श्रीम्हाळसाकांत.
लेखांक ३४६.
१७२२ पौष वद्य ८.
राजश्री केसो कृष्ण गु ।। व देशपांडे पा।। गाळणा गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ कासीराव होळकर देशमुख पो। मा।। दंडवत सु॥ इहीदे मया तैन व अलफ. राजश्री त्रिंबकराव चिंतामण यांनी श्रीमंताचें पत्र छ ६ रजबचें आणिलें कीं प्रांत खानदेश येथील कानुगोईचें वतन खंडोगंभीरराव व चिंतो विठ्ठल यांचे त्यांची जफ्ती पेशजी सरकारांत केली होती त्यास चिंतो विठ्ठल निधन पावले त्यांचे पुत्र त्रिंबकराव चिंतामण यांजवर कृपाळू होऊन त्यांचे हिश्शाचें वतनाची मोकळीक केली असे तरी तुह्माकडील महालानिहायचे मामलेदार व जमीनदार यांस ताकीद करून पूर्वी चिंतो विठ्ठल यांजकडे वतन चालत होतें त्याप्रों।। यांजकडे चालवणें ह्मणोन त्यावरून हें पत्र सादर केलें असें तरी तुह्मी सरकार सनदे प्रों।। मा।। येथील कानगोईचें वतनाचा हक्क रुसूम व इनाम व घरें व मान-पान कानूकायदे सुध्धा पेशजी चिंतो विठ्ठल यांजकडे सुदामत चालत आल्याप्रों।। मशारनिलेकडे चालवणें व कागदपत्राचा सिरस्ता पूर्वी मोगलाई अमलांतील असेल त्या अन्वये यांचे दप्तरी देत जाणें जाणिजे छ २२ साबान बहुत काय लिहिणें.
बार