लेखांक ६१
१६५३
तालिक १/१७
भगवंतराव बिन सुभानराव जगदाले पाटिल कसबे मसूर सुर सन इसन्ने सलासिन मया व अलफ कारणे लिहुन दिल्ही तक्रीम ऐसिजे आपले वडिलानी कुमाजीबावाचे वर्तमान सागितले कराडकर बागवानयाचे कर्ज पांढरीवर होते गैरहगामाचे दिवस बागवान येऊन दगा करू लागला त्यास कुमाजीबावा बोलल की गैरहगामाचे दिवस आहेत हगामावर येऊन मागण आता हाणामारी करू नये इतकियावर न ऐकता बागवान जगीस ऐऊन बेआदबी बोलला त्यावर कुमाजीबावानी पायाचा पायपोस काढून त्यावर टाकिला बागवानाने तैसाच पायपोस काढून त्यावर टाकिला बागवानाने तैसाच पायपोस घेऊन कराडास गेले तेथ नायबास आपली लेक देऊन फिर्याद त्यापासी केली की मसूरचे पाढरीवर कर्ज होते आपण मागावयासी गेलो त्यास कुमाजी पाटिल यानी आपणासी पायपोस मारिला ह्मणोन फिर्याद केली बागवानाचे आत्म्य धरून कुमाजी पाटिलास तलब करून कराडास नेहले मनोरियात कैदेत ठेविले त्याजवर जबरदस्ती करून पैका व्याजसुध्धा देणे अगर वतन लिहून देणे पैका द्यावयासी गाठ पडे ना जीवावरील गोष्टी येऊन पडली नाइलाजे मग वतनाचा कागद करून दिल्हा त्या उपरि हि कैदेतून बाहेर काढीनात तीन वर्षे मनोरियात ठेविले त्यावर म्हादजी पाटील चेरगावकर हे आपले दिवाणकामास नायबाचे भेटीस आले भेट घेऊन निरोप घेऊन माघारे आपले गावास मनोरियावरून जात होते तो कुमाजीबावा बदीखानेतून निघोन बाहेर बैसले होते तो याची व म्हादजी पाटील याची द्रिष्टी जाहाली कुमाजीबावानी रामराम केला त्यावर त्याणी विचारिले की तुमचे वर्तमान काय आहे त्यास त्याणी आपले सकल वर्तमान सागितले वतन हि घेऊन आपलेसी सोडीत नाही तुह्मी सिवधडे पाटील आह्मी तीन वर्षे बदखाना सोसिला आता आपण काही वाचत नाही तुमचे हातून काही इलाज जाहला तर करून पाहणे एतके ऐकून माघारा फिरोन नायबास अर्ज केला की त्याचे वतन घेऊन त्यास का सोडाना त्यावर नायब बोलला जे त्याजपासून आपण जबरदस्तीने वतनाचा कागद घेतला आहे जर तो आपले रजावदीने देईल तर त्यास सोडू त्यावर म्हादजी पाटिलानी अर्ज केला की त्यास बाहीर काढून ते आपण बोलून विचार करून आपणास अर्ज करू त्यावर कुमाजीबावास कैदेतून काढून म्हादजी पा। याचे हाती दिल्हा म्हादजी पाटिलानी कुमाजीबावास विचारले की रजावदीने वतन दिल्ह्यास तुह्मास सोडतील त्याजवरून कुमाजीबावा बोलला की आपण काही वाचत नाही निमे वतन देतो हे वर्तमान नायबास म्हादजी पाटील यानी सागितले त्यावरून त्याणी मान्य केले निमे वतना कागद करून घेतला आणि हजीर जामिन मागितला त्यावरून कुमाजीबावानी म्हादजी पाटिलास दिले भारी करून दिवाणात जामिन दिले त्यावर नायबाने बागवानास बोलावून आणोन त्यास सागितले की कुमाजी पाटिलास नाहून धू घालून त्यास वस्त्रे देणे असे नायबाने सागितले त्यावर त्याणे त्यास वस्त्रे देऊन म्हादजी पाटलास सागितले की कुमाजी पाटलास मसुरास घेऊन जाणे असे निर्वाह करून म्हादजी पाटलास सागितले पाठीमागे आह्मी मसूरास येतो त्यावरून कुमाजीबावा व म्हादजी पाटिल मिळून शाहापूरचे डोगरापावेतो आले तेथ उभे राहून कुमाजीबावा याणी म्हादजी पाटलास सागितल जे आपण गावास येत नाही तुरका बराबर आपण पाटिलकी करीत नाही निरोप द्याल तर आपण जाईन म्हादजी पाटील बोलिले जे आपणास जामीन दिले आणि तुह्मी जाऊ म्हणतां याचा विचार काय कुमाजी बावा बोलिले जे तुह्मास जामिनकीचा तगादा लागला तर अवघेच वतन त्याचे हावाल करणे आपण निश्चयरूप राहात नाही मग म्हादजी पाटिलानी निरोप देऊन चरेगावास गेले मग कुमाजीबावानी आपली बायको गावात होती व लेक नरसोजी पाच वर्षाचा होता हे उभयता गावातून काढून समागम घेऊन घाटावर मौजे आबेकीत जावून राहिले तेथे असता कुमाजीबावा मृत्यु पावले त्याउपर त्याचे बायकोन आपला लेक नरसोजी समागमे घेऊन निदुतास माहेरास गेली तेथे नरसोजीबावा विसा वर्षाचा जाहला लोक मसूरकराचे मूल ह्मणून पाचारू