Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

भगास [ भग्नाशं = भगास ] सर्व जग भगास दिसूं लागलें.

भंगी [ भंगी (indirect hint) = भंगी ] श्लोकाची भंगी करणें म्हणजे पूर्ववक्ता जे श्लोक म्हणेल त्याचें अंत्य अक्षर किंवा शब्द यांनीं प्रारंभ होणारा श्लोक दुसर्‍या मनुष्यानें म्हणणें.

भंजन [ व्यंजन ( चटणी) = बंजन = भंजन ]

भजें [ भज् १० विश्राणने. भज् ( भाजयति) = भाजणें. भज्यं = भजें. भक्तः = भात ] ( धा. सा. श. )

भटार [ भ्रष्टकार किंवा भ्रष्टहार = भट्टार = भटार. भटार (प्रा.) + खानह् (फा.) = भटारखाना. भ्रस्ज् धातु ] (भा. इ. १८३३)

भट्टारक [ भर्तृ = भर्तार = भट्टार. भट्टार + क= भट्टारक ] संस्कृत नाटकांत नटी आपल्या नवर्‍याला म्हणजे भर्त्याला भट्टार या प्राकृत सन्मानदर्शक नांवानें संबोधते. तेव्हां भट्टार हा शब्द भर्तु या संस्कृत शब्दाचें प्राकृत रूप आहे. पुढें भट्टार हा शब्द जशाचा तसा पुन्हा संस्कृतांत घेतला. हा संस्कृतीकृत भट्टार, भट्टारक शब्द जुन्या ताम्रपटांतून राजांना अनेक स्थळीं लावलेला आढळतो. (भा. इ. १८३३)

भट्टिकाव्य [ भर्तृ - (हरि) - काव्य = भट्टिकाव्य. भर्तृ = भट्टि ] (भा. इ. १८३३)

भट्टी [ भृज् १ भर्जने, भृष्टिः = भट्टि = भट्टी ( कुंभार वगैरेंची) (भा. इ. १८३३)

भडक १ [बर्हक ( चमकणारे) = भडक ] लालभडक.

-२ [ भर्ग (उजेड, लखलखणारें तेज ) = भरग = भडग = भडक ] लालभडक = रक्तं भर्ग.

-३ [ अभ्यधिक ( अतिशयित, श्रेष्ठ ) = भडक ] लालभडक supremely red.

-४ [ अभ्यधिकं surpassing excellent = भडक ] exceedingly. लालभडक surpassingly red. Note - भडक विशेषणाच्या पुढें येतो. मागें येता तर विशेषण होता. येत नाहीं; सबब क्रियाविशेषण अव्यय.

भडभड १ [ भटभटाय ](धातुकोश-भडभड ३ पहा)

-२ [ भडि परिभाषणे. भडभड (द्विरुक्ति), भडभडून येणें, रडणें ] (ग्रंथमाला)

भडभडून १ [ भटभटाय ] ( धातुकोश-भडभड ३ पहा)

-२ [ भटभटायित्वा = भडभडून ] भडभड आवाज होऊन किंवा करून. (भा. इ. १८३६)

भडभड्या [ भट् १ परिभाषणे. भटभटकः = भडभड्या ] ( धा. सा. श. )

भकणें १ [ वस्क् १ गतौ. वस्कनं = बक्खणें = भकणें ] कोणीकडेतरी भकला म्ह० हिंडत गेला. ( धा. सा. श. )

-२ [ बृह, भष् भाषार्थे- बृह = बह = बहकणें. ] भष् = भख् = भक् = भकणें ] भकणें, बहकणें म्हणजे भलतीकडे बोलत सुटणें. (ग्रंथमाला)

भक्कम [ बृहत्क्रम = बहक्कम = भक्कम ] बृहत्क्रम म्हणजे मोठा जोरदार.

भगकन् [ मृग् (ज्वाला ) ] (धातुकोश-भगभग ३ पहा)

भंगट [ भग्निष्ट: = भंगट ] विचारशक्तीच्या कामीं अतिशय मोडलेला. भांगेशीं कांहींएक संबंध नाहीं.

भंगणें [ वधि आक्षेपे निंदायां । गतौच।. वंगनं= वंगणें, भगणें ]
ढेंकुणाच्या संगें हिरा जो भंगला म्ह० आक्षिप्त झाला. (धा. सा. श. )

भगदेव म्हणजे बाहेरख्याली, स्त्रीलंपट. (भा. इं. १८३७)

भगभग [ भक्ष्यभक्षिका = भकभका = भगभग (स्त्री. ) ] भगभग म्हणजे खाखा. (भा. इ. १८३७)

भगरा [ विड्ग्रहः = भगरा ] मुलगा भगरा हगतो.

भगवा-वी-वें [ भगव. भार्गव = भग्गव = भगव. मृगुक = भगुअ = भगव. भार्गव व मृगु म्हणजे चकाकणारें, लखलखणारें. लखलखणारा रंग तो भगवा रंग. भगवी छाटी = भृगुका शाटी, भार्गवी शाटी. भगवा झेंडा म्हणजे लखलखणार्‍या रंगाचा झेंडा. भगवा = Purple colour. संन्यासी, तापसी भगवें वस्त्र पांघरतात. भगवें म्हणजे हुर्मुजी. रामदासी रंग भगवा किंवा हुर्मुजी असे. भगवें घेणें म्हणजे भगवें वस्त्र पांघरणें, संन्यासी बनणें. ] ( भा. इ. १८३३)

भगवा झेंडा [ भगवदध्वजदंड: = भगवा होंडा (इंद्राचा झेंडा ) ]

भगवें [ मृगु ( tawny ) = भगवें ] ( भा. इ. १८३६)

कुणें (बुद्रक) - कौणं (झाडावरून). मा

कुतबपूर - मुसलमानी नांव. खा

कुंदें - कुंद - कुंदं. खा व

कुपेंखेडें - कुप्य (जस्त ) - कुप्यकखेटं. खा नि

कुंभवणी - कुंभ (कुंभकर्णपुत्र) - कुंभवनी. खा म

कुंभारखाण - कुंभकारखानि. खा म

कुंभारखेडें - कुंभकारखेटं. खा म

कुंभारडें - कुंभकार - कुंभकारवाटं. खा म

कुंभारी - कुंभकार - कुंभकारिका. ३ खा म

कुंभारें - कुंभकारकं. ४ खा म

कुमरेज - कुमारिका - कुमारीजं. खा म

कुमसडी - कुल्माषवाडी. खा व

कुरखळी - कोरकखली. खा व

कुरंगी - कुरंग (हरिण) - कुरंगिका. खा इ

कुरवंडें - कुरववंटं (कुरुनामक गोत्राचें नांव). मा

कुरवेल - कोरक. खा व

कुराणपिंपरी - कुररं (क्रौंच पक्षी ) - कुररवनपिप्पलिका. खा इ

कुरुकवाडें - कुरुक ( राजाचें नांव) - कुरुकवाटं. खा म

कुरुली - सं. प्रा. कुरुमरथी. पुणें, खेड तालुका. ( शि. ता.)

कुरुसवाडें - करुष ( लोकनाम ) - करुषवाटं. खा म

कुर्‍हाड - कुरु (लोकनाम) - कुरुवाटं. ३ खा म

कुर्‍हाडदें - कुरु (लोकनाम) - कुरुवाटपद्रं. खा म

कुर्‍हावद - कुररं (क्रौंचपक्षी) - कुररावर्त. खा इ

कुर्‍हें - कुररं (क्रौंचपक्षी) - कुररं. ५ खा इ

कुवा - कुप्य ( जस्त ) - कुप्यकं. खा नि

कुवारखेडें - कुमारिकाखेटं. खा म

कुसगांव - कुशग्राम ( कुश = वनस्पति). मा

कुसगांव - कुशाग्रामं (झाडावरून). मा

कुसगांव (खुर्द) - कुशग्रामं. मा

कुसंवलें - वनकौशांबी. कुलाबा. (पा. ना.)

कुसवली - कुशपल्ली (कुशतृणावरून). मा

कुसवाड - कुशवाटिका. खा व

कुसवाड - कुश (रामपुत्र ) - कुशवाटं. खा म

कुसंबी - वनकौशांबी. सातारा. (पा. ना.)

कुसंबबेरी-कुशांब (कुशनाभाचा वडील भाऊ). खा म

बोर्‍या [ बादरिकः = बोर्‍या. बदराणि उंछति इति बादरिक: (४-४-३२) ] बोर्‍या म्हणजे बोरें वेंचून निर्वाह करणारा म्हणजे दरिद्री. बोर्‍या म्हणजे दरिद्री.

बोल १ [ वल्ह = बल्ह = बल्ल = बोल. अचा ओ ] ( ज्ञा. अ. ९ )

-२ [ बोल gum-myrh = बोल, बोळ ] Gum-myrh. उ०- आंगा बोल माखुनु तपें । विकावेया आपणपें ।
अंगना हीन पडपें । जिया परीं ॥ ज्ञा. अ. १७-२४५

बोलकें [ वल्ह-वल्हत्कं = बोलकें ] ( धा. सा. श.)

बोलणें १ [ पुल् १ वृद्धौ. पोलनं = बोलणें ] आतां धंदा बोलूं लागला म्ह० भरभराटीस येत चालला.
हा मराठी बोल धातू संस्कृत पुल् पासून निघालेला आहे. ( धा. सा. श. )

-२ [ वहल (बोलणें) = बहल = बोल्ल = बोल = बोलणें ] वहल हा धातु पाणिनीय धातुपाठांत आहे. (ग्रंथमाला)

बोले [ वल्हिहि ] (येइ पहा )

बोवा १ [ भगवत् = बअवअ = बोवा, बावा ]
अचा उच्चार ओ होऊन या बवा = एहि भवन्.
बुवा आला (पोरांना भीति दाखवितांना) = भूतः आगतः
ये बावा = एहि भाव.
बावा आले = भगवन्तः आगताः.
एथें बोवा ! आपलें कांहीं चालत नाहीं.
एथें बोवा ! = अत्रबवन् ! (संबोधन ) (भा. इ. १८३४)

-२ [ भवत् ] ( बवा पहा)

बोहरा [ व्यो + कारः ] ( बोरा पहा )

बोहरी [ भुरिः ] (धातुकोश-बोहर पहा )

बोहारा [ व्यो + कारः ] ( बोरा पहा )

बोहिरी [ भुरिः ] ( धातुकोश-बोहर पहा )

बोळ १ [ बोल = बोळ (औषध) ] Gum-myrrh. (भा. इ. १८३६)

-२ [ वोल ] ( बोल २ पहा )

ब्याद [ विवादक = बिआदआ = ब्यादा - ब्याद ] व्याधि या शब्दाशीं कांहीं संबंध नाहीं. (भा. इ. १८३४)

ब्येंब्यें १ [ वि + रु ]

-२ [ मीम् ( द्वि. ) = ब्यें ब्यें ]

-३ [ रु २ शब्दे. बिंबीरवं ( माधवचंपू १३ श्लोक ) = ब्यें ब्यें आवाज. ( धा. सा. श. )

ब्रीद [ बिरुदं (बि + रुद् to proclaim ) = ब्रीद, बिरीद, बिरुद ]

बोडन्ती १ [ वृध्-वर्ध् कापणें. वदन्तीप्रमाणें वर्धन्ती.
वर्धन्ती = वडुन्ती = वोडन्ती = बोडन्ती ] वोडन्ती म्हणजे कापणी, केसांची कापणी, हजामत (कुत्सितार्थक) (भा. इ. १८३४)

-२ [ मोटन्ती = वोडन्ती = बोडन्ती ] मोटन्ती म्हणजे मोडणें, हाणून पाडणें. मी त्याची बोडन्ती केली म्हणजे मी त्याला वाचेनें हाणून पाडिला. (भा. इ. १८३६)

बोडंती [ मुड् १ न्यग्भावे ] (धातुकोश-बोड ७ पहा)

बोंडिलें [ मंडलकं a circular vessel = बोंडलें

बोडा [ वोढृ = बोडा] Penis, husband.

बोडाण [ अवदान = बोडाण, बोडण] बोडण भरणें = अवदानं बिभर्ति, अभ्यवहरति.

बोड्यो [ वर्धक = बड्डअ = बोड्डअ = बोढ्ढा-ढ्डी-ड्डें. वर्धककः = बोड्यो ] मुलाला वर्धक, वर्धमान इत्यादि शुभ शब्दांनी हाक मारण्याची चाल संस्कृतांत होती. (भा. इ. १८३६)

बोड्ड्यो [ वयोधास् = बओढा = बोड्ड्या = बोड्ड्यो ] वयोधास् म्हणजे तरुण मुलगा. हा शब्द कोंकणांत फार.

बोण [ भोजनं = भोअणँ = बोणें, बोण, बोन, बोनें ]

बोणें [ भोजनं ] (बोण पहा)

बोथाटी [ वृथाटनिः = बुथाटणी = बोथाटणी = बोथाटी ] अटनि म्हणजे धनुष्याची किंवा शस्राची कोटि, टोंक. ती तीक्ष्ण्, ज्या शस्त्राची नाहीं तें शस्त्र बोथट.

बोन, बोनें [ भोजनम् ] (बोण पहा)

बोंब १ [ ॐ हैं वोम् = बोम् = बोंब ] तंत्रांत असें सांगितलें आहे की, त्रैवर्णिकांनीं ॐ असा उच्चार करावा व शूद्रांनीं वोम् असा उच्चार करावा.

-२ [ द्वंद्व ] (बंब २ पहा)

बोबडा १ [ बोबल (बल् धातूचें यङि रूप) = बोबड-बोबडा-डी-डें ] (ज्ञा. अ. ९ पृ. ८)

-२ [ बल्बलाकरः ] ( धातुकोश-बोबड पहा)

बोभाट १ [ भट् परिभाषणे ] (भाट २ पहा)

-२ [ (भर्त्स्) वाभर्त्स्यते = बोभाटतो ] (भा.इ. १८३६)

बोभावणें [ भट् परिभाषणे ] (भाट २ पहा)

बोरा [ व्यो ( लोखंड ) + कारः = बोआरा, बोरा, बोहरा ] लोखंडाचा बेपार करणारा. व्यवहारिन् पासून निघालेला शब्द बोहारी आहे, बोहारा नाहीं.

काळघाट - कालघाटः खा

काळाकांटा - काली (मेढशिंगी ) - कालीकंथं. खा

काळाचिखल - काली (मेढशिंगी)- २ खा

काळादांत घाट - कालदंतकघाटः खा

काळीवेल - काली (मेढशिंगी ). खा

काळेपाणी - कालपर्णिका (तगार). खा

किकवारी - किखि: (माकड) - किखिवाटिका. २ खा

किनोद - किणि ( अघाडा ). खा

किन्हई - किणि (अघाडा) - किण्यावती. खा

किन्हगांव - किणि (अघाडा) - किणिग्रामं. २ खा

किरवाडें - कीर (पोपट) - कीरवाटं. खा इ

किरोल - सं. प्रा. किरुवल्लि. ठाणें. ( शि. ता.)

किरोली - सं. प्रा. किरुवल्लि. सातारा. (शि. ता.)

किरोळे - कीर (पोपट) - कीरपल्लं. खा इ

किवळें - किर्मिपल्लं (किर्मि म्हणजे पळस). मा

कुई - कुप्य (जस्त) कुप्यका. २ खा नि

कुकडेल - कुक्कुटवेर. खा इ

कुकताड - कोक (लांडगा) - कोकताडः (ताड=पर्वत). खा इ

कुकरमुंडे - कुक्कुरमुंडं. खा इ

कुकराणी - कुक्कुरवनी. खा इ

कुकलोट - केकिलवाटं. खा इ

कुकाण - कोक (लांडगा) - कोकवनं. खा इ

कुकावल - कोक (लांडगा) - कोकावलि. खा इ

कुचबिहार - कूचवार = कुचबार = कुचब्यार = कुच-बिहार. पाणिनि - अष्टाध्यायी ४-३-९४

कुंझर - कुंजर (हत्ती) - कुंजरकं. खा इ

कुंठावळ - कुंठ (रोहिस गवत) - कुंठम्लिका. खा व

कुडळ - कूट (गिरिशिखर) - कूटपल्लं. ४ खा नि

कुडा - कूटा. खा न

कुंडाणें - कुंड (गोळक) - कुंडवनं. ४ खा म

कुडासी - कूट (गिरिशिखर) - कूटककर्षा. खा नि

कडाळ - सं. प्रा. कोडाल. सातारा, रत्नागिरी. ( शि. ता.)

कुढावद - कुध्र (पर्वत) - कुध्रावर्त. २. खा नि

कुणें - कौणं (कुणि - नांदुर्की). माकुणें (खुर्द) - कौणं (झाडावरून). मा

बोडका १ [ मस्करिन् (यति ) = बोडका = फजिती ]

-२ [ व्युदक = बोडका - बोडकें ( तळें वगैरे ज्यांत पाणी नाहीं तें) ] बोडक्याचें भात = व्युदकीयाः तंडुला:

बोडका - की [ वुड् (त्यागणें) पासून बोडका-की ] ज्यांनीं केस किंवा अलंकार त्यागिले आहेत त्या व्यक्ति. (स.मं.)

बोडकिच्चा [ वार्धकिनेयः = बोडकिच्चा ]

बोडकी [ वर्धकी (वेश्या, जारिणी) = बोडकी ]

बोडकें १ [ मुंडकं = बोडकें ]

-२ [ मूर्धकं = वूढकँ = बोडकें (मस्तक) ]

-३ [ मूर्धन् + क = मूर्धक pate = बोडकें pate ]

बोडक्याचें (भात) [ मुंडकशालि: = बुंडक = बोडक. मुंडकीय = बोडक्याचें (भात) ]

बोडण १ - नित्य जे वार्षिक कुलाचार व नैमित्तिक जे विवाहादि संस्कार ह्यांच्या प्रारंभीं किंवा अंतीं बोडण भरण्याची चाल कोंकणस्थांत आहे. बोडण भरणें म्हणजे कोणत्याहि शुभ धातूची देवीची प्रतिमा किंवा प्रतीक घेऊन तिला अन्नाचे, प्रायः कणकेचे अलंकार घालून, अन्नाचा प्रायः दहीदुधाचा अभिपेक करून, अन्नाचा म्हणजे पुरणाचा नैवेद्य दाखविणें. नैवेद्य दाखविल्यावर, मूर्तीसुद्धां सर्व संभार सुवासिनी एकत्र कालवितात आणि शेवटीं उत्तरपूजेकरितां प्रतिमा काढून घेऊन, नंतर त्या कालविलेल्या संभारांतून भोजनास आलेल्या सर्व कुलस्त्रियांस, कुलपुरुषांस व कुलबालकांस प्रसाद वांटतात. असा हा वोडणाचा विधि आहे. हा विधि श्रुतिस्मृतिशास्रोक्त नाहीं, तंत्रोक्त आहे. गोपीनाथ दीक्षित ओक यांनीं शक १६८७ त समाप्त केलेल्या संस्काररत्नमाला नामक ग्रंथांत, हा बोडणाचा कुलाचार सांगितला आहे. हा संस्काररत्नमालाग्रंथ आनंदाश्रमसंस्कृतग्रंथावलींत छापून आलेला आहे. त्याच्या २६५ व्या पृष्टावर गोपीनाथ दीक्षित म्हणतात -
" यदि मोटनाचारश्चेत् सोपि कार्यः । तच्चमोटनं उक्तं मेरुतंत्रे -

अथ मोटनकं वक्ष्ये देवाविर्भावकारणं ।
पाकक्रिया प्रकर्तव्या चतुर्भक्ष्यसमन्विता ।।
भार्यया साधकेन्द्रस्य पतिव्रत्यादियुक्तया ।
अप्रसूताः स्त्रियः पंच आहूय सुकुमारिकः ।।
अलंकृता: पवित्रास्ता एकदंबत्योपवेशयेत् ।
तत्रादौ विघ्नपत्थानमोत्रे तु वटुकस्य च ।।
चकारात्कुलदेवतायाः
ताः संपूज्य महापात्रे पवित्रे तत्र चार्पयेत् ।
क्रमाद्द्विगुणमानेन मध्वाज्ये च सितादधि ॥
दुग्धं च निक्षिपेत्तत्र नैवेद्यं तत्र निक्षिपेत् ।
कुमारिकायाहस्तेन मन्थयेयुः स्त्रिय श्च तत् ॥
स्त्रीभि स्तस्मिन् मध्यमाने देवावेशः प्रजायते ।
देवावेशे जायमाने सुगंधो वाति मारुतः ॥
सर्वे मनोगतं वक्ति देवताशु प्रसीदति ।
सिध्यंति सर्वकार्याणि मोटनानां शतेन.च ॥
नखै र्भवेद्विवाहस्तु पंचाशद्भिः सुतस्तथा ।
नखै र्विशैरित्यर्थः । पंचाशद्भिः सुतलाभ इत्यर्थः ।
अशीत्या गतराज्याप्ति विशत्या लभते धनम् ।
अष्टोत्तरशतेनापि असाध्येन तु मेलयेत् ॥
कौमारिका चेष्टदेवं कौमार्या ईरितो विधिः । इति।
कौमारी योगेश्वरी । तदुद्देशेन विधिर्भवतीत्यर्थः ।

सैंपाक करावा, पांच अप्रसूत स्त्रिया पांच कोंवारणींसह बोलवाव्या, जोगेश्वरीची प्रतिमा घ्यावी, मोठी परात घ्यावी, तींत मध, धूप , साखर, दहीं, दूध, व नैवेद्य घालावा व त्या स्त्रिया व कोंवारणी ह्यांच्याकडून तो संभार कालवावा. कालवतांना देवी अंगांत येते व सर्व मनोगत बोलते. शंभर बोडणांनीं सर्व कार्ये सिद्ध होतात. वीस बडणांनीं लग्न होतें. पन्नासांनीं पुत्र होतो. ऐशींनीं गतराज्य मिळतें. विसांनीं धनसंपत्ति मिळते. अष्टोदर्शांनीं असाध्यसिद्धि होते.

असा हा मेरुतंत्रोक्त विधि आहे. कित्येक तंत्रोक्तविधि श्रुतिस्मृत्युक्त असतात. त्यांपैकीं हाहि विधि कदाचित् असेल.
मोटन = वोडण = बोडण

गोपीनाथ दीक्षित कोंकणस्थ पडले. तेव्हां त्यांनीं ह्या आचाराचा उल्लेख केला. नारायण दीक्षितादि देशस्थ धर्मशास्त्रकार ह्या विधीचा उल्लेख करीत नाहींत. गोपीनाथ दीक्षित ओक आनंदीबाई पेशवीण इचे संबंधी होते म्हणतात.

विघ्नांचें मोटन ऊर्फ बोडण ज्या आचारानें होतें त्या आचाराचें नांव बोडण.

ज्या आचारांत अन्नादि संभार मोडून चूर्ण करावयाचा असतो तो बोडणविधि होय. (भा. इ. प्रथम संमेलनवृत्त)

-२ [ ओदन = वोडण = बोडण ] बोडण भरणें. बोडण म्हणजे कुलधर्मांत अन्न बायका कालवून मळतात तें. (भा. इ. १८३३)

-३ [ बहूदनं (षड्रस अन्न ) = बोडण ]
देवीचें बोडण भरणें म्हणजे देवीला षड्रस अन्नाचा नैवेद्य दाखविणें.

-४ [ वि + अवदान = बोडण ] Gift of food to deity.

-५ [ अवदान ] (बोडाण पहा)

कारेघाट - कारवीघाट:. खा व

कार्लें - (खडकाळें पहा)

कार्लें - कारपल्लं ( कारव झाडावरून ). मा

काली - काली (मेढशिंगी). खा व

कालें - कल्य (ग्रामं ) ( कल्य म्हणजे चांगलें). मा

कांवटी - कमठ (बांबू, वेळू) - कमठिका. खा व

कांवटें - कमठ (बांबू, वेळू) - कमठं. २. खा व

कावडी - सं. प्रा कापिका. पुणें, सातारा. (शि. ता.)

कावपिंपरी - काम्ये (सुंदर) - काम्यकपिप्पली. खा नि

कावी - सं. प्रा. कापिका. भडोच. ( शि. ता.)

काष्टी - काष्टा (दारुहळद). खा व

कासमवाडी - खा मु

कासर्डें - सं. प्रा. काशर्‍हद. रत्नागिरी, कोल्हापूर. ( शि. ता. )

कासली - कासर (रेडा, गवा) - कासरिका. खा इ

कासविहीर - काश (तृणविशेष). खा व

कासवें - कछप - कछपिकं. खा इ

कासारखेडें - कासार (तळें) - कासारखेटं. खा नि

कासारें - कासार (तळें) - कासारकं. २ खा नि

कासोदा - काशमर्द = कासवद = कासोदा.

कासोदें - काश (तृणविशेष) काशपद्रं. खा व

काहोचें - काही (कुडा ) - काहीयं. खा व

काळखेडें - कालिक (काळी चिंमणी) - कालिकखेटं. खा इ

काळखेडें - काली (मेढशिंगी ). खा व

काळगांव - कालिक (काळी चिमणी ) - कालिकाग्रामं. खा इ

कापरी - कर्पूरिका. खा न

कापसी - कर्पास - कार्पासिका. खा व

कापूसवाडी - कर्पासवाटिका. खा व

कांबरें - कम्रपुरं (चांगलें सुंदर गांव) मा

कांबरें नाणे - कम्रपुरं ज्ञानकं. मा

कामथवाडी - कर्मस्थ (कुळकरणी, कायस्थ) - कर्मस्थवाटिका. ३ खा म

कामपुर - काम्ये (सुंदर) - कम्यकपुरं. खा नि

कामोद - कुमुदं. खा व

कारली - सं. प्रा. कारेल्लिका. रत्नागिरी, कुलाबा, खानदेश. ( शि. ता.)

कारलें - सं. प्रा. कारोल्लिका. पुणें, कुलाबा, बेळगांव. ( शि. ता.)

कारस्कर - इतिहास मंडळाच्या शके १८३४ च्या इतिवृतांत मीं असें विधान केलें होतें कीं कारस्कर हा देश व वृक्ष व लोक पाणिनीला माहीत असावे व हा देश नर्मदेच्या दक्षिणेस असावा. ह्या विधानाला वनस्पतिशास्त्रांतून एक दुजोरा मिळाला आहे. कारस्कर हा शब्द निघण्टूंत कुचल्याचा म्हणजे Nux vomica चा वाचक आहे. कुचला सह्याद्रींत नाशकापासून गोंवा मलबार पर्यंत सांपडतो असें वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणतात. कुचल्याची मूळ-भूमि सह्याद्रीचा हा प्रांत असावा. कुचला हें औषध व वनस्पति नर्मदेच्या उत्तरेकडील आर्यांना जेव्हां कळली, तेव्हा ही विषारी व औषधी बी ती ज्या देशांतून येई त्या देशाच्या नांवानें ते ओळखूं लागले. मूळ देशाचें व लोकांचें नांव कारस्कर होतें व कारस्कर देशांतून येणार्‍या ह्या अपूर्व व तेजस्वी वनस्पतीचें नांव हि उतरेकडील पाणिनीय कालीन आर्यानीं कारस्कर असें च ठेविलें. तात्पर्य, कारस्कर हा दक्षिणेकडील देश आहे, असें निःसंशयपणें म्हणण्यास आतां हें एक आणीक प्रमाण मिळालें आहे व पाणिनीला नर्मदेच्या खालील कुचला ज्या प्रांतांत होत असे तो प्रांत नांवानें तरी चांगला माहात होता असें कबूल करणें भाग पडतें. कारस्कर हा मूळचा संस्कृत शब्द नाही. हा सह्याद्रींत राहणार्‍या नागा लोकांच्या भाषेंतील शब्द असावा. तो नागसंसर्गानें आर्यांनीं संस्कृतांत रूढ केला आणि कालान्तरानें तो अत्यन्त रूढ झाल्यावर त्याची व्युत्पति पाणिनीसारख्या सूक्ष्मदृष्टि वैय्याकरणाला करावी लागली. प्रायः परभाषेंतून घेतलेले शब्द स्वभाषेच्या स्वभावाप्रमाणें व नियमांना धरून व्युत्पादण्याचा प्रयत्न थोडासा हास्यास्पदच आहे. परंतु पाणिनीनें ज्या अर्थी तो संस्कृत शब्द म्हणून व्युत्पादण्याचा प्रयत्न केला आहे, त्या अर्थी पाणिनीच्या आधीं कित्येक शतकें हा शब्द संस्कृतांत इतका रूढ होऊन बसला होता कीं, तो मूळ संस्कृत आहे कीं नागभाषेंतील आहे, या बाबीची आठवणसुद्धां पाणिनीच्या कालीं बुजाली होती. अशी स्थिति असल्यामुळें कारस्कर शब्दाची कृत्रिम व्युत्पत्ति करण्यास पाणिनि प्रवृत्त झाला व कार व कर या दोन संस्कृत शब्दांचा समास होतांना सुडागम मध्यें येतो असें सूत्र त्यानें साहजिक च ठेवून दिलें. सिंधप्रदेशांत ज्याला पारकर प्रांत म्हणतात त्याला पाणिनि पारस्कर म्हणे व तेथें हि सुडागमाचा च उपयोग पाणिनीनें केला आहे. प्रायः पारस्कर हा शब्द सिंधप्रांतांत आर्यांच्या अगेदर जे कोणी लोक राहात असतील त्यांच्या भाषेंतील मूळचा आहे, असा माझा तर्क आहे. (भा. इ. १८३४)

बोचकभवानी १ [ व्यवसायभवानी = बोचकभवानी ] उद्योगी बया.

-२ [ मूपकभवानी = बूचकभवानी = बोचकभवानी ] भवानी deity of the मूषकs c. e. robbers.

-३ [ मुंच् १ गर्वे. मुंचक = बुंचक = बोचकभवानी ] गर्विष्ठ फसवी मुलगी.
सहाव्या गणांतील मुच् मुंच् निराळा. (धा. सा. श.)

बोचका [ व्यंसक ( cunning ) = बोचका ]

बोचणें [ व्युष् ४ विभागे. व्योषणं = बोचणें ] ( धा. सा. श. )

बोंचणें [ कर्मणि व्रूस्यते = बोंचतें ( अकर्मक ) व्रूस् इजा करणें हिंसायाम्. व्रूसयति = बोंचतो (सकर्मक)] ( भा. इ. १८३६)

बोचरा १ [ व्युच्चारकः = बोचरा] व्युच्चारक म्हणजे सीधा मार्ग सोडून वर्तन करणारा.

-२ [ व्यच्चरक going astray, adulterous = बोचरा, भोसडा ] adulterous व्युच्चर्यः = भोसडिच्या adulterous.

बोचा १ [ बुस् उत्सर्गे. बोसः = बोचा ] बोचा म्हणजे उत्सर्ग करण्याचें इंद्रिय. ( धा. सा. श.)

-२ [ मुंचक = बुंचा = बोचा ]
मुंचक म्हणजे अंड, आंड.
बोचा म्हणजे अंड.

-३ [ बुसः the organ that voids offal = बोचा. बुस् to omit, to void. ]

बोज [ ओजस् = वोज = बोज ]

बोजड [ व्यायत, व्युद्यत = वोजड ] बोजड म्हणजे आकाराबाहेर आडवेंतिडवें लांबलचक.

बोजा [ अवोह्य: ( अव + उह्य ) = बोजा ]

पोट १ [ पोत = वोट = बोट ] नाव. इंग्रजींत हि boat असा च शब्द आहे. आगबोट = अग्निपोतः

-२ [ चिंचेच्या बोटाप्रमाणें ज्याची आकृति दिसते तो अवयव. पुट = पोट = बोट ] (स. मं.)

बोंड [ वृंत = बोंड ] वृंत म्हणजे स्तनाग्र. बोंड म्हणजे स्तनाचें अग्र, कळीचें आग्र, कश्याचें हि अग्र.

बोडक [ वर्धक = वडुक = बोडक (का - की - कें ) ] वर्धक म्हणजे कापलेलें, केंस कापलेलें. जिचे केंस कापले किंवा काढले किंवा भादरले आहेत ती बोडकी.
ज्याच्या डोक्यावरती केसांचें किंवा वस्त्रांचें आच्छादन नाहीं तो बोडका.
ज्याच्यावरतीं कुसळांचें अच्छादन नाहीं तें बोडक्याचें भात. (भा. इ. १८३४)