लेखांक ६०
१६३३ कार्तिक वद्य १४
(फारसी मजकूर)
जुबादतुल एकरान माहादजी जगदळे देशमुख पा। मसूर सु॥ सन ११२० बिदानद की पा। मजकूरची देशमुखी तुमचे वतन तुमचे दुमाला केले असे तर तुह्मी मौजेमजकुरास जाऊन पा।मजकुरच्या मोकदमास व कसबेमजकुरच्या सेटे व महाजनास कौल देऊन आबादी व इस्तमालतीस कोसीस करून किफायत सरकार व रफायत राया अमलात आणोन व हरएक असामीस तुह्मी आपला कौल देऊन आणाल त्याप्रमाणे चालविले जाईल कोण्हे बाबे वसवान न धरिया सरकारचे काम बवजे अहसन सरजाम करीत जाणे मोर्तब शुद
रुजू दफ्तर दिवानी
रुजू दफ्तर मुस्तोफी
तेरीख २७ सौवल