लेखांक २] [१५८३ श्रावण वद्य ४
श्री
ll मशरुल रा l हवालदार व कारकुनानी व देशमुखानी देशपाडियेनानी व मोकादमानी व सेटियें व माहाजनानी व बाजे यानि माहालनिहाय मामले प्रभावली यासि पिलाजी नीलकठराव सुभेदार नामजाद माl माl सूरसन इसने सितैन अलफ नरसोबा नाईक बिन कान्होवा नाईक मावलगकर गुमस्ते सरदेसाई मामले माl याही राजगडच्या मुll हुजूर जाऊन माहाराज राl साहेबाची सनद घेऊन सुभा माl आले राl छ २ माहे जिलकाद पौ छ १७ माहे माl तेथे हुकूम जे नरसो नाईक बिन कान्हो नाईक मावलगकर गुमस्ते सरदेसाई मामले प्रभावली याणी किले राजगडच्या मुll हुजूर येऊन अर्ज केला जे रंगो नाईक बिन केसो नाईक मावलगकर सरदेसाई माl माl हे पेसजी किले माl साहेबाचे भेटीस आले होते तेव्हा अर्ज केला जे सदरहू देशमुखीचे वतन आपले पिढी दर पिढी मातकदम इस्तकबिलपासून ताl साल गुll पावेतो चालत आले हाली तलकोकण साहेबास अर्जान जाहालेया वीर साहेबी सेवकावरी मेहरबान होऊन कौल सादर केलिया वरी आपण वतनाचे बाबे खिजमतीस हाजीर जाहालिया वरि दिवा णातून सारी च वतने अमानत जाहाली आपले कदीम हक व लवाजिमा इनामती दिवाणातून अमानत जाहाल्या आपण तो साहेबाते खिजमतीस येकसान असो साहेबी मेहरबान होऊन कुटुबास अन्न देऊन सेवकाची उस्तवारी केलिया उमेद धरून येकसान चाकरी करू त्या वरी साहेब मेहरबान होऊन सेवकास पटी पछ्योडी लाहारी २००० दोन हजार मामले माl जमाबदी वरी रयत निसबत सीस्त करून द्यावी ह्मणोन सुभा माl नायक पाl माl सनद सादर केली ते घेऊन सुभा आले सदरहू प्राl सीस्त करून घ्यावी तो राl सुभेदार हुजूर आले सेवकास काही पावले नाही या मुले सेवक हइरान आहे पेस्तर सेवकास पोटभर अन्न देऊन उस्तवारी करणार साहेब धनी आहेत बराय इलतिमास खातरेस आणून रयत मामुरी वरी नदर देऊन सरदेसाई माl यासि हक व लवाजिमा पटी पछयोडी लारी ३००० तीन हजार व इनामत बागाइत मौजे कोलबे ताl पावस माl माl या प्रमाणे करार करून देऊन हे सनद सुभा सादर केली असे सदरहू लारी ३००० तीन हजार मामले माlचे जमाबदी वरी रयत निसबत सीस्त करून सरदेसाई माl त्यासि देत जाणे व बाग माlची बागाईत व जिराईत जमाबदी होईल ते सरदेसाई माl याजकडेस इनामत खर्च साल दर साल लिहीत जाणे दर साल ताजा सनदेचा उजूर न धरणे या पत्राची नकल घेऊन असलपत्र सरदेसाई माlजवल देणे ऐसे पत्र घेऊन सुभा आलिया वरी मामले मजकूरचे व माहालानिहाय माl माl वतनदार सुभा आणून याच्या हुजूर ऐन जमाबदी वरी लारी ३००० तीन हजाराची रयतनिसबत सीस्त करून गावगना पटी बसऊन सुभाहून दर माहालास सनदा आलाहिदा सादर केल्या आहेत त्याप्राl हक व लवाजिमा व इनामत दर साल सरदेसाई माlयास तुह्मी बिलाकुसूर देत जाणे जाणिजे छ १७ माहे जिल्हेज