पत्रांक ६९.
१७७१ ता. २४ जून श्री. १६९३ अधिक आषाढ शुद्ध १२
हें राजश्री विसाजी कृष्ण मुक्काम तारिवे ( ? ) गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मी-अलंकृतराजमान्य स्ने। १हरकूबाई होळकर दंडवत. सु॥ इसन्ने सबैन मया व अलफ. हरीराम-भवानीदास याजकडे तुमचा ऐवज येणें, त्यांचा फडशा करावयासी प्रा(ण ?)नाथ भवानीदास सिरपुरास आले आहे(त?). तरी तुम्ही त्यासी तगादा न करीतां सोहलतीनें ऐवज वसूल करोन घेणें. ऐवजाचें काम, यास्तव लिहिलें असे. जाणिजे. रा। छ १० रबिलावल बहुत काय लिहिणे ?