श्री.
लेखांक ३००.
नकल
१७०२ आश्विन वद्य ५.
चिरंजीव राजश्री त्रिंबकराव यांसि विठ्ठल आशिर्वाद उपरी आह्मी रजाबंदीनें खरिदी केली त्यापैकी तुह्मास वतनें वगैरे दिल्ही बितपसील.
१ कानगोचें वतन प्रां।। खानदेश सरकार पैकी निमे खंडो गंभीरराव निमे आह्मी तो आह्मीं आपले निमे तुह्मांस दिल्हें इनामें वगैरे सुध्धा.
२ मौजे रेहें व मौजे लालवावली येथील भट कुळकर्ण पोनमावळची
२ पुण्यांतीलवाडे वोंकारेश्वराजवळचे व बाग
-------
५
एकूण पांच पैकी एक कानगोचें वतन व दोन कुळकर्णे ज्योतिषवृत्ती दोन गावची व दोन वाडे तुह्मांस दिल्हे आहेत सुखरूप अनभवणें यास कोण्हासी संमध नाहीं कोण्ही भाऊबंद दिक्कत कदाश्चित् काल देश जाणून करतील त्यास आमची शफत असे तुह्मी सरकार लक्षानें वर्तणूक करून सुखरूप वंशपरंपरेनें अनभवणें मिती आश्विन वद्य ५ शके ७०२ शार्वरी संवत्छरे हें आशिर्वाद सरर्हू वतनास व घरास कोण्हा भावबंदास समंध नाहीं कोण्हाचा लढा यांत नाहीं हे आशिर्वाद.