पत्रांक ५३.
स. १६६७ ता। २६ आक्टोबर. श्री. कार्तिक शुद्ध ४ शके १६८९
राजश्री बळवंतराव गोपाळ का।दार पा। श्रीगोंदे वगैरे गांव गो।। यांसिः-
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य स्ने।। केदारजी सिंदे दंडवत. सु।। समान सितैन मया व अलफ. स्वदेशचे सरसुभ्याचे कामकाज राजश्री सदाशिव केशव याजकडे सांगितलें असे तुम्ही मा।रनिलेसी रुजू होऊन पा। मजकुरचा बंदोबस्त मा।रनिले करून देतील त्याप्रों अंमल करणें. मागील हिशेब आहेत ते मारनिलेस समजाऊन देऊन पुढें बंदोबस्त सरसुभे करून देतील त्याजप्रों वर्तणूक करून सरकारचाकरी करणें. जाणिजे. छ० २ जमादिलाखर. बहुत काय लिहीणें! हे विनंती