Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

भांड [ भंड: = भांड (मस्कर्‍या ) ]

भांडकुदळ [ कुर्द् १ क्रीडायाम्. कुर्दल: = कुदळ, भांडकुदळ ] भांडकुदळ म्हणजे क्रीडेनें भांडण्यांत पटाईत.

भांडवल १ [ भांडमूल्य = भांडउल = भांडवल ] (ज्ञा. अ. ९ पृ. १७५)

-२ [ भांडपदम् = भांडवड=भांडवल ] (भा इ.१८३४)

-३ [ भांडबलं = भांडवल ] मूलधन (भा. इ. १८३७)

भांडेंकुंडें [ भांडं कुंडं = भांडेंकुंडें. भांड भूषणमात्रेपि इति विश्वः ] चोरानें तिचें भांडेंकुंडें नेलें म्हणजे दागदागिने नेले.

भाड्या - ब्राह्मण्यां वैश्याद् यो वैदेहको जातः तेन राज्ञां शुद्धान्ते अन्तःपुरे स्थित्वा राज्ञीनां रक्षणं कर्तव्यं । तेन सामान्यवनिताः पोष्याः । तेषां भाटी तस्य जीविका । स शुद्राद्धीनः । पण्यांगनानां राज्ञां च तदिच्छया संगतं कुर्यात् ॥
भाटी म्हणजे भाडें.

सामान्यवनितांच्या भाड्यावर उपजीविका करणारा जो वैदेहक तो च भाटिक.
भाटिक: = भाडिआ = भाड्या

हा शब्द प्राकृत स्त्रिया प्राकृत पुरुषांना अपशब्दार्थी सध्यां महाराष्ट्रींत लावितात.
टीप - वरील उतारा जातिदर्पणनामक ग्रंथांतून-मजजवळ असणाच्या-पृष्ठ ४, पंक्ति ७॥८॥९ - घेतला आहे. ( भा. इ. १८३२ )

भाणें [ भाजन = भाअण = भाणँ = भाणें = भांडें र्‍हस्वत्वदर्शक भाणडें = भांडें ] ( ग्रंथमाला )

भात [ भक्तः = भात ] ( भजें पहा )

भातुकली [ व्यात्युत् + केलि ] (बातुकली पहा)

भातें [ भृत्यकं wages, hire = भातें ] मजुरी, पोटगी.

भातोण [ भक्तकुण = भातोण. भक्तस्य पाकः भक्तकुणः (५-२-२४ ) ]

भानगड [ भ्रम् ४ भ्रमणे. भ्रमनिगडितं = भांनिगड = भानगड ] भानगड म्हणजे भ्रमानें घेरलेली स्थिति. ( धा. सा. श. )

भानचोद [ भगिनीसुत = बेहेणसोद=भेनचोद= भानचोद ] भानचोद ही मराठींत शिवी नाहीं. भानचोद म्हणजे बहिणीच्या मुला ! बहिणीला चोदणारा असा उत्तान अर्थ उगाच करतात.

भांवावणें [ बंभ्रम्यते ( भ्राम्) = भांवावणें ] भांवावणें म्हणजे अतिशय भ्रममाण होणें. ( भा. इ. १८३६ )

भारकस [ भारकर्ष: = भारकस ] भारा बांधण्याची दोरी, कसा.

खटवाणी - खटिक (खडू) - खटवाहनी. खा नि

खटाळ - खट्टालि: (तृणविशेष). खा व

खडक - कटक (सैन्याचा तळ ) - कटकं. खा नि

खडकतळे - कटक (सैन्याचा तळ)-कटकतलं. खा नि

खडकदेवळें - कटक (सैन्याचा तळ) - कटकदेवलकं. खा नि

खडकवण - कटक (सैन्याचा तळ)- कटकवनं. खा नि

खडकाळें - खडक+तल=खडकअळ=खडकाळ =ळँ=ळें.
कार + तल = कारअळ = कार्ळ =ळँ = ळें.
लवण + तल = लोन + अळ = लोनाळ = ळँ =ळें = लेनावळें.
खंड + तल = खंड + अळ = खंडाळ = ळँ = ळें.
खिंड + तल = खिंड + अळ = खिंडाळ = ळँ = ळें. ( ग्रंथमाला )

खडकाळें - कटकालयं ( मावळ प्रांतांतील तत्कालीन राजाच्या सैन्याचें ठाणें ). मा

खडकी - कटकी. खा न

खडकी - कटक (सैन्याचा तळ) - कटकिका. १० खा नि

खडकें - कटक (सैन्याचा तळ ). कटककं. ४ खा नि

खडक्या - खडक्किका ( खिडकी ) - खडक्किका. खा नि

खडगांव - खटिक (खडू) - खटिकग्रामं. खा नि

खंडणे - खंड ( चीर, तुकडा, भेग) - खंडवनं. खा नि

खंडवाय - खांडव (अरण्यनाम) खांडवावती. खा नि

खंडाळे - कंदरिकं - कंडळिय = खंडाळें a village in a vally कंदर.

खंडाळे - खिंडपल्लं (बोरघाटाच्या खिंडीतलें गांव). मा

खंडाळे - महाराष्ट्रांत खंडाळीं पुष्कळ आहेत. खिंडतल, खंडतल, खंडअळ, खंडाळ, खिंडाळ अशा परंपरेनें हा शब्द आला आहे. खिंडीच्या तळचें किंवा माथ्यावरचें जें गांव तें खंडाळे.
(महाराष्ट्र इतिहास-मासिक श्रावण शके १८२६)

खंडाळे - (खडकाळें पहा).

खंडाळे-खंड ( चीर, तुकडा, भेग ) - खंडपल्लं. ५ खा नि

खंदार - गंधर्व. (व्यक्तिनाम व्युत्पत्ति कोश-गांधारी पहा)

खपाट- क्षपाट ( राक्षसनाम )-क्षपाटकं. खा म

खमगांव- खर्म ( रेशीम ) - खर्मग्रामं. खा नि

खमताणें - खर्म (रेशीम ) - खर्मस्थानं. खा नि

खमाणें - खर्म (रेशीम ) - खर्मवनं. खा नि

भाकड [ मर्करा (वांझ) = भक्कडा = भाकड ]

भाकडकथा [ अभ्याख्यातकथा = (अलोप) भाकडकथा. ख्या २ कथने ] अभ्याख्यात falsely accused false, खोटी.

भाकर [ भक्ष्याहार = भक्खार = भाकार = भाकर ] अशिष्ट लोक भाकार असाच उच्चार करितात. मूळ पुल्लिंगाचें मराठीत स्त्रीलिंग झालें आहे. लहान भाकर ती भाकरी. (भा. इ. १८३३)

भाकाढ [ बष्काढ्या = भाकाढ ] विऊन फार महिने झालेली. (उंटाड पहा )

भांग [ भंग = भांग ] (स. मं. )

भागणें [ भज् १ सेवायाम्. भाक्तं (मिळविलें ) = भागलें ] जगला म्हणजे भागलें म्ह• मिळविलें. भागणें (मिळवणें). ( धा. सा. श.)

भागला [अभ्यागतः = भागाअ + ल = भागला-ली-लें ] अभ्यागतः अतिथिः = पाहुणा भागला. चांदोबा, चांदोबा, भागलास का ? = चंद्र चंद्र अभ्यागतोऽसि किम् ?

भांगसळ [ भंगशलाका = भांगसळ ]

भाग होणें - तें-करणें मला भाग झालें = तत्करणं मे भाग्यं अभवत्. भाग्यं अवश्यकं. तेंकरणें हा मराठींत समास आहे.

भाचं-चा-ची [ बहिणिस्स = बहिणिच्च = भणच्च = भंच्च = भांच = भाचं-चा-ची ] भावाला बहिणीचा मुलगा भाचा होतो, बहिणीला भावाचा म्हणजे भावाच्या बायकोचा म्हणजे वहिनीचा मुलगा भाचा होतो. (स. मं. )

भाज [ भार्य्या ] (भाजा पहा)

भाजणें [ ऊन भाजतें, या वाक्यांत जो भाज धातु येती तो संस्कृत टुभ्राजृ दीप्तौ धातूपासून आला आहे. भ्राज् = भाज] (भा. इ. १८३७)

भाजा [ भार्य्या = भाज्जा = भाजा, भाज ] (स. मं.)

भाजी [ (सं. ) भाजी = भाजी (म) ] ( भा. इ. १८३३)

भाजीवाला [ भाजीपाल: = भार्जावाला ]

भाट १ [ भट्ट ( क्षत्रिय व ब्राह्मणी यांचा पुत्र ) = भाट ]

-२ [ भट् परिभाषणे = भाट, बोभाट, बोभावणें ] (ग्रंथमाला)

भाटकन्, भाडदिनि [ चटकर पहा ]

भातकुट्या [ भक्तकुट्टक: = भातकुट्टा इ. इ.] (भा. इ. १८३३)

कोरपावली - कोरक. खा व

कोराळी - कोरकपल्ली. खा व

कोल्हाटी - क्रोष्टुवाटिका. खा इ

कोल्हापुर - कोल ( लोकनाम) - कोलकपुरं. खा म

कोल्हापूर - सह्याद्रीच्या कांहीं भागांतील पूर्वेकडे उघडणार्‍या खोर्‍यांना ज्याप्रमाणें मावळें म्हणतात, त्याप्रमाणेंच ह्या पर्वताच्या कांहीं भागांतील खोर्‍यांना कोल म्हणण्याची पुरातन कागदपत्रांत वहिवाट आहे. कोल्हापुराच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या खोर्‍यांना कोल म्हणत. ह्या कोलांतून देशांत येतांना वस्तीचा जो मोठा गांव त्याला पुरातन कालीं कोलापूर म्हणत व अर्वाचीन कालीं कोल्हापूर अथवा कोल्हापूर१ म्हणत. कोल्हा ह्या जनावराच्या नांवाशीं ह्या शहराच्या नांवाचा कांहींएक संबंध नाहीं. कोल्हापूरच्या पश्चिमेकडील खोर्‍यांत फार पुरातन काळीं कोल ऊर्फ कोळ लोक राहात होते, त्यावरून त्यांच्या प्रांतालाही कोळ म्हणत असत. सह्याद्री पर्वतांतील कातकरी, भिल्ल, कोळी, कातवडी वगैरे मूळच्या लोकांपैकींच हे कोल ऊर्फ कोळ होत. कोल्हापुराचें करवीर हें संस्कृत नांव सापेक्ष दृष्टीनें अलीकडील आहे असें दिसतें,
(महाराष्ट्र इतिहास मासिक, श्रावण शके १८२६)
(१ येथें कांहींतरी निराळा शब्द असावा पण मासिक छापतांना दोन्ही शब्द एकसारखेच पडले आहेत.)

कोल्हार - सं. प्रा. कोलाहलपुर. विजापूर, नगर. ( शि. ता.)
कोल्हारवाडी = सं. प्रा. कोलाहलपुर. पुणें. (शि. ता. )

कोल्हारें - सं. प्रा. कोलाहलपुर, ठाणें. ( शि. ता.)

कोल्ही - क्रोष्टु (कोल्हा) - क्रौष्टिका. खा इ

कोल्हें - क्रोष्टु (कोल्हा) - क्रौष्टुकं. २ खा इ

कोसगांव - कोश (जायफळ). खा व

कोसवण - कोश (जायफळ ). खा व

कोसुर्डें - कोश (जायफळ) - कोशपुरपद्रं. खा व

कोळगांव - कोल (लोकनाम ). खा म

कोळडी - कोल ( लोकनाम) - कोलवाटिका. खा म

काळदें - कोल (लोकनाम) - कोलपद्रं. ३ खा म

कोळपिंपरी - कोल ( लोकनाम ). खा म

कोळंबें - कोल (लोकनाम) - कोलांबिकं. खा म

कोळवद - कोल (लोकनाम). खा म कोळवन - (खांडववन पहा). 

कोळोदं - कोल (कोलनाम). खा म

कौशांबी - ( पलदी पहा).

भवरा [ अभिह्वरः crookedness, complexity, whirlpool = भवरा, भोवरा ] संसारस्य अभिह्वरे = संसाराच्या भवर्‍यांत.

भवानी [ भवंती a virtuous woman = भवानी ]
ए भवान्ये ! ही शिवी मराठीत उपरोधिक आहे.

भवाळ [ बहुवल्लभ = भोअल्लह = भवाळ ] राजे भोळे भवाळ असतात = राजानः बहुवल्लभाः सन्ति राजे लोकांना प्रेमपात्रें फार असतात असा अर्थ.

भविन्नल [ भू - णिच् भवयति निष्ठा भविन्न + ल (स्वार्थे ) = भविन्नला (झाला ) ]

भसकदिशि [ दृश् १ प्रेक्षणे. भाषकदृश = भसकदिशि ] ( धा. सा. श. व आडदीठ पहा)

भसकन् १ [ मस्क् १ गतौ ] (धातुकोश-भोसक ३ पहा)

-२ [ भृश् to be powerfull भृशति = भसकन् ] vahemently, powerfully.

भसदिशी [ भषकदृश् भसदिशी ] भषकदृश् म्हणजे कुत्र्याप्रमाणें.
भसदिशी अंगावर येतो म्हणजे कुत्र्याप्रमाणें अंगावर येतो.

भसभशीत [ भसित reduced to ashes ] भस् to reduce to ashes. imaginary धातु not given in धातुपाठ.

भसाडा [ भस् भर्त्सनदीप्त्योः ] भसाडा म्हणजे ठळठळित, ठसठसित. (भा. इ. १८३३)

भळभळाट १ [ बर्ह् १० प्रसरणे; बल्ह् १० प्रसरणे ] ( धा सा. श. )

-२ [ भ्लाश् १ दीप्तौ. भ्लाश् (द्विरुक्त) = भळभळाट ] भळभळाट म्ह० झळझळाट. ( धा. सा. श.)

भाईचार [ भ्रात्राचारः = भाईचार ]

भाउजी [ भ्रातृ + आर्य = भाव + अज्ज = भाउ + ज्ज = भाउज = भाउजी ] (स. मं.)

भाउली [ पुत्तलिका ] ( बाहुली २ पहा )

भाऊ १ [ भाम = भावँ = भाऊ ] बहिणीचा नवरा. (भा. इ. १८३३)

-२ [ (सं ) भाव ( Respected sir) = भाअ = भाऊ ( बहुमानार्थी ) ] हा शब्द खानदेशांत फार ऐकूं येतो. (भा. इ. १८३३)

भाऊबंध [ भ्रातृबंधु = भाऊबंध ] (स. मं.)

भाऊबाज [ भ्रातृद्वितीया = भाऊबीज ]

भरीत [ भरितं = भरीत ( लेह्य ) ] दध्रा भरितं = दह्याचें भरीत. दहीं वगैरे पातळ पदार्थांनीं केलेलीं वांगें इत्यादिकांचीं खाद्यें.

भर्तार [ भर्तृ = भर्तार ( अनेकवचन मराठींत) भातार ] (स. मं.)

भल ! [ भल ! = भल ! (ऋग्वेद) ]

भल ( ला-ली-लें ) १ [ वल्लभ = बल्लह = भल ( लाली-लें ) ] भला नवरा = वल्लभः नववरः . भली स्त्री = वल्लभा स्त्री. सर्व पुरुषांत स्त्रीला नवरा भला = सर्व पुरुषेषु स्त्रियः पतिः वल्लभः । भद्र व व्हल या दोन शब्दांपासून निघालेले भल शब्द निराळे.

-२ [ बहल ( पुष्कळ, दाट, घट्ट ) = भल (ला-ली-लें) ] भलें मोठें enormously great, hugely great.

भलंदन [ हें एका ऋषीचें व गोत्राचें नांव आहे. ] भलंदन म्हणजे मराठींत अगडबंब पुरुष. ( भा. इ. १८३४)

भलमोठें [ बहलमहत् = भलमोटें ] बहल म्हणजे अतिशय.

भला [ भद्रः friendly = भला friendly
भद्र ! = भल्या good man.
भद्रम् = भले good !, agreeable ! ]

भलारी [ भारहारः = भालार = भलारी ] भलारी म्हणजे भारा वाहाणारा पानांचा वगैरे. (भा. इ. १८३४)

भले [ भलम् ] (वल्हे पहा)

भलें १ [ वहलं (निबिडं, निर्भरं) भलें ] भलें मोठें = बहलं महत्

-२ [ भद्रं = भलें ( आर्द्र = ओल्ल. द्र = ल्ल ) ] (ज्ञा. अ. ९ पृ. १०३)

भलेरी १ [ भलकारिका = भलेरी ] भल रे दादा भल असें ओरडून सांवे निसणें, याला भलेरी म्हणतात.

-२ [ फलेग्रहि ( यथाकालीन फलद्रूपता ) = भलेरी ] work in a body for gathering in the fields.

भलोवा [ भलन्दनः ( एकशेष ) = भलः = भलोवा ( आदरार्थक ) ] ( भा. इ. १८३६)

भल्ल ( ल्ला-ल्ली-ल्लें ) [ भद्रः = भल्लः = भल्ल (ल्ला-ल्ली-ल्लें) ] भल्ला मोठा = चांगला जबर.

भवंड [ भ्रम ]

भवंडणें [ भोंवडणें पहा ]

भवया, भंवया [ भ्रुवर्तिका ] ( भिवया पहा )

कोचूर - क्रौंच - (कौंच ) पुरं. खा इ

कोटखांब - कोट्ट ( किल्ल ) - कोट्टस्तंभ. खा नि

कोटडें - कोट्ट (किल्ल) - कोट्टवाटं. २ खा नि

कोटर - कोट्ट ( किल्ल ) - कोट्टपुरं. २ खा नि

कोटली - कोट्ट ( किल्ल ) - कोट्टपल्ली. ४ खा नि

कोटली - कौटलिक (पारधी ) - कौटलिका. खा म

कोटवेल - कोट्ट (किल्ल) - कोट्टवेलं. खा नि

कोटार - कोट्ट ( किल्ल ) कोट्टागारं. २ खा नि

कोटी - कोटिक ( मृगाचा किडा ) - कोटिकं. खा इ

कोठली - सं. प्रा. कुस्थल (पुर). कोल्हापूर, बेळगांव. ( शि. ता. )

कोठपुर - सं. प्रा. कोट्टूर. बडोदा. (शि. ता. )

कोठरें - सं. प्रा. कोट्टूर. नाशिक. (शि. ता.)

कोठलें - सं. प्रा. कुस्थल (पुर ). सोलापूर, पुणें, ठाणें. (शि. ता.)

कोठूर - सं. प्रा. कोट्टूर. नाशिक. ( शि. ता.)

कोठोरें - सं. प्रा. कोट्टूर. खानदेश. ( शि. ता.)

कोंडणपूर - (सासवड जवळचें) कुंडिनपुर. ( संशोधक वर्षे ४ अं. १ )

कोडदें - कोट्ट ( किल्ल) - कोट्टपद्रं. खा. नि

कोंडाईबाई घाट - कुंडावतीद्वारिकाघाटः खा प

कोंडाण - कुंडिनपुर. (संशोधक वर्षे ४ अं. १ )

कोंडिबलें - सं. प्रा. कुंडिवाटक. रत्नागिरी. (शि. ता.)

कोंडिवडें - कुंडिवाटं. मा

कोंडिवडें - कुंडिवाटं. (कुंड नांवाच्या जातीचें गांव) मा

कोंडिवडें - सं. प्रा. कुंडिवाटक. पुणें, ठाणें. ( शि. ता.)

कोंडिवली - सं. प्रा. कुंडिवाटक. रत्नागिरी, कुलाबा. ( शि. ता.)

कोंढरज - कुध्र (पर्वत) कुध्ररजस्. २ खा नि

कोढीत - कुद्रि ( व्यक्तिनाम ) - कुद्रिवाटं. खा म

कोंतगांव - कुंत. खा नि

कोदळी - कोद्रवपल्ली. खा व

कोंदोली - कुंदपल्ली. २ खा व

कोपरली - कूर्पर-कूर्परपल्ली. खा न

कोपरेल - कूर्पर - कूर्परवेरं. खा नि

कोरट - कोरक. खा व

कोरटें - कोरकवाटं. खा व

भरकटणें [ अभ्यवकर्षणं = भरकरणें (र व क यांचा परिवर्त ) ] भरकटणें म्हणजे वांकडें तिकडें लिहिणें. (भा. इ. १८३६)

भरड [ भ्रद् ]

भरडणें [ अर्द् १० हिंसायाम्. अभ्यर्दनं = ( अलोप) भिरडणें = भरडणें ] ( धा. सा. श. )

भरणें १ [ वर्ह् परिभाषणहिंसाच्छादनेषु. वर्ह् to give = भरणें ( पैसा, फी वगैरे). वर्ह् to speak = भरणें ( रागें )] ( धा. सा. श. )

-२ [ भर्व (भर्वति ) अत्तिकर्मा (निघंटु ] तो अन्न भरतोहे = तो अन्न खातो आहे = स अन्नं भर्वति. (प्रयोजक) आई मुलाला अन्न भरवते. (भा. इ. १८३४)

भरताड [ मृतभांडकं = भरताड ] रहाटावरील भरलेलीं सर्व मडकीं.

भरपूर १ [ परिपूरत ]

-२ [ परिपूर्ण = भरपूर ] completely full.

- [ भूरिपृ = भूरिपूरं = = भरपूर ]

भरभरणें [ वर्भर्त्ति ( भृ ) = भरभरणें ] भरभरणें म्हणजे अतिशय भरणें. (भा. इ. १८३६)

भरभराटणें [ वर्बर्ढि ( बृह् वृद्धौ ) = भरभराटणें ] भरभराटणें म्हणजे अतिशय वाढ होणें. (भा. इ. १८३६)

भरमसाट [ भ्रमसृष्टिकं = भरमसाट ]

भरवसा १ [ पराश्वासः ] ( धातुकोश-भरवस ५ पहा)

-२ [ वरिवस्या = बरिवसा = भरवसा ] बरिवस्या म्हणजे पूजा, भक्ति. माझा त्याच्यावर भरवसा आहे म्हणजे भक्ति आहे.

-३ [ पर्यवसायः ( निश्चय, खात्री ) ] (ज्ञा. अ. ९ पृ. ७९)

भरंवसा [ परिविश्वास: ] ( धातुकोश-भरंवस पहा)

भराडी १ [ भरटक = भरडअ = भरडा = भराडी ] एका प्रकारचे भिक्षेकरी. ( भा. इ. १८३३)

-२ [ भरतः ( नट) = भराडी ] खेळ वरून पोट भरणारी एक जात आहे.

भरावसा [ पराश्वासः ] ( धातुकोश-भरवस ५ पहा)

भरिवसा [ परिविश्वासः ] ( धातुकोश-भरंवस पहा) म. धा.२०

भडभुंजा १ [ बरीभृंजक: ( भ्राज् to fry ) = भडभुंजा ] a fryer of grain.

-२ [ भृज् १ भर्जने. भरीभृजः = भडीभुंजा = भडभुंजा धान्य भाजणार ( धा. सा. श. )

-३ [ भृष्ट भुंजक = भट्ट भुंजअ = भडभुंजा ] भाजलेलें धान्य तयार करणारा तो भडभुंजा. (भा. इ. १८३३)

भडवा १ [ बटुकः contemptible chap = भडवा ] जा भडव्या get away chap.

-२ [ बटुक stupid fellow = भडवा ] भडव्या you stupid fellow.

भडाग्नी [ वडवाग्नि = बडआग्री = भडाग्नी ]

भडेराक्षस [ अभ्यधिको राक्षसः = भडे राक्षस ] भडे राक्षस म्हणजे राक्षसाहून मोठा राक्षस.

भणभणाट [ बण् १ शब्दे ] ( धातुकोश-भणभण २ पहा)

भतीजा [ भ्रात्रीयः = भतीजा ]

भत्ता [ मृत्य (वेतन, पगार ) = भत्ता ] ज्यादा पगार, वेतन.

भदें [ वपनं भद्राकरणं. भद्र = भद्द = भद ] तुझें भदें करून टाकतों = तुझी हजामत करतों. (ग्रंथमाला)

भद्र्या [ भद्रक = भद्र्या ]

भंपक [ भव्यक = भब्बक = भंपक ] (भा. इ. १८३२)

भपकारा [ अभ्यपक्रम: ] ( धातुकोश-भपकर पहा)

भप्प, भपपकन [ बाष्प = बप्फु = भप्प. भप्प + कन = भप्पकन (जाळ झाला ) ] (भा. इ. १८३२)

भंभाळ [ भंभालि = भंभाळ, बंबाळ ] आगीची भंभाळ म्हणजे आगीच्या धुराचा लोट.

भयाणा [ भयानक = भयाण ]

भयाभीत - हा शब्द रामदासांनीं उपयोजिला आहे.
उ०- " भयाभीत तो अक्षयी मोक्ष देतो," “भयाभीत निश्चित ये स्वस्वरूपी.” या समासाचा विग्रह भय + अभीत असा स्पष्ट आहे. परंतु त्यापासून विपरीत अर्थाची निष्पत्ति होते. तेव्हां भियाभीतः- भयाभीत अशा परंपरेनें हा युधिष्टिर सारखा मराठींत अलुक् समास समजावा. (भा. इ. १८३७)

० भर [भृत = भर] भर उन्हाळा = संमृतः ऊष्णकाल:

भर १ [ भर इति संग्राम नाम ( निघंटु ) ] संग्राम. वादाच्या भरांत तो वाटेल तें बरळतो, येथें भर याचा अर्थ युद्ध, संग्राम असा आहे. (भा. इ. १८३४)

-२ [ मासात् प्रभृति = महिना भर
वर्षात् प्रभृति = वर्षा भर
वर्षप्रभृति = वर्षभर
दिवसप्रभृति = दिवसभर
दिवसात्प्रभृति = दिवसा भर.]

कुसुंबवाडें - कुशांब (कुशनाभाचा वडील भाऊ). खा म

कुसुंबी - कुशांव (कुशनाभाचा वडील भाऊ) - कौशांबी. खा म

कुसुंबें - वनकौशांबी. खानदेश. (पा. ना.)

कुसुंबे - कुशांब (कुशनाभाचा वडील भाऊ), कौशांबिकं. ६ खा म

कुसुमतेल - कुसुंभतिलकं. खा व  

कुसूरु- कुशपुरं ( झाडावरून ). मा

कुळंधें - कुलत्थ-कुलत्थकं. खा व

कूड - कूट (गिरिशखर) - कूटकं. खा नि

कृष्णापुरी - कृष्णा. खा म

केकत - कीकट (लेकनाम) - कैकटं. खा म

केडगांव - सं. प्रा. खेटग्राम. पुणें. ( शि. ता.)

केडगांव - कैटभग्रामं = केडगांव.

केरसाणें - केलास (स्फटिक ) - केलासवनं. खा नि 

केरळें - सं. प्रा. केरल. सातारा. ( शि. ता.)

केर्‍हाळें - कैरवपल्लं. २ खा व

केवडी - कैवर्तक: (केवडा) - कैवर्तिका. २ खा व

केवडें - कैवर्तकः (केवडा ) - कैवर्तिकं. खा व

केळणी - कदलीवनी. २ खा व

केळझर - कदलीझरी. खा व

केळमळा - कदली - कदलमलय: खा व

केळवडी - सं. प्रा. केळवाडी. विजापूर. (शि. ता.)

केळा - कदली - कदलक: २ खा व

केळी - कदली. खा व

कोकण - गोकर्ण = कोकण्ण = कोकण.

कोंकण - कोंकण व नागलोक. कुकण (एका नागकुलाचें नांव) त्यावरून संस्कृतांत कुंकण, कौंकण व मराठींत कोंकण, कोकँण.
(राजवाडे लेखसंग्रह भा. २ पृ. २३२)

कोकणगांव - कुकुण (नागजातिनाम) - कुकुणग्रामं. खा म

कोकलें - कोकट (खोकट) - कोकटकं. खा इ

कोकलें - कोंक ( लोकनाम ) - कोंकपल्लं. खा म

कोकोडी - कोक (लांडगा) - कोकपद्रा. खा इ

कोचरें - सं. प्रा. कोच्चुरक. होनावर, रत्नागिरी, ठाणें. (शि. ता. )

कोंचरें - क्रौंचपुरं. खा इ