श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २६१.
१६९६ कार्तिक वद्य १४.
गंगाभागीरथीं मातुश्री भवानीबाई गायकवाड वडिलांचे सेवेसी :-
अपत्य गोविंदराव गायकवाड शेना खासखेल समशेर बहादर दंडवत विनंति. उपरी बदल देणें राजश्री बाबूराव कासी नि॥ चिंतो विठ्ठल यांस सोनगड जिल्हेचे सुकडीचे ऐवजी रु ॥ १००० एक हजार देऊन पावलियाची कबज घेणें. हिसेबी मजुरा असे जाणिजे. छ० २७ माहे रमजान.