पत्रांक ५८.
स. १७६७ ता. २ नोव्हेंबर. श्री. कार्तिक शुद्ध ११ शके १६८९
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे शेवेसी विनंति सेवक माहादजी सिंदे दंडवत विज्ञापना. तागाईत छ ९ जमादिलाखर पावेतों साहेबाचे कृपेकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. आम्हाकडील बोलणें पेशजी जे प्रहस्त बोलत होते त्या गोष्टी झाडून खोटया. त्या जाबसालांत आम्ही नाहीं. हालीं राजश्री चिंतो विठ्ठल आपणापासीं आम्हांकडील लक्षाची विनंति करीत आहेत आणि पेशजीही केली आहे. ते बोलणें आमचें असें. त्याजप्रमाणें बंदोबस्त करणें तो मशारनिलेच्या विद्यमानें करावा. सारांश मशारनिलेच्या बोलण्यांत आम्ही असों. *येथील सर्व वर्तमान मशारनिले स्वामीस निवेदन करतील तें ध्यानास आनून बंदोबस्त करून देनार स्वामी समर्थ आहेत. जेनेकरून सरदारी उपयोगी स्वामीचे सेवेसी पडे ऐसे करनार धनी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57