पत्रांक ६६.
इ. स. १७६८ ता. १० फेब्रुवारी श्री. १६८९ फाल्गुन शुद्ध २
राजश्री व्यंकटराव कासी का। दार पा। सीरोज गोसावी यांसिः
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य स्ने॥ तुकोजी होळकर. दंडवत. सु॥ समान सितैन मया व अलफ. राजश्री चिंतो२ विठ्ठल याचे पागेची बोली करून त्याचे तैनात ऐवजीं पा। मजकूर पैकीं गांवे३ तनखा रु॥ १५००० पंधरा हजाराचे पेस्तर सालापासून करार करून हें पत्र तुह्मांस सादर केलें आहे. तरी पा। मजकूरचे पंधरा हजाराचे गांव इस्तावियानें लावणी होऊन उमेदीस४ पंधरा हजार आकार होतील ऐसे गांव एकास एक लगते ५पेस्तरसालापासून नेमून देणें. साल मजकुराचा ६फडच्या येथे जाला असे. जाणिजे. छ १ सवाल बहूत काय लिहिणें?
बार