लेखांक १६
श्री १६१३ वैशाख वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १७ प्रजापतिनाम सवत्सरे वैशाख बहुल दसमी भोमवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजाराम छत्रपति याणी राजश्री नागोजीराउ व चादजीराउ पाटणकर देसमुख पा। पाटणयासि आज्ञा केली ऐसीजे, तुह्मी माहादजी जगदळे देशमुख याबरोबरी विनतिपत्र पाठविले ते पावले माहादजी देशमुख याचे देशमुखीचा भोगवटा कितेक दिवस तुटला आहे ऐशास हे पुरातन वतनदार या पासी बेदरचे पादशहाचे फर्मान व इभराईम आदलशाहाचे फर्मान व सुलतान माहमदशाहाचे फर्मान व वरकड कागदपत्र पूर्वील भोगवटियाचे आहेती तरी याचे वर्तमान स्वामीने मनास आणून याजवरी कृपा करून याचे वतन देशमुखी यास चालविण्याची आज्ञा करून अभयपत्र करून देविले पाहिजे ह्मणोन कित्येक तपसिले लिहिले ते विदित जाले व माहादजी देशमुख याणे आपले वर्तमान जाहीर करून कागदपत्र रुजू केले ते सर्वही मनास आणिले आणि माहादजी जगदळे याची देशमुखी यास चालवायाची आज्ञा केली आहे व अभयपत्र दिल्हे आहे व सुभियाचे नावे सनद सादरकेली आहे तेणेप्रमाणे याचे देशमुखीचे वतन याचे यास चालेल काही अतर पडणार नाही व या उपरी याचे वतनास इस्कील व खलेल होणार नाही जाणिजे निदेश समक्ष
बार सूद
सुरू सूद