श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २५७.
१६९६ कार्तिक वद्य १२.
राजश्री सिदो तुकदेव पो।।. चिखली गोसावी यांसि:- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर दंडवत. सु॥ खमस सबैन मया अलफ बद्दल देणें सिलेदार बाबूराव कासी यासी रुसकतीचे ऐवजीं रुपये ११५० साडे अकरासे पो।। मजकूरीचे ऐवजी देऊन कबज घेणें. जाणिजे छ० २५ माहे रमजान.
बार