेवक बाजीराव शेषाद्रि व त्रिंबक भुलाजी सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल छ २१ माहे जावल मुा शहर हैदराबाद जाणोन तुह्मी आपलें क्षेम लिहीत असावें विशेष श्रीमंत राव गोविंदराव कृष्ण यांची तनखा सरकारांतून चाळीस हजार रुपयाची पेशजी जाहली त्याचे नवाजषनामे दोन अखेर रावलचे वायदा विसा हजाराचा व अखेर शाबान विसा हजाराचा या दो वायद्यापो अखेर रावलचा वायदा गुजरून गेला एथें त्यानी ऐवजाकरितां निकड लाविली याजवरून आपणास लिो जाते जे राव गोविंद कृष्ण यांचे मोहेरनसी रसीद विसा हजार रुपयाची व हें पत्र व. भुकणदास व्यंकटीदास साहूकार याचा गुमास्ता हे दोन्ही दस्तऐवज घेऊन आपणापासी येतील ते दोन्ही दस्तऐवज घेऊन ऐवज त्याचे पदरी घालून साहुकाराचे गुमास्त्याचें कबज घ्यावें नवाजषनामा वायदयाचा श्रीमंत रा गोविंदराव मामा पुण्यास गेले त्यांचेबराबर गेला सबब मुजरद हरकारा नवाजषनामा आणावयास पा असे तोहि आठ चऊं रोजानी येईल आणि चाळीस हजार रुपयाचा तमसुक लिहून दिल्हा त्याजवर वसूल मांडून घेऊ ऐवज देण्यास दिकत हरगीज न करावी दुसरें साहुकाराचा गुमास्ता वसमतीस येणार नाही गोपाळ ना सराफा बराबर सदरहू रुपये नांदेडी पाठऊन साहेब मोहीदीन यांचे मारफातीने देऊन कबज रसीद घ्यावी विशेष काय लिहिणे लोभ कीजे है विनंति.