Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री. 

लेखांक २३४.


१७०१ आश्विन वद्य ७.

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यासि:- रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ समानीन मया व अलफ. सरकारांत दारू करणार कारीगर यांचा दरकार आहे, त्यांस तुह्मी जनराल यांस हटकून दोन कारगिर त्याजवळ मागणें. शेवटीं त्याणीं येकच दिल्यास त्यास हजूर पाठविणें. जर जनरल यांणीं द्यावयास आनमान केल्यास तेथें कारीगर असतील त्यांचा शोध करून, त्यास फोडून तेथें त्याचा दरमहा असेल त्याहून जाजती च्यार पांच रुपये सरकारातून केले जातील हा लोभ दाखवून, आणि तेथें घरीं जातों म्हणोन निरोप घ्यावा अथवा सुरतेस जातों असा निरोप घेऊन हुजूर तुम्हीं त्यास पाठवून देणें. पेशजी तुम्हास पालखीच्या तावदानाविसी पांच च्यार वेळां लिहिलेंच आहे. त्याप्रों।। तावदानें पालखीच्या मेजाचीं हुजूर पाठवणें. जाणिजे. छ २० सवाल आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पौ।।. छ १ जिलकाद, सन समानीन.

श्री. 

लेखांक २३३.


१७०१ भाद्रपद वद्य १२.

राजमान्य राजश्री सदासिव धोंडदेव यासि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ समानीन मया व अलफ. बार्क पाठविला तो पावला. त्यांत सदासिव वैद्याबाद आहे तो किमतीस बरा पडला आहे. दाख्तर टेणट याजकडील पाठविला, त्यांस रुपये अडीचपट अधिक पडून फार उंचहि नाहीं. तरी हाली गोविंदा जांबूळकर खिजमतमार पाठविला आहे. याजबराबर दहा शेर बार्क जितका उंच मिळेल तितका सदाशिव वैद्य याचे गुजारतीनें खरीदी करून हुजूर पाठविणें. जाणिजे. छ २५ रमजान. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पो।। ४ सवाल आश्विन शु॥ ६.

श्री. 

लेखांक २३२.


१७०२ भाद्रपद वद्य ४.

राजश्री भगवंतराव कदम यासि:-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री स्नेहांकित रघुनाथ बाजीराव आशिर्वाद. सु॥ इहिदे समानीन मया व अलफ. तुह्मी विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. लिहिला मजकूर सविस्तर निवेदन जाहाला. ऐसियास तुमची निष्ठा आहे तसी कृपाहि हुजूरची आहे. त्यास, तुमचा कारकून हजूर आल्यानंतरी आज्ञा करणें. ती केली जाईल. जाणिजे. छ १७ रमजान.

श्री. 

लेखांक २३१.


१७०१ भाद्रपद शुद्ध १०.

राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
सु॥ समानीन मया व अलफ. नरलपैकीं कवायती गारदी याचे आंगरखे बालाजी सदाशिव याणीं तुमच्या हवालीं केले आहेत ते व आणखी तुह्मांजवळ जे आले असतील ते झाडून हुजूर पाठवणें. जाणिजे. छ ९ रमजान. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)
पो।। छ १४ रमजान, सन समानीन भाद्रपद वद्य २.

श्री. 

लेखांक २३०.


१७०१ भाद्रपद शुद्ध १०.

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव व विश्वनाथ नारायण व लक्ष्मण रणसोड यांसि:-
रघुनाथ बाजीराव. सु॥ समानीन मयो व अलफ. कवाइती लोक यांस आंगरख्याबद्दल आठशें आंगरखे होत ऐसा पटुकल वखारींत चवकसीनें खरेदी करून, आपाजी आइतोले पाठविले आहेत, याजपाशीं देणें. जाणिजे. छ ९. रमजान.
आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पो।। छ १५ रमजान, सन समाननी, भाद्रपद वद्य २
बार.

श्री. 

लेखांक २२९.


१७०१ श्रावण वद्य १२.

राजमान्य राजश्री सदासिव धोंडदेव यासि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ समानीन मया व अलफ तुम्ही विनंति पत्रें दोन पाठविलीं तीं प्रविष्ट जाहालीं.

बाळाजी विश्वनाथ यांची मोजदाद जिनसाची दिली होती, ते माघारे घेतली. त्यांणीं नेमणुकेशिवाय पाउणशें रुपये खर्च केला आहे. त्याचा ते फडशा हजुर करणार ह्मणोन लिहिलेंते कळलें. त्यास, तुह्मींहि तगादा न करणें. बाळाजी विश्वनाथ हजुर आल्यावर समजोन फडशा करोन घेतला जाईल. कलम १. व्यंकटराव पिलाजीचा व रतनजी पारसी याचा मजकूर लिहिला तो कळला. पुढें त्याजकडे पत्रें पाठवावयाचीं असेत. परंतु कोणी ममतेचा जाऊं लागेल त्याजबराबर पाठऊं. सबब जहाजाच्या शोधांत हमेषा राहावें. येकादो माणसांस नेहमीं तेंच काम पाहिजे. बारभाईंनीं वकील कलकत्यास रवाना केल्याचा वगैरे बातमीचा मजकूर लिहिला. तो कळला.

पकी बातमी लिहिली येईल तितकीच लिहित जाणें. बाजारी बातमी न लिहिणें. त्यांतहि जरूर असल्यास लिहिणें. परंतु ही बाजारी बातमी, असें लिहीत जाणें. कलम १.

तावदानाचा मजकूर लिहिलांत, कीं पहिल्या बेताची मिळत नाहीं. त्यास, थोडीसी जाजती असली तरी कार्यास येईल. त्याच मेजाची कसी मिळतील ?

जाजतीच मेजाची घेऊन पाठवणें.

कल्याणापैकीं कांहीं जिनस विकावयाचा होता तो आतां खासा स्वारी सुर्तेस आली. सबब फरोक्त करीत नाहीं ह्मणोन लि॥. त्यास कल्याणपैकीं आरसे आहेत त्यांपैकीं ज्यांची कलई उडाली असेल व पालखीस लागू होत असें असतील ते पालखीकरितां हजूर पाठविणें.

ह्मणजे दुसरे पाहिजेत तितकेच खरिदी करणें. बाकी ज्या आरशास कलई असेल ते विकणें व दुसराहि कल्याणपैकीं जिंनस असेल तो फरोख्त करणें. ज्यांत किफायत नजरेस येईल तेंच तुह्मी करणें. तुमची नजरही बरी आहे.

मिर्जा तेथें आहेत. त्यास तुह्मीं त्याजकडे सहजांत जाऊन त्यास पुसणें कीं, श्रीमंत सुर्तेस आले आहेत त्यास तुमचे चित्तांत जावयाचें आहे किंवा नाहीं. हा त्याचा भाव काढून हजुर लेहून पाठवणें. सरकारतर्फेनें हा त्यासी जाबसाल न बोलणें. तुह्मीं होऊन आपले तर्फेनें सहजांत त्यासी बोलोन, त्याचा शोध घेऊन लिहिणें. त्यासी आपले तर्फेनेंच बोलणें. कलम १

येकूण कलमें साहा लि॥ आहेत. त्या प्रें॥ करणें. जाणिजे. छ २५ साबान आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पै॥ छ १४ रमजान, सन
समानीन, भाद्रपद व॥ २.

श्री. 

लेखांक २२८.


१७०१ श्रावण वद्य १२.

पु॥ रावजी सदाशिव धोंडदेव यांसि:-
सु॥ समानीन मया व अलफ. कवायती लोक व बंदुका येथें आहेत, त्यांस हुजुर रवाना करावयाची जसी आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तणूक करीन, म्हणोन लिहिलें तें कळलें. त्यांस, बंदुका व कवायती माणूस आहे तें हजूर पाठऊन देणें. लोकांस दर असामीस दोन तीन रुपये खर्चास देणें. जाणिजे. छ २५ साबान. आज्ञाप्रमाण. लोकांस जमानी ठाव ठिकाण मिळाले तरी उपयोगी. बंदुखा घेऊन पटऊन गेले तरी बंदुखा व रुपये नाहक बुडतील ऐसें न करणें.

(लेखनावधि:)

पे॥ छ १४ रमजान, सन समानीन,
भाद्रपद वद्य २.

श्री. 

लेखांक २२७.


१७०१ श्रावण वद्य १०.

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव व व विश्वनाथ नारायेण यांसि:-
रघुनाथ बाजीराव. सु॥ समानीन मया व अलफ. केशवजी कासार वोतारी हुजुरून आठा रोजाचा निरोप घेऊन आपले घरीं मुंबईस आला आहे व यांजबराबर सरकारांतून बाळू शेट्या खिजमतगार दिल्हा आहे. त्यास हा आठ रोज घरीं राहील. उपरांत हुजूर येऊं लागेल ते समयी तोफा वोतावयाची हातेरें वाकें व भाते व दुबारी गोळे वोतावयाचा पंचरसी फर्मा वगैरे सरंजाम या दोघांबरोबर देऊन हुजूर रा।। करणें. जर केशवजी आठा दिवसांनंतर निघावयास हैगई करूं लागल्यास, भवानजी विसाजी यांस पत्र दिल्हें आहे तें त्यांस देऊन जनरल यांजकडून ताकीद करून केशवजीस पाठवून देणें. जाणिजे. छ २३ साबान आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)
पो।। छ ५ रमजान सन समानीन.

श्री. 

लेखांक २२६.


१७०१ श्रावण वद्य ५.

पु॥ राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
सु॥ समानीन मया व अलफ. दोन शेर बार्क नवा चांगला औषधास पाठऊन देणें ह्मणोन पेशजी तुह्मांस लिहिलें होतें. त्यास आणखीही त्याशिवाय येक शेर मध्यम ऐकूण तीन शेर पाठवून देणें. कदाचित् दोन शेर चांगला न मिळाल्यास तीन शेरही मध्यम प्रतीचा पाठवून देणें. जाणिजे. छ १९ साबान. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पो।। छ ३ रमजान,
सन समानीन, भाद्रपद श्रु॥ ५

श्री. 

लेखांक २२५.


१७०१ श्रावण वद्य ४.

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:- रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ समानीन मया व अलफ. भागे व बाकेंतांच्यानें व दुबारी गोळे वोतावयाचा फर्मा पंचरसी विश्वनाथ नारायण याचे येथें आहे तो सरंजाम तोफा वोतावयाचा जो असेल तो जहाजावर घालून हुजूर र॥ करणें. जाणिजे. छ १८ साबान. आज्ञाप्रमाण. या कामाकरितां बाळू कुमकर पाठविला आहे, याजबराबर र॥ करणें. छ मजकूर.

(लेखनावधि:)

पो।। छ ३ रमजान,
सन समानीन, भाद्रपद शुद्ध ५.