श्रीरामचंद्र.
लेखांक ३८०.
गजश्रिया-विराजित-राजमान्य-राजश्री चिंतोपंत स्वामी गोसावी यांसि
पो।। सदाशिव चिमणाजी सचिव नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें विशेष पत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. किल्ले राजगड येथील असामीच्या वेतना-विशीं लिहिलें त्यास सालगुदस्ताचें किल्ले- मजकूरचें देणेंच राहिले आहे या अन्वयें हेही राहिलें सालमारचा अर्थ तरी हा कालपर्यंत किल्लेमारचा तहबंद जाला नाहीं ठराव होऊन तह-बंद जाला म्हणजे निमेसिमे ऐवज पाववावयाचा तो पावल *रा।। छ २२ रबिलाखर बहुत काय लिहिणें हे विनंती.
********************************************** समाप्त ****************************************