लेखांक ६६. १७१४ पौष शुद्ध ११.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाळाजी नाईक स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत आसिले पाहिजे विशेष कसबे कनड वगैरे देह पांच एथील कुळकर्ण राजश्री सिवराम माहादाजी व खंडेराव कोनेर यांचे त्यास याजकडे अजीमुदौली यांचा खासगत ऐवज येणे होता सबब त्याणी कुलकर्णाची जप्ती करूने ऐवज घेऊन जमीदारास व आमीलास बरखास्त दिल्ही या संधीत त्यांजकडील सुभेदारीचे काम दूर होऊन आपली बाहाली जाली जप्तीचे काम तसेच बहिवाटीत आले जप्ती काही एथून सरकारांतून नाही याजकरितां सांप्रत नवाब अजमुलउमरा बाहादूर याणी तुह्मास पत्र लिहिलें आहे त्या प्रो कसबे कनड वगैरे पांच गांवचे कुळकर्ण सिबराम माहादाजी व खंडेराव कोनेर यांचे याजकडे ज्यारी करून द्यावे दीमत पडों नये मारनिलें आमचे पदरचे याजमुळें यांचेहि एकविसीं साहित्य करीत जाणे हे कामे आमची खासगत जरूरीची याजकरितां लिहिण्यात येतात याचा बोभाट न ये तें करावें र।। छ ९ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)