श्री.
लेखांक ३४२.
१७२२ पौष वद्य ४.
अजू स्वारी राजश्री बळवंतराव नागनाथ सुभेदार ता॥ पट्टा ता॥ मोकदम मौजे निऱ्हाळे ता।। देपूर पो।। संगमनेर सुमा ईहिदे मया तेन व अलफ. मौजे मजकूर येथील कुलकर्ण चिंतो विठ्ठल याचे आहे त्याची जप्ती पेशजीं सरकारांतून होऊन तालुके मजकुराकडे सांगितली आहे. हाली मोकळी करून चिंतो विठ्ठल मृत्यु पावले त्याचे पुत्र राजश्री त्रिंबकराव चिंतामण याजकडे मौजे मजकूरचे कुळकर्ण पेशजी प्रो।। मारनिलेकडे चालवावयाची हुजुरून छ २६ जमादिलाखरची सनद सादर जाहाली त्याजवरून हे चिठी सादर केली असे तरी मौजे मजकूरचे कुळकर्ण मारनिले अनुभवितील. कुळकर्णाचे गुमस्तगिरीचे कामावर बापूजी शामराज यांस मारनिलेनीं पाठविले आहेत. कुळकर्णाचे कामकाज करितील. जाणिजे. छ १८
साबान. मोर्तब सूद.