लेखांक ५८
श्री १६२९ माघ वद्य ७
स्वस्तिश्रीराज्याभिषेक शके ३४ सर्वजित नामसंवत्सरे माघ बधी सप्तमी रविवासरे क्षेत्रियकुलावतस श्रीराजा शाहू छत्रपति स्वामी याणी माहादजी जगदळे (देशमुख) च रुद्राजी चंदो देशपांडे ता। मसूर सुभा प्रात सातारा यासि आज्ञा केली ऐसी जे तर्फमजकूरची नजरपट्टीची खंडणी क रु॥ १५०० पंधरासे पैकी बद्दलदेणे रा। परसोजीराजे भोसले रु॥ ७००
बाकी रसद हुजूर रु॥ ८००
आठसे पैकी रवासूदगी सेटी खाटक हुजूर बाजार लस्कर रु॥ १०० बाकी रु॥ ७०० सातसे पैकी हुजूर रसद घेतली रु॥ २००
दोनसे बाकी रुपये ५००
हुजूर रसद पाठवणे या कामास लोक दि॥ हाय रुपये
हरवाजी अंबीकर बारगीर रु॥ ६
लखमाजी बिरामण जाधव रु॥ ५
एकूण रु॥ ११ अकरा रास देविले असे आदा करणे जाणिजे