लेखांक २४
श्री १६१५ भाद्रपद वद्य १
स्वस्तिश्रीराज्याभिषेकशके २० श्रीमुखनामसवत्सरे भाद्रपदबहुल प्रतिपदा भोमवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजाराम छत्रपति याणी समस्तसेनाधुरधर राजमान्य राजश्री धनाजी जाधवराऊ सेनापती यासि आज्ञा केली ऐसी जे तपे मसूर प्रा। कराड येथील देशमुखीचे वतन सालाबाद माहादजी बिन सुलतानजी जगदळे याचे पिढी दर पिढी चालत आले आहे मधे काहीक दिवस भोगवटा उठला होता याकरिता माहादजी जगदळा चजीचे मुकामी हुजूर एऊन वर्तमान विदित केले व पूर्वील कागदपत्र व पादशाहाचे फर्मान होते ते हि दाखविले त्यावरून स्वामीने मनास आणून याचे वतन याचे दुमाला करून प्रा। मजकूरीच्या देशाधिकारियास आज्ञापत्र सादर केले त्यास साप्रत राजश्री सुदर तुकदेऊ दि॥ चिरजीव राजश्री राजा कर्ण याणी कथळा केला की कराड परगणियाची देसमुखी राजश्री राजा कर्ण यास दिल्ही त्यामुळे मसूर तपियाची देसमुखी दिल्ही आहे म्हणौन वतनासी कथळा केला याकरिता माहादजी जगदळा मागती चजीचे मुकामी हुजूर एऊन वर्तमान विदित केले ऐशास पूर्वी याचे कागदपत्र मनास आणून निर्वाह करून याचे वतन खरे जाले याकरिता स्वामी कृपाळू होऊन याचे स्वाधीन केले कराडची देशमुखी चिरजीव राजा कर्ण याकडे दिल्ही आहे काही मसूर तपादेखील दिल्ही नाही ऐसे असता सुदर तुकदेऊ यास कथळा करावयास काय गरज होती हाली स्वामीने मसूरतपियाची देशमुखी माहादजी जगदळे यास चालवावयाची आज्ञा करून सुदर तुकदेव यास आज्ञापत्र सादर केले असे ते याउपरि कथळा करणार नाही तुह्मी हे जाणोन तपेमसूरीची देशमुखी सालाबादप्रमाणे माहादजी जगदळे याचे दुमाला करणे आणि याचे हाते स्वामिकार्य घेत जाणे या वतनास खलेल करील त्यास ताकीद करणे जाणिजे* बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा
माा सुरू सुद
पैाा छ २८ रबिलोवल सन खमस