पत्रांक ५२.
स. १७६७ ता. २६ अक्टोबर श्री. १६८९ कार्तिक शुद्ध ४
राजश्री रामकृष्ण गोविंद का।दार पा। पैठण वगैरे गोसावी यासिः-
अखंडित लक्ष्मीआलंकृत राजमान्य स्ने।। केदारजी शिंदे दंडवत. सु। समानसीतैन मया व अलफ स्वदेशचे सरसुभ्याचें कामकाज राजश्री सदाशिव केशव यास सांगितलें असे. तरी तुह्मी मा।निलेसी रुजूं होऊन पा। मजकूरचा बंदोबस्त मा।निले करून देतील त्याप्रमाणें अंमल करणें. मागील हिशेब मानिलेस समजाऊन देऊन फडशा करून पुढें बंदोबस्त मामलत संबंधें करून देतील, त्याजप्रों वर्तणूक करून सरकारचाकरी करणें. जाणिजे. छ २ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
बार