Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २२४.
१७०१ श्रावण शुद्ध १४.
राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ समानीन मया व अलफ. त्रिंबक पांडुरंग यांस पंचवीस रुपये दरमहाची नेमणूक करून सनद सादर जाहली आहे. त्यास, हालीं हें पत्र नदर केलें आहे. तरी त्रिंबक पांडुरंग यास रुपये न देणें. दरमहा बंद करणें. तुह्मांकडे खर्चाची नेमणुकीची याद पहिली सादर केली आहे त्याची नकल हजुर पाठवून देणें. जाणिजे. छ १३ रमजान. आजतागाईत तुह्मांकडे जमा काय व खर्च काय जाहाला आहे व बाकी सिलक काय राहिली ते तपशीलवार लेहून पाठविणें. छ मजकूर.
(लेखनावधि:)
पो।। छ ४ सवाल, आश्विन शु॥ ६.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २२३.
१७०१ श्रावण शुद्ध ८.
(श्रीमत् रघुनाथराव.)
राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ समानीन मया व अलफ. चिमणाजी गोपाल याजकडे पणवेलीपैकीं साडेचारशें रुपये सिल्लक आहे, ते पेशजी लक्ष्मण रणसोड याजकडे देण्याविषयीं पत्रें त्यास सादर जाहालींच आहेत. त्याजवरून मशारनिलेनीं लक्ष्मण रणसोड याच्या हवालीं ऐवज केला असल्यास उत्तम. नाहीं तरी तुह्मीं त्याजकडून ऐवज मागोन घेणें. दिक्कत करूं लागल्यास जनराल यास पत्र दिल्हें आहे. हें त्यांस देऊन त्यांजकडून निक्षूण ताकीद करवून ऐवज आपले पदरीं घेणें. ऐवज दिक्कत न करतां दिल्यास जनराल यास पत्र द्यावयाचें प्रयोजन नाहीं. कलम १
तुह्मांकडे बेलापूर वगैरे माहालचा ऐवज जमा करविला होता. त्यास, कोणे महालचा काय ऐवज तुम्हांकडे जमा काय जाहला आहे व त्यांतून खर्च काय जाहला आहे, त्याचा झाडा तपसीलवार हजूर लिहून पाठवणें. दाहां हजारपर्यंत तुह्माजवळ शिल्लक असल्यास आपलेजवळ ठेवणें. दाहा हजारावर असतील ते हजूर पाठवून देणें. कलम १.
एकूण कलमें दोन लिहिलीं असेत. त्याप्रों।। करणें. जाणिजे. छ ६ साबान. आज्ञाप्रमाण.
(लेखनावधि:)
पौ।। छ १८ साबान, सन समानीन श्रावण व॥ ४.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २२२.
१७०१ श्रावण शुद्ध ६.
राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ समानीन मया व अलफ. सरकारांत जिनसाचें प्रयोजन आहे. तरी ज्यादारोब व मोती वाघमारा खिजमतगार पाठविला आहे, याजबराबर येणेंप्रमाणें र॥ करणें.
पालकीस तावदानें सुमार बारा पाहिजेत. त्यांचे मेजपेषजी तुह्माकडे पाठविलें आहे. त्याप्रमाणें बारा तावदानें पाठवून देणें. खरीदी करून र॥ करणें.
इंग्रजी कमचा दाहा दाहा खरीदी करून पाठवणें. १
बार्क नवा वजन पके दोन शेर खरीदी करून र॥ करणें.
एकूण तीन कलमें लिहिलीं आहेत, त्याप्रमाणें करणें. जाणिजे. छ ४ साबान. खरेदीस ऐवज लागेल, तो सरकारचे ऐवजांपैकी खर्च करणें. छ मजकूर.
आज्ञाप्रमाण.
(लेखनावधि:)
पो।। छ १८ साबान, सन समानीन, श्रावण वद्य सप्तमी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २२१.
१७०१ अधिक श्रावण शुद्ध ६.
राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ समानीन मया व अलफ. तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. आज्ञापत्र सादर जाहाल्यावरून बाळाजी विश्वनाथ याचे जिनसाची मोजदाद दिली. माझा बारभाईकडे जावयाचा मजकूर नसतां कोणी गैरवाका समजाविला आहे, हे नकळे, ह्मणोन तुह्मीं कितेक आपले निष्ठेचे अर्थ लिहिले ते कळले. व भास्कर भिमाजी याणेंहि विदित केलें. ऐशास, तुह्मांवर सरकारची बेमर्जी होऊन तुमच्या जागा दुसरा कारकून पाठविला, असा कांहीं अर्थ नाहीं. तुह्मी पुण्यास जाणार, हे बातमी दोन तीन जागांहून हुजूर कळली. तेव्हां तेथें देखरेखीस कारकून तरी असावा, सबब बाळाजी विश्वनाथ रवाना केला. मागाहून तुमचींही पत्रें आलीं. तुम्ही येकनिष्ठ, हे तुम्हांविषयीं खातरजमा दिसोन आली. त्यास, तुम्हांवर सरकारची कृपाच समजणें. तुह्मीं पहिल्याप्रमाणेंच तेथील कामकाज करीत जाणें. बाळाजी विश्वनाथ याजकडे मोजदाद जिनसांची दिल्ही असेल ते फिरोन माघारी घेणें. येविषयीं त्यासही ताकीदपत्र पाठविलें आहे. तो हुजूर येईल. जाणिजे. छ ५ रजब. आज्ञाप्रमाण. पो।। छ १४ साबान, सन समानीन, श्रावण शु॥ १४.
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २२०.
१७०१ वैशाख वद्य ४.
राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तुम्ही चिरंजीवांकडे पुण्यास जाणार ह्मणोन ऐकलें. सबब, तेथें रहावयास हुजुरून बाळाजी विश्वनाथ कारकून पाठविले आहेत. तरी तुमचे तसलमातीस ऐवज आहे, त्या पैकीं नेमणुकीब॥ खर्च जाहाला त्याचा हिसेब यास दाखवून बाकी शिलक राहिला असेल तो ऐवज बाळाजी विश्वनाथ याचे स्वाधीन करून कबज घेणें. व तेथें सरकारचा जिनसाना आहे त्याची मोजदाद यांस देऊन पावती घेणें. सरकारचा वाडा व बंगला व बाग व विहिरी तेथें आहेत त्यांची देखरेख तुम्ही करीत होता त्याप्रमाणें तुम्हीं खर्चाचे नेमणुकीची याद तुह्माजवळ असेल ती मशारनिलेचे स्वाधीन करणें. जाणिजे. छ १७ रबिलाखर.
आज्ञाप्रमाण.
(लेखनावधि:)
पो।। छ ५ जमादिलावर.
सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २१९.
१७०१ चैत्र वद्य १३.
राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव नातू यासि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ सन तिसा सबैन मया व अलफ. बद्दल देणें खर्चास रुपये.
१०० सैद आबुदला मुंबईत आहे त्यास
१०० सेख महमद.
------
२००
एकूण दोनशें रुपये तुम्हांकडील तसलमातीचे ऐवजीं देविलें असेत. पावते करून कबज घेणें. जाणिजे. छ २६ रबिलोवल.
आज्ञा प्रमाण.
(लेखनावधि:)
पो. छ २२ रबिलाखर सन तिसा सबैन.
बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २१८.
१७०१ चैत्र वद्य ८.
राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. कल्याणच्या ठाण्यांत घोडीं पाडाव केलीं, त्यांपैकीं तीन घोडीं सुभानराव मोरे याजवळ साष्टीत आहेत. त्यास फत्तेसिंग यांजवळ कवायती लोक आहेत. ते खर्चाकरितां गवगवा करितात, ह्मणोन त्यानें हुजूर अर्ज सांगोन पाठविला. त्यावरून हें पत्र तुह्मांस सादर केलें असे. तरी मोरे यांजवळ सरकारची तीन घोडीं आहेत तीं ठाण्यांत अवघे मिळोन पाडाव केलीं असल्यास, वाजवी मनास आणोन, मोरे याजवळून घेऊन, तुम्हीं व फत्तेसिंग मिळोन फरोख्त करोन, याचा ऐवज होईल तो लोकांस वांटणीप्रमाणें देणें. फत्तेसिंगास सुरतेच्या मागें हुजूर येणें म्हणोन आज्ञा केली आहे. त्याजबरोबर त्या लोकांसहि र॥ करणें जाणिजे. छ ११ रविलावल.
(लेखनावधि:)
पो।। छ २५ रबिलावल.
सन तिसा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २१७.
१७०१ चैत्र शुद्ध १३.
राजमान्य राजश्री सदासिव धोंडदेव यासि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तुह्मांस चिरंजीव राजश्री माधवराव नारायण याचा कौल व राजश्री लक्ष्मण आपाजी याणीं आपलें खासगत पत्र देऊन तुह्माकडे पाठविलें आहे, ह्मणोन ऐकतों. त्यास तुमचा विचार जावयाचा आहे किंवा रहावयाचा आहे, हें समजलें पाहिजे. तरी लेहून पाठविणें. तर तुमच्या चित्तांत जावयाचेंच असल्यास अगाधरे विनंति लिहिणें. म्हणजे येथून कारकून पाठविला जाईल. त्याच्या हवालीं तेथील बंदोबस्त करून, मग तुम्हास जावयाचें असल्यास जाणें. जाणिजे. छ ११ रबिलावल. हें वर्तमान ऐकलें. परंतु खरें कीं खोटें हें समजत नाहीं. तथापि, तुह्माविसीं हुजूरची खातरजमाच आहे कीं, हुजूरचा निरोप घेतल्याशिवाय जाणार नाहीं. परस्परें ऐकलें, सबब लिहिलें असे. छ मजकूर.
आज्ञा प्रमाण.
(लेखनावधि:)
पो।।. छ २८ रविलावल, सन तिसा
सबैन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २१६.
१७०० फाल्गुन वद्य ३०.
(श्रीराजा शाहू नरपती हर्षनीधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)
राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव नातू यासि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. मीरजाखान याजकडे तोफखान्यापैकीं शिलकी जिन्नस तीनशें सवासत्याणव रुपये तीन आणे याचा ठेविला आहे. तो फ्रोख्त करावयास भवानी शंकरराम यास आज्ञा करून प॥ आहेत. त्यास, तुम्हीं व मशारनिले मिळोन जिन्नस फ्रोख्त करून, त्यापैकीं दोनसें सवाबेवीस रुपये दोन आणे भवानी शंकर यास देऊन, कबज घेणें. बाकी येकसे पंच्याहत्तर रुपये येक आणा तुम्हाकडील हिसेबी जमा करणें. जाणिजे छ २९ सफर. आज्ञा प्रमाण.
(लेखनसीमा.)
पो छ २८ रबिलावल सन तिसा सबैन.
बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २१५.
१७०० माघ वद्य ७.
(श्रीसांब : सपुत्रो विजयते राजा शाहू नरपति हर्षनीधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)
राजमान्य राजश्री बाबुराव मोरेश्वर यासि:-
रघुनाथ बाजीराव प्रधान. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तुह्मी मुंबईस गेला. त्यास, तेथें चिमणाजी गोपाल व सदाशिव धोंडदेव व त्रिंबक पांडुरंग व भास्कर भिकाजी तेथ आहेत. त्यास कळवें- परसीकचा हिसेब समजावणें. म्हणजे चौकशीनें पाहातील मग तो हिसेब घेऊन हुजूर येणें. जाणिजे. छ १९ मोहरम.
(लेखनावधि:)