लेखांक २३
श्री १६१५ भाद्रपद वद्य १
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके २० श्रीमुखनामसवत्सरे भाद्रपद बहुल प्रतिपदा भोमवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजारामछत्रपति याणी रा। खडोजी वाग मुद्राधारी व कारकून किल्ले वसतगड यासि आज्ञा केली ऐसीजे तुह्मी विनती पत्र छ ७ रमजानचे पाठविले ते छ २९ जिल्हेज प्रविष्ट जाले माहादजी जगदळे देशमुख तपे मसूर प्रा। कराड हे पूर्वी स्वामीचे सेवेसी आला होता तेव्हा स्वामीनी त्याची विनती मनास आणून वृत्तिपत्रे दिल्ही त्या प्रमाणे राजश्री राजचद्र पडित अमात्य हुकमतपन्हा याणि ही आपली पत्रे करून दिल्ही याउपरि राजश्री सुदर तुकदेऊ आले याणी देशमुखीस खलेल केले ह्मणोन महादजी जगदला सेवेसी आला आहे याचे पापत्य करून द्यावया आज्ञा केली पाहिजे ह्मणोन लिहिले ते कळो आले ऐशास माहादजी जगदला याणे स्वामीच्या पायासी येकनिष्ठा धरून सेवा केली या करिता देशमुखमजकुरावरी कृपाळून याचे वतन यास बिलाकुसूर चालवावे ऐसा निर्वाह करून राजश्री रामचद्रपत यास व राजश्री सुदर तुकदेव यास आज्ञा-पत्रे पाठविली आहे ते याचे वतन याचे स्वाधीन करून सुरक्षित चालवितील तुह्मी एकनिष्ठेनें राहोन अलगनोबत चौकस करून जागा स्वामीचा जतन करणे जाणिजे निदेश समक्ष
संमत संमत
मंत्री सचिव
सुरु सूद बार